आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
नोएडाच्या सेक्टर ३१ मधील, D5 हे त्या भागातील रस्त्यावरचे शेवटचे घर आहे. हे पांढऱ्या रंगाचे घर असून आज ते रिकामं पडलेलं आहे. ह्या घरातील भयाण शांतता अंगावर काटा अंत असते. १३ वर्षांपूर्वी ह्या घरात एक असा प्रकार घडला होता, ज्याने सबंध देशाला हादरावून टाकले होते.
ह्या भागात राहणारे लोक आजही तेरा वर्षांपूर्वी घडलेल्या त्या अत्यंत अमानुष घटनांच्या आठवणी घेऊन जगत आहेत.
त्या भागातील लोक आजही त्या घराच्या व्हरांड्यात सापडलेल्या दोन मृतदेहांच्या आठवणी सांगत असतात.
डिसेंबर २००६ साली नोएडा जवळच्या निठारी ह्या गावातून आठ मुलं अचानक बेपत्ता झाली आणि ह्या घराच्या मागल्या बाजूस काम करणाऱ्या लोकांना काही मुलांचे मृतदेह हाती लागले आणि मग सबंध देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्याकांडाचा पर्दाफाश झाला.
मुलं बेपत्ता झाली तेव्हा निठारीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांनी पोलिसांकडे जाऊन तक्रार केली. पण पोलीस मात्र ह्या मुलांच्या अचानक बेपत्ता होण्यावर काही कारवाई न करता, शांत होते.
संतप्त पालकांनी त्या पोलिसांना जाब देखील विचारला पण पोलीसांनी हलगर्जीपणा केला.
झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब नागरिकाला त्या पोलिसांकडे न्याय मिळेल अशी आशा मावळत चालली होती. एकीकडे मुलं बेपत्ता आणि एकीकडे पोलिसांचा मनस्ताप, पालकांची फार दयनीय अवस्था झाली होती.
डिसेंबर २९, २००६ साली निठारी गावच्या दोन माणसांनी असा दावा केला की सुरेंद्र कोळी नामक त्याच गावचा निवासी असलेल्या नागरिकाचा मुलांच्या बेपत्ता होण्यात हात आहे. त्यांनी तिथल्या एका स्थानिक नेत्याच्या साथीने त्या घराच्या मागचा शोष खड्डा खोडून बघितला, त्यावेळी त्यांना तिथे दोन लहान मुलांचे सांगाडे आढळून आले.
हे समजताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि खूप मोठे गौडबंगाल जगाच्या समोर आले.
त्या भागात असलेल्या नागरिकांनी ह्या विरोधात आक्रोश करायला सुरुवात केली. त्यांनी आरोप केला की बंगल्याचा मालक असलेल्या मोहिंदर सिंग पंधेर यांनी पोलिसांना पैसे चारून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे.
पुढे ह्या प्रकरणात नागरिकांनी पोलीसांवर अविश्वास दाखवत निष्पक्ष चौकशीची मागणी सरकारकडे केली. नागरिक म्हणाले की ह्या प्रकरणात मुलांच्या मृतदेहांचा शोध देखील त्यांनीच लावला असून पोलीस फक्त तमाशा बघत बसले होते.
नागरिकांच्या दाव्याला खोडून काढण्यासाठी पोलिसांनी उत्तर दिले की प्रकरण वेगळे हे असू शकते आणि आम्हाला पंधरा मृतदेह सापडले नाही.
याचा परिणाम असा झाला की लोकांनी जनुकीय चाचणीची मागणी केली. ही चाचणी केल्यावर पोलीस खोटं बोलत असल्याचे समोर आलं आणि पोलिसांचं धाबं दणाणलं.
त्या घराच्या मागील बाजूस आलेले मृतदेह त्या वस्तीतून असलेल्या मुलांचे असल्याची ओळख पटली. मग त्याठिकाणी असे खोदकाम करणात आले आणि त्यात त्यांना १७ बालकांचे आणि एका स्त्रीचा मृतदेह आढळून आला.
३० डिसेंबर २००६ साली मोहिंदर सिंग पंधेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोळी यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
पायल सिंह ह्या २० वर्षीय तरुणीचा बलात्कार आणि तिची हत्या करून तिला घराच्या मागच्या बाजूला पुरलं असल्याचा कबुलीजबाबा त्याने दिला. ऑक्टोबर २००६ मध्ये पायल अचानक गायब झाली होती, तिचा फोन बंद होण्यापूर्वी तिची शेवटची लोकेशन ह्या घराच्या इथे आली होती. यामुळे पोलिसांना ह्या दोघांचा सुगावा लागला.
त्याठिकाणी पायलचा मृतदेह शोधायला गेलेल्या पोलिसांना त्याठिकाणी अजून लहान मुलांचे मृतदेह आढळून आले होते आणि ह्या प्रकरणात ह्या दोन जणांवर संशय बळावला.
पायलच्या वडिलांनी देखील पोलिसांनी आपल्याला अजिबात सहकार्य केलं नसल्याची भावना बोलून दाखवली.
आता पोलिसांच्या एकूण चरित्रावर संशय निर्माण झाला होता. पोलिसांची एकूण वागणूक अशी संशयास्पद असल्याने स्थानिकांनी ह्या प्रकरणी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली, अखेरीस केंद्र सरकारने सीबीआयची नेमणूक ह्या प्रकरणाचा तपास करायला केली.
त्या ठिकाणी सापडलेल्या दहा सांगाड्याची ओळख पटवण्यात आली, त्याठिकाणी तब्बल ३१ मुलांचे मृतदेह आढळून आले होते. ह्या सर्व लहान मुलांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले होते.
सर्वात आधी त्यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या डॉक्टरचा तपास करण्यात आला पण पोलिसांन तिथे काही आढळून आले नाही. पोलिसांना संशय होता की त्या माणसाचे कृत्य असावे, पण जेव्हा यांचे कृत्य समोर आले तेव्हा पोलिसांन ही धक्का बसला.
लहान मुलांचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केला जात होता, त्या मुलांचे तुकडे तुकडे केले जात होते.
इतक्यावरच हा अमानुषपणा थांबला नव्हता, ह्या मुलांच्या शरीराचे तुकडे करून भक्षण केल्याचा कबुलीजबाब सुरेंद्र कोळीने नोंदवला होता. वेब कॅमवर याचे शुटींग करून त्या मुलांचे व्हिडीओ पोर्न साईटवर टाकले जात होते.
तब्बल दहा वर्षांनी ह्या संपूर्ण प्रकरणाचा निकाल २०१७ साली लागला होता. यात तब्बल १७ खुनांचे आरोप आणि अत्यंत गंभीर गुन्ह्यात सहभागी म्हणून सुरेंद्र कोळीवर ११ जन्मठेपेच्या शिक्षा ठोठवण्यात आल्या होत्या. २०१४ सालीच त्याला सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती, अगदी राष्ट्रपतीने देखील त्याचा दयेचा अर्ज फेटाळला होता.
फाशीची तयारी म्हणून त्याला मेरठला देखील पाठवण्यात आले, पण एका आठवड्याने एका याचिकेनंतर त्याची शिक्षा स्थगित करण्यात आली होती.,
२०१७ साली मोहिंदर सिंगला देखील ह्या ठिकाणी पायलच्या गुन्ह्यात अटक झाली आणि त्याला त्याचं नोकर सुरेंद्र कोळीसोबत जन्मठेपेची शिक्षा अखेरीस कोर्टाने सुनावली.
हे प्रकरण अजूनही कोर्टात असून दोन्ही गुन्हेगार आपली शिक्षा भोगत आहेत. त्या परिसरातून अचानक अदृश्य झालेल्या मुलांच्या मृत्युच्या दुखद आठवणीने त्या निठारी गावचे नागरिक आक्रोश करत आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.