आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
दुसरं महायु*द्ध संपलं आणि त्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले व यामुळे निर्माण झालेल्या स्थितीला शीतयु*द्ध असे म्हणतात. आता अमेरिकेने शीतयु*द्धाच्या काळात आपल्या भांडवलशाही धोरणांचा कसा प्रचार व प्रसार केला? हे आज जाणून घेऊ.
शीतयु*द्ध या नावानेच लक्षात येते की, या यु*द्धात शस्त्रांचा उपयोग न करता फक्त हे धमक्यांपर्यंत मर्यादित राहिले. शीतयु*द्धाचा मूळ उद्देश हा जगातील बहुतांश भागात आपलं वर्चस्व कायम ठेवणे. शीतयु*द्धाच्या वेळी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोघांनीही आपापल्या गटात मित्र राष्ट्रांना समाविष्ट करून घेतले व आपली लष्करी शक्ती मजबूत करायला सुरुवात केली.
आता हे शीतयु*द्ध होण्यामागची बरीच कारणे होती, इराणमधील सोव्हिएतचा हस्तक्षेप, टर्कीमध्ये सोव्हिएतचा हस्तक्षेप, युनानमध्ये साम्यवादी प्रचार, अमेरिकेची अणू चाचणी, आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्पर विरोधी प्रचार, बर्लिनचा वाद, बाल्कन कराराची उपेक्षा इत्यादी. हे शीतयु*द्ध १९४६ पासून ते १९८९ पर्यंत चालू होते. या शीतयु*द्धामुळे जगामध्ये आतंक, भीती आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं. शीतयु*द्धामुळे आ*ण्विक यु*द्धाची शक्यता वाढली आणि नाटो, ‘वॉरसाव पॅक्ट’सारख्या लष्करी आघाड्या निर्माण झाल्या. त्यामुळे या शीतयु*द्धाला “शस्त्रसज्ज शांती” असे ही म्हणतात.
आता या शीतयु*द्धाच्या तणावग्रस्त वातावरणात अमेरिकेने थेट सोव्हिएत युनियनमध्ये आपल्या भांडवलशाही विचारसरणीचा प्रचार प्रसार कसा केला हे जाणुन घेऊ. १९५९ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आइजनहोवर यांना थेट सोव्हिएत युनियनमध्ये अमेरिकन संस्कृती आणि भांडवलशाही धोरणांचा प्रचार आणि प्रसार करायचा होता.
आता हे करण्यासाठी अमेरिकेने मॉस्कोमध्ये “अमेरीकन नॅशनल एक्झीबीशन” सुरू केलं. या अमेरीकन नॅशनल एक्झीबीशनचं उद्घाटन करायला राष्ट्राध्यक्ष आइजनहोवर यांनी उपाध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना मॉस्कोला पाठवलं. या अमेरीकन नॅशनल एक्झीबीशनमध्ये अमेरिकन संस्कृतीशी निगडित विविध वस्तू व सेवा यांचं प्रदर्शन मांडलं होतं.
अमेरिकेच्या भांडवलशाही धोरणांचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता बऱ्याच अमेरिकन खाजगी कंपन्यांनी ही त्यांची उत्पादनं या एक्झीबीशनला आणली होती. पण अशी एक घटना घडली आणि शीतयु*द्धाची दिशाच बदलून गेली आता काय होती ती घटना ते पाहू.
वरील परिच्छेदात नमूद केल्याप्रमाणे अमेरिकेच्या भांडवलशाही धोरणांचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता बऱ्याच अमेरिकन खाजगी कंपन्यांनी ही त्यांची उत्पादनं या एक्झीबीशनला आणली होती. आता या कार्यक्रमात अमेरिकेचे उपाध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी जगासाठी व कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी भांडवलशाही धोरणं कशी योग्य आहेत या मुद्द्यावर त्यांनी भाष्य करायला सुरुवात केली.
त्यावेळी सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष होते ख्रुश्चेव्ह. ख्रुश्चेव्ह यांना निक्सन यांचा भांडवलशाही प्रचार काही आवडला नाही आणि त्यांना निक्सन हे सोव्हिएत युनियन व त्यांचा साम्यवादी विचारधारेला कमी लेखत आहेत असे वाटले. आता ख्रुश्चेव्ह यांनीही साम्यवाद कसा चांगला आणि भांडवलशाहीचे तोटे काय यावर भाष्य करायला सुरुवात केली आणि यावरून निक्सन आणि ख्रुश्चेव्ह यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. दोघेही काही केल्या माघार घेईनात. अशावेळी कोणताही ही माणूस करायच्या फंदात पडणार नाही पण एक माणूस होता जो मध्यस्ती करण्यासाठी सरसावला त्यांचं नाव होतं डोनाल्ड केंडाल.
त्या एक्झीबीशनला अमेरिकेच्या पेप्सी कंपनीचे प्रतिनिधी म्हणून खुद्द पेप्सी कंपनीचे उपाध्यक्ष मॉस्कोमध्ये उपस्थित होते. हे खाजगी कंपनीचे लोक मार्केटिंगच्या क्षेत्रातील उस्ताद असतात. ते केवळ एका चांगल्या संधीची वाट पाहत असतात. डोनाल्ड केंडाल यांनी निक्सन-ख्रुश्चेव्ह वाद ही आपल्या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठीची एकदम योग्य संधी आहे हे हेरलं आणि ते मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावले. मध्यस्थी करत असताना डोनाल्ड केंडाल यांनी ख्रुश्चेव्ह यांना शांत करत त्यांच्या हातात पेप्सीने भरलेला थंडगार ग्लास दिला.
आधीच शाब्दिक वादामुळे ख्रुश्चेव्ह आक्र*मक झाले होते व अशा अवस्थेत त्यांनी केंडाल यांच्याकडून तो पेप्सीचा ग्लास घेतला व ती पेप्सी ते प्यायले. आणि एखादा चमत्कार व्हावा अशी गोष्ट घडली, ख्रुश्चेव्ह एकदम शांत झाले व त्यांची नजर त्या ग्लासमधल्या पेप्सीवर गेली. डोनाल्ड केंडाल यांनी ख्रुश्चेव्ह यांच्या मनातील भाव हेरले व त्यांच्या ग्लासमध्ये अजून पेप्सी भरली. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना ही घटना म्हणजे मोठा चमत्कार वाटत होती पण त्या मागचं सत्य वेगळं होतं.
निक्सन यांना ख्रुश्चेव्ह यांचा शीघ्रकोपी स्वभाव माहीत होता, हे एक्झीबीशन यशस्वी करण्यासाठी निक्सन यांनी ख्रुश्चेव्ह यांच्या शीघ्रकोपी स्वभावाचा वापर करायचे ठरवले. निक्सन यांनी पेप्सीचे उपाध्यक्ष डोनाल्ड केंडाल यांना सोबत घेऊन एक योजना आखली ज्यात ते मुद्दाम ख्रुश्चेव्ह यांच्या सोबत भांडवलशाहीविरुद्ध साम्यवादी वाद घालतील व योग्य संधी साधून केंडाल ख्रुश्चेव्ह यांना पेप्सी देतील.
ख्रुश्चेव्ह आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पेप्सी आवडली आणि त्यांनी अमेरिकेसोबत पेप्सीच्या पुरवठ्याबद्दल करार करण्याची तयारी दर्शविली. एका यशस्वी स्टंटमुळे पेप्सी कंपनीला सोव्हिएत युनियनची अख्खी बाजारपेठ मिळाली. एवढा फायदा झाला म्हणून पेप्सी कंपनीने डोनाल्ड केंडाल यांना सीइओ म्हणून त्यांची बढती केली.
पण या सगळ्यात एक समस्या निर्माण झाली की ही पेप्सी नक्की खरेदी करायची तरी कशी?
शीतयु*द्धाच्या काळात सोव्हिएत युनियन ही एक बंद अर्थव्यवस्था होती. सोव्हिएत युनियनचे चलन रुबल याला सोव्हिएत युनियनच्या बाहेर जगात काही किंमत नव्हती आणि त्यांच्याकडे परकीय चलनाचा साठा देखील नव्हता. चलन तर नव्हते पण पेप्सी तर पाहिजे होती मग अशावेळी सोव्हिएत युनियनने पेप्सी खरेदी करण्यासाठी वस्तू विनिमय पद्धतीचा वापर करायचं ठरवलं.
सोव्हिएत युनियन हा थंडगार प्रदेश अंगात उष्णता निर्माण व्हावी या करता तिथे वोडकाचे सेवन करतात. शीतयु*द्धाच्या काळात सोव्हिएत युनियन वोडका उत्पादन करीत असे, मग अखेर असं ठरलं की अमेरिकेने पेप्सी द्यायची व त्याच्या बदल्यात सोव्हिएत युनियन त्यांना सरकारी उत्पादन असलेली वोडका देतील.
आता यामुळे सर्वात जास्त फायदा झाला तो पेप्सीचा, वस्तू विनिमय पद्धतीमुळे पेप्सी कंपनी ही अमेरीकेतील पहिली रशियन वोडका मोठ्या प्रमाणात आयात करणारी कंपनी ठरली आणि या आयातीमुळे सर्व अमेरिकेला पेप्सीमार्फत वोडकाचा पुरवठा व्हायला लागला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पेप्सी हे पहिलं अमेरिकन उत्पादन होतं जे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोव्हिएत युनियनमध्ये विकलं गेलं.
इथवर सगळं छान चालू होतं पण परत एक घटना घडली आणि सर्व चित्र बदलून गेलं. ती घटना काय होती ते पाहू.
१९७९ साली सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानवर आक्र*मण केलं. अमेरिकेने या घटनेची निंदा केली व त्यांचा समाचार घ्यायचं ठरवलं. सोव्हिएत युनियनला वाटत होतं की अमेरिका ही आता लष्करीदृष्टया आक्र*मक होईल पण अमेरिकेने असं काही न करता फक्त एक अफवा त्यांच्या बाजारपेठेत उठवली की अमेरिकन लोकांना आता रशियन वोडकाचा कंटाळा आला आहे. आयात केलेली वोडकाचा खप होत नाही म्हणून अमेरिका इथून पुढे सोव्हिएत युनियनकडून वोडका खरेदी करणार नाही. झालं..!
या अमेरिकेन सरकारच्या एका वाक्यामुळे सोव्हिएत युनियनचे धाबे दणाणले. अमेरिकन सरकारची ही भूमिका पाहून पेप्सी कंपनीने ही आता आपण पेप्सीचा पुरवठा वस्तू विनिमय पद्धतीने करणार नाही असे जाहीर केले. अमेरिका व पेप्सीच्या या भूमिकेमुळे अख्ख सोव्हिएत युनियन हताश झालं.
सोव्हिएत युनियनला पेप्सी तर हवी होती पण अमेरिकेला वोडका नको होती. अशावेळी आपण अशी कोणती गोष्ट देऊ शकतो ज्याच्या बदल्यात आपल्याला पेप्सी मिळेल हा विचार सोव्हिएत युनियनमध्ये सुरू झाला. जेव्हा शीतयु*द्ध सुरू झालं त्यावेळी सतत यु*द्ध या भीतीने अमेरीका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात शस्त्रास्त्र निर्मितीची एक स्पर्धा सुरू झाली ज्याला इंग्रजीत “आर्म्स रेस” असं म्हणतात. या आर्म्स रेसचा भाग म्हणून सोव्हिएत युनियन भरपूर प्रमाणात विविध शस्त्रास्त्र निर्माण केली होती.
आता सोव्हिएत युनियनने पेप्सीच्या पुरवठ्यासाठी १७ पाणबुड्या, २ विमान वाहू जहाज पेप्सी कंपनीला देऊ केले. या १७ पाणबुड्या, २ विमान वाहू जहाज यांची त्याकाळी किंमत होती तीन अब्ज डॉलर.
मग अखेर अमेरिकन सरकारच्या सल्ल्यानुसार पेप्सीने १७ पाणबुड्या, २ विमानवाहू जहाजं यांच्या बदल्यात तीन अब्ज किंमतीची पेप्सी सोव्हिएत युनियनला देऊ केली. एका शीत पेयाच्या बदल्यात एका खाजगी कंपनीला एवढी घातक शस्त्रास्त्रं मिळाली होती.
१९९१ साली सोव्हिएत युनियनचं विभाजन झालं आणि पेप्सीच्या प्रगतीचा रथ अखेर थांबला. याचं कारण म्हणजे आता पेप्सीला आता एका देशाला त्यांच्या उतपादनाचा पुरवठा करायचा नव्हता तर त्यांना पंधरा देशांना त्यांचे उत्पादन पुरवायचे होते. मागणी पुरवठ्याचा हा समतोल पेप्सीला राखता आला नाही व याचाच फायदा कोकाकोला कंपनीने घेतला आणि रशिया व इतर १५ देशांच्या बाजारपेठा पटकन काबीज केल्या.
सोव्हिएत युनियनकडून मिळालेली शस्त्रास्त्रं पेप्सीने स्वीडनमधील एका मोठ्या भंगार कंपनीला देऊन त्याची विल्हेवाट लावली. या सर्व प्रकरणाचा जर नीट विचार केला तर असं लक्षात येईल की १९४६ पासून जे अमेरिकन सरकार सैन्य व गुप्तहेर खात्यांना जमलं नव्हतं अशा बलाढ्य सोव्हिएत युनियनला एका पेप्सीसारख्या शीत पेय विक्री करणाऱ्या खाजगी कंपनीने त्यांच्या शीतपेयाच्या जोरावर निःशस्त्र केलं होतं. आणि त्याहून भयानक म्हणजे सोव्हिएत युनियनचे विभाजन झाल्यानंतर कोकाकोलाचा विस्तार थांबवण्यासाठी जर पेप्सीने त्यांना मिळालेली शस्त्रास्त्र वापरली असती तर काय झालं असतं?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.