The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

by द पोस्टमन टीम
31 January 2023
in मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करण्याची क्रेझ असणाऱ्या लोकांना कार आणि स्पोर्ट्स कार यातील कोणती गाडी तुम्ही निवडाल असा प्रश्न विचारल्यास निश्चितच स्पोर्ट्स कार हे उत्तर येईल. स्पोर्ट्स कार रस्त्यावरून जाताना आपसूकच आपलीही नजर तिच्याकडे वळतेच. याचे कारण, म्हणजे तिचा लुक आणि स्पीड.

भारतातही आज अनेक स्पोर्ट्स कार प्रसिद्ध आहेत. पण भारतात बनवली गेलेली पहिली स्पोर्ट्स कार कोणती तुम्हाला माहिती आहे का?

डीसी अवंती (DC Avanti) नावाची पहिली स्पोर्ट्स कार २०१२ साली लॉंच झाली. २०१२ साली झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये दिलीप छाब्रिया  (Dilip Chhabria) यांनी पहिल्यांदा ही स्पोर्ट्स कार प्रदर्शित केली होती.

डीसी अवंती या पहिल्या-वहिल्या भारतीय स्पोर्ट्स कारचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट पुण्याजवळील तळेगाव येथे होते. भारतीय बनावटीच्या या स्पोर्ट्स कारची किंमत त्यावेळी ३० लाखाहून जास्त होती. स्वदेशी वस्तूंचा सुरुवातीला कौतुकच होते तसेच काहीसे या स्पोर्ट्स कारच्या बाबतीतही झाले. लोकांना आपल्या देशातील उत्पादन म्हणून या कारबद्दल आकर्षण होते. पण, अवघ्या चार-पाच वर्षातच हे कौतुक संपुष्टात आले आणि ही स्पोर्ट्स कार जशी आली तशीच भंगारातही गेली.

डीसी अवंतीबद्दल आज लोकांना फारसी माहिती देखील नसेल. पण, भारतीय बनावटीच्या या स्पोर्ट्स कारबाबतीत नेमकं असं काय घडलं की, चार वर्षातच हा प्लांट गुंडाळावा लागला? जाणून घ्यायचं असेल तर हा लेख नक्की वाचा.

ही कार बंद का पडली हे पाहण्याआधी या कारची वैशिष्ट्ये नेमकी काय होती हे जाणून घेऊया.

२०१२मध्ये आलेली ही कार दिसायला एकदम आकर्षक होती. बहुतेक स्पोर्ट्स कार असतात तशीच देखणी आणि आकर्षक. ही कार हॅचबॅक होती. पुण्याजवळील डोंगराळ भागातून या कारचे टेस्टिंग करण्यात आले होते. कार तशी मजबूत होती पण, सुरक्षा मानकांचा विचार करता, त्या कसोटीवर ही कार अगदीच खोटी ठरली. स्पोर्ट्स कारमध्ये एअरबॅग्ज तरी हव्यातच ना? पण, या कारमध्ये अशा बॅग्जचा पत्ताच नव्हता. भारतीय कार एवढी एक खासियत सोडल्यास यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या.

हे देखील वाचा

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

या बयेनी नवऱ्याला तुरुंगातून पळवण्यासाठी चक्क पायलटचं लायसन्स मिळवलं होतं

घाटाच्या रस्त्यावर कार थांबलीच तर पूर्ण रस्ताच बंद होईल अशी त्याची रूंदी होती. आत ऐसपैस बसता येत असले तरी याची उंची कमी असल्याने जास्त उंचीच्या व्यक्तींसाठी ही कार थोडी अनकम्फर्टेबलच होती. आतमध्ये बऱ्याच आधुनिक ॲक्सेसरीज दिल्या होत्या. ग्राउंड क्लिअरन्स १७० मिमीचे असल्याने भारतीय रस्त्यावरून ही कार आरामात धावू शकत होती.

या कारला रेनॉल्ट बेस्ड २.० लीटर फोर-सिलिंडर टर्बो पेट्रोल मोटर बसवलेली होती. २५० बीएचपी मॅक्स पॉवर ३४० एनएम मॅक्स टॉर्क इतकी तिची क्षमता होती. २०० कमी/तास इतका तिचा वेग होता.

कारला रिअर विंडो छोटी असल्याने मागून येणाऱ्या गाड्या दिसयच्याच नाहीत ही याची एक मुख्य समस्या होती. शिवाय, २०१६ मध्ये वाहन परवाना मंत्रालयाने पर्यावरण आणि सुरक्षेच्या दृष्टीने जे नियम अंमलात आणले त्यातील नियमावलीनुसार ही गाडी अपात्र ठरली. त्याच वेळी या कंपनीचे मालक सुरेश छाब्रिया यांनी कर वाचवण्यासाठी म्हणून अनेक ठिकाणी कायद्याला गुंगारा दिल्याचेही स्पष्ट झाले.

आज स्वतः अँटिला हिल बॉम्ब प्रकरणात अडकलेले इन्स्पेक्टर सचिन वाझे यांनी छाब्रीयांच्या या अफरातफरीचा पर्दाफाश करून त्यांना अटक केली होती. छाब्रिया यांच्या अटकेनंतर डीसी अवंतीच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला जे टाळे लागले ते कायमचेच.

सुरुवातीला एक स्वच्छ प्रतिमेचे उद्योजक अशी ख्याती असलेले छाब्रिया यांच्या उद्योगाकडे फारसे कुणी संशयात्मक नजरेने पहिले नाही. पण, एकदा इन्स्पेक्टर सचिन वाझे यांना टीप मिळाली की, हॉटेल ताजच्या बाहेर एक डीसी अवंतीची स्पोर्ट्स कार उभी असून तिचा रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बनावट आहे. या गाडीचा माग काढताना पोलिसांना छाब्रीयांच्या इतरही कारनाम्यांची माहिती मिळाली आणि छाब्रिया स्वत:च्याच कंपनीत घोटाळा करण्याच्या, बनावट इंजिनचा वापर करून कार विकण्याच्या गुन्ह्यात अडकले गेले.

पोलिसांनी हॉटेल ताज समोरून ताब्यात घेतलेली डीसी अवंतीची स्पोर्ट्स कारचे रजिस्ट्रेशन तामिळनाडू मधील असले तरी कारचा चेसीस आणि व्हीआयएन नंबर मात्र हरियाणाच्या आरटीओ अंतर्गत नोंदवला होता तोही दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट्सच्या नावावर.

त्यानंतर पोलिसांनी अशाच प्रकारची अफरातफर केलेल्या ५ कोटी किंमतीच्या १४ गाड्या सील केल्या शिवाय ४० इम्पोर्टेड बॅटऱ्या पण ताब्यात घेतल्या. या सगळ्या अफरातफारीमुळे सरकारी कोषागाराला ४० कोटीचा फटका बसल्याचा अंदाज वर्तवला जात होता. सुरुवातीला हा सगळा घोटाळा लपून गेला असला तरी जेव्हा मुंबई पोलिसांना एकच इंजिन नंबर आणि चेसीस नंबरच्या अनेक गाड्या आढळून आल्या तेव्हा या घोटाळ्याचा खुलासा झाला.

उत्पादन प्रक्रियेतचा असा दोष आढळून आल्यानंतर डीसी अवंतीला पुन्हा एकदा आपले उत्पादन सुरू करता येईल, अशी शक्यता अजिबात नव्हती. तळेगाव दाभाडेच्या फॅक्टरीमध्ये आज डीसी अवंतीच्या कितीतरी गाड्या धूळखात पडून आहेत. अनेक वर्षे त्यांचा वापर झाला नसल्याने गाड्यांना गंज लागला आहे. त्यावर धुळीचे थर साचले आहेत. बघणाऱ्याला या गाड्या न वापरलेल्या आहेत असं सांगितलं तर अजिबात पटणारही नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे.

ADVERTISEMENT

हा घोटाळा उघड होण्यापूर्वी डीसी अवंतीची पुढील रेंज बाजारात आणण्याचाही छाब्रियांचा विचार होता. डीसी अवंतीचे पुढचे व्हर्जन हे इलेक्ट्रॉनिक स्पोर्ट्स कारचे असेल असेही त्यांनी जाहीर केले होते आणि त्यासाठीची तयारीदेखील सुरू केली होती. पण, आता कंपनीच्या उत्पादनावरच बंदी असल्याने डीसी अवंतीचा हा प्रोजेक्टही बंद पडला आहे.

भारताच्या पहिल्या स्पोर्ट्स कारची ही शोकांतिका दुर्दैवी असली तरी, येत्या काळात चांगल्या, दर्जेदार भारतात स्पोर्ट्स कार बनतील अशी अशा बाळगण्यास हरकत नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

या एका बँकेमुळे जगात पुन्हा आर्थिक मंदीचे सावट येऊ घातले आहे

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

7 September 2022
मनोरंजन

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

4 June 2022
मनोरंजन

या बयेनी नवऱ्याला तुरुंगातून पळवण्यासाठी चक्क पायलटचं लायसन्स मिळवलं होतं

22 April 2022
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

22 April 2022
मनोरंजन

‘त्या’ दिवशी उडती तबकडी बघून लंडनवासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता, पण…

20 April 2022
इतिहास

त्याच्या संशोधनाने कोट्यवधी लोकांना अन्न दिले आणि लाखोंना वेदनादायक मृत्यूही!

18 April 2022

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)