The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवृत्त झाल्यानंतर नेमकं कसं आयुष्य जगतात माहिती आहे का..?

by Heramb
2 January 2025
in राजकीय
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


अमेरिकेसारख्या देशाचे राष्ट्राध्यक्षपद भूषवणे यासारखे परमभाग्य नाही असे कदाचित आपल्याला वाटत असेल. काही अंशी ते खरंही आहे. २४ तास कडक सुरक्षा, भरभक्कम उत्पन्न, ऐषारामी महाल आणि असं बरंच काही राष्ट्राध्यक्षाच्या पदावर असतानाच मिळतं. पण काही डोंगर दुरूनच साजरे असतात.

कारण राष्ट्राध्यक्षपदाची मुदत सम्पल्यानंतर आणि व्हाइट हाऊस सोडल्यानंतरही त्यांच्या आयुष्यावरच निर्बंध येतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांचं आयुष्य कायमचंच बदलून जातं. तर राष्ट्राध्यक्षांच्या कारकीर्दीनंतरच्या आयुष्यावर या लेखाच्या निमित्ताने थोडक्यात नजर टाकू..

१. राष्ट्राध्यक्षपदाच्या समाप्तीनंतरही मिळणाऱ्या विशेष सोयी:

एखादा व्यक्ती ‘माजी राष्ट्राध्यक्ष’ झाल्यानंतरही त्यांना पेन्शन, प्रवास आणि वैद्यकीय सेवांमध्ये विशेष सोयीसुविधा मिळतात. १९५८ सालच्या “माजी राष्ट्राध्यक्ष” कायद्यानुसार राष्ट्राध्यक्षांना आजीवन पेन्शन दिले जाते. अमेरिकेच्या तिजोरीतून दरवर्षी सुमारे २ लाख डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम माजी राष्ट्राध्यक्षांसाठी पेन्शन म्हणून खर्च होते.

पेन्शनची वास्तविक रक्कम सिनेटच्या निर्णयावर अवलंबून असते. पण दरवर्षी माजी राष्ट्राध्यक्षाला दिले जाणारे पेन्शन हे ‘फर्स्ट लेडीला’ तिच्या पतीच्या मृत्यूनंतर दिल्या जाणाऱ्या वार्षिक रकमेच्या दहापट आहे. पतीचा मृत्यू झाल्यास ‘फर्स्ट लेडीला’ सुमारे २० हजार डॉलर्स वार्षिक रक्कम दिली जाते. विशेष म्हणजे जर कोणत्याही गंभीर आरोपांखाली आणि सर्व संमतीने एखाद्या राष्ट्राध्यक्षाला पदच्युत करण्यात येत असेल, तर त्यालासुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पेन्शन दिले जाते.

आर्थिक फायद्यांशिवाय कोणत्याही माजी राष्ट्राध्यक्षाला मोफत आरोग्य सेवा आणि प्रवासही मिळतो. राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही लष्करी रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार मिळू शकतात. ते स्वखर्चाने खाजगी आरोग्यसेवा आणि विमासुद्धा घेऊ शकतात.



माजी राष्ट्राध्यक्ष प्रत्येक वर्षी सुरक्षा आणि प्रवासासाठी दहा लाख डॉलर्स खर्च करू शकतात, याशिवाय अतिरिक्त पाच लाख डॉलर्स त्यांच्या जोडीदाराच्या प्रवासासाठी राखीव आहेतच.

२. ‘फक्त’ पेन्शनवरच का अवलंबून राहायचं? :

माणसाला कितीही पैसे मिळाले तरी ते कमीच वाटतात. तेव्हा वार्षिक पेन्शन २ लाख डॉलर्सपेक्षा जास्त असले तरीही पुस्तके लिहून भरपूर कमाई होऊ शकते. कारण महाशक्तीच्या शासन, प्रशासन आणि लष्करी सिस्टीमच्या व्यवस्थापनाचे किस्से वाचायला कोणाला आवडणार नाही?

हे देखील वाचा

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

आपल्या प्रोफेशनल अनुभवांशिवाय अनेक माजी राष्ट्राध्यक्ष प्रवास वर्णने आणि वैयक्तिक आयुष्यातील आठवणींवर आधारित पुस्तके लिहितात. आता राष्ट्राध्यक्षांचे अनुभव म्हटल्यावर त्याचं प्रकाशन आणि विक्री करण्यात शून्य अडचणी असतात. त्या पुस्तकांचा खपही चांगला होतो आणि त्यातून प्रचंड रक्कम उभी केली जाते.

जॉर्ज बुशच्या अशाच पुस्तकाच्या सुमारे ११ लाख प्रति विकल्या गेल्या होत्या आणि त्यातून त्याला ७० लाख डॉलर्स मिळाले. तर बिल क्लिंटनच्या अशा प्रकारच्या पुस्तकाच्या सुमारे २० लाख प्रति विकल्या गेल्या आणि त्याला १.५ कोटी डॉलर्स मिळाले, म्हणजेच जॉर्ज बुशच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट. ओबामा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकारच्या पुस्तकांच्या विक्रीतून ६ कोटीपेक्षा अधिक डॉलर्स कमावले.

जर कोणत्याही माजी राष्ट्राध्यक्षाला प्रभावी लिखाण जमत नसेल तर राष्ट्राध्यक्षाला सहज नोकरी मिळू शकते किंवा ते सहज स्वतःचा व्यवसाय करू शकतात. जॉर्ज वॉशिंग्टनने स्वतःची दारू-भट्टी सुरू केली होती तर हेन्री ट्रुमन याने व्हाइट हाऊस सोडल्यानंतर ग्रंथालयात नोकरी पत्करली.

जर नोकरी, लिखाण, व्यवसाय या तीनही गोष्टी जमल्या नाहीत तरी कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला वक्तृत्वाकला उत्तम प्रकारे जमते. बिल क्लिंटन यांनी राष्ट्राध्यक्षपदानंतर दहा वर्षांपेक्षा अधिक काळ विविध ठिकाणी भाषणे देण्यात घालवला. यातून त्यांना १०५ दशलक्ष डॉलर्सचा फायदा झाला.

३. ..पण सिक्रेट सर्विसचे सतत लक्ष राहणार:

कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षाला किती धोका असतो हे तुम्हाला समजलेच असेल. एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या डिक्शनरीमधून ‘प्रायव्हसी’ हा शब्द कायमचा काढून टाकावा लागतो. कारण राजकारणाच्या या क्षेत्रात कोणी राष्ट्राध्यक्षांची बाजू घेवो न घेवो पण त्यांचे सुरक्षा-रक्षकमात्र नेहमीच त्यांच्या बाजूने ‘त्यांच्या संरक्षणासाठी’ कटिबद्ध राहून उभे असतात. सुरक्षेच्या कारणास्तव हे सुरक्षा रक्षक राष्ट्राध्यक्षांना कधीही नजरेआड होऊ देत नाहीत. अमेरिकेचे प्रत्येक राष्ट्राध्यक्ष त्यांच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत एका सुरक्षा बबलमध्ये असतात.

राष्ट्राध्यक्षांना अनिश्चित काळासाठी सुरक्षा प्रदान करण्याचा कायदा २००९ साली लागू करण्यात आला. पण हे संरक्षण फक्त राष्ट्राध्यक्षांसाठी असते, त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी या सिक्रेट सर्व्हिसवर नसते. सिक्रेट सर्विसमुळे व्हाइट हाऊस सोडल्यानंतर आणि जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाल्यानंतरही, आरामात जिकडे पाहिजे तिकडे फिरण्याचे स्वातंत्र्य राष्ट्राध्यक्षांना नसते. ते खाजगी कारमधून कुठेही प्रवास करू शकत नाहीत, त्यांना फिरण्यासाठी सरकारी कारच अनिवार्य असते, याशिवाय मनात आल्यानंतर ते स्वतः ड्राइव्हसुद्धा करू शकत नाहीत.

व्हाइट हाऊस सोडल्यानंतरही त्यांना येणाऱ्या पर्सलची रीतसर डिलिव्हरी त्यांना करण्यात येते. कोणतेही पार्सल त्यांना पाठवण्यापूर्वी सिक्रेट सर्व्हिसचे कर्मचारी त्याची कसून तपासणी करतात. अशा अनेक पार्सलसमध्ये बॉ*म्ब सापडण्याच्या आजवर अनेक घटना घडल्या आहेत. पण सिक्रेट सर्व्हिस हे डाव वारंवार हाणून पाडते.

४. सुरक्षा कवचामधील लोकांशीच संबंध:

विविध निर्बंध आणि चार वर्षांच्या विशिष्ट जीवनशैलीमुळे अनेक राष्ट्राध्यक्ष एक प्रकारच्या सुरक्षा कवछामध्ये किंवा ‘सिक्युरिटी बबल’मध्ये राहतात, किंबहुना ते सुरक्षा कवछ त्यांच्यासाठी जाणूनबुजून तयार केले जाते. हे कवछ म्हणजे भौतिक गोष्ट नाही, पण राष्ट्राध्यक्षांच्या आसपास कोणीही येऊ नये यासाठी विविध प्रकारे काळजी घेतली जाते आणि तशी व्यवस्था निर्माण केली जाते.

राष्ट्राध्यक्ष क्लिंटन आणि बुश यांची मैत्री हे अशा प्रकारच्या सुरक्षा कवछातील जवळच्या संबंधांचे प्रमुख उदाहरण आहे. ते जरी विरोधी पक्षांमधील असले, तरीही ते एकमेकांना ‘ब्रदर फ्रॉम अनदर मदर’ मानतात.

राष्ट्राध्यक्षांच्या जीवनात निर्बंध असूनही, ते त्यांच्या लक्झरी ड्रीम कारचा आनंद घेऊ शकत नाहीत याचा अर्थ ते श्रीमंत नाहीत किंवा त्यांचा लोकांवर प्रभाव नाही असा होत नाही. शेवटी, युनायटेड स्टेट्सचा कोणताही माजी राष्ट्राध्यक्ष अजूनही सामान्य माणसापेक्षा खूप महत्त्वाचा असतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

१९९६ वर्ल्डकप – रणतुंगा म्हणाला, ‘आत्ताच फोटो काढू नका, उद्या ती ट्रॉफी आपल्याकडेच येणार आहे

Next Post

इस्लाम, ज्यू आणि ख्रिश्चन धर्मात असलेल्या समानता थक्क करणाऱ्या आहेत..!

Related Posts

राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

20 January 2024
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
Next Post

इस्लाम, ज्यू आणि ख्रिश्चन धर्मात असलेल्या समानता थक्क करणाऱ्या आहेत..!

हे आहेत आजवर न सापडलेले खजिने, ज्यांच्या शोधात लोक आजही आपलं आयुष्य पणाला लावतात

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.