The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

by Heramb
21 November 2023
in गुंतवणूक, विश्लेषण
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


कोरोना साथ आल्यानंतर ‘वर्क फ्रॉम होम’ची लाटच आली. पण जसजसा काळ पुढे जाऊ लागला त्याप्रमाणे पूर्णतः ‘वर्क फ्रॉम होम’ शक्य नाही हे कंपन्यांबरोबरच कर्मचाऱ्यांनाही लक्षात येऊ लागलं. घरांमधलं वातावरण, कलकलाट यांमुळे फक्त मीटिंग्सनाच नाही तर कामालाही अडथळे निर्माण होत होते. कालांतराने लॉकडाऊन आणि कोरोनाची लाट ओसरल्यानंतर मात्र अनेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ची मागणी केली.

कंपन्यांचा ‘वर्क फ्रॉम ऑफिस’चा आग्रह आणि कर्मचाऱ्यांची ‘वर्क फ्रॉम होम’ची मागणी यांच्यामध्ये संघर्ष टाळण्यासाठी एक सुवर्णमध्य काढण्यात आला. तो सुवर्णमध्य म्हणजे ‘हायब्रीड वर्क कल्चर’. ‘हायब्रीड वर्क कल्चर’मध्ये आठवड्यांतील ठराविक दिवशी ऑफिसमध्ये येऊन काम करायचं तर बाकी दिवशी वर्क फ्रॉम होम किंवा वर्क फ्रॉम अनिव्हिअर करायचं.

या सगळ्या गोंधळात मात्र ज्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीमध्ये समस्या येत होत्या त्यांच्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होताना दिसलं. अशा कर्मचाऱ्यांसाठी एक पर्याय होता तो म्हणजे विवर्क प्लॅटफॉर्म. अनेक कर्मचाऱ्यांबरोबर कंपन्यांनी देखील विवर्कची सेवा वापरून पाहिली.

विवर्क ही खरंतर एक रिअल-इस्टेट कंपनी आहे, ही कंपनी कर्मचारी किंवा कंपन्यांना कामासाठी जागा उपलब्ध करवून देते. या जागा सर्व आवश्यक सोयीसुविधांनी सुसज्ज असतात. एकेकाळी न्यूयॉर्क मधली सर्वोत्तम कंपनी, तसेच इतर स्टार्टअप्सना मार्गदर्शन करणारी ही कंपनी आता मात्र दिवाळखोर बनली आहे. विवर्कच्या याच प्रवासाचा आढावा घेण्यासाठी हा प्रपंच.

सुरुवात – २००८

ॲडम न्यूमन आणि मिग्युएल मॅक्केल्वे या दोन अमेरिकन तरुणांनी २००८ साली त्यांनी ग्रीनडेस्क नावाची एक कंपनी सुरु केली होती. ग्रीनडेस्क कंपनी कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी अमेरिकेतील ब्रुकलिन येथे पर्यावरणपूरक जागा उपलब्ध करून देत असे. दोन वर्षांतच त्यांनी ही कंपनी विकली आणि २०१० साली त्यांनी विवर्कची सुरुवात केली. मॅनहॅटनमधील सोहो येथे या कंपनीने सर्वप्रथम एक ऑफिस भाड्याने देऊ केले.

२०११ साली पेप्सिकोने आपले काही कर्मचारी विवर्कच्या ऑफिस स्पेसमध्ये काम करण्यासाठी पाठवले. पेप्सिको आणि विवर्कने मिळून विवर्कच्या ऑफिस स्पेसमध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या अनेक नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे विवर्कची ठिकाणे फक्त रिअल इस्टेटच्या स्वरूपात ऑफिसेस भाड्याने देणारी बनली नव्हती तर नव्या कंपन्यांना मार्गदर्शन करणारी देखील ठरली होती. २०१३ पर्यंत या कंपनीच्या ग्राहकांमध्ये ३०० पेक्षा अधिक स्टार्टअप्स होते. २०१४ पर्यंत विवर्क ही ऑफिस स्पेसेस भाड्याने देणारी न्यू यॉर्क शहरातील सर्वांत मोठी कंपनी बनली होती.

२०१६ पर्यंत सर्वकाही आलबेल सुरु होतं. २०१६ साली कंपनीने चिनी कंपन्या लिजेंड होल्डिंग्स आणि हॉनी कॅपिटलकडून ४३ करोड डॉलर्सचा निधी घेतला. यामुळे कंपनीचं मूल्यांकन (व्हॅल्यूएशन) १६०० करोड डॉलर्स झालं. जून २०१६ मध्ये कंपनीने अचानक एकूण स्टाफपैकी ७% स्टाफचा ले-आउट जाहीर केला आणि त्यानंतर हायरिंग देखील बंद केलं. याचदरम्यान जुलै २०१६ मध्ये, विवर्कने जोआना स्ट्रेंज या कर्मचाऱ्याला काढून टाकले आणि त्याने कंपनीवर खटला भरला, त्याने कंपनीचे आर्थिक उद्दिष्ट साध्य होणार नसल्याचा दावा केला. पण तसं काही घडताना दिसलं नाही.

हे देखील वाचा

जुगारात पैसे उडवून जिओनीच्या मालकाने या लिडिंग स्मार्टफोन कंपनीला कायमचं संपवलंय..!

झिम्बाव्वेने १० हजार करोड डॉलर्सपर्यंतच्या नोटा छापल्या होत्या, पण…

सरकारच्या या नियमामुळे भारतातील ‘गुगल अर्थ’ इमेजेस क्लिअर नसतात..!

स्वार्थ

२०१८ साली ॲडम न्यूमनने कंपनीच्या माध्यमातून गल्फस्ट्रीम G650 हे बिझनेस जेट ६ करोड डॉलर्सपेक्षा जास्त किमतीत खरेदी केले. हा निर्णय सीईओ ॲडम न्यूमनचाच होता, त्याने आपल्या वैयक्तिक वापरासाठी हे अवाढव्य विमान खरेदी केले होते. दुष्काळात तेरावा म्हणजे याच वर्षी कंपनीला २ करोड डॉलर्सचे नुकसानही सहन करावे लागले होते.

२०१९ साली कंपनीच्या शेअरहोल्डर्स, डायरेक्टर्स इत्यादींमध्ये काही अंतर्गत वाद असूनही इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) रिलीज होतो. आयपीओ रिलीज झाल्यानंतर दोन महिन्यांनी ॲडम न्यूमॅनने कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला, त्याच्याकडेच कंपनीचे सर्वांत जास्त शेअर्स होते, त्यानुसार डायरेक्टर्सच्या बोर्डकडून मतदान करून घेतले.

या सर्व घटनांमुळे कंपनीच्या मूल्यांकनामध्ये (व्हॅल्युएशन) प्रचंड घट झाली आणि आयपीओ रद्द करण्यात आला. ॲडमनंतर सॉफ्टबँकने विवर्कमध्ये सर्वांत जास्त गुंतवणूक केली होती, तेव्हा ॲडम न्यूमनने कंपनी सोडल्यानंतर त्याला १७० करोड डॉलर्स देऊन सॉफ्टबँकने टेकओव्हर केले. नोव्हेंबर २०१९ मध्ये कंपनीने सुमारे २४०० जणांना कामावरून काढून टाकलं. 

२०२० मध्ये कोरोनामुळे कंपनीला आणखी नुकसान सहन करावे लागले. १० फेब्रुवारी २०२० रोजी कोरोनामुळे १०० इमारती तात्पुरत्या बंद करण्याची घोषणा केली. होणाऱ्या नुकसानीमुळे मार्च २०२० मध्ये कंपनीने सुमारे २५० कर्मचाऱ्यांना काढून टाकले, एप्रिल २०२० मध्येही अशाच प्रकारे ले-ऑफ झाले. तर जून २०२० मध्ये दुसरा सीईओ मिग्युएल मॅक्केल्वेने आपण कंपनी सोडत असल्याची घोषणा केली. त्यानंतरच्या काळात कंपनीला आणखी ६६ वर्किंग स्पेसेस गमवाव्या लागल्या तर १५० हून अधिक ठिकाणी भाड्याचे दर कमी करावे लागले किंवा तेथील नियमांमध्ये काही बदल करावे लागले.

दिवाळखोरी 

२०१९ साली आयपीओच्या माध्यमातून एक पब्लिक कंपनी बनता न आल्याने २०२१ साली कंपनीला काहीही करून पब्लिक करायचं असं ठरवलं गेलं. ब्रॉक्स ॲक्विजीशन कॉर्प या कंपनीला विवर्क ९०० कोटी डॉलर्समध्ये विकण्यात आले आणि ‘स्पेशल-पर्पज अक्विजीशन कंपनी’ म्हणजेच एसपीएसीच्या माध्यमातून कंपनी पब्लिक करण्यात आली. स्पेशल-पर्पज अक्विजीशन कंपनी ही एक शेल कंपनी असून ज्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांना आयपीओ न करताच पब्लिक व्हायचे आहे, अशा कंपन्यांना ॲक्वायर करून पब्लिक कंपनी करते. पण अशा कंपन्या स्टॉक एक्सचेंजवर फार काळ टिकत नाहीत. २०२२ साली युक्रेनवरील रशियन आक्र*मणामुळे विवर्कने रशियामधील त्यांची सर्व कार्यालये बंद केली.

२०२३ पासून मात्र विवर्कवर न भूतो न भविष्यती असे संकट ओढवले आहे. यावेळी कंपनीचे मूल्यांकन (व्हॅल्युएशन) होते ३६ करोड डॉलर्स. २०१९ च्या सुरुवातीला याच कंपनीचे मूल्यांकन ४७०० करोड डॉलर्स होते. म्हणजेच २०१९ पासून एप्रिल २०२३ पर्यंत कंपनीच्या मूल्यांकनामध्ये सुमारे ९९.२३% घट झाली होती. 

जून २०२३ पर्यंत विवर्ककडे जगभरातील ३९ देशांमधील ७०० हून अधिक ऑफिसेस होते. यावेळी विवर्कने एकूण नफ्याच्या ८०% भाग यांच्या देखभाली किंवा अन्य खर्चासाठी घालवला. त्यांनी यासाठी वर्षभरात २७० करोड डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम खर्च केली होती. शेवटी ऑगस्ट २०२३ मध्ये, बंकरप्सी प्रोटेक्शनसाठी अर्ज द्यावा लागेल असे कंपनीने जाहीर केले.

३१ ऑक्टोबर २०२३ रोजी, विवर्कने बँकरप्सी प्रोटेक्शनसाठी अर्ज दाखल करण्याची तयारी करत आहे असे जाहीर केले. कारण कर्जदारांनी दिलेली मुदत ६ नोव्हेंबर रोजी संपणार होती. या सर्व घडामोडींमुळे विवर्कच्या स्टॉकमध्ये सुमारे ३७% घसरण झाली. ६ नोव्हेंबर रोजी विवर्कच्या स्टॉक्सची देवाण-घेवाण थांबवण्यात आली आणि त्यांनी युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ न्यू जर्सी डिस्ट्रिक्टमध्ये बँकरप्सी प्रोटेक्शनसाठी अर्ज दाखल केला आहे.

थोडक्यात विवर्कची वाढ वेगाने होत होती. पण त्यांनी अतिशय कमी वेळेत क्वालिटी किंवा अन्य गोष्टींचा तपास न करताच नवीन स्पेसेस घेतल्या, यामुळे ते सर्वप्रथम लॉसमध्ये गेले. शिवाय कंपनीचा सीईओ ॲडम न्यूमनला कंपनीच्या आर्थिक धोरणांबद्दल अजिबात गांभीर्य नसल्याचे दिसून येते. आर्थिक आघाडींवर कंपनीचे नुकसान होत असताना देखील तो वैयक्तिक कारणांसाठी पैशांची उधळपट्टी करत असे, कंपनीतून कर्ज घेत असे. या आणि अशा अनेक कारणांमुळे विवर्क चांगल्याच अडचणीत सापडलं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मुंगीएवढ्या लहान किड्यांनी इथं आपलं वेगळं साम्राज्यच उभं केलंय

Next Post

पाकीट विसरले म्हणून नाही तर स्टोअर कार्ड्सच्या या समस्येवर उपाय म्हणून क्रेडिट कार्ड सुरु झाले..

Heramb

Heramb

Related Posts

विश्लेषण

जुगारात पैसे उडवून जिओनीच्या मालकाने या लिडिंग स्मार्टफोन कंपनीला कायमचं संपवलंय..!

25 November 2023
विश्लेषण

झिम्बाव्वेने १० हजार करोड डॉलर्सपर्यंतच्या नोटा छापल्या होत्या, पण…

24 November 2023
विश्लेषण

सरकारच्या या नियमामुळे भारतातील ‘गुगल अर्थ’ इमेजेस क्लिअर नसतात..!

23 November 2023
इतिहास

पाकीट विसरले म्हणून नाही तर स्टोअर कार्ड्सच्या या समस्येवर उपाय म्हणून क्रेडिट कार्ड सुरु झाले..

22 November 2023
विश्लेषण

मुंगीएवढ्या लहान किड्यांनी इथं आपलं वेगळं साम्राज्यच उभं केलंय

20 November 2023
विश्लेषण

ॲक्रोमॅगली रोग झाल्याने प्रसिद्धी मिळालेल्या या माणसावरून श्रेकचं कॅरेक्टर बनवलंय..!

18 November 2023
Next Post

पाकीट विसरले म्हणून नाही तर स्टोअर कार्ड्सच्या या समस्येवर उपाय म्हणून क्रेडिट कार्ड सुरु झाले..

सरकारच्या या नियमामुळे भारतातील 'गुगल अर्थ' इमेजेस क्लिअर नसतात..!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023

जुगारात पैसे उडवून जिओनीच्या मालकाने या लिडिंग स्मार्टफोन कंपनीला कायमचं संपवलंय..!

25 November 2023

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)