आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमास या द*हश*तवादी संघटनेने ह*ल्ला केला. इस्रायल-पॅलेन्स्टाईन वाद गेल्या सात दशकांपासून चालत आला आहे. पण या वादाला सशस्त्र संघर्षाचं रूप १९८९ साली हमास या द*हश*तवादी संघटनेने केलेल्या ह*ल्ल्यानंतर प्राप्त झालं. बघता बघता हा संघर्ष वाढतच गेला.
अखेरीस २००५ साली इस्रायलने ८ किलोमीटर रुंद आणि ४१ किलोमीटर लांब असलेल्या गाझामधून माघार घेतली. पण हमास नावाची द*हश*तवादी संघटना यावरच थांबणार नव्हती, म्हणूनच २०१४ आणि २०२१ साली इस्रायल आणि हमासमध्ये हिं*सक संघर्ष उसळले. मागच्या महिन्यात तर हमासने ‘न भूतो न भविष्यती’ असा ह*ल्ला इस्रायलवर केला. या ह*ल्ल्यात शेकडो निष्पाप लोक मृत्युमुखी पडले, कित्येक कुटुंबं उ*ध्वस्त झाली, कित्येक तरुणांच्या स्वप्नांची राख झाली, कित्येकांचे आयुष्यभराचे श्रम वाया गेले.
७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये ‘सिमचत तोराह’ नावाचा सण साजरा केला जात होता, त्यानिमित्त अनेकांना सुट्टी होती तर एका ठिकाणी म्युजिक फेस्टिवल देखील सुरु होतं. नेमकं याच दिवशी गाझा पट्टीतून हजारो रॉ*केट्सचा मारा इस्रायलवर झाला. त्या नंतर हमासचे शेकडो द*हश*तवादी इस्रायलमध्ये घुसले.
सणानिमित्त सुट्टी असल्याने इस्रायलचे बहुतांश सैनिक आपापल्या घरी होते, याच संधीचं सोनं द*हश*तवाद्यांनी केलं होतं. इस्रायलमध्ये घुसलेल्या द*हश*तवाद्यांनी सामान्य नागरिक, वृद्ध, लहान मुलं, नवजात बालकं यांच्या निर्घृण ह*त्या करण्यास सुरुवात केली. स्त्रियांवर बला*त्कार झाले, मेलेल्यांच्या मृतदेहांची देखील वेगवेगळ्या प्रकारे विटंबना करण्यात आली.
निष्पाप, निःशस्त्र नागरिक आणि नवजात बालकांना ठा*र करणाऱ्या हमासच्या तथाकथित स्वातंत्र्ययो*द्ध्यांचे खरे हेतू जगासमोर आले होते. अमानवीय अ*त्याचार करणाऱ्या या नराधमांकडून कोणत्याही मानवी कृत्याची अपेक्षा सोडा, कल्पना देखील करता येणार नाही. याच गोष्टीला सिद्ध करत हमासच्या द*हश*तवाद्यांनी आणखी एक “पराक्रम” केला तो म्हणजे पीस ॲडव्होकेट विवियन सिल्वर यांची ह*त्या. पॅलेन्स्टाईनच्या लोकांवर अनंत उपकार करणाऱ्या ७४ वर्षीय विवियन सिल्वर नेमक्या होत्या कोण, जाणून घेऊया या लेखातून..

शांततेच्या पुरस्कर्त्या, इस्रायली-कॅनडियन विवियन सिल्वर यांनी आयुष्याची पन्नास वर्षे पॅलेन्स्टाईन लोकांना मदत करण्यात घालवली होती. अगदी कर्करोगग्रस्त गाझाच्या गरीब रहिवाशांना जेरुसलेम शहरापर्यंत जाण्यासाठी सीमा पार करून देण्यापासून, जेरुसलेम शहरात पोहोचवण्यापर्यंतची सर्व मदतही त्या करत असत. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या ह*ल्ल्यात आपण केलेल्या कामांमुळे त्यांनी निर्धास्त राहायला हवं होतं, पण घडलं उलटंच.
आपल्या मैत्रिणींना पाठवलेल्या काही शेवटच्या मेसेजेसमध्ये, सिल्वर यांनी आपल्या घरात द*हश*तवादी घुसल्याचे वर्णन केले आहे. तिच्या शेवटच्या मेसेजमध्ये “ते आत येत आहेत. मी क्लोझेटच्या दारामागे लपले आहे,” अशी वाक्ये होती. आणि ज्याची भीती होती तेच शेवटी घडलं. विवियन सिल्वर यांना हमासच्या द*हश*तवाद्यांनी किडनॅप करून गाझामध्ये नेलं होतं, असा अंदाज बांधण्यात आला. पण आता त्यांच्याच उ*ध्वस्त घरात त्यांच्या मृतदेहाचे अवशेष मिळाले आहेत. यामुळे त्यांचा मृत्यू झाला यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

त्यांना योनातन झेगेन नावाचा मुलगा देखील आहे. गेल्या आठवड्यात कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनशी बोलताना योनातन झेगेन म्हणाला, “हमासच्या ह*ल्ल्यात सिल्वरचे घर जळून खाक झाले होते आणि त्यावेळी एक मृतदेह सापडला होता, तिथे गोळ्या लागल्याचे कोणतेही पुरावे नसल्याने तिचे अपहरण करण्यात आले असेल असे कुटुंबाला वाटले.”
गाझामधील लोकांसाठी एवढं केल्यानंतरही त्यांना हे बक्षीस मिळालं. हमासच्या विचारसरणीनुसार, ‘ती काफिर (मुस्लिमेतर) होती’ हेच यामागे कारण आहे. विवियन सिल्वरची ही गोष्ट आपल्याला झाकीर नाईकच्या विधानाची आठवण करून देते, “तुम्ही जिथे कुठे काफिर पाहाल तेव्हा, तिथेच त्यांना मारून टाका.” इस्रायल-हमासचे यु*द्ध आणखी किती दिवस चालेल याची गणना करणे अवघड असले तरी यासारख्या विचारधारेचा संपूर्ण जगाला धोका आहे हे निश्चित..!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.