The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

आपल्या मित्राच्या अस्थि विसर्जित करायला स्टीव्ह वॉ चक्क वाराणसीत आला होता!

by द पोस्टमन टीम
13 April 2022
in क्रीडा
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


4 मार्च 2022 रोजी ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वाॅर्न याचे निधन झाले. ‘त्याची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचा मित्र स्टीव्ह वॉ भारतात आला आणि त्याने वाराणसी येथे गंगेमध्ये अस्थिविसर्जन केले’ अशा प्रकारच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे? जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

स्टीव्ह वॉ. बस नाम ही काफी है! तुम्ही क्रिकेटशी संबंधित असा अथवा नसा, स्टीव्ह वॉ हे नाव ऐकले नाही अशी व्यक्ती सापडणे विरळाच. 2004 मध्ये तो शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यावेळी भारताने सिडनी येथील चार सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली होती. ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्रेमींसाठी तर ऑस्ट्रेलियाचा हा माजी कर्णधार देवासमान आहे, पण त्या पलीकडेही त्याचे भारताशी वेगळे नाते आहे. ते नाते आहे क्रिकेटच्या पलीकडचे.

यापूर्वी कोलकात्यात मदर तेरेसा यांच्या कामाने प्रभावित होऊन स्टीव्हने समाजातील उपेक्षित मुलांसाठी काम करायचे ठरवले होते. 2009 पासून त्याची संस्था कुष्ठरोग झालेल्या मुलांसाठी काम करते. शिवाय ऑस्ट्रेलियामध्येही स्टीव्ह वॉ फाउंडेशन ही त्याची संस्था दुर्मिळ आजार असलेल्या मुलांना मदत करण्याचे काम करते.

हिंदू संस्कृती, चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा मानणारा आणि त्याबद्दल कुतूहल असणारा एक मोठा वर्ग आज भारताबाहेर आहे. भारतीय संस्कृती बद्दल अनेक परदेशी पर्यटकांना देखील कमालीचे आकर्षण असते. बरेचसे परदेशी खेळाडू, कलाकार, सेलिब्रिटी एकदा भारतात आल्यानंतर त्यांचे भारताशी कायमस्वरूपी नाते जोडले जाते, आणि पुढेही ते येथे या ना त्या कारणाने वरचेवर येत राहतात.

असाच 2017 मध्ये स्टीव्ह वॉ लोकांना वाराणसी मध्ये दिसला. त्यावेळी अनेकांना आश्चर्य वाटले. क्रिकेट संदर्भात एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा मीटिंगसाठी तो आला असावा असा अनेकांचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात मात्र तो आला होता एका वेगळ्याच कामासाठी. तो आपल्या मित्राच्या अस्थि विसर्जनासाठी वाराणसीला आला होता. त्याचा जवळचा मित्र असलेल्या ब्रायन याचे चार महिन्यांपूर्वी निधन झाले होते.

हिंदू संस्कृतीचा प्रभाव असलेल्या ब्रायनची आपल्या अस्थी गंगेच्या पात्रात विसर्जित व्हाव्यात ही अखेरची इच्छा होती. ब्रायन स्वतः चांभार (मोची) होता आणि त्याला कोणीही नातेवाईक नव्हते. त्यामुळे त्याची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी स्टीव्ह वाराणसीला पोहोचला. त्याच्याबरोबर त्याचा आणखी एक मित्र जॉन्सन हाही होता. वाराणसीहून एका गाईडला बरोबर घेऊन स्टीव्ह थेट दशाश्वमेध घाट येथे गेला, आणि तिथून एका बोटीने ते दोघे मनकर्णिका घाटावर पोहोचले. घाटावर जाऊन त्यांनी अस्थिविसर्जन केले. त्याचवेळी घाटावरील नयनरम्य दृश्यांचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

ADVERTISEMENT

स्टीव्ह वॉच्या सांगण्यानुसार ब्रायन स्वतः कृष्णभक्त होता आणि इस्कॉन मंदिराशी संबंधित होता. “माझ्यासाठी वाराणसीला भेट देणे हा एक अनोखा अनुभव होता. मला या शहराला खरोखर भेट द्यायची होती. येथे येऊन मनुष्य एक वेगळाच अध्यात्मिक अनुभव घेतो. आज माझ्या मित्राच्या अस्थिविसर्जनानंतर मला स्वतःलाही असेच काहीसे वाटत आहे. त्याचे आयुष्य फार खडतर होते आणि त्याला कुणी कुटुंबीयही नव्हते. गंगेमध्ये आपल्या अस्थिंचे विसर्जन व्हावे ही त्याची अखेरची इच्छा होती. मला त्याच्यासाठी काहीतरी करता आले यातच मला आनंद आहे”, असे स्टीव्ह याने सांगितले.

हे देखील वाचा

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

पाकिस्तानमध्ये त्यांच्याच विरोधात वीरू पाजीनं भारताचं कसोटीतील पहिलं त्रिशतक ठोकलं होतं!

टेस्ट क्रिकेटची बादशहा असलेली न्यूझीलंडची टीम २६ धावांवर ऑल आऊट झाली होती

हिंदू धर्मीयांसाठी काशी हे किती पवित्र क्षेत्र आहे हे सांगायची गरज नाही. येथे मृत्यू किंवा अंतिम संस्कार होणाऱ्याला मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे. हा भाग बाजूला सारला तरी स्टीव्हने केवळ मित्राला दिलेला शब्द पाळण्यासाठी जे पाऊल उचलले ते कौतुकास्पद होते, हे मात्र मान्य करावे लागेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

एका आजारामुळे या सैन्याच्या विजयाचे रूपांतर पराजयात झाले!

Next Post

जगातले सगळे डास नष्ट झाले तर..?

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

क्रीडा

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
क्रीडा

पाकिस्तानमध्ये त्यांच्याच विरोधात वीरू पाजीनं भारताचं कसोटीतील पहिलं त्रिशतक ठोकलं होतं!

16 April 2022
क्रीडा

टेस्ट क्रिकेटची बादशहा असलेली न्यूझीलंडची टीम २६ धावांवर ऑल आऊट झाली होती

15 April 2022
क्रीडा

ICC नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम आजही इंग्लंडचा हा क्लब बनवतो..!

15 April 2022
क्रीडा

रस्त्यावर भाजी विकणारा १८ वर्षांचा तिरंदाज भारतासाठी विश्वचषकाचं ‘लक्ष्य’ गाठणार आहे!

14 April 2022
क्रीडा

तब्बल १६ तास ६७३ चेंडूंचा सामना करत या पठ्ठ्यानं ब्रायन लाराचा विक्रम मोडून काढलाय!

13 April 2022
Next Post

जगातले सगळे डास नष्ट झाले तर..?

तब्बल १६ तास ६७३ चेंडूंचा सामना करत या पठ्ठ्यानं ब्रायन लाराचा विक्रम मोडून काढलाय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)