आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
एखादा बॅटर खेळताना शून्यावर आउट झाला तर डक आउट झाला असे म्हटले जात असे. अनेकदा एखादा बॅटर शून्यावर आउट झाल्यास डोनाल्ड डक चे कार्टून येत असल्याचे आपल्या अनेकांच्या लक्षात असेल. ज्यावेळी जगभरात अतिशय लोकप्रिय असलेला क्रिकेट खेळ कम्प्युटरवर गेम म्हणून आला, त्यावेळी देखील एखाद्या प्लेअरला शून्यावर आउट केल्यानंतर डोनाल्ड डकचे कार्टून येत असे. यामागे नेमकं कारण काय आहे असा प्रश्न कधी पडलाय? किंवा पडला असला तरी त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केलाय? यामागे नेमकं काय कारण आहे?
क्रिकेटमधील “डक” हा शब्द एका इनिंगमध्ये एकही धाव न काढता बाद झालेला फलंदाजासाठी वापरला जातो. क्रिकेटमधील “डक” या शब्दाची उत्पत्ती निश्चितपणे ज्ञात नाही, परंतु त्याच्या इतिहासाबद्दल अनेक दावे-प्रतिदावे केले जातात. अनेक लोकांच्या मते, “बदक” हा शब्द शून्य (0) अंकाच्या आकारापासून आला आहे, जो बदकाच्या अंड्यासारखा दिसतो. अनेकांच्या मते इंग्लंडचा राजकुमार शून्यावर आउट झाल्याने क्रिकेटमध्ये “डक आउट”ची संकल्पना आली. इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध डक आउट म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमनचा.
१४ ऑगस्ट १९४८ या दिवशी दक्षिण लंडनमध्ये सर डॉन ब्रॅडमन आपल्या करिअरमधील शेवटच्या खेळीची मैदानावर उतरला. प्रतिस्पर्धी असले तरी या विशेष क्षणी ब्रिटिश खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले आणि खेळाला सुरुवात झाली. पण फक्त दोन बॉल्स खेळून तो आउट झाला. एरिक होलीज या स्पिनरने ब्रॅडमनला दुसऱ्या चेंडूवर बोल्ड-आउट केले.
ब्रॅडमनने एकही रन न केलेल्या या मॅचनंतर त्याची ६ हजार ९९६ धावांची झंझावाती कारकीर्द संपली. आणि तेव्हापासूनच ‘डोनाल्ड डक’ या संकल्पनेची सुरुवात झाली. प्रसिद्ध डोनाल्ड डक कार्टून देखील याच खेळाडूवर आधारित आहे. १९४८ साली झालेल्या या मॅचनंतरच एखादा प्लेयर शून्यावर आउट झाल्यानंतर निराश झालेला डोनाल्ड डक दाखवायची प्रथा सुरु झाली असावी.
१९२०-२१ मध्ये ब्रॅडमनने स्थानिक क्रिकेट टीमसाठी खेळण्यास सुरुवात केली. १९२८-२९ साली झालेल्या ऍशेस मालिकेदरम्यान, एका क्रिकेट सामन्यात, असामान्य फलंदाजी शैली असलेल्या एका या राईट-हँडेड बॅटरने पहिल्या डावात फक्त १८ धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात १ रन केला होता. या परफॉर्मन्समुळे ब्रॅडमन यांना दुसऱ्या कसोटीसाठी वगळण्यात आले. मालिकेच्या अखेरीस त्यांच्या नावावर दोन शतकं आणि दोन अर्धशतकं होती, पण इंग्लंडच्या दौऱ्याच्या विस्डेनच्या अहवालात त्याचा उल्लेखही नव्हता. सर्वांचे लक्ष वेली हॅमंडच्या विजयी फलंदाजीवर होते.
काही महिन्यांनंतर मात्र, एकेकाळी वाईट परफॉर्मन्ससाठी वगळण्यात आलेल्या ब्रॅडमनच्या नावाची सर्वत्र चर्चा होती. त्याने कसोटी सामन्यांमध्ये ७ इनिंग्समध्ये तब्बल ९७४ धावा करून प्रसिद्ध इंग्लिश क्रिकेटपटू हॅमंडला मागे टाकले. त्याचा ‘पर इनिंग ऍव्हरेज स्कोअर’ १३९ च्या वर होता. एका कसोटी मालिकेत खेळाडूने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. त्या मालिकेतील ब्रॅडमनची एकूण धावसंख्या स्टीव्ह स्मिथने २०१९ च्या ॲशेस मालिकेत केलेल्या धावांपेक्षा २०० ने जास्त होती. ब्रॅडमनच्या ९९.९४ च्या प्रचंड सरासरीने तो क्रिकेटचा महान खेळाडू बनला.

टोनी शिलिंगलॉ नावाच्या एका इंग्रज माणसाने ब्रॅडमन इतका यशस्वी कशामुळे झाला हे समजून घेण्यासाठी सुमारे ३ दशके घालवली. ब्रॅडमनची बालपणी घरी गोल्फ बॉल आणि स्टंपसह सराव करण्याची अनोखी पद्धत ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली होती असे त्यांचे मत आहे. शिलिंगलॉ यांचा असा विश्वास आहे की त्याची सुरुवात सगळ्यांपेक्षा वेगळी आणि अन्युजुअल असूनही, ब्रॅडमनने वापरलेली पद्धत क्रिकेट शिकवण्यासाठी महत्त्वाची ठरेल.
या पद्धतीमुळेच ब्रॅडमनने कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हजारो धावा केल्या. या पद्धतीला शिलिंगलॉ “रोटरी पद्धत” म्हणतात. शिलिंगलॉ यांनी २००३ साली त्यांच्या “ब्रॅडमन रिव्हिजिटेड” या पुस्तकात याबद्दल लिहिले होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.