The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

एका आजारामुळे या सैन्याच्या विजयाचे रूपांतर पराजयात झाले!

by द पोस्टमन टीम
12 April 2022
in इतिहास
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगात विविध प्रकारचे अनेक रोग त्यांच्या लक्षणांमुळे आणि संक्रमणामुळे प्रसिद्ध आहेत. अगदी वातावरणातल्या बदलांमुळे होणारे, एखाद्या प्राण्यामधून नंतर मानवामुळे पसरणारे ते अगदी लैंगिक संक्रमणातून पसरणारे असे विविधांगी रोगांनी आणि आजारांनी शतकांपासून मानवाला हैराण केले आहे. लाखो लोक याला बळी पडले. अशाच एका भयानक रोगाने जर युद्धभूमीवर लढणारं पूर्ण सैन्यच संक्रमित झालं तर? तुम्ही म्हणाल काय राव काय पण सांगता. पण अहो खरंच एकदा असं झालंय! आज आम्ही तुम्हाला त्याचीच गोष्ट सांगणार आहोत.

तर, १४९२ साली इटलीमध्ये एक मोठं साम्राज्य अस्तित्वात होतं ते म्हणजे नेपल्सचं साम्राज्य. या साम्राज्यावर राजा अल्फान्सो याचं शासन होतं. त्याने धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करून नेपल्समधल्या पोप याला सरंजामी कर भरण्याची सक्ती केली आणि याला पोपने नकार दिला. राजाच्या या सक्तीमुळे पोपने फ्रांस च्या चार्ल्स (आठवा) याला नेपल्सच्या साम्राज्यावर आक्रमण करून इथे सत्ता स्थापन करण्याचं आमंत्रण दिलं.

१४९४ च्या उन्हाळ्यात, फ्रान्सचा राजा चार्ल्स (आठवा) त्याच्या ५० हजारांच्या सैन्यासह नेपल्सचं साम्राज्य जिंकण्यासाठी आणि त्याचा शासक असलेल्या अल्फोन्सो याला त्याच्या राजेपदावरून उलथून टाकण्यासाठी, उत्तर इटलीकडे निघाला.

फेब्रुवारी १४९५ मध्ये इटलीच्या भूमीवर मोठं युद्ध लढलं गेलं. या युद्धाचा शेवट हा चार्ल्सच्या विजयाने झाला, त्यानं नेपल्सचं साम्राज्य आपल्या हाती घेतलं.

भविष्यात जर अशा छोट्या मोठ्या लढाया झाल्या किंवा युद्ध होण्याची चिन्ह दिसली तर पुढे मध्यपूर्वेत लष्करी मोहिमा सुरू करण्यासाठी नेपल्सच्या राज्यातच लष्करी तळ बनवावा असं या विजयानंतर घोषित करण्यात आलं. त्यानंतर, फ्रेंच सैनिकांनी एक प्रकारे आनंदोत्सवच साजरा केला, मद्याचे अनेक पेले रिचवले, वेगळ्याच धुंदीत ते हे यश अनुभवत होते. पण अगदी काहीच दिवसात, या संपूर्ण सैन्याला एका भयंकर ‘लैंगिक संक्रमित रोगाचा’ सामना करावा लागला !

त्यावेळच्या नोंदीनुसार ५० पैकी ४५ हजारापेक्षा जास्त पुरुष या लैंगिक संबंधातून संक्रमित झालेल्या रोगाचे बळी ठरले. युद्धात जेवढी हानी झाली त्याहून कित्येक पटीने अधिक सैनिक या रोगामुळे मरण पावले होते. सैनिकांमध्ये पसरलेला हा एक नवीन रोग दिसून आला, ज्याला नंतर ‘सिफिलीस’ (उपदंश किंवा गुप्तरोग) असे नाव देण्यात आले. आणि संक्रमित झालेल्यांपैकी बहुतेकांचे मृत्यू हे या सिफिलीसमुळेच झाले होते.

त्यावेळी उपलब्ध असलेल्या अशा जुन्या वैद्यकीय पद्धतींमुळे, तसेच लैंगिक संक्रमित रोगांबद्दल फारच कमी ज्ञान असल्यामुळे, सैन्यासोबत असलेल्या डॉक्टरांना सिफिलीसची लागण झालेल्या एकाही सैनिकाला वाचवण्यात यश आले नाही. त्याहून वाईट गोष्ट म्हणजे त्यापैकी अनेक सैनिक कल्पनेच्या पलीकडील असह्य वेदनांनी मृत्युमुखी पडले.

इतिहासात अनेक ठिकाणी, अगदी भारतातही ब्युबोनिक प्लेग या रोगाचा उल्लेख बऱ्याच प्रमाणात आढळतो. या रोगाने आजवर युरोप, अमेरिका, आशिया अशा सर्व प्रदेशांमध्ये लाखो लोकांचे बळी घेतले. पण हा नव्याने दिसून आलेला सिफिलीस रोग वेगळा होता. त्याच्यामुळे झालेल्या मृत्यूची तुलना बुबोनिक प्लेगशी केली जाऊ शकत नसली, तरीही हा मानवी इतिहासातील सर्वात धोकादायक आणि विचित्र रोगांपैकी एक ठरला.

हे देखील वाचा

या दोन देशांमधील युद्ध तब्बल सहाशे वर्षांहून अधिक काळ चालू होतं!

या नकाशाने अब्राहम लिंकन यांना गुलामगिरी संपवण्यास भाग पाडले!

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

ADVERTISEMENT

याची लक्षणे फारच वेदनादायक आणि माणसाला वाळीत टाकावी अशी होती. यावर त्यावेळी असे काही उपाय होते जे त्यावर प्रभावी होण्यापेक्षा हानिकारकच ठरले. सिफिलीससारखे लैंगिक संक्रमित रोग, अनेक सैनिकांच्या मृत्यूचे कारण ठरले.

असे मानले जात होते की १४९३ मध्ये कोलंबसने सिफिलीस अमेरिकेतून युरोपमध्ये आणला होता. परंतु १९३४ मध्ये जेव्हा यावर जास्त अभ्यास केला गेला तेव्हा जुन्या नोंदींवरून असे दिसून आले की हा रोग १४९३ पूर्वीही युरोपमध्ये अस्तित्वात होता.

मग ही महामारी अतिशय वेगाने युरोपभर पसरू लागली. १४९७ मध्ये ती फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी, इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये मोठ्या प्रमाणात पसरली. १४९८ मध्ये हा रोग कलकत्ता, भारत येथे येऊन पोहोचला.

१५०० मध्ये सिफिलीस स्कॅन्डिनेव्हियन (उत्तर युरोपीय) देशांमध्ये, हंगेरी, ग्रीस, पोलंड आणि रशियामध्ये पोहोचला. १५२० मध्ये तो आफ्रिका, मध्य पूर्व, चीन, जपान आणि ओशनिया येथे पोहोचला.

या आजाराची सुरवातीला फारशी माहिती उपलब्ध नव्हती त्यामुळे कोणतेही अधिकृत किंवा लिखित असं नाव नसल्याने संशोधकांचा आणि डॉक्टर लोकांनाही याची माहिती नव्हती, म्हणून मग लोकांनीच या रोगाला जबाबदार असलेल्या शत्रूच्या नावावरून या रोगाला नाव दिले. फ्रेंचांनी याचं “नेपोलिटन रोग”, “स्पॅनिश रोग” किंवा “स्मॉलपॉक्स(देवीचा रोग)” असं नामकरण केलं.

इंग्रज आणि इटालियन लोकांनी याला “फ्रेंच रोग” म्हटले, जर्मन लोकांनी याला “फ्रेंच राक्षस” म्हटले, रशियन लोकांनी त्याला “पोलिश रोग” म्हटले. पोल आणि पर्शियन लोकांनी त्याला “तुर्की रोग” म्हटले. तुर्क लोक याला “ख्रिश्चन रोग” म्हणत, भारतात तो “पोर्तुगीज रोग” आणि जपानमध्ये “चायनीज स्मॉलपॉक्स” म्हणून ओळखला जात असे.

या रोगाची सुरुवात जननेंद्रियाच्या अल्सरने होते, त्यानंतर ताप येतो, स्नायू दुखतात आणि काही महिन्यांनंतर, संपूर्ण शरीरभर दुर्गंधीयुक्त गळू दिसू लागतात. यामुळे हाडे ठिसूळ होतात, शरीररचनेवर परिणाम होतो. विशेषतः कवटीवर याचा मोठा परिणाम होतो आणि एकूण शरीरच विकृत दिसू लागते. त्या वेळी, सिफिलीस आताच्या तुलनेत खूपच गंभीर होता आणि अधिक सहजपणे पसरतही होता.

या रोगाच्या परिणामांमुळे चार्ल्स आठव्याचे ४५ हजारांहून अधिक सैनिक इतके आजारी होते की रोगाचे वाढते परिणाम आणि भीतीमुळे संक्रमित न झालेल्या बाकी सनिकांनीही त्याची धास्ती घेतली.

मोठ्या पराक्रमाने चार्ल्स आणि त्याच्या सैन्याने इटलीच्या अजिंक्य अशा नेपल्स साम्राज्यावर सर्व शक्तीने विजय मिळवला होता त्या विजयाचं एका रोगाने पराजयात रूपांतर केलं. या सगळ्याची अखेर नैसर्गिक अपयशाने झाली. मैदानातील युद्ध जिंकूनही संपूर्ण सैन्याला या भयंकर आजारामुळे माघार घ्यावी लागली आणि चार्ल्स त्याच्या मोजक्याच सैनिकांसह आपल्या राज्यात परतला…


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

मिसाईल चुकून पडलं पाकिस्तानात पण फिलिपाईन एवढा का घाबरलाय?

Next Post

आपल्या मित्राच्या अस्थि विसर्जित करायला स्टीव्ह वॉ चक्क वाराणसीत आला होता!

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

इतिहास

या दोन देशांमधील युद्ध तब्बल सहाशे वर्षांहून अधिक काळ चालू होतं!

4 June 2022
इतिहास

या नकाशाने अब्राहम लिंकन यांना गुलामगिरी संपवण्यास भाग पाडले!

2 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

20 April 2022
इतिहास

ही आहे जगातील पहिली संघटित दहशतवादी चळवळ!

20 April 2022
इतिहास

त्याच्या संशोधनाने कोट्यवधी लोकांना अन्न दिले आणि लाखोंना वेदनादायक मृत्यूही!

18 April 2022
इतिहास

एका लहानशा दगडामुळं ग्रीक संस्कृतीच्या इतिहासाच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय!

15 April 2022
Next Post

आपल्या मित्राच्या अस्थि विसर्जित करायला स्टीव्ह वॉ चक्क वाराणसीत आला होता!

जगातले सगळे डास नष्ट झाले तर..?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)