The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी ‘पद्मिनी कार’ घेण्यासाठी कर्ज काढलं होतं

by द पोस्टमन टीम
10 January 2024
in मनोरंजन, इतिहास
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


जेव्हा आपण मुंबईला भेट देतो, तेव्हा स्टेशनच्या बाहेर आपल्या बऱ्याच काळ्यापिवळ्या टॅक्सीज आपल्या स्वागताला तयार दिसतात. ह्या सर्व गाड्या एकाच मॉडेलच्या असतात आणि ते मॉडेल म्हणजे फिएट पद्मिनी. १९७० -८० च्या दशकात भारतातील रस्त्यांवर या गाड्यांचे अधिराज्य होते.

१९६४ च्या सुरवातीला भारतात ऑटोमोबाईल निर्मितीला सुरुवात झाली. यावेळी भारतात दोन ऑटोमोबाईल कंपन्या होत्या, एक होती हिंदुस्तान मोटर्स लिमिटेड आणि दुसरी होती प्रीमियर ऑटो लिमिटेड. यापैकी प्रसिद्ध अँबेसिडर कार ही हिंदुस्तान मोटर्सची निर्मिती होती आणि पद्मिनी कार ही प्रीमियर ऑटो लिमिटेडची कार होती..

मजेशिर गोष्ट म्हणजे दोन्ही गाड्या या विदेशी गाड्यांची प्रतिकृती होत्या. अँबेसिडर ही मॉरिस ऑक्सफोर्डची कॉपी होती तर पद्मिनी इटलीच्या फैब्रिका इटालियाना ऑटोमोबाईल टोरिनो कंपनीच्या एका गाडीची कॉपी होती.

१९६४ साली प्रीमियरने ही गाडी फिएट पद्मिनी ११०० डिलाईट म्हणून लॉंच केली.

ही गाडी लोकांच्या पसंतीस उतरली आणि बघता बघता लोक या गाडीची खरेदी करू लागले. पुढे तीन चार दशकं या गाडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.



पद्मिनी ही फिएटची पहिली गाडी. ‘फिएट ५००’ तयार होण्याआधीच तयार करण्यात आली होती. १९५१ साली भारतीय बाजारात पद्मिनीला उतरवण्याची तयारी देखील करण्यात आली. मग पुढे १९५४ साली एक कार बाजारात आली, जिला लोक डकार म्हणून ओळखतात.

खरंतर ही फिएटची ११०३ -१०३ ही गाडी होती. ह्याच गाडीला पुढे मॉडीफाय करून फिएट पद्मिनी ११०० डी ह्या गाडीची निर्मिती करण्यात आली. १९६४ साली फिएटने लायसन्स घेऊन ह्या गाडीची भारतात निर्मिती करायला सुरुवात केली. आधी लोक ह्या गाडीला फक्त फिएट म्हणून ओळखत होते. पुढे काळ बदलला आणि लोक ह्या गाडीला पद्मिनी म्हणू लागले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

ह्या गाडीच्या कॉर्बोरेटरमध्ये चार सिलेंडरचे इंजिन होते. हे इंजिन ४० बीएचपी हॉर्स पॉवरचे होते. परंतु ह्या गाडीचा वेग फार कमी होता. ह्या गाडीचा टॉप स्पीड १२५ किलोमीटर प्रति तास इतका होता. आतून ही गाडी प्रवासासाठी अत्यंत आरामदायी होती. डॅशबोर्डच्या मोठ्या भागावर मेटल शीट होती. जी आजच्या गाड्यांमध्ये आढळून येत नाही. ह्या गाडीला चालवण्यासाठी एकदम सरळ बसावं लागत होतं.

१९६० -७० च्या दशकात रेसिंग ही एक स्वप्नच होते. अशा काळात देखील पद्मिनीला रेसिंग ट्रॅकवर उतरवण्यात आले होते. चेन्नईचा शोलावरम आणि कोलकाताचा सीएमएसस्सी हे रेस ट्रॅक त्याकाळी प्रसिध्द होते. परंतु त्याकाळी रेसिंगचा प्रकार साहसाचा समजला जात होता. असं असून देखील फिएटने दोन्ही ट्रॅकवर होणाऱ्या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. ह्या रेसमध्ये पद्मिनी बरोबर सिपाणीच्या डॉल्फिन आणि हिंदुस्थान मोटर्सच्या आंबेसेडर आणि स्टँडर्ड हेराल्ड यांनी देखील सहभाग नोंदवला.

फिएट आपल्या मजबुतीने ह्या ठिकाणी देखील आपले वर्चस्व राखण्यात यशस्वी झाली. पद्मिनीने त्यावेळेपासून लोकांच्या मनात अशी जागा निर्माण केली की आजसुद्धा लोकांना पद्मिनीची सफारी हवी असते.

फिएट पद्मिनी जशी जनसामान्य लोकांची आवडती गाडी होती तशीच ती फिल्मी सितारे आणि राजकीय नेत्यांची देखील आवडती गाडी होती.

आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेले लाल बहादूर शास्त्री १९६४ साली भारताचे पंतप्रधान झाले. त्याकाळी पद्मिनीची किंमत ही १२ हजार रुपये इतकी होती. परंतु शास्त्रीजी जवळ त्या गाडीच्या खरेदीसाठी पुरेसे पैसे नव्हते. अशावेळी त्यांनी कर्जावर ही कार विकत घेतली.

दुर्भाग्याने शास्त्रीजींचे कर्ज फेडण्याच्या आधीच निधन झाले. परंतु शास्त्रीजींच्या पत्नी ललिता यांनी ५००० रुपयांचे कर्ज फेडले होते. आजही त्यांची ती गाडी दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री मेमोरियल संग्रहालयात ठेवण्यात आली आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र देखील म्हणाले होते की फिल्मी जगतात प्रवेश करण्या अगोदर फिएट पद्मिनी त्यांच्या स्वप्नातील गाडी होती. धर्मेंद्रने देखील आपल्या चित्रपटाच्या यशानंतर ही गाडी विकत घेतली होती.

रजनीकांत, मामुट्टी, आमिर खान ह्यांनी देखील त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला ही गाडी विकत घेतली होती. जसा काळ पुढे जात होता एका पेक्ष्या एक गाडी रस्त्यावर येत होती. १९९१ ला जागतिकीकरण झाल्यानंतर अजून नवीन गाड्या भारतात आल्या, परदेशी गाड्यांना लोकांची पसंती प्राप्त झाली.

फिएटने देखील गाडीच्या मॉडेलमध्ये, इंजिनमध्ये आणि गियरबॉक्समध्ये बदल करून गाडी मॉडीफाय केली खरी पण लोकांच्या पसंतीस ही गाडी उतरू शकली नाही.

पुढे पेट्रोल डिझेलप्रमाणे बदल ह्या गाडीत केले गेले तरी लोक ही गाडी विकत घेत नव्हते. अखेरीस नाईलाजास्तव १९९७ साली ह्या गाडीची निर्मिती थांबवण्यात आली.

आज देखीळ पद्मिनी गाडीची क्रेझ जशीच्या तशीच आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत ही गाडी आजही आढळून येते. ही गाडी मुंबईत आढळण्याचे कारण म्हणजे कुर्ल्याला ह्या गाडीची निर्मिती केली जात होती. ह्या गाडीचे उलट्या दिशेने उघडणारे दरवाजे आजही लोकांना आकर्षित करत असतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

राम मंदिराच्या अस्तित्वाचा दावा एका मुस्लीम पुरातत्त्वशास्त्रज्ञाने केला होता

Next Post

रील लाईफमधील व्हिलन बनला रिअल लाईफ हिरो

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

रील लाईफमधील व्हिलन बनला रिअल लाईफ हिरो

या मातब्बर दलित नेत्याला पंतप्रधानपदाने थोडक्यात हुलकावणी दिली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.