The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तब्बल १६ तास ६७३ चेंडूंचा सामना करत या पठ्ठ्यानं ब्रायन लाराचा विक्रम मोडून काढलाय!

by द पोस्टमन टीम
1 May 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


सध्या क्रिकेट जगतात टी-ट्वेंटी आणि वनडे मॅचेस जास्त प्रमाणात खेळवल्या जातात. कमी वेळात सामन्याचा निकाल लागत असल्यानं प्रेक्षकांचा या क्रिकेट फॉरमॅट्सकडे जास्त कल आहे. असं असूनही कसोटी क्रिकेटनं अजूनही आपली लोकप्रियता टिकवण्यात यश मिळवलेलं आहे. एक काळ असा आला होता की, लोकांनी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हणण्याचं ठरवलं होतं. पण, कसोटी सामन्यांतील रोमांचकारी चढ-उतारांनी असं होऊ दिलं नाही.

असं म्हटलं जातं कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंचा पूर्ण कस लागतो. एखादा खेळाडू कसोटी क्रिकेट कशा पद्धतीनं खेळतो त्यावरून तो ‘लंबी रेस का घोडा’ आहे की नाही, याची पडताळणी होते. या कसोटी सामन्यांमधून जगातील अनेक महान खेळाडूंनी आपलं कौशल्य सिद्ध केलेलं आहं. काही मोजक्या फलंदाजांनी तासनतास उन्हातान्हात मैदानावर तळ ठोकून आपल्या संघाला संकटातून बाहेर काढलेलं आहे. अशाच मॅरेथॉन बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंमध्ये आता कॅरेबियन टेस्ट कॅप्टन क्रेग ब्रेथवेटचं नाव घ्यावं लागेल.

या पठ्ठ्यानं एक-दोन नाही तर तब्बल १६ तास बॅटिंग केली आहे. १६ तास म्हणजे ९६० मिनिटं क्रेग एकटा किल्ला लढवत होता. त्याच्या या विक्रमी खेळीनं अनेक क्रिकेट चाहत्यांना आणि तज्ज्ञांना कसोटी क्रिकेटचं महत्त्व पुन्हा एकदा समजलं आहे.

क्रीजवर असताना क्रेग ब्रॅथवेट एकदम एखाद्या संन्याशासारखा भासतो. कारण, आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना तोंड देताना त्याचं लक्ष आणि एकाग्रता कमालीची असते. त्याच्या फलंदाजीचं तंत्र साधं-सरळ आणि डोळ्यांना सुखावणारं आहे. तो क्वचितच बॉलला शरीरापासून दूर ठेवून खेळतो. इतरवेळी ड्राईव्ह शॉट्स तर त्याचे फेव्हरेट आहेतच.

ब्रॅथवेटनं अवघ्या १६व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आपल्या पहिल्याच सामन्यात त्यानं बार्बाडोससाठी फलंदाजी करताना ७३ धावा केल्या. २००९मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याला वेस्ट इंडिज संघात घेण्यात आलं. कारण, त्यावेळी वेस्ट इंडिज क्रिकेटमधील बहुतेक वरिष्ठ खेळाडू संपावर गेले होते. राखीव खेळाडू म्हणून वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं ब्रेथवेटशी करार केला होता.



धीरगंभीर असणाऱ्या क्रेग ब्रेथवेटच्या फलंदाजी शैलीची कायम शिवनारायण चंद्रपॉलशी तुलना केली जाते. ब्रॅथवेटनं २०१० मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजच्या अंडर-१९ संघात स्थान मिळवलं होतं. तेव्हा तो वेस्ट इंडिजचा सर्वाधिक धावा करणारा आणि चार अर्धशतकांसह ३३५ धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला होता. २०११ मध्ये क्रेगनं पाकिस्तानविरुद्ध घरच्या कसोटी मालिकेत दणक्यात पदार्पण केलं.

पुढे चालून, अनुभवाच्या आणि खेळाच्या बळावर त्यानं वेस्ट इंडिजच्या कसोटी संघांचं कर्णधारपद मिळवलं. एक कर्णधार म्हणून त्याची कारकीर्द असंख्य चढ-उतारांनी भरलेली आहे. सध्या वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडविरोधात कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट प्रचंड दबावाखाली होता. त्याच्या कर्णधार म्हणून त्याच्या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

गेल्या वर्षाच्या अखेरीस त्याची टीम श्रीलंकेविरुद्ध ०-२ अशी पराभूत झाली होती. ही सलग तिसरी मालिका होती जी कर्णधार म्हणून क्रेग जिंकू शकला नव्हता. वैयक्तिक पातळीवर तो स्वत:ही खराब फॉर्मशी झुंजत होता. या मालिकेपूर्वी स्वत:च्या फॉर्ममुळं तो संघातील स्थान किती काळ टिकवून ठेवू शकेल याबाबत शंका निर्माण झाली होती.

गेल्या १२ कसोटी डावांमध्ये त्याला फक्त दोन अर्धशतकं करता आली होती. देशांतर्गत सामन्यांतही तो छाप पाडण्यात अपयशी ठरला होता.

या सर्व परिस्थितीमुळं क्रेग ब्रेथवेटच्या दृष्टीनं इंग्लंडविरुद्धच्या सिरीजला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं होतं. पहिल्या सामन्यात त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर कसेतरी हातपाय मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यानं इतिहास घडवला. कॅरेबियन कर्णधाराच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळं वेस्ट इंडिजने बार्बाडोसमध्ये खेळलेला हा कसोटी सामना अनिर्णित ठेवला.

या सामन्यात ब्रेथवेटनं तब्बल १६ तास फलंदाजी करून एकूण ६७३ चेंडूंचा सामना केला. त्यानं एका कसोटी सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळणाऱ्या ब्रायन लारा आणि गॅरी सोबर्स या दिग्गजांचा विक्रम मोडला. क्रेग ब्रेथवेटनं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ७१० मिनिटे फलंदाजी करत ४८९ चेंडूत १६० धावा केल्या.

यानंतर दुसऱ्या डावात २८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी संघ मैदानात उतरला. यावेळी अवघ्या ३९ धावांमध्ये यजमानंच्या तीन विकेट पडल्या होत्या आणि संघावर पराभवाचं संकट घोंगावत होतं. मात्र, क्रेगनं कर्णधारपदाचा मान राखत दुसरी बाजू घट्टपणे लावून धरली आणि सामना अनिर्णित ठेवला.

दुसऱ्या डावात त्यानं २४५ मिनटे फलंदाजी करून १८४ चेंडूंचा सामना केला आणि नाबाद ५६ रन केले. या सामन्यातील दोन्ही डावांसह क्रेग ब्रेथवेटनं एकूण ६७३ चेंडू खेळले. कोणत्याही कॅरेबियन फलंदाजानं कसोटी सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा हा विक्रमही आहे. यापूर्वी २००४ मध्ये ब्रायन लारानं ५८२ चेंडू खेळले होते तर १९५८ मध्ये सर गॅरी सोबर्स यांनी ५७५ चेंडूंचा सामना केला होता.

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दरम्यान खेळवला गेलेली बार्बाडोस येथील कसोटी सामना क्रेग ब्रेथवेटप्रमाणं आणखी एका खेळाडूच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय सामना ठरला आहे. वेस्ट इंडिजच्या कर्णधारानं जर विक्रमी खेळी केली तर इंग्लंडचे खेळाडू कसे मागे राहतील.

इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लीचनं या सामन्यात एकूण ९४ षटकं टाकली. त्यानं पहिल्या डावात ६९.६ षटकं (ओव्हर्स) टाकली ज्यापैकी २७ मेडन होत्या. पहिल्या डावात त्यानं ११८ धावा देत तीन विकेट घेतल्या. यानंतर दुसऱ्या डावातही लीचनं २५ षटकं टाकली आणि १३ मेडन्ससह ३६ धावांत तीन बळी घेतले. इंग्लंडसाठी कसोटी सामन्यात एका गोलंदाजानं सर्वाधिक षटकं टाकण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी १९६२ मध्ये टोनी लॉक्स यांनी पाकिस्तानविरुद्ध ११५ षटकं टाकली होती.

ज्या लोकांनी निदान गल्ली क्रिकेट खेळलेलं आहे, त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी किती ताकद लागते याची नक्कीच जाणीव असेल. कुठल्याही फलंदाजासाठी १६ तास मैदानात उभं राहणं आणि कुठल्याही गोलंदाजासाठी ९४ षटकं टाकणं किती कठीण आहे, याची आपण कल्पनाही नाही करू शकतं. मात्र, क्रेग ब्रेथवेट आणि जॅक लीचनं हे प्रत्यक्षात करून दाखवलं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जगातले सगळे डास नष्ट झाले तर..?

Next Post

महायु*द्धाच्या दरम्यान ना*झींनी लुटलेल्या खजिन्याचं पुढे काय झालं?

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

11 September 2024
Next Post

महायु*द्धाच्या दरम्यान ना*झींनी लुटलेल्या खजिन्याचं पुढे काय झालं?

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.