The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अल्बर्ट आईन्स्टाईनने इस्रायलच्या राष्ट्रपतीपदाची चालून आलेली संधी नाकारली होती

by Heramb
22 October 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


अल्बर्ट आइन्स्टाईन भौतिकशास्त्राच्या क्षेत्रातील एक प्रतिभावान शास्त्रज्ञ तर होताच, पण ना*झीवादाचा निषेध, वंशवादावर टीका आणि ज्यूंच्या स्वतंत्र इस्रायल राष्ट्राचे समर्थन यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते मांडून त्याने आपले राजकीय आणि सामाजिक विचारही मांडले. जर्मनीमध्ये दुसऱ्या महायु*द्धापूर्वी त्याने ज्या परिस्थितीला तोंड दिले होते, त्यामुळे तो अशा मुद्द्यांवर आपली मते मांडत होता.

दुसर्‍या महायु*द्धादरम्यान ज्यू समुदायावर झालेल्या भयंकर अ*त्याचारांमुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीमुळे त्याला इस्रायल या ज्यूंच्या स्वतंत्र देशाचा सर्वेसर्वा होण्याची इच्छा असेल असे आपल्याला वाटेल. पण, आईन्स्टाईन खऱ्या अर्थाने बुद्धिजीवी होता, त्याला कधीही सत्ता नको होती, कारण त्याच्याकडे असलेली एकमेव शक्ती म्हणजे ज्ञान. १९३६ साली अमेरिकेत स्थलांतर करण्यापूर्वी, त्याला हिट*लरने जीवे मारण्याची धमकी दिली होती, म्हणूनच देशातून पलायन करण्याशिवाय त्याच्याकडे कोणताही पर्याय उरला नव्हता.

ना*झींनी उभारलेल्या छळ छावण्यांतून मुक्त झालेले बहुतेक ज्यू इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले. तेव्हाच पॅलेस्टाईनबरोबर संघर्ष होण्याची शक्यता असूनही इस्रायलमध्येच सुरक्षितता मिळेल हे त्यांना माहित होते. ६ फेब्रुवारी १९४९ रोजी इस्रायलचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडून येणाऱ्या चाइम वेइजमन यांनी अमेरिकन सरकारकरवी इस्रायलला नवे राष्ट्र म्हणून मान्यता मिळवून दिली.

त्यांनी १९५२ पर्यंत अर्थात त्यांच्या मृत्यूपर्यंत इस्रायलच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाताळली. त्यावेळी इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांनी अल्बर्ट आइन्स्टाईनला राष्ट्रपती पदासाठी प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले. अल्बर्ट आइन्स्टाईन पृथ्वीवरील सर्वांत मोठा यहुदी आणि कदाचित पृथ्वीवरील सर्वात महान माणूस आहे म्हणून त्याने इस्रायलचे राष्ट्रपतीपद स्वीकारावे, असे डेव्हिड बेन-गुरियन यांचे मत होते. 

१६ नोव्हेंबर १९५२ रोजी गुरियनने वॉशिंग्टनमधील इस्रायलच्या दूतावासाला पत्र लिहिले. त्यावेळच्या दूतावासाचे प्रमुख अब्बा एबन होते. एबन गुरियनच्या परिचयाचा होता. गुरियनने त्याला आइन्स्टाईनला इस्रायलचे राष्ट्रपती बनण्यास स्वारस्य आहे का हे जाणून घेण्यास सांगितले होते. उमेदवार होण्यापूर्वी आईन्स्टाईनला एक ‘इस्रायली’ म्हणून नागरिकत्व मिळवण्यासाठी इस्रायलमध्ये स्थलांतर करावे लागणार होते.



१८ नोव्हेंबर १९५२ रोजी आइन्स्टाईनने थेट गुरियनला एक पत्र लिहिले. त्याने ही ऑफर नकारण्याची वेगवेगळी कारणे सांगितली होती. या गोष्टींबद्दल त्याला बरंच काही समजलं असल्याचं त्याने या पत्रात नमूद केलं होतं आणि ही ऑफर न स्विकारण्याचं त्याने ठरवलं होतं. परंतु त्याच वेळी तो ही ऑफर स्वीकारणार नाही याचीही त्याला लाज वाटते असंही त्याने नमूद केलं. त्याने आपले संपूर्ण आयुष्य विज्ञानासाठी समर्पित केले आणि त्याने कधीही अधिकरणाचे किंवा राजकीय कार्य केले नाही म्हणून त्याला त्याचे गुण इस्रायलच्या अध्यक्षपदाच्या पदासाठी योग्य नाही असे वाटले.

त्याच्या पत्राचे बोल होते:

“आपल्या इस्रायल राज्याच्या (या) ऑफरमुळे मी खूपच प्रभावित झालो आहे आणि त्याच वेळी दुःखीसुद्धा झालो कारण मी ते स्वीकारू शकत नाही. आयुष्यभर मला (राजकारण सोडून) वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागले आहे, म्हणून माझ्याकडे लोकांशी चांगले वागण्याचा आणि अधिकृत कर्तव्ये पार पाडण्याचा अनुभव या गोष्टींचा आभाव आहे. केवळ ही कारणे लक्षात घेता, राष्ट्रपतीपदाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी मी पात्र नाही असे मला वाटते. माझे म्हातारपण या गोष्टी पुन्हा अवगत करण्याचे सामर्थ्य परत मिळवून देणार नाही. या परिस्थितीमुळे मी आणखी दु: खी झालो आहे. कारण, जेव्हापासून मला जगातील राष्ट्रांमधील अनिश्चित परिस्थितीची जाणीव झाली आहे तेव्हापासून ज्यू लोकांशी माझे नातेसंबंध सर्वांत मजबूत बनले आहेत!”

आइन्स्टाईन शांततावादी होता आणि तसा विचार केला तर त्याच्या दृष्टीने त्याला ज्यांचे नेतृत्व करायचे होते ते लोक पूर्णतः वेगळे होते, म्हणूनच आइन्स्टाईनने अध्यक्षपदासाठी नकार दिला, असे अनुमानही दीर्घकाळापासून लावले जात आहेत.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ब्रिटिश आणि ना*झींची बोलणी घडवून आणणारी ‘ना*झी स्पाय प्रिन्सेस’ स्टेफनी

Next Post

रंगना हेराथने श्रीलंकन क्रिकेट टीमला मुथैय्या मुरलीधरनची कमी भासू दिली नाही

Related Posts

राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

20 January 2024
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
Next Post

रंगना हेराथने श्रीलंकन क्रिकेट टीमला मुथैय्या मुरलीधरनची कमी भासू दिली नाही

आमदार-खासदार खरेदीच्या कार्यक्रमाला घोडेबाजार म्हणतात त्यामागे ही गोष्ट आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.