The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

इंदिरा गांधींवर नाराज होऊन राजकारण सोडलेला हा नेता बिनविरोध राष्ट्रपती बनला होता

by द पोस्टमन टीम
3 January 2021
in राजकीय
Reading Time:1min read
0
Home राजकीय

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब

भारतात १९६९ साली झालेली राष्ट्रपती निवडणूक एका वेगळ्याच कारणामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरली होती. आजही राजकीय क्षेत्रात या निवडणुकीची चर्चा होत असते. कॉंग्रेस सिंडीकेटच्या वतीने नीलम संजीव रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी इंदिरा गांधी आणि कॉंग्रेस सिंडीकेट यांच्यातील संबंध बिघडत चालले होते. पक्षावर इंदिरा गांधी ज्याप्रमाणे आपली हुकुमत गाजवत होत्या आणि पक्षाच्या या सिंडीकेट सदस्यांना विश्वासात न घेता त्यांनी एकतर्फी निर्णय घेण्याचा जो सपाटा चालवला होता त्यामुळे कॉंग्रेस सिंडीकेटचे सदस्य इंदिरा गांधींवर नाराज होते.

सिंडीकेटने नीलम संजीव रेड्डी यांना आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. पण, इंदिरा गांधींना हे अजिबात आवडले नव्हते. त्यांनी यावेळी स्वतःचा उमेदवार उभा केला आणि त्याला निवडून देखील आणले. नीलम संजीव रेड्डी हे खरे तर पक्षाचे एक ज्येष्ठ सदस्य होते, नेहरूंच्या निकटवर्ती वर्तुळातही त्यांचा समावेश होता. परंतु या राष्ट्रपती निवडणुकीत आलेले अपयश त्यांना अधिक तीव्रतेने झोंबले कारण, स्वतः इंदिरा गांधींनी त्यांच्याविरोधात काम केले होते. या अपयशानंतर त्यांनी राजकीय संन्यास जाहीर केला आणि ते आपल्या आंध्रप्रदेशातील मूळ गावी परतले.

राजकीय जीवनापासून दूर राहून त्यांनी आपल्या शेतीवाडीत लक्ष घालणे जास्त सोयीस्कर समजले. याचवेळी पक्षात कॉंग्रेस (ओ) आणि कॉंग्रेस (आय) अशी फुट पडली.

१९६७ साली त्यांना लोकसभेच्या अध्यक्षपदी बसवण्यात आले होते मात्र, या पराभवामुळे राजकारणातून त्यांचे मनच उडाले. त्यांनी राजकीय संन्यास जाहीर केला असला तरी, नियतीच्या मनात मात्र त्यांच्याविषयी काही वेगळेच होते. पाच वर्षानंतर त्यांच्याही ध्यानीमनी नसताना ते पुन्हा राजकीय जीवनात सक्रीय झाले आणि यावेळी राष्ट्रपती पदावर विराजमानही झाले.

यावेळी त्यांची राष्ट्रपती पदासाठीची निवड बिनविरोध झाली होती. राष्ट्रपतीपदावर बिनविरोध निवडून येणारे ते भारतातील पहिलेच राष्ट्रपती ठरले.

नीलम संजीव रेड्डी हे भारताचे सहावे राष्ट्रपती होते. एकदा राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर ते पुन्हा राजकारणात कसे सक्रीय झाले आणि राष्ट्रपतीपदासाठी सर्वानुमते त्यांच्या नावावर कसा शिक्कामोर्तब करण्यात आला याविषयी त्यांनी आपल्या आत्मकथेत लिहिले आहे.

‘विदाऊट फियर ऑर फेवर’ या आपल्या आत्मकथेत ते लिहितात, “१९७५ साली आणीबाणी लागू करण्यात आली होती. हैद्राबादमध्ये जेपींनी एक सभा बोलावली होती. योगायोगाने मी देखील तेंव्हा हैद्राबादमध्येच होतो. जेपींचे भाषण ऐकण्यासाठी म्हणून मीही श्रोत्यांच्यात जाऊन बसलो. सामान्य लोकांसोबत बसून मी कार्यक्रम ऐकत होतो. इतक्यात जेपींसोबत बसलेल्या एका व्यक्तीने मला ओळखले आणि मी या कार्यक्रमासाठी हजर असल्याचे त्याने जेपींच्या लक्षात आणून दिले. मग जेपींनी माझी इच्छा नसतानाही आग्रहाने मंचावर बोलावले.”

हे देखील वाचा

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

सीबीआयवाले इंदिराजींना अटक करायला गेले होते पण…

व्ही पी सिंहांनी मंडल आयोगाच्या तरतुदी लागू करण्याची घोषणा केली आणि संपूर्ण देशात आंदोलन पेटलं

मग नीलम रेड्डी यांनी जेपींसोबत सर्वानाजिक मंचावरून भाषणे देण्यास सुरुवात केली. आणीबाणी रद्द केल्यानंतर १९७७ मध्ये झालेल्या सार्वजनिक निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. यावेळी जनता दलाचे सरकार केंद्रात स्थानापन्न झाले. आता राष्ट्रपतींची निवड करण्याची संधी जनता दलाकडे होती. याचवेळी नीलम रेड्डी हे पहिल्यांदा बिनविरोध राष्ट्रपती म्हणून निवडून आले. पण, ही गोष्ट तितकीशी सोपी नव्हती. जनता दलातच त्यांच्या नावावर सहमती नोंदवताना अनेकांनी का-कू केली. अनेकांना त्यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी योग्य वाटत नव्हते. परंतु खुद्द जेपींनीच त्यांच्या नावाची शिफारस केल्याने कोणालाच त्याला थेट विरोध करून डावलणे शक्य नव्हते.

जेपींमुळेच मोरारजी देसाई पंतप्रधान पदावर बसू शकले होते. हे खरे असले तरी मोरारजी देसाई आणि जेपी यांच्यातही काही कारणावरून बिनसत होते.

नीलम रेड्डी हे जेपींच्या अगदी जवळचे होते. म्हणून मोरारजी त्यांच्या नावाला सहमती देण्यासाठी नाखूष होते. पण, मोरारजी सरकारला बाहेरून पाठींबा देणाऱ्या पक्षांची मात्र नीलम रेड्डी यांच्या नावाला सहमती होती. म्हणून मोराराजींचाही नाईलाज झाला.

नीलम रेड्डी एक असे राष्ट्रपती होते ज्यांनी आपल्या वेतनातील ७०% वाटा सरकारी तिजोरीत जमा केला. इतर राष्ट्रपतींप्रमाणे त्यांनी नोकरांचा लवाजमाही नाकारला. भल्या मोठ्या राष्ट्रपती भवनातील फक्त एकच खोली ते वापरत असत. अत्यंत साधे राहणीमान हेच त्यांचे खास वैशिष्ट्य होते. सामान्यातील सामान्य माणसालाही त्यांना थेट भेटता आले पाहिजे असे त्यांचे मत होते.

आंध्रप्रदेशच्या अनंतपुर जिल्ह्यातील इल्लूर या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब एक समृद्ध जमीनदार कुटुंब होते. घरी भरपूर मोठी शेती होती. गावात त्यांच्या वडिलांचा सन्मान केला जात असे. परंतु नीलम रेड्डी यांना मात्र घरी असलेल्या समृद्धीचा थोडाही हव्यास नव्हता. तरुणपणी ते स्वातंत्र्य लढ्यात उतरले. महात्मा गांधींच्या विचारांनी त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पाडला होता. स्वातंत्र्यानंतर ते नेहरूंचेही विश्वासू सहकारी बनले.

१९६२ साली आंध्रप्रदेशची निर्मिती झाली तेंव्हा ते आंध्रप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनीच त्यांना आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. त्यांनतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री देखील होते. इंदिरा गांधीं सरकारमध्येही ते कॅबिनेट मंत्री होते. तेंव्हा कॉंग्रेसमध्ये सिंडीकेटचे पारडे थोडे जड होते.

१९७७ साली राष्ट्रपती पदावर निवडून आल्यानंतर १९८२ पर्यंत ते या पदावर राहिले. त्यांच्या या कारकिर्दी दरम्यान त्यांनी तीन सरकार बदलताना बघितले. पहिले मोरारजी देसाई, त्यानंतर चरण सिंह आणि पुन्हा सत्तेत आलेल्या इंदिरा गांधीं सरकार.

जनतेच्या भल्यासाठी कामे करण्यात या तिन्ही सरकारांना सपशेल अपयश आल्याचे ते नेहमी म्हणत. राष्ट्रपती पदावरून निवृत्त होताना केलेल्या भाषणातही त्यांनी या तिन्ही सरकारांवर टीका केली.

राष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यावर ते पुन्हा आपल्या गावाच्या सध्या वातावरणात रमून गेले. लहानपणापासून घरी श्रीमंती आणि ऐश्वर्य पाहिलेल्या नीलम रेड्डी यांनी त्यांची ६० एकर जमीन सरकारकडे सुपूर्द केली.

ADVERTISEMENT

१ जून १९९६ रोजी न्यूमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाला.

साधे राहणीमान असलेले, फक्त गरजेपुरतेच मानधन स्वीकारून उर्वरित रक्कम सरकारी खजिन्यात दान करणारे एक साधेसुधे राष्ट्रपती म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

लेडी डायनाच्या आयुष्यातील रहस्य अजूनही उलगडले नाहीत

Next Post

जगण्यासाठी आवश्यक बनलेल्या वायफायचा शोध हॉलीवूडच्या या अभिनेत्रीने लावलाय

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

इतिहास

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021
सीबीआयवाले इंदिराजींना अटक करायला गेले होते पण…
राजकीय

सीबीआयवाले इंदिराजींना अटक करायला गेले होते पण…

11 December 2020
व्ही पी सिंहांनी मंडल आयोगाच्या तरतुदी लागू करण्याची घोषणा केली आणि संपूर्ण देशात आंदोलन पेटलं
राजकीय

व्ही पी सिंहांनी मंडल आयोगाच्या तरतुदी लागू करण्याची घोषणा केली आणि संपूर्ण देशात आंदोलन पेटलं

2 December 2020
जगातले सर्वात जास्त तेलाचे साठे असूनही या देशातल्या लोकांचे खायचे वांधे आहेत..
ब्लॉग

जगातले सर्वात जास्त तेलाचे साठे असूनही या देशातल्या लोकांचे खायचे वांधे आहेत..

2 December 2020
नेहरूंनी डॉ. राजेंद्र प्रसादांना सरदार पटेलांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी मनाई केली होती
इतिहास

भारताच्या स्वातंत्र्यदिनीच पटेलांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही अशा अफवा पसरल्या होत्या

12 November 2020
या माणसामुळे इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली होती
इतिहास

ज्या राजनारायण यांनी इंदिरा गांधींना हरवलं त्यांनाच पुढे जनता पक्षाने हाकलून लावलं

9 November 2020
Next Post

जगण्यासाठी आवश्यक बनलेल्या वायफायचा शोध हॉलीवूडच्या या अभिनेत्रीने लावलाय

सत्याग्रहाची आयडिया गांधीजींच्या या नातेवाईकाच्या डोक्यातून निघाली होती

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

21 April 2020
शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

20 June 2020
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

अफगाणी सैनिकांसाठी युद्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह ‘नलवा’

16 January 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021

Recent News

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!