The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

त्यांच्या दृष्टीने ‘असं’ करणे म्हणजे सौंदर्याचं प्रतीक आहे..!

by द पोस्टमन टीम
9 September 2023
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपल्या दृष्टीने आजूबाजूचं जग कितीही झगमगाटी झालं असलं तरीही आफ्रिका खंडात आणि ॲमेझॉन खोऱ्यात आजही कित्येक आदिवासी जमाती आपल्या मूळ निसर्गावर आधारलेल्या अवस्थेत आणि तशाच जीवनशैलीचा अंगीकार करून राहत आहेत. आपल्याला कधी आश्चर्यकारक वाटणाऱ्या, तर कधी निरर्थक वाटणाऱ्या प्रथा, परंपरा हे आदिवासी प्राणपणाने पाळत आहेत. कदाचित त्या प्रथांना आणि परंपरांना कवटाळणारी ही त्यांची शेवटची पिढी असू शकेल.

इथिओपियाच्या नैऋत्य प्रदेशात आढळणारी ‘मुर्सी’ ही आदिवासींची जमात ‘ओमो’ नदीच्या खोऱ्यात राहते. त्याचप्रमाणे ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुरी नावाची जमात वस्ती करून आहे. पूर्णपणे नैसर्गिक अवस्थेत जगणाऱ्या या आदिवासींची फार कमी संख्या आता शिल्लक असेल. मात्र, त्यांच्या त्यांच्या जमातीच्या पूर्वजांनी घालून दिलेल्या प्रथा, परंपरा ते टिकवून आहेत.

या आदिवासींमध्ये विशेषतः वयात आलेल्या युवतींसाठी प्रचलित असलेली अशीच एक प्रथा म्हणजे ओठात लाकडी किंवा मातीच्या सुशोभित ताटल्या (प्लेट्स) घालणे. त्यांच्या दृष्टीने ते त्यांच्या सौंदर्याचं प्रतीक आहे.

आपल्या ओठात जास्तीत जास्त मोठी प्लेट ठेवता यावी, यासाठी त्या नुकत्याच वयात आलेल्या बिचाऱ्या युवतींना मोठ्या यातनांतून जावं लागत. त्यासाठी त्या तयार असतात कारण जेवढी मोठी प्लेट तेवढी ती युवती अधिक सौंदर्यवान मानली जाते.

File:Mursi Tribe, Lip Plate (8422030927).jpg - Wikimedia Commons

सुशिक्षित आणि त्या आदिवासींपेक्षा सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या पाश्चिमात्त्य समाजातील काही लोकांनीच त्यांच्या अशा प्रथांचा बाजार करून स्वतःच्या तुंबड्या भरून घेतल्या. त्या बिचाऱ्या मुलींना पिंजऱ्यातल्या प्राण्यांसारखं प्रदर्शनीय बनवून इतरांची करमणूकही केली.

आज स्वतःला फॅशनेबल म्हणवणारी मुलं-मुलीही ज्याप्रमाणे ‘पीअर्सिंग’सारखे प्रकार करून घेतात किंवा शस्त्रक्रिया वगैरे करून अवयवांचे आकार बदलून घेतात तीही अशाच प्रकारची विकृतीच म्हणावी लागेल. या ‘मुर्सी’ आणि ‘सूरी’ जमातीतला ओठ लांब करून त्यात सुशोभित प्लेट ठेवण्याचा प्रकार आहे. मात्र, त्यांच्या मागे त्यांच्या त्यांच्या म्हणून काही धारणा आहेत. या दोन जमातींसह ‘टांझानिया’ आणि ‘मोझंबिक’मधील आदिवासी मुली, ‘सारा’ आणि ‘लीबिया’ जमातीतील मुलीही अशा ओठात प्लेट्स घालतात.

हे देखील वाचा

कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली लाखोंचा स्कॅम झालाय..!

हा आहे स्टार्ट-अप्सच्या जगातील आजवरचा सगळ्यांत मोठा स्कॅम..!

पे पालच्या माजी कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या कंपन्या आज कोट्यवधींची उलाढाल करताहेत..!

या प्लेट्स बहुतेक वेळा चिकणमाती किंवा वजनाने हलक्या लाकडापासून बनवल्या जातात. त्यांना ‘लॅब्रेट’ म्हणतात. या ‘लॅब्रेट’ कधी वेगवेगळ्या रंगांनी नक्षी काढून सजवल्या जातात, तर कधी धातू आणि चमकणाऱ्या खड्यांची त्यावर नक्षी काढली जाते. काही जमातीत वरच्या ओठात, काही खालच्या ओठात तर काही दोन्ही ओठात लॅब्रेट घालतात.

आफ्रिकन आदिवासी जमातीतल्या मुलींना वयात आल्यावर, ऋतुप्राप्तीनंतर या प्लेट्स ओठात घातल्या जातात. त्यासाठी त्यांना मोठ्या दिव्यातून जावं लागतं. मोठ्या आकाराची प्लेट घालता यावी यासाठी त्यांचा खालचा ओठ कापावा लागतो. हे काम त्या मुलीची आई आणि कुटुंबातल्या किंवा जमातीतल्या अन्य वृद्ध महिला करतात. ओठाचा कापलेला भाग जखम भरेपर्यंत पुन्हा जोडला जाऊ नये म्हणून त्यात लाकडी तुकडा ठेऊन तो उघडा ठेवला जातो. ही जखम पूर्णपणे भरून यायला साधारणपणे तीन महिन्यांचा कालावधी लागतो.

जखम पूर्णपणे भरल्यानंतर अशा मुली ओठात प्लेट्स ठेवायला सुरुवात करतात. ओठ किती लांब ठेवायचे आणि प्लेट किती मोठी घालायची हे त्या तरुण मुली स्वतःच ठरवतात. जर मोठी प्लेट ठेवायची असेल काही काळानंतर तर ओठ कापण्याचा प्रकार पुन्हा पुन्हा करावा लागतो. त्यासाठी २-३ दातही काढावे लागतात.

इथिओपिया इथल्या एका आदिवासी महिलेने आपल्या ओठात परिधान केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी प्लेट तब्बल १९. ५ सेंटीमीटर व्यासाची आहे. तिची नोंद गिनीज बुकमध्येही करण्यात आली आहे.

साधारणपणे तरुण, अविवाहित मुली आणि नवविवाहित स्त्रिया बहुतेक लिप प्लेट्स घालतात. मात्र, गायींचे दूध काढताना, पुरुषांना जेवायला वाढताना आणि लग्नासारख्या समारंभात प्लेट्स घालण्याला विशेष महत्व आहे. ही प्रथा नक्की कशी सुरू झाली याचे नेमके संदर्भ मिळत नाहीत. मात्र. महिलांचं समाजातलं स्थान आणि आत्मसन्मान याचा त्यांच्या समाजात या प्लेट्सशी थेट संबंध आहे हे नक्की.

या आदिवासी जमातींमध्ये प्लेट्सचा आकार हा त्या मुलीच्या किंवा महिलेच्या सौंदर्याचा मापदंड मानला जातो. लग्न झाल्यावर त्या मुलीची आर्थिक स्थिती कशी असेल हे ही प्लेटच्या आकारावरून ठरवलं जातं. याचं कारण या जमातींमध्ये नवऱ्या मुलाच्या कुटुंबाने मुलीकडच्यांना हुंडा द्यायची प्रथा आहे.

मुलीच्या ओठातली प्लेट लहान असेल तर ४० जनावरे एवढा हुंडा आणि मोठी असेल तर ६० जनावरे; असा एकंदर हिशोब असतो.

दुसरी बाब म्हणजे मुलीच्या ओठात प्लेट असल्यामुळे हे ती परिपक्व, प्रजननक्षम झाली आहे आणि ‘यंदा कर्तव्य आहे’, हा संदेश आपोआप जमातीतल्या उपवर मुलांच्या कुटुंबांपर्यंत जातो. या लिप प्लेटिंगबद्दल एक सिद्धांत असाही आहे की, आफ्रिकन लोकांनी त्यांच्या स्त्रियांना गुलामांचे व्यापारी आणि हल्लेखोरांपासून वाचवण्याच्या दृष्टीने कुरूप दिसण्यासाठी ही प्रथा सुरू केली असावी. मात्र, त्यात फारसं तथ्य नाही. कारण, ही आफ्रिकन परंपरा गुलामीची प्रथा आणि त्यांचा व्यापार सुरू होण्याच्याही पूर्वीची आहे.

दुसरा असाही एक दावा केला जातो की, कोणत्याही आधुनिक साधनसामग्रीचा अभाव असताना जंगलात प्रतिकूल अवस्थेत राहण्यासाठी उपवर मुलगी शारीरिक आणि मानसिक दृष्टीने सक्षम बनावी, यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आली असावी. ओठ लांब करण्यासाठी त्यांना चीर पाडण्यापासून जखम भरणं, ओठ ताणून त्यात प्लेट बसवणं हे सगळं सहन करून स्त्री आपला कणखरपणा आणि येणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्याचं धैर्य सिद्ध करते आणि आपण मातृत्व तसेच संसाराची जबाबदारी घेण्यास सक्षम असल्याचं सिद्ध करते.

सध्याच्या काळात सगळ्या सण-समारंभांचं आणि प्रथा, परंपरांचं उत्सवीकरण करण्याबरोबरच त्याचं बाजारू ‘इव्हेंटीकरण’ झाल्याचा अनुभव आपण आपल्याकडेही घेतंच आहोत. मग बाहेरच्या जगाची ओळख नसणारे हे गरीब आदिवासी, इतरांचा बाजार भरवून आपल्या पोळ्या भाजून घेणाऱ्यांच्या नजरेतून कसे सुटतील?

या आदिवासी महिला सौंदर्याचं लक्षण म्हणून अभिमानाने मिरवत असलेले ताणलेले ओठ आणि त्यात बसवलेल्या रंगीबेरंगी चकत्या हे ‘आपल्या’ दुनियेतल्या लोकांचं मनोरंजन करतील’, हे हेरून त्यांच्यापैकी १३ आदिवासी मुलींना अमेरिकेत आणलं गेलं आणि अक्षरश:सर्कशीतल्या इतर प्राण्यांसारखं खुद्द सर्कशीतच त्यांचं प्रदर्शन मांडण्यात आलं.

सन १९३० च्या सुरुवातीला ‘रिंगलिंग ब्रदर्स’ आणि ‘बर्नम’ यांच्या सर्कसमध्ये अमेरिका आणि युरोपमधल्या प्रेक्षकांपुढे ‘उबांगी सेव्हेज’ या नावाखाली ‘लिप प्लेटिंग’ दाखवलं गेलं.

वास्तविक ‘उबांगी’ या नावाशी या आदिवासींचा आणि त्यांच्या संस्कृतीचा काडीचाही संबंध नव्हता. मात्र, युरोप, अमेरिकेतल्या लोकांना काही तरी वेगळं, नवीन आणि चटकदार नाव वाटावं म्हणून आफ्रिकेतल्या एका नदीच्या नावावरून या ‘शो’चं नाव उबांगी ठेवण्यात आलं. याहूनही वाईट गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना आकृष्ट करून घेण्यासाठी या आदिवासी महिलांची डक बिल्लड सॅव्हेजेस (बदकाच्या चोचीसारख्या), मॉन्सटर माऊथ सॅव्हेजेस (राक्षसी तोंडाच्या), ह्युमन क्रॉकोडाईल्स फ्रॉम आफ्रिकाज डार्केस्ट डेप्थस (आफ्रिकेच्या घनदाट जंगलातल्या मानवी मगरी) अशी विशेषण देऊन त्यांची हेटाळणीच करण्यात आली.

प्राचीन आदिवासी संस्कृतीबद्दल अभ्यास करण्याच्या बाता मारून किंवा त्यांच्या मागासलेपणाचा खोटा कळवळा दाखवून जगभरातले पर्यटक या आदिवासींच्या भागांना भेटी देतात आणि त्यांची छायाचित्र घेऊन त्याचा पुन्हा बाजारच मांडला जातो. दुर्दैवानं आतापर्यंत रोकड पैशाचा गंधही नसलेल्या या आदिवासी जमातींमधल्या अनेकांना बाहेरच्या जगाचं वारं लागल्याने त्यांना पैशाची चटक लागली आहे आणि ते ही या प्रकारात उत्साहाने सहभागी होऊ लागले आहेत.

आपण पुढारलेल्या जगातल्या सुखसुविधा उपभोगत असताना आदिवासी बांधवांना त्यांच्या संस्कृतीचं रक्षण करण्याच्या नावाखाली समाजाच्या मुख्य प्रवाहात न आणता त्यांच्या आहे त्याच अवस्थेत ठेवणं हे अमानुषपणाचंच आहे. मात्र, त्यांचा ‘उद्धार’ करण्याच्या नावाखाली त्यांचा बाजार मांडून स्वतःच्या तुंबड्या भरून घेणं हे अधिक अमानुषपणाचं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

इस्राएलमध्ये सापडली १२०० वर्षे जुनी वैभवशाली हवेली..

Next Post

कोलंबस नाही तर यानं पहिल्यांदा अमेरिकेत पाऊल ठेवलं होतं!

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

विश्लेषण

कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली लाखोंचा स्कॅम झालाय..!

27 September 2023
विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे स्टार्ट-अप्सच्या जगातील आजवरचा सगळ्यांत मोठा स्कॅम..!

26 September 2023
विश्लेषण

पे पालच्या माजी कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या कंपन्या आज कोट्यवधींची उलाढाल करताहेत..!

23 September 2023
विश्लेषण

सात दशके पोलिओशी लढा देत, कोणतीही हालचाल न करता तो आज वकील झाला आहे..!

22 September 2023
विश्लेषण

एक्सप्लेनर: भारत-कॅनडा तणावाचं कारण नेमकं काय..?

21 September 2023
विश्लेषण

मोजक्या भांडवलावर सुरु केलेली ही कंपनी आज त्या क्षेत्रातील “ब्रॅण्ड” आहे..!

18 September 2023
Next Post

कोलंबस नाही तर यानं पहिल्यांदा अमेरिकेत पाऊल ठेवलं होतं!

अमेरिकेन सैन्याच्या सोयीसाठी 'मॅकडॉनल्ड्स्'ने 'ड्राइव्ह थ्रू' सुरु केला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2023

कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली लाखोंचा स्कॅम झालाय..!

27 September 2023

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)