The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

कोलंबस नाही तर यानं पहिल्यांदा अमेरिकेत पाऊल ठेवलं होतं!

by द पोस्टमन टीम
9 September 2023
in इतिहास, विश्लेषण
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


‘मुर्गी पहले आयी या अंडा?’, हा प्रश्न जवळपास प्रत्येकानं कधीना कधी ऐकला असेल. या प्रश्नाच्या उत्तराबाबत आन्थ्रोपोलॉजिस्टपासून ते ओर्निथोलॉजिस्टपर्यंत (पक्ष्यांवर संशोधन करणारे तज्ज्ञ) अनेकांमध्ये मतभेद आहेत. गेल्या कित्येक शतकांपासून हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

इतिहासाच्या पोटातील काही घटनादेखील या प्रश्नाप्रमाणंच आहेत. या घटनांचे कुणी प्रत्यक्ष साक्षीदार किंवा तत्सबंधी ठोस पुरावे उपलब्ध नसल्यानं त्यांची सत्यता पडताळून पाहणं आता शक्य नाही. उपलब्ध असलेल्या थोड्याफार लेखी पुराव्यांच्या आधारे ऐतिहासिक घटनांवर आपण विश्वास ठेवतो, किंबहुना तो ठेवावा लागतो. ‘अमेरिकेचा शोध कोणी लावला’ हा प्रश्नदेखील कोंबडी आणि अंड्याच्या प्रश्नासारखा गोंधळात टाकणारा आहे.

अमेरिकेच्या शोधाबाबत अनेक थेअरी अस्तित्वात आहेत. त्यापैकी ख्रिस्तोफर कोलंबसचा समावेश असलेली थेअरी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. आपल्यापैकी बहुतेकांना असंच वाटतं की, पश्चिम गोलार्धाला भेट देणारा पहिला युरोपियन व्यक्ती हा ख्रिस्तोफर कोलंबस होता. मात्र, ही गोष्ट खोटी असल्याचं नव्यानं समोर आलं आहे.

पश्चिम गोलार्धात जाणारी पहिली व्यक्ती कोलंबस नव्हती तर मग कोण होती? त्याचं नाव ‘लीफ एरिक्सन’. उत्तर अमेरिकेत पाय ठेवणारा तो पहिला युरोपियन असल्याचं संशोधनात समोर आलं आहे. कोलंबसनं अमेरिकेत जाण्याच्या अगोदर साधारण ५०० वर्षांपूर्वी एरिक्सन अमेरिकेत गेला होता. 

आता हा लीफ एरिक्सन नेमका कोण होता? एक एक्सप्लोरर, एक साहसी दर्यावर्दी की, एखादा लकी खलाशी? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

लीफ एरिक्सनचा जन्म दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला होता. त्याचे वडील एक प्रसिद्ध ‘नॉर्स एक्सप्लोरर’ होते. एरिक द रेड असं त्यांचं नाव होतं. लीफ एरिक्सन त्यांचा मधला मुलगा होता. लीफचा जन्म आईसलँडमधील नॉर्स कॉलनीत झाला. त्याचं बालपण तिथेच गेलं. एरिक द रेडनं पकडलेल्या एका जर्मन व्यक्तीनं लीफचं काही अंशी पालनपोषण केलं. या जर्मन व्यक्तीनं लीफला लिहणं-वाचणं आणि व्यापार करण्यास शिकवलं.

एक दिवस अचानक एरिक द रेडला तीन वर्षांच्या कालावधीसाठी आइसलँडमधून हद्दपार करण्यात आलं. त्याला नॉर्वेमधूनदेखील हद्दपार करण्यात आलं. त्यामुळं तो आताच्या ग्रीनलँडमध्ये स्थायिक झाला. एरिक द रेडने ग्रीनलँडवर पहिली कायमस्वरूपी नॉर्स वसाहत स्थापन केली होती.

हे देखील वाचा

कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली लाखोंचा स्कॅम झालाय..!

हा आहे स्टार्ट-अप्सच्या जगातील आजवरचा सगळ्यांत मोठा स्कॅम..!

धूम्र*पान विरोधी चळवळ राबवणारा हिट*लर कोणे एकेकाळी चेन स्मो*कर होता!

हद्दपारीची तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर एरिकनं आइसलँड आणि ग्रीनलँड दरम्यान अनेकदा प्रवास केला. या प्रवासात तो लीफलाही सोबत नेत असे. यामुळं लीफ एरिक्सनला खोल समुद्रातील नौकानयन आणि नेव्हिगेशनबद्दल बरंच काही शिकण्यास मिळालं.

वयाच्या चोवीसाव्या वर्षी लीफ एरिक्सनला मोठ्या समुद्र प्रवासाचं नेतृत्व करण्याची पहिली संधी मिळाली. इसवी सन १०००च्या सुमारास तो, नॉर्स मेनलँडचा राजा ओलाफ I याच्यासाठी भेटवस्तू आणण्यासाठी नॉर्वेला गेला. राजा ओलाफ लीफच्या कामगिरीमुळं खूप प्रभावित झाला होता. राजानं त्याच्याकडे ग्रीनलँडच्या मूळ रहिवाशांचं ख्रिस्तीकरण करण्याची जबाबदारी दिली.

राजानं दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी लीफ एरिक्सन ग्रीनलँडला परत निघाला मात्र, तो ग्रीनलँडला पोहचला नाही. त्याच्या जहाजानं ज्या ठिकाणी नांगर टाकला ती जागा वेगळी होती. ग्रीनलँडचा बहुतांश भाग हिमनद्यांनी व्यापलेला होता. पण, लीफनं ज्या ठिकाणी पाऊल ठेवलं होतं तिथे तर हिरवीगार, सुपीक जमीन होती. ती जमीन वाईल्ड ग्रेप्सनी व्यापलेली होती.

या नैसर्गिक द्राक्षमळ्यांच्या उपस्थितीतीमुळं लीफ एरिक्सननं त्या प्रदेशाला ‘विनलँड’ म्हणण्याचा निर्णय घेतला. लीफ आणि त्याच्या खलाशांनी हिवाळा संपेपर्यंत त्या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तिथे एक छोटंसं गाव स्थापन केलं. त्यानंतर आलेल्या वसंत ऋतूमध्ये लीफ आणि त्याचा क्रू ग्रीनलँडला परत जाण्यासाठी निघाला.

मिळालेल्या माहितीनुसार तो पुन्हा कधीही विनलँडला परतला नाही. लीफनं ग्रीनलँडमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला. त्याच्या आईनं तिथे पहिलं ख्रिश्चन चर्च बांधलं. वायकिंग सागामध्ये त्याच्या मृत्यूचा उल्लेख कधीच झालेला नाही. परंतु, त्यानं १०१९ आणि १०२५ च्या दरम्यान ग्रीनलँडमध्ये शेवटचा श्वास घेतल्याचं म्हटलं जातं.

वरील गोष्टीवर विश्वास ठेवल्यास लीफ एरिक्सन हा ख्रिस्तोफर कोलंबसच्या काही शतकांपूर्वी उत्तर अमेरिकेत पोहचला होता. विनलँडमध्ये नॉर्स वसाहत सुरू झाली होती. परंतु, ती फार काळ टिकली नाही. इसवी सन १००४ मध्ये एरिक्सनचा भाऊ थोरवाल्डर विनलँडला आला होता. परंतु, त्यानं आणि त्याच्या माणसांनी स्थानिक लोकांच्या गटावर हल्ला केल्यानं अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर नेमकं काय झालं, याबाबत माहिती उपलब्ध नाही. मात्र, अमेरिकेच्या शोधाबाबत अनेक थिअर सुरूच राहिल्या.

१९३७ मध्ये, नाइट्स ऑफ कोलंबस म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रभावशाली कॅथोलिक गटानं ख्रिस्तोफर कोलंबसला  सन्मानित करण्यासाठी काँग्रेस आणि अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांच्याकडे यशस्वीपणे लॉबिंग केलं.

इतिहासकार गेविन मेन्झीस यांचा दावा तर या पेक्षाही वेगळा आहे. त्यांच्या मते, ‘ॲडमिरल झेंग हे’च्या नेतृत्वाखाली एक चिनी ताफा १४२१ मध्ये अमेरिकेत पोहोचला होता. ही थेअरी वादग्रस्त आहे. अमेरिकेचा शोध कोलंबसने लावल्याची गोष्ट सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.

कोलंबसपाठोपाठ लीफ एरिक्सनच्या थेअरीला जास्त व्हॅलिड मानलं जातं. आजही आइसलँड आणि ग्रीनलँडमध्ये तसेच नॉर्डिक वंशाच्या लोकांची जास्त लोकसंख्या असलेल्या उत्तर अमेरिकन भागात लीफ एरिक्सनचे पुतळे आढळतात. शिकागो, मिनेसोटा आणि बोस्टनमध्ये एरिक्सनला मानणारे लोक आहेत.

याशिवाय युनायटेड स्टेट्समध्ये ९ ऑक्टोबरला अधिकृतपणे ‘लीफ एरिक्सन डे’ साजरा केला जातो. लीफ एरिक्सनच्या अमेरिका प्रवासाबाबत आजही इतिहारकार संशोधन करत आहेत. त्यांना एकदम खात्रीशीर पुरावे सापडले तर अमेरिकेच्या सुरुवातीच्या इतिहासातील काही पानं नक्कीच बदलतील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

त्यांच्या दृष्टीने ‘असं’ करणे म्हणजे सौंदर्याचं प्रतीक आहे..!

Next Post

अमेरिकेन सैन्याच्या सोयीसाठी ‘मॅकडॉनल्ड्स्’ने ‘ड्राइव्ह थ्रू’ सुरु केला होता..!

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

विश्लेषण

कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली लाखोंचा स्कॅम झालाय..!

27 September 2023
विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे स्टार्ट-अप्सच्या जगातील आजवरचा सगळ्यांत मोठा स्कॅम..!

26 September 2023
इतिहास

धूम्र*पान विरोधी चळवळ राबवणारा हिट*लर कोणे एकेकाळी चेन स्मो*कर होता!

25 September 2023
विश्लेषण

पे पालच्या माजी कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या कंपन्या आज कोट्यवधींची उलाढाल करताहेत..!

23 September 2023
विश्लेषण

सात दशके पोलिओशी लढा देत, कोणतीही हालचाल न करता तो आज वकील झाला आहे..!

22 September 2023
विश्लेषण

एक्सप्लेनर: भारत-कॅनडा तणावाचं कारण नेमकं काय..?

21 September 2023
Next Post

अमेरिकेन सैन्याच्या सोयीसाठी 'मॅकडॉनल्ड्स्'ने 'ड्राइव्ह थ्रू' सुरु केला होता..!

तब्बल नऊ तास वाहतुक कोंडी निर्माण करणारा 'बर्निंग मॅन'?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2023

कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली लाखोंचा स्कॅम झालाय..!

27 September 2023

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)