The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जसप्रीत बुमराहच्या रूपाने भारतीय संघाला परफेक्ट यॉर्कर किंग सापडलाय..!

by द पोस्टमन टीम
6 December 2021
in क्रीडा
Reading Time: 1 min read
A A
0
जसप्रीत बुमराहच्या रूपाने भारतीय संघाला परफेक्ट यॉर्कर किंग सापडलाय..!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


‘आमच्या टीममध्ये एक खेळाडू असा ही त्याला ‘प्रेशर’ ही गोष्ट काय आहे याचा गंधच नाही. जेव्हा टीममधील सर्व खेळाडू प्रेशरमध्ये असतात तेव्हा हा गडी त्याच्याच धुंदीत मैदानात वावरत असतो, हिटमॅन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) या वाक्यांमधून तो त्या खेळाडूची स्तुती करतो आहे की चेष्टा हे शोधून काढणं फारसं कठीण नाही. या खेळाडूला आपण ‘बुम बुम बुमराह’ या अतरंगी नावानं ओळखतो.

जेव्हा बीसीसीआय एका फुल टाईम डेथ ओव्हर्स स्पेशालिस्टचा कसोशीनं शोध घेत होती तेव्हा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारतीय क्रिकेटसाठी एक वरदान म्हणून समोर आला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा भाग असलेला आणि लसिथ मलिंगाच्या छत्रछायेत तयार झालेल्या गुजराती छोकऱ्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतल होतं.

डोमेस्टिक सर्किटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा बुमराह पदार्पणापासूनच रणजी लेवलवरील बॅटर्ससाठी मोठा धोका ठरला होता. हाताच्या अतिशय चपळ हालचालींमुळं त्यानं फेकलेल्या प्रत्येक बॉलचा अंदाज लावण खेळाडूंसाठी अतिशय डोकेदुखी उत्पन्न करणारी बाब ठरत होती. इंच-परफेक्ट यॉर्कर बोलिंग करण्याची परिपूर्ण कला अवगत असलेला बुमराह अल्पावधीतच भारतीय संघातील एक बहुमूल्य हिरा बनला आहे. आज जसप्रित बुमराहचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त हा विशेष लेख…

आपण २८ डिसेंबर २०१८ पासून सुरुवात करूया. तो बॉक्सिंग डे टेस्टचा तिसरा दिवस होता. दुपारच्या जेवणाची वेळ जवळ आली होती. शॉन मार्श मैदानावर पाय रोवून उभा होता. बुमराह हवेचा वेग वापरून 140 प्रती किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने बॉल टाकत होता. आपली लाईन आणि लेंथ घट्ट पकडून शक्य त्या गोष्टी तो करत होता. लंचपूर्वी शेवटचा बॉल पडण्यापूर्वी रोहित शर्मा नेहमीप्रमाणं बुमराहला काही कानगोष्टी सांगण्यासाठी गेला. रोहितनं त्याला स्लो बॉल टाकण्याचा सल्ला दिला. बुमराहला आपल्या आयपीएल कॅप्टनचा सल्ला आवडला. त्यानं त्या टेस्ट मॅचमध्ये तोपर्यंत स्लो बॉल टाकला नव्हता. मात्र, आता तो मार्शवर प्रयोग करण्याच्या तयारीत होता.

त्यानं आपला रनअप घेऊन ११३ प्रती किलोमीटर वेगानं स्विंग करून बॉल सोडला. तो बॉल जाऊन मिडल स्टंपच्या समोर एकदम रेषेत असलेल्या मार्शच्या घोट्याला जाऊन धडकला. आपल्यासोबत नेमक काय झालं हे मार्शच्या लक्षात येऊपर्यंत भारतीय संघ धिंगाणा घालत पोटपुजा करण्यासाठी ड्रेसिंग रूमकडे निघाला देखील होता. तर ही होती जसप्रित बुमराह नावाच्या जादुगाराची खरी ओळख! समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलिंग व्हेरिएशन्सनी ‘गुमराह’ करणार ‘बुमराह’ भारतीय बोलिंग अटॅकमधील हुकमी एक्का आहे.

आपल्या अनोख्या बोलिंग स्टाईलनं आणि विलक्षण रिलीझ पॉइंटमुळं बुमराहनं लगेचच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. वयाच्या १९व्या वर्षी मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्यापासून ते भारताचा डेथ बॉलिंग स्पेशालिस्ट होण्यापर्यंतचा मोठा पल्ला त्यानं अतिशय कमी वेळात गाठला आहे. 

6 डिसेंबर 1993 रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये जसप्रीत बुमराहचा जन्म झाला. त्यानं वयाच्या १४ व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. एक राईट मिडीयम फास्ट बोलरम्हणून त्यानं गुजरातकडून खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला मुंबई इंडियन्स सारखी तगडी आयपीएल फ्रँचायझी मिळाली. टीममध्ये असलेल्या दिग्गज खेळाडूंच्या मार्गदर्शानाचा वापर करून त्यानं आत्मविश्वासानं आपला खेळ बहरत ठेवला. बुमराह सात वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं होता. त्यानंतर शिक्षिका असलेल्या आईनं त्याचा आणि त्याची बहिणीचा सांभाळ केला. लहान असताना त्याला कॅनडामध्ये स्थायिक होण्याची इच्छा होती. मात्र, वयाच्या १४ व्या वर्षी त्याला क्रिकेटबद्दल असलेल्या पॅशनची जाणीव झाली आणि तो क्रिकेटमध्ये आला.

हे देखील वाचा

पाकिस्तानमध्ये त्यांच्याच विरोधात वीरू पाजीनं भारताचं कसोटीतील पहिलं त्रिशतक ठोकलं होतं!

टेस्ट क्रिकेटची बादशहा असलेली न्यूझीलंडची टीम २६ धावांवर ऑल आऊट झाली होती

ICC नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम आजही इंग्लंडचा हा क्लब बनवतो..!

२०१३-१४ च्या डोमेस्टिक क्रिकेट सिझनमध्ये त्यानं विदर्भाविरुद्ध गुजरातकडून पहिला सामना खेळला. आपल्या पहिल्याच सामन्यात त्यानं सात विकेट्स घेतल्या. त्यावर्षी मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक असलेले जॉन राइट सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी बुमराहला खेळताना पाहिलं. त्याच्यामध्ये असणारा स्पार्क अनुभवी राइटच्या डोळ्यांना लगेच हेरला अन् त्याला आयपीएलचं तिकीट मिळालं.

येथेही आपल्या पहिल्याच सामन्यात त्यानं सर्वांना प्रभावित केलं. विराट कोहलीसारख्या वर्ल्डक्लास बॅटरला त्यानं आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट केलं होतं. १९वर्षीय बुमराहनं त्या सामन्यात आणखी दोन विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सनं त्याचा वापर एक सरप्राईज पॅकेज म्हणून केला होता. पुढे याच मुलानं जगातील अनेक दिग्गज खेळाडूंना आपल्या बोलिंगचं सरप्राईज दिलं.

गुजराती ढोकळा आणि अमिताभ बच्चन या दोन गोष्टींचा जबरदस्त फॅन असलेल्या जसप्रीतनं आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळं २०१६मध्ये भारतीय संघामध्ये जागा मिळवली. २०१४ पासून भारत-ए संघाचा नियमित सदस्य असूनही गुडघ्याच्या दुखापतीमुळं बुमराहचं पदार्पण लांबणीवर पडल होतं. 

२०१६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामन्यातून त्यानं भारताकडून पदार्पण केलं. मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत त्यानं भारतीय गोलंदाजीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. ही सिरीज 3-0 च्या फरकानं भारतानं जिंकली होती. या विजयामध्ये बुमराहनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो सर्वाधिक विकेट घेणारा बोलर ठरला होता.

वन-डे आणि टी-ट्वेंटीमध्ये अप्रतिम कामगिरी केल्यानंतर त्याला टेस्टसाठी निवडण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली कसोटी खेळून तो कसोटी क्रिकेटमधील भारताचा २९०वा खेळाडू ठरला. एबी डिव्हिलिर्सची विकेट घेऊन त्यानं आपल्या कसोटी कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता. माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅकग्रा किती खडूस आहे हे जगजाहीर आहे. तो सहजासहजी कुणाची स्तुती करत नाही, गोलंदाजाची तर नाहीच नाही. पण, जसप्रित बुमराह आपल्या खेळाच्या बळावर मॅकग्राला आपली स्तुती करण्यास भाग पाडलं.

यावर्षी (२०२१) टी-२० वर्ल्डकप पूर्वी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्या टेस्ट सिरीजमध्ये ओव्हल येथे खेळवल्या गेलेल्या चौथ्या मॅचमध्ये बुमराहनं इतिहास रचला. अवघ्या २४ सामन्यांत त्यानं १०० टेस्ट विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आणि सोबतच अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांचा विक्रम देखील मोडला. भारताकडून आतापर्यंत केवळ ७ पेसर्सनी कसोटी क्रिकेटमध्ये १०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत कपिल देव, झहीर खान, जवागल श्रीनाथ, इशांत शर्मा, करसन घावरी, इरफान पठाण आणि मोहम्मद शमी यांचा समावेश होतो. आता जसप्रित बुमराहनं या दिग्गजांच्या यादीमध्ये स्थान मिळवलं आहे.

आपल्या गोलंदाजी भात्यामध्ये असलेल्या विविध अस्त्रांचा वापर करून मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवण्यामध्ये जसप्रितचा हातखंडा आहे. स्वत: कितीही दबावाखाली असला तरीही तो कधी प्रतिस्पर्ध्याला त्याचा ठाव लागू देत नाही. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून आपली दहशत दाखवण्यासाठी तो पुन्हा एकदा सज्ज झाला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

एजाज पटेलने जे स्वप्नातही पाहिलं नव्हतं ते त्याच्यासाठी आज सत्यात उतरलंय..!

Next Post

सर रवींद्र जडेजा म्हणजे भारतीय संघासाठी रजनीकांतपेक्षा कमी नाहीत…!

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

पाकिस्तानमध्ये त्यांच्याच विरोधात वीरू पाजीनं भारताचं कसोटीतील पहिलं त्रिशतक ठोकलं होतं!
क्रीडा

पाकिस्तानमध्ये त्यांच्याच विरोधात वीरू पाजीनं भारताचं कसोटीतील पहिलं त्रिशतक ठोकलं होतं!

16 April 2022
टेस्ट क्रिकेटची बादशहा असलेली न्यूझीलंडची टीम २६ धावांवर ऑल आऊट झाली होती
क्रीडा

टेस्ट क्रिकेटची बादशहा असलेली न्यूझीलंडची टीम २६ धावांवर ऑल आऊट झाली होती

15 April 2022
ICC नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम आजही इंग्लंडचा हा क्लब बनवतो..!
क्रीडा

ICC नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम आजही इंग्लंडचा हा क्लब बनवतो..!

15 April 2022
रस्त्यावर भाजी विकणारा १८ वर्षांचा तिरंदाज भारतासाठी विश्वचषकाचं ‘लक्ष्य’ गाठणार आहे!
क्रीडा

रस्त्यावर भाजी विकणारा १८ वर्षांचा तिरंदाज भारतासाठी विश्वचषकाचं ‘लक्ष्य’ गाठणार आहे!

14 April 2022
तब्बल १६ तास ६७३ चेंडूंचा सामना करत या पठ्ठ्यानं ब्रायन लाराचा विक्रम मोडून काढलाय!
क्रीडा

तब्बल १६ तास ६७३ चेंडूंचा सामना करत या पठ्ठ्यानं ब्रायन लाराचा विक्रम मोडून काढलाय!

13 April 2022
आपल्या मित्राच्या अस्थि विसर्जित करायला स्टीव्ह वॉ चक्क वाराणसीत आला होता!
क्रीडा

आपल्या मित्राच्या अस्थि विसर्जित करायला स्टीव्ह वॉ चक्क वाराणसीत आला होता!

13 April 2022
Next Post
सर रवींद्र जडेजा म्हणजे भारतीय संघासाठी रजनीकांतपेक्षा कमी नाहीत…!

सर रवींद्र जडेजा म्हणजे भारतीय संघासाठी रजनीकांतपेक्षा कमी नाहीत...!

स्वित्झर्लंडने आत्महत्या कायदेशीर केली आहे आणि त्यासाठी मशीनही आणलंय..!

स्वित्झर्लंडने आत्महत्या कायदेशीर केली आहे आणि त्यासाठी मशीनही आणलंय..!

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!