The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

चिडक्या आणि रडक्या ऑस्ट्रेलियन संघात ग्लेन मॅकग्रा कायमच वेगळा वाटायचा

by ऋजुता कावडकर
26 March 2021
in क्रीडा
Reading Time:1min read
0
Home क्रीडा

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब

क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा किती दबदबा आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ज्या देशात हा खेळ सुरु झाला त्या देशाला म्हणजे इंग्लंडलाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेट खेळताना दडपण येते.

ऑस्ट्रेलियन संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. आपल्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ग्लेन मॅकग्राबद्दल तर तुम्ही खूप काही ऐकून असालच. हातातून गेली अशा वाटणाऱ्या सामन्याचा निकालही फिरवायची कसब असलेला खेळाडू.

२००२मधे दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये जोहान्सबर्गच्या मैदानात झालेला सामना तुम्हाला आठवत असेल. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर होता, १ विकेट ८९ धावा. पण बघता बघता दक्षिण आफ्रिकेचे एकामागून एक खेळाडू तंबूत जाऊ लागले आणि फक्त १३३ धावावरच दक्षिण आफ्रिकेला आपला खेळ गुंडाळावा लागला.

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची चांगली कामगिरी सुरू असताना अचानक त्यांचे पारडे कसे फिरले. कारण, त्यांच्याविरोधात बॉलिंग करण्यासाठी उभा होता, ग्लेन मॅकग्रा.

ग्लेनने असे चमत्कार अनेकदा करून दाखवले आहेत. कसोटी असो की वन-डे, वर्ल्ड कप असो की लीग मॅच ग्लेनने आपल्या संघाची मजबुती टिकवण्यावर नेहमीच भर दिला आहे.

ग्लेनचा क्रिकेट कारकिर्दीचा प्रवास कसा झाला हे जाणून घेणे खूपच प्रेरणादायी ठरेल.

ग्लेन मॅकग्राचा जन्म ऑस्ट्रेलियातील डाबू येथे झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबाने न्यू साउथ वेल्स येथे स्थलांतरण केले. लहानपणापासूनच ग्लेनला क्रिकेटची आवड होती. त्याला या खेळात विशेष गती होती हे पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डॉग वाल्टर्सने त्याच्यातील या कौशल्याला प्रोत्साहन देण्याचे ठरवले.

हे देखील वाचा

इंग्लंडचा प्रिन्स शून्यावर बाद झाला आणि क्रिकेटमध्ये ‘डक’ आला..!

या पैलवानाने कुस्तीत सिंहालाच हरवलं होतं..!

जुन्या काळात लोक टाइमपाससाठी कुठले खेळ खेळायचे माहिती आहे का..?

वॉल्टर्सला ग्लेनची बॉलिंग आवडत असे. ग्लेनने सदरलँडच्या ग्रेड क्रिकेटमध्ये खूप छान कामगिरी कली होती. सिडनी येथे भरलेल्या या मालिकेत ग्लेनने आठ सामने खेळले आणि प्रत्येक सामन्यात त्याने उत्तम खेळ केला. यानंतर त्याची ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली. इथूनच त्याच्या क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात झाली.

१२ नोव्हेंबर १९९३ रोजी पर्थच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला होता. ग्लेनचा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात ग्लेनने ३ विकेट घेतल्या. पण त्यानंतर ग्लेनच्या कर्तृत्वाचा आलेख वाढताच राहिला आहे.

ग्लेन कसोटी क्रिकेट खेळू लागला. हळूहळू त्याच्या बॉलिंगला चांगलीच धार येऊ लागली. त्याच्या या कमालीच्या बॉलिंगने ऑस्ट्रेलियाला अनेकदा यश मिळवून दिले आहे. विजयाचे पारडे फिरवणारा खेळाडू ही त्याची ओळख आजही कायम आहे.

९ डिसेंबर १९९३ साली दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याद्वारे ग्लेनने एकदिवसीय क्रिकेटची सुरूवात केली. त्याच्या या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ग्लेनला एकही विकेट मिळाला नव्हता. पण, त्याच्या बॉलिंगने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

त्याच्या नावावर बॉलिंगचे अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. कसोटी, एकदिवसीय, किंवा टी-२० सगळ्याच प्रकारात त्याने चांगली कामगिरी केली. १४ वर्षाच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत त्याने एकूण १२४ कसोटी सामने खेळले आणि एकूण ५६३ विकेट त्याने आपल्या नावावर कमावले. यातील २९ सामन्यात तर त्याने सलग ५ विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. संपूर्ण टीमला तंबूत पाठवण्याचा विक्रमही त्याने केला आहे आणि एकदा नव्हे तर त्याने हा विक्रम तब्बल तीनदा केलेला आहे.

ग्लेनला महान खेळाडू का म्हणतात हे आता तुमच्या लक्षात आले असेलच.

एकदिवसीय सामान्यातही त्याने असेच विक्रम नोंदवले आहेत. त्याने संपूर्ण कारकिर्दीत एकूण २५० एकदिवसीय सामने खेळले. या सगळ्या सामन्यात मिळून त्याने ३८१ विकेट मिळवल्या आहेत.

एकदिवसीय सामन्यातील त्याची बॉलिंग तर भन्नाट अशीच म्हणावी लागेल. एकदिवसीय सामन्यात त्याने तब्बल सात वेळा एकमागून एक अशा पाच खेळाडूंना तंबूत पाठवण्याची किमया साधलेली आहे. ग्लेनच्या बॉलिंगची जादू काय होती याचा तुम्ही अंदाज लावू शकता.

२००७ च्या वर्ल्डकप मालिकेत त्याने एकूण २६ विकेट घेतल्या. या मालिकेत इतक्या विकेट घेण्याचा विक्रम यापूर्वी कोणीही केलेला नाही. आणि म्हणून त्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधेही झालेली आहे. ग्लेनने कसोटी सामन्यात तब्बल ३५ वेळा खेळाडूंना शून्यावरच आउट केलेले आहे. हाही एक विक्रम त्याच्याच नावावर आहे. यानंतर नंबर लागतो तो त्याच्याच संघातील खेळाडू शेन वॉर्नचा.

एवढेच नाही तर, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटच्या शेवटच्या सामन्यातील शेवटच्या बॉलवरही याने विकेट घेतली आहे.

सामन्याची दिशा बदलण्याची त्याच्यात हिंमत होती. १९९७ साली इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या सामन्यात तर त्याने आठ खेळाडूंना तंबूत पाठवले होते. २० ओव्हरच्या बॉलिंग त्याने ८ विकेट घेतल्या होत्या. हा सामना अनिर्णीत राहिला पण ग्लेनच्या बॉलिंगने सर्वांच्या मनावर चांगलाच ठसा उमटवला होता.

गाबाच्या मैदानातील २००६ साली झालेली ऍशेषची मालिकाही अशीच अविस्मरणीय राहिली आहे. ग्लेनने खेळलेली ही पहिली ऍशेष होती. यातही त्याने ६ विकेट घेऊन सामन्याचा निकाल फिरवून टाकला होता. त्याच्या बॉलिंगमुळे ऑस्ट्रेलियाने २७७ धावांनी हा सामना जिंकला होता.

२००३चा वर्ल्डकपचा सामानही ग्लेनच्या बॉलिंगमुळेच जिंकता आला होता. या सामन्यातही ग्लेनने ७ विकेट घेतल्या होत्या. तेही सलग. निबियाच्या खेळाडूंना त्याची बॉलिंगच समजली नाही आणि एकामागून एक सात खेळाडू आउट झाले.

ग्लेनने २००७ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

पण खेळाडू म्हणून तो निवृत्त झाला असला तरी त्याचे क्रिकेट प्रेम मात्र तितकेच उत्कट आहे. आज तो नव्या खेळाडूंना क्रिकेटचे प्रशिक्षण देतो. यासाठी त्याने एका फाउंडेशनचीही स्थापना केली आहे. या फाउंडेशनच्या वतीने महिलांमध्ये आरोग्य जागृती करण्याचेही काम केले जाते.

ADVERTISEMENT

ग्लेनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत नेहमीच प्रामाणिक आणि दर्जेदार खेळ करण्याचा प्रयत्न केला. एक अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून नेहमीच ग्लेन क्रिकेट रसिकांच्या स्मरणात राहील.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

हरभजन सिंह – भारतीय संघाचा टर्बिनेटर

Next Post

मृत्यूनंतर देखील हा भारतीय सैनिक देतोय सीमेवर पहारा !

ऋजुता कावडकर

ऋजुता कावडकर

Related Posts

इंग्लंडचा प्रिन्स शून्यावर बाद झाला आणि क्रिकेटमध्ये ‘डक’ आला..!
क्रीडा

इंग्लंडचा प्रिन्स शून्यावर बाद झाला आणि क्रिकेटमध्ये ‘डक’ आला..!

10 April 2021
या पैलवानाने कुस्तीत सिंहालाच हरवलं होतं..!
क्रीडा

या पैलवानाने कुस्तीत सिंहालाच हरवलं होतं..!

10 April 2021
जुन्या काळात लोक टाइमपाससाठी कुठले खेळ खेळायचे माहिती आहे का..?
क्रीडा

जुन्या काळात लोक टाइमपाससाठी कुठले खेळ खेळायचे माहिती आहे का..?

9 April 2021
ख्रिस गेल – वेस्ट इंडिजचा ‘रनमशीन’ स्लमडॉग मिलेनियर
क्रीडा

ख्रिस गेल – वेस्ट इंडिजचा ‘रनमशीन’ स्लमडॉग मिलेनियर

1 April 2021
तेव्हापासून आजपर्यंत पाकिस्तान आपल्याकडून नेहमीच हरत आलाय
क्रीडा

तेव्हापासून आजपर्यंत पाकिस्तान आपल्याकडून नेहमीच हरत आलाय

27 March 2021
IPLमधे ६३ चेंडूत १२० धावा करणारा पॉल वाल्थटी सध्या काय करतोय..?
क्रीडा

IPLमधे ६३ चेंडूत १२० धावा करणारा पॉल वाल्थटी सध्या काय करतोय..?

9 April 2021
Next Post
मृत्यूनंतर देखील हा भारतीय सैनिक देतोय सीमेवर पहारा !

मृत्यूनंतर देखील हा भारतीय सैनिक देतोय सीमेवर पहारा !

भारताच्या एका जुन्या जहाजाने पाकिस्तानच्या नव्याकोऱ्या ‘गाझी’चा भुगा केला होता

भारताच्या एका जुन्या जहाजाने पाकिस्तानच्या नव्याकोऱ्या 'गाझी'चा भुगा केला होता

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दाऊदने बॉम्बस्फोट घडवून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली होती

दाऊदने बॉम्बस्फोट घडवून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली होती

20 February 2021
नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

25 February 2021
त्या रात्री दारूने सरबजीतचा घात केला होता

त्या रात्री दारूने सरबजीतचा घात केला होता

8 March 2021
मुस्लिमांच्या शिया व सुन्नी पंथियांचा पेहरावच नव्हे तर ‘अजान’सुद्धा वेगळी आहे !

मुस्लिमांच्या शिया व सुन्नी पंथियांचा पेहरावच नव्हे तर ‘अजान’सुद्धा वेगळी आहे !

26 March 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह दफन न करता जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह दफन न करता जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

11 April 2021
इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

11 April 2021
या एका खटल्याने आपल्या देशातील संविधान आणि लोकशाहीला वाचवलंय

या एका खटल्याने आपल्या देशातील संविधान आणि लोकशाहीला वाचवलंय

11 April 2021
सोमालियाच्या गल्लीबोळात कॅप्टन जॅक स्पॅरो सापडतात..!

सोमालियाच्या गल्लीबोळात कॅप्टन जॅक स्पॅरो सापडतात..!

10 April 2021

Recent News

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

11 April 2021
इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

11 April 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!