आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
येत्या काही दिवसांत जगभरात नववर्षाचे स्वागत होईल. नववर्ष आगमनाचा कोणताही कार्यक्रम कुठेही असला तरीही त्यामध्ये रंग भरण्यासाठी व्हिस्कीसारख्या पेयांचा सर्रास वापर होतोच. जगभरात व्हिस्कीचे अनेक प्रसिद्ध ब्रॅण्ड्स आहेत. भारतात देखील व्हिस्कीचे अनेक ब्रॅण्ड्स पाहायला मिळतात, या ब्रॅंड्सपैकीच एक असलेलं “इंद्री” काही दिवसांपूर्वीच जगातील सर्वोत्तम व्हिस्की ब्रँड म्हणून जाहीर झाले आहे.
खरंतर व्हिस्की म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते स्कॉटलंड किंवा युरोपातील इतर देश. पण तरीही भारतीय बनावटीच्या “इंद्रा” व्हिस्कीने या स्पर्धेत बाजी मारली, आणि ही व्हिस्की सरस ठरली. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा विशेष लेख..
सिंगल माल्ट व्हिस्की म्हणजे नेमकं काय?
सिंगल माल्ट व्हिस्की हा व्हिस्कीचा एक प्रकार आहे जो एका डिस्टिलरीमध्ये एकाच प्रकारचे धान्य, अनेकदा जव वापरून तयार केले जाते. सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की हा सिंगल माल्ट व्हिस्कीचा सुप्रसिद्ध प्रकार आहे.
व्हिस्कीज ऑफ द वर्ल्ड अवॉर्ड्स
व्हिस्कीज ऑफ द वर्ल्ड अवॉर्ड्स ही जगभरातील व्हिस्की ब्रॅंड्सपैकी सर्वोत्तम व्हिस्की कोणती हे ठरवण्यासाठीची वार्षिक स्पर्धा आहे. हा पुरस्कार उत्पादक आणि संबंधित डिस्टिलरीजसाठी आपापली उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ व्यासपीठ उपलब्ध करून देतो. इंद्री व्हिस्की हा प्रसिद्ध पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय व्हिस्की आहे.
या वर्षी (२०२३) पार पडलेल्या ‘व्हिस्कीज ऑफ द वर्ल्ड अवॉर्ड्स’ या स्पर्धात्मक कार्यक्रमात भारतीय बनावटीच्या ‘इंद्रा’ या व्हिस्कीला “बेस्ट इन शो, डबल गोल्ड” हा पुरस्कार मिळाला आहे. या स्पर्धेत जगभरातील १०० व्हिस्की ब्रॅण्ड्सनी सहभाग नोंदवला होता.
एवढा मोठा पुरस्कार मिळाला म्हटल्यावर हा ब्रँड अनेक वर्षे जुना असेल असे आपल्याला कदाचित वाटेल. पण जगात सर्वोत्तम ठरलेल्या या ब्रॅण्डची सुरुवात अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाली आहे. हरियाणामधील पिकॅडिली डिस्टीलरीज या कंपनीच्या माध्यमातून हा ब्रँड फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये पोहोचला. सध्या हा ब्रँड भारतातील १७ राज्यांमध्ये तर जगातील १९ देशांमध्ये उपलब्ध असून, येत्या नोव्हेंबरपासून हा ब्रँड अमेरिका आणि युरोपातील देशांमध्ये देखील उपलब्ध होईल.
बेस्ट इन शो
२०२३ च्या ‘व्हिस्कीज् ऑफ द वर्ल्ड अवॉर्ड्स’मध्ये ‘इंद्री दिवाळी कलेक्टर्स एडिशन २०२३’ ने ‘बेस्ट इन शो, डबल गोल्ड’ पुरस्कार जिंकला. जगातील सर्वांत मोठ्या व्हिस्कीच्या स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेत १०० हून अधिक ब्रँड्सशी स्पर्धा करत ‘इंद्री’ने हे जेतेपद मिळवले. गेल्या दोन वर्षांत याच ब्रॅंडने सुमारे १४ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.
२०२१ साली लाँच झालेला हा ब्रँड हरियाणाच्या पिकाडिली डिस्टिलरीजचा आहे. या डिस्टिलरीच्या मूळ ब्रँडने, म्हणजेच इंद्री-त्रीणि म्हणून ओळखल्या जाणार्या भारतातील पहिल्या ट्रिपल-बॅरल सिंगल माल्टने या प्रवासाची सुरुवात करून दिली होती. विशेष म्हणजे इंद्री व्हिस्की बनवण्याची पद्धत पूर्णतः भारतीय असून ही व्हिस्की जवापासून बनवली जाते, तर व्हिस्कीचे बाष्पीभवन (डिस्टिलेशन) भारताच्या पारंपरिक तांब्याच्या भांड्यातच केले जाते.
इंद्री दिवाळी कलेक्टर्स एडिशन २०२३ व्हिस्की उत्तर भारतातील उपोष्णकटिबंधीय हवामानात तयार होते, तर यामध्ये साखरेचा लेप दिलेला सुकामेवा, टोस्टेड नट्स, काही मसाले, ओक आणि कडवट चॉकलेटचा ‘स्मोकी’ स्वाद आहे.
इतकेच नाही तर भारतातल्याच अमृत डिस्टिलरीजच्या अमृत फ्यूजनने “२०२३ डबल गोल्ड”, अमृत इंडियन सिंगल माल्टने “२०२३ सिल्व्हर” आणि इंद्री ड्रू सिंगल माल्ट इंडियन व्हिस्कीने “२०२३ सिल्व्हर” पुरस्कार जिंकला आहे. दुसरीकडे, ‘अमृत कुरींजी’ने “२०२३ ब्रॉन्झ” पुरस्कार जिंकला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.