The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पृथ्वीवरच्या ‘या’ ठिकाणांवर गुरुत्वाकर्षण शक्ती चक्क “शून्य” आहे!

by द पोस्टमन टीम
11 April 2025
in भटकंती, विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


आकाशात उंच फेकलेली वस्तू खाली जमिनीवरच पडते. टेबलावरून घरंगळत जाणारा खडू खाली जमिनीवरच पडतो. झाडावरून तुटलेले पान असो किंवा फळ, ते खालच्या दिशेनंच पडतं. सफरचंदाच्या झाडाखाली बसलेल्या न्यूटनने आपल्याला यामागचे रहस्य कित्येक वर्षापूर्वीच उलगडून सांगितले आहे. पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हवेतील प्रत्येक वस्तू जमिनीकडे खेचली जाते.

गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच सगळ्या वस्तू जमिनीच्या पृष्ठभागाला चिकटून राहतात. इतकेच काय, सौरमालेतील ग्रह देखील एकमेकांशी या गुरुत्वाकर्षण शक्तीनेच बांधलेले आहेत.

प्रत्येक ग्रह आपापल्या कक्षेत सूर्याभोवती फिरत राहतो यामागे गुरुत्वाकर्षण शक्तीचं काम करते. परंतु ही गुरुत्वाकर्षण शक्तीच नसेल किंवा नसतीच तर काय झालं असतं? कधी विचार केलाय का नेमकं काय होईल जर एखाद्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने काम करणंच बंद केलं किंवा त्याठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्तीच नसेल तर? आपण हवेत तरंगत राहिलो असतो किंवा स्पायडरमॅनप्रमाणे भिंतीवरूनही चालू शकलो असतो.

हो! कारण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच आपण खाली पडतो. एरवी आपण हवेत तरंगण्याची किंवा इमारतीच्या भिंतीवरून चालण्याची कल्पना देखील करू शकणार नाही. आपण जमिनीवर उभे असताना थोडे जरी वाकलो तर आपण खाली पडू की काय अशी आपल्याला भीती असते.

पृथ्वीच्या केंद्रस्थानी असणारी आजूबाजूच्या वस्तूंना आकर्षित करून घेण्याची शक्ती म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती.



चंद्रावर माणसाने पाऊल ठेवल्यानंतर त्याला कळले की चंद्रावरील गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा खूप कमी आहे. वेगवेगळ्या ग्रहांवरील गुरुत्वाकर्षण शक्तीच्या कमीजास्त प्रमाणात तिथल्या पृष्ठभागावर वेगवेगळे परिणाम जाणवतात. पण, समजा पृथ्वीवरच जर अशी काही ठिकाणे असतील जिथे गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत नाही किंवा कमी असेल तर?

हो! पृथ्वीवरही काही अशी ठिकाणे आहेत जिथे हे गुरुत्वाकर्षण बल अगदी शून्य आहे. जाणून घेऊया अशा काही ठिकाणांची माहिती जिथे गेल्यावर तुम्ही कितीही वाकलात तरी जमिनीवर पडणार नाही.

हे देखील वाचा

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

  • कॅलीफोर्नियातील मिस्ट्री स्पॉट

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या सँटाक्रूज शहरात मिस्ट्री स्पॉट नावाचे एक ठिकाण आहे. जिथे गुरुत्वाकर्षण शक्ती शून्य आहे. १९३९ साली काही संशोधकांना या ठिकाणाचा शोध लागला. १९४० पासून सामान्य लोकांसाठी हे ठिकाण पाहण्यासाठी खुले करण्यात आले.

या ठिकाणाचा शोध लागला तेंव्हा काही जणांना असे वाटत होते की इथे इतर कोणत्यातरी अमानवी शक्तींचे प्राबल्य असावे.

california mystery spot

पण, संशोधकांच्या मते या ठिकाणच्या १५० स्क्वे. फुट जागेतील चुंबकीय क्षेत्रात काही अनियमितता आहे. इथे पाणी देखील वरच्या दिशेने वाहते. इतकेच नाही तर वस्तूंचा आणि माणसाच्या आकारातदेखील बदल दिसतात. या ठिकाणी आपण तिरके उभे राहिलो तरी खाली पडू शकत नाही.

  • सेंट इग्नास मिस्ट्री एरिया

मिशिगनमधील सेंट इग्नास या ठिकाणी काही लोक सर्वेक्षणासाठी गेले होते. अचानक एके ठिकाणी त्या सर्वांची उपकरणे बंद पडली. त्याठिकाणी अधिक बारकाईने निरीक्षण केल्यानंतर असे आढळून आले की फक्त ३०० स्क्वे. फुट एरियातच मशीन्स काम करत नव्हती.

Mystery Spot

संशोधानंतर असे आढळले की या ठिकाणीदेखील पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत नाही.

त्यामुळे इथे काही अजबगजब घटना घडत राहतात. इथे लोक भिंतीवरदेखील उभे राहू शकतात. गुरुत्वाकर्षण नसल्याने याठिकाणी लोक अजबगजब कसरती करत राहतात. अगदी भिंतीवर खुर्ची ठेवून त्यावर बसतात.

या ठिकाणी जास्त काळ थांबल्यास डोके हलके होऊ लागल्याचे जाणवते. साउथ डकोटामधील रॅपिड सिटीतील कॉसमॉस मिस्ट्री एरियातदेखील काही झाडांचे खोड हे उलट्या दिशेने वाढल्याचे दिसतात. इथेदेखील आपण एकाच कोनात जास्त काळ उभे राहू शकतो. या ठिकाणचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे उंचावरून खाली पाहिल्यास इथे जमीनदेखील आपली जागा बदलत असल्याचे दिसते.

  • लडाखमधील मॅग्नेटिक हिल

जगात अशीही ठिकाणे आहेत जिथे गाड्या डोंगरावर अपोआप खेचल्या जातात. भारतातील लडाखमध्ये मॅग्नेटिक हिल नावाचा एक डोंगर आहे. या डोंगराच्या पायथ्याशी गाडी न्युट्रलवर ठेवली तरी ती अपोआप डोंगरावर खेचली जाते.

असाच एक डोंगर अमेरिकेतही आहे ज्याला स्पुक हिल म्हणतात.

भारतातीलच श्रीनगर-लेह महामार्गावर कारगिलच्या दिशेने जाणाऱ्या एका रस्त्यावर ३० किमीचा चढ आहे. इथे गाडी न्युट्रलवर ठेवली तरी ती अपोआप वरच्या दिशेने खेचली जाते. इंजिन बंद असले तरी इथे किमान २० किमी प्रती तास या वेगाने गाडी धावते.

Magnetic Hill Ladakh

गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच आपण जमिनीवरून चालू शकतो. आपले रोजचे व्यवहार करताना आपल्याला काही अडचणी येत नाही. अगदी सूर्यमालेतील ग्रहांचे चलन देखील याच शक्तीच्या जोरावर चालते.

पण काही ठिकाणी या शक्तीच्या अभावाने अशा चमत्कारी वाटणाऱ्या घटना घडतात. या ठिकाणी नेमक्या कोणत्या कारणाने गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत नाही याचे रहस्य मात्र उलगडलेले नाही. अर्थात, निसर्गाच्या जादुई पेटीतील हीदेखील एक अद्भुत किमयाच म्हणावी लागेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या चीनी सम्राटाने मरणोत्तर सुरक्षिततेसाठी ८००० पुतळ्यांची फौज बनवली होती

Next Post

कोरोना लसीच्या चाचणीसाठी या संघ स्वयंसेवकाने आपले शरीर दान केले आहे

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

4 June 2026
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
Next Post

कोरोना लसीच्या चाचणीसाठी या संघ स्वयंसेवकाने आपले शरीर दान केले आहे

माउंट एव्हरेस्टची उंची अचूक मोजण्याची किमया करून दाखवणारा अज्ञात भारतीय विद्वान

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

29 May 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.