आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आज (दि. १९ जुलै २०२४) सकाळी प्रत्येकजण आपापल्या ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे कम्प्युटर्स सुरु करत असेल, पण कम्प्युटर्स सुरु झाल्या झाल्या विंडोजची आकाशी रंगाची स्क्रीन आली. काहींचे कम्प्युटर्स सुरु झाले, पण सुरु होताच आपोआप रिस्टार्ट झाले आणि त्यांनाही अशीच आकाशी रंगाची स्क्रीन दिसू लागली, तर काहींचे कम्प्युटर्स आपोआप शट डाऊन झाले, ते पुन्हा सुरु केले तर तीच गत. हे नेमकं काय सुरु होतं याचा कोणालाच पत्ता नव्हता.
काही वेळाने कळालं की असा प्रकार जगातील जवळपास सर्वच विंडोज कम्प्युटर्सवर होत आहे. यालाच “ब्लू स्क्रीन ऑफ डेथ” (BSoD) असेही म्हणतात. या एरर्स हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरमधील समस्यांमुळे उद्भवू शकतात. जर तुम्ही नुकतेच नवीन हार्डवेअर इन्स्टॉल केले असेल आणि ब्लू स्क्रीन एरर आली तर तुमचा कम्प्युटर बंद करून, नवीन हार्डवेअर काढून टाका आणि कम्प्युटर रीस्टार्ट करा. रीस्टार्ट करताना अडचण येत असल्यास, तुम्ही तुमचा पीसी सिक्युर्ड मोडमध्ये सुरू करू शकता.
जर समस्या सर्वसाधारण असेल तर याच स्क्रीनवरील हेल्प सेक्शनमध्ये तुम्हाला सोल्युशन्स मिळू शकतील. पण अशी समस्या मायक्रोसॉफ्टकडूनच उत्पन्न होत असेल तर तुम्हाला संयम दाखवून मायक्रोसॉफ्टचे अधिकृत एक्स हॅन्डल पाहावे लागेल. असाच प्रकार आज घडला.
भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडे पाच वाजता मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हॅन्डलवरून अपडेट देण्यात आली – “हा एरर क्राउडस्ट्राइक अपडेटमुळे आला आहे.” मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिस हेल्थ स्टेटस अपडेट्सनुसार, “या एररमागील मूळ कारण म्हणजे (क्राऊडस्ट्राईकच्या) अझ्युर क्लाउड सर्विसच्या बॅकएंड वर्कलोड्सच्या एका भागात कॉन्फिगरेशनमध्ये बदल झाला, त्यामुळे स्टोरेज आणि कंप्युट रिसोर्सेसमध्ये व्यत्यय आला असून मायक्रोसॉफ्ट कनेक्टिव्हिटीवर याचा विपरीत परिणाम झाला आहे.”
क्राउडस्ट्राइक हे एक सायबरसिक्युरिटी प्लॅटफॉर्म आहे, जे वैयक्तिक वापरकर्ते आणि व्यवसायांना सायबर सिक्युरिटी सोल्युशन्स देते. याचाच वापर मायक्रोसॉफ्ट करते. क्राऊडस्ट्राईकचेच एक सायबरसिक्युरिटी सॉफ्टवेअर प्रोडक्ट आहे – फाल्कन आयडेंटिटी थ्रेट प्रोटेक्शन. फाल्कन आयडेंटिटी थ्रेट प्रोटेक्शन कायम (रिअल टाइममध्ये) विविध एंडपॉइंट्स (ज्यावरून माहितीची देवाणघेवाण केली जाते अशा लिंक्स), वर्कलोड्स आणि खोट्या ओळखीच्या आधारावर (फेक आयपी ऍड्रेसेस) सिस्टिम्स हॅक करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना ओळखून, त्यांना थांबवण्यासाठी सिंगल सेन्सर आणि युनिफाइड थ्रेट इंटरफेस वापरते. नुकत्याच फाल्कन आयडेंटिटी थ्रेट प्रोटेक्शनमध्ये केल्या गेलेल्या एका अपडेटमुळे या सेन्सरने विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये चुकीच्या पद्धतीने काम केले, हा सॉफ्टवेअर अपडेट क्लाउडवर केल्याने काहीच वेळात सर्वांपर्यंत पोहोचला. यामुळेच हा एरर आला आहे.
या एररमुळे मायक्रोसॉफ्ट 365 सर्व्हिसेससह इतर काही सर्व्हिसेस सध्या बंद आहेत. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे, “या समस्येची आम्ही कसून तपासणी करत असून समस्येची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही ट्रॅफिकला (वापरकर्त्यांना) बॅकअप आणि अल्टर्नेटीव्ह सिस्टीम्सवर शिफ्ट करत आहोत.. ”
मायक्रोसॉफ्टच्या मते, या एररमुळे PowerBI, Fabric आणि Teams सारखे सॉफ्टवेअर्स, तसेच Microsoft 365 Apps वर विपरीत परिणाम होत आहे. जगभरातील पोलीस आणि शासन व्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर देखील यामुळे विपरीत परिणाम झाला आहे. अमेरिकन एअरलाइन्स, डेल्टा एअरलाइन्स आणि युनायटेड एअरलाइन्ससह प्रमुख यूएस विमान वाहतुकीच्या कंपन्यांनी समस्यांचा हवाला देत आज सकाळी “ग्राउंड स्टॉप” जाहीर केले.
भारतात, विमान वाहतूक कंपनी – स्पाइसजेटला अनेक तांत्रिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ऑनलाइन तिकीट बुकिंग आणि चेक-इन तसेच इतर कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे. अकासा एअर आणि विमान वाहतूक उद्योगातील दिग्गज इंडिगो या कंपन्यांना देखील याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच या समस्येमुळे लंडन स्टॉक एक्स्चेंजला देखील समस्यांचा सामना करावा लागत असून याचा बँका व इतर वित्तीय सेवांवरही विपरीत परिणाम झाला आहे. युनायटेड किंगडमचे स्काय न्यूज नेटवर्क देखील बंद आहे.
क्राउडस्ट्राइकने देखील आपली चूक मान्य केली असून “आमचे इंजिनिअर्स या समस्येचे निराकरण करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत” असे म्हटले आहे. मायक्रोसॉफ्टचा क्लाउड प्लॅटफॉर्म ‘अझ्युर’ आज (शुक्रवारी, १९ जुलै रोजी) सकाळीच सुरळीत सुरु झाला आहे. त्यामुळे यावर आधारित सॉफ्टवेअर्स हळू हळू सुरु होतील.
पण या एररने अनेक ऑनलाईन सुविधा क्लाउडवर अवलंबून असतील तर काय धोके उद्भवू शकतात याची जाणीव करून दिली. जेव्हा अत्यावश्यक सेवा क्लाउड प्लॅटफॉर्मवर अवलंबून असतात, तेव्हा कोणत्याही खराबीमुळे वापरकर्ते, सेवा आणि विविध उद्योगांवर व्यापक परिणाम होऊ शकतात. प्राथमिक क्लाउड सेवा फेल झाल्यावरही ऑपरेशन्स सुरळीतपणे कसे चालू राहू शकतील यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे हे या घटनेवरून कळते. क्लाउड आणि सायबर सिक्युरिटी कंपन्यांनी राखीव सिस्टिम्स (बॅकअप सिस्टिम्स) विकसित करून त्या मेंटेन केल्या पाहिजेत. या बॅक्डअप सिस्टीम्स अशा प्रकारच्या एरर आल्यास अथवा खराबीच्या वेळी वापरता येऊ शकतात.
जर अजूनही कोणाला अशाच समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी पुढील स्टेप्स कराव्यात –
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.