The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनेक लोकांना करोडोंचा चुना लावून तो अजूनही मोकाट आहे..!

by Heramb
10 January 2025
in विश्लेषण
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


अनेकदा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपण प्रत्यक्ष त्यात उतरत नाही तर विविध प्रकारच्या एजन्सीजची मदत घेतो, या एजन्सीजमध्ये पेन्शन फंड, म्युच्युअल फंड, बॅंक्स इत्यादींचा समावेश असतो. याशिवाय अन्य काही एजन्सीज देखील यासाठी कार्यरत असतात. त्यांनाच हेज फंड्स म्हणूनही ओळखले जाते.

अमेरिकेतील अनेक लखपती उद्योजक अशाच प्रकारच्या फंड्ससंबंधी कंपन्या उभारून आपली साम्राज्ये तयार करतात. अशाच उद्योजकांपैकी एक म्हणजे स्टीव्ह कोहेन. गेल्या दशकभरात स्टीव्ह कोहेनवर अनेक आरोप करण्यात आले, पण ते सिद्ध झाले नाहीत. स्टीव्ह कोहेनवर झालेले आरोप गंभीर स्वरूपाचे होते. कंपनीमधील गोपनीय माहितीचा गैरवापर करून त्याने स्टॉक एक्सचेंजमध्ये व्यवहार केले होते. नेमकं काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊया या लेखातून..

स्टीव्ह कोहेनची हेज फंड कंपनी एसएसी कॅपिटल ॲडवायजर्सचा अमेरिकन शेअर मार्केट वॉल स्ट्रीटवर प्रचंड दबदबा होता, आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम परतावा मिळवून देण्यात ते अग्रेसर होते, पण ही घोडदौड थांबली ती २०१२ साली. याच वर्षी एसएसी कॅपिटल ॲडवायजर्सवरील आरोप सिद्ध झाल्याने कंपनीला प्रचंड मोठा दंड देखील आकारण्यात आला, परंतु कोहेनवरील आरोप सिद्ध झाले नाहीत.

अमेरिकन विश्लेषक आणि लेखिका असलेल्या शिलाह कोल्हटकर यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास आणि सविस्तर संशोधन करून ‘ब्लॅक एज’ नावाचे पुस्तक लिहिले आहे, यामध्येच त्यांनी या प्रकरणाचा सविस्तर तपशील दिला आहे.

पार्श्वभूमी

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना कोणत्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढेल, आणि कोणत्या कंपनीच्या शेअरची कमी होईल याचा अभ्यासपूर्ण अंदाज बांधण्याचे कौशल्य असायला हवे. स्टीव्हकडे योग्य अंदाज बांधण्याचे कौशल्य आणि बुद्धिमत्ता जन्मजातच होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.



वॉल स्ट्रीटवरील इतर अनेक ट्रेडर्स किंवा ब्रोकर्सप्रमाणे स्टीव्हचा जन्म श्रीमंत घराण्यात झाला नव्हता, मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेल्या स्टीव्हला शालेय जीवनापासूनच स्टॉक मार्केटबद्दल कुतुहूल निर्माण झाले होते. लहान वयात तो पोकर (जुगार) खेळून प्रचंड कमाई करत असे, अनेकदा तर “बाप से बेटा सवाई” ही म्हण त्याच्यावर तंतोतंत लागू होत असत, कारण जुगाराच्या खेळात त्याने अनेकदा आपल्या वडिलांपेक्षा जास्त कमाई केली होती.

१९७८ साली कोहेनने अमेरिकेतील ग्रुन्टल फायनॅन्शियल कॉर्पोरेशन या कंपनीत स्टॉक एक्सचेंजसंबंधी नोकरी सुरु केली. अशा प्रकारे वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षीच त्याने स्टॉक मार्केट नावाच्या समुद्रात उडी घेतली आणि एका अविश्वसनीय कारकिर्दीची सुरुवात झाली. या कंपनीत काम करत असताना त्याने स्टॉक मार्केटबद्दल अनेक गोष्टी समजावून घेतल्या. यामध्ये त्याला “इन्सायडर ट्रेडिंग” नावाचा प्रकार देखील समजला.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इन्सायडर ट्रेडिंग

प्रत्येक कंपनीला आपल्या सेवा अथवा उत्पादनांचा खप वाढवण्यासाठी, किंवा ब्रॅण्डचे नाव मोठे व्हावे यासाठी अंतर्गत चर्चा करून, काही मुत्सद्दी निर्णय आणि चर्चा गोपनीय ठेवण्याचा अधिकार जवळपास प्रत्येक देशातील संविधानाने दिला आहे. अशा प्रकारची माहिती कोणत्याही बाहेरील व्यक्तीला देणे आणि त्या माहितीच्या आधाराने स्टॉक मार्केटमध्ये व्यवहार करणे, (तो विशिष्ट स्टॉक खरेदी करणे अथवा विकणे) यालाच इन्सायडर ट्रेडिंग म्हणतात.

पण अशा प्रकारची माहिती वापरून स्टॉक एक्सचेंजमध्ये व्यवहार करणे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहेच, शिवाय अनेक देशांतील संविधानांत याविरोधात शिक्षा अथवा आर्थिक स्वरूपातील दंडाची तरतूद देखील करण्यात आली आहे.

इन्सायडर ट्रेडिंग पद्धतीचा अवलंब करत स्टीव्ह कोहेनच्या कंपनीने प्रचंड नफा कमावला होता. याकाळात स्टीव्हची कमाई वर्षाकाठी ५ ते १० लाख डॉलर्स होत असे. परंतु त्याचे हे कांड अनेक दिवस लपून राहिले नाही. सुमारे ६ वर्षांनंतर, म्हणजेच १९८५ साली त्याच्यावर अमेरिकेच्या एसइसी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनमध्ये सर्वप्रथम इन्सायडर ट्रेडिंगचे आरोप करण्यात आले. अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन भारतातील सेबीप्रमाणे शेअर मार्केट नियमनाचं काम करतं.

आपल्या एका मित्राकडून त्याला आरसीए या इलेक्ट्रॉनिक कंपनीबद्दल जबरदस्त माहिती मिळाली. जनरल इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आरसीएचे अधिग्रहण करणार अशी ती माहिती होती. अधिग्रहण होणार म्हटल्यावर त्याने आरसीएमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आणि प्रत्यक्ष अधिग्रहणाच्या वेळी त्याला सुमारे २ करोड डॉलर्सचा नफा झाला. कालांतराने हे प्रकरण बाहेर आलं देखील, पण कोहेन यातून अगदी सुखरूपपणे बाहेर पडला आणि ती केस देखील बंद करण्यात आली.

वॉल स्ट्रीट किंग

इन्सायडर ट्रेडिंगमुळे १४ वर्षांतच वॉल स्ट्रीटवर स्टॉक एक्सचेंजचे व्यवहार करणारा लहान-मोठा तरुण व्यापारी आता आपल्या ग्राहकांना सर्वांत जास्त परतावा मिळवून देऊ लागला. तो ‘वॉल स्ट्रीट किंग’ बनला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. १९९२ साली अडीच करोड डॉलर्सची गुंतवणूक करून त्याने ‘एसएसी कॅपिटल ॲडवायजर्स’ या हेज फंडची सुरुवात केली. यावेळी त्याच्याबरोबर फक्त ९ जण होते.

१९९२ पासून २०१२ पर्यंतच्या काळात स्टीव्ह कोहेनने सुरु केलेली एसएसी कॅपिटल ॲडवायजर्स कंपनी आपल्या ग्राहकांना नियमित आणि सर्वोत्तम परतावे देत होती. एसएसी कॅपिटल ॲडवायजर्स हेज फंडने वॉल स्ट्रीटवर आपला दबदबा निर्माण केला होता. त्याकाळात अनेक ट्रेडर्स आणि ब्रोकर्स कंपन्यांमधील एक्सपर्ट्सबरोबर मिळून व्यवहार करत असत. एसएसी कॅपिटल ॲडवायजर्सने देखील कंपन्यांमधील एक्सपर्टसचा वापर केला. हे एक्सपर्टस् स्टॉक ट्रेडर्सना सल्ले देत. सल्ले देत असतानाच ते कंपनीच्या आतल्या गोष्टी देखील सांगत असत. त्यामुळे काही ट्रेडर्सना याचा फायदा होऊ लागला.

अमेरिकेत मुक्त अर्थव्यवस्था असली तरी सरकारी एजन्सीज् सर्व आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेऊन असतात, त्यांचे नियमन करत असतात. ज्या कंपन्या नुकत्याच तयार झाल्या आहेत त्यांचे नियमन हलक्या हाताने केले जात असे. हेज फंड्सशी निगडित कंपन्या त्यावेळी नवख्या होत्या, त्यामुळे एफबीआयसारख्या संस्था त्यांच्यावर नजर ठेवत नसत. पण अतिशय कमी अवधीतच वॉल स्ट्रीटवर अशा कंपन्यांचा दबदबा वाढला आणि त्या एफबीआयच्या वॉचलिस्टवर आल्या. २०१२ साली एफबीआयचे सर्वांत जास्त लक्ष होते एसएसी कॅपिटल ॲडवायजर्स या हेज फंडवर.

सरकारी एजन्सीजनी आपले सोर्सेस नेमले, ट्रॅप लावला आणि सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. एसएसी कॅपिटल ॲडवायजर्सच्या काही कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. यामध्ये कंपनीत त्यावेळी काम करणाऱ्या पोर्टफोलियो मॅनेजर्सबरोबरच आधी काम केलेल्या पोर्टफोलियो मॅनेजर्सवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले. पण त्यांनी मात्र स्टीव्हविरोधात तोंड उघडले नाही.

स्टीव्हचे वकील मॅनहॅटनचा तत्कालीन ॲटॉर्नी प्रीत भराराला भेटले. ‘ॲटॉर्नी’ न्यायालयीन खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडण्याचे काम करतो. स्टीव्हच्या वकिलांनी तिथे एक मोठे प्रेझेंटेशन केले आणि या प्रेझेंटेशनमधून सरकारी बाजू ही केस जिंकू शकत नाही हे ॲटॉर्नीच्या मनावर बिंबवले. यामुळेच कदाचित त्याची बाजू कमकुवत झाली. कोर्टाने देखील थेट स्टीव्ह कोहेनवर आरोप न करता त्याच्या एसएसी कॅपिटल ॲडवायजर्स कंपनीवर आरोप ठेवले आणि अशा प्रकारे स्टीव्ह कोहेन यातूनही सुटला.

कोहेन सुटला, पण त्याच्या ‘एसएसी कॅपिटल ॲडवायजर्स’ कंपनीला दोषी ठरवून सुमारे १८० कोटी डॉलर्सचा दंड आकारण्यात आला. तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनबरोबर केलेल्या करारान्वये २०१८ पर्यंत या फर्मला लोकांचे पैसे वापरून व्यवहार करण्याची परवानगी नव्हती, तरीही स्टीव्हने स्वतःच्या पैशातून ट्रेडिंग सुरु ठेवले होते.

आजही तो ‘पॉईंट72 ॲसेट मॅनेजमेंट कंपनी’ हा हेज फंड चालवतो. त्याची नेट वर्थ सुमारे १९८० करोड डॉलर्स आहे. शिलाह कोल्हटकर यांनी एसएसी कॅपिटल ॲडवायजर्स या कंपनीचा सखोल अभ्यास करून ते इन्सायडर ट्रेडिंग कसे करतात हे सिद्ध करून दाखवले. त्यांनी या प्रकरणावर “ब्लॅक एज” हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे.

ब्लॅक एज

ब्लॅक एज हे नाव देखील वैशिष्ट्यपूर्ण असून त्यात एक गहन अर्थ दडला आहे. यातील “एज” म्हणजे एखाद्या कंपनीविषयीची माहिती, मग ती कोणत्याही प्रकारची असू शकते. अशा प्रकारच्या माहितीमुळे ती कंपनी फायद्यात जाणार की तोट्यात याचा पुरेपूर अंदाज लावता येऊ शकतो, या गोपनीय माहितीमुळे इतर गुंतवणूकदारांच्या तुलनेने ज्याच्याकडे ती गोपनीय माहिती आहे त्यांना अधिक फायदा होऊ शकतो.

शिलाह कोल्हटकर यांनी अशा प्रकारच्या माहितीचे तीन वर्गांत वर्गीकरण केले आहे. एक आहे व्हाईट एज, म्हणजेच कंपनीबद्दलची अशी माहिती जी सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केली जाते, यांमध्ये कंपनीविषयीच्या बातम्या, किंवा कंपनीबद्दलची इंटरनेटवर उपलब्ध होणारी माहिती इत्यादींचा समावेश होतो.

ब्लॅक एज म्हणजे कंपनीबद्दल असलेली सर्व प्रकारची अप्रकाशित माहिती, अशा प्रकारच्या माहितीमुळे कंपनीच्या स्टॉक प्राईझवर देखील परिणाम होऊ शकतो. तर ग्रे एज म्हणजे ब्लॅक एज आणि व्हाईट एज यांच्या दरम्यान असलेलं क्षेत्र. यामध्ये कंपनीच्याच अधिकाऱ्यांनी फंड्सचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांना काही इशारे दिलेले असतात, पण हे प्रचंड सावधानता बाळगून केले जाते.

पुराव्यांनिशी आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने लहिलेले हे पुस्तक वाचल्यानंतर कोणीही स्टीव्ह कोहेन निर्दोष असल्याचा दावा करू शकत नाही. पण कायद्याच्या दृष्टीने मात्र तो निर्दोष आहे. स्टीव्हने कंपन्यांमधून माहिती काढण्यासाठी एक व्यवस्थाच उभी केली होती, त्या व्यवस्थेतून मिळणाऱ्या माहितीपैकी बरीच माहिती बेकायदेशीर अथवा अनैतिक पद्धतीने मिळत असे. कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराबद्दल जाणून घेण्यासाठी त्याने अगदी बँकांना देखील कमिशन देऊ केले होते.

याच पुस्तकात कोल्हटकरांनी असा देखील दावा केला – “स्टीव्ह कोहेनचा आणि अर्थशास्त्राचा किंवा आर्थिक धोरणांचा काडीचाही संबंध नाही, तरी त्याने वॉल स्ट्रीटला एक वेगळी दिशा देण्याचे काम केले. बँकांकडे असणारा लोकांचा कल कमी करून तो हेज फंड्सकडे वळवण्याचे काम कोहेनने केले…”

स्टीव्हने गुंतवणुकीची व्याख्याच बदलून टाकली. त्याने शेअर्स विकत घेतले, पण म्युच्युअल फंड्स किंवा पेन्शन फंड्सप्रमाणे दीर्घ कालावधीसाठी स्वतःकडे न ठेवता त्यांचे नफा मिळवून देणारे व्यवहार अतिशय जलदगतीने केले. असं करणं जास्त परतावे मिळवून देणारं असलं तरी याने वॉल स्ट्रीटची “सर्वांसाठी खुले असलेले आर्थिक विकासाचे इंजिन” ही प्रतिमा मलिन होते. अवैध किंवा अनैतिक स्वरूपाने मिळवलेल्या माहितीच्या जोरावर झालेला नफा कायदेशीर असला काय किंवा नसला काय, पण तो अनैतिक आहे हे निश्चित.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या आहेत अमेरिकेतील सर्वांत श्रीमंत जमाती..!

Next Post

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, अर्बन कंपनीवर देखील मिळणार नाही अशी सुविधा हा डॉक्टर घरपोच देतोय..!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.