The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फेकन्यूज आणि अफवांना आळा घालण्यासाठी व्हाॅट्सऍपने हे नवीन फिचर आणलंय.

by द पोस्टमन टीम
16 April 2020
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
whatsapp fakenews the Postman
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


जेंव्हा व्हाॅट्सऍप आलं तेंव्हा हे ऍप म्हणजे जगभरातील लोकांसाठी वरदान ठरले होते. त्याच्या अगोदर फोन वरील मेसेजेस पाठवणे इतकाच मेसेजेसचा अर्थ मर्यादित घेतला जात असे. सिमकार्ड कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी मेसेजेससाठी विशेष रिचार्ज पॅक देत असत. फोन रिचार्ज केल्यानंतर सुद्धा या मेसेजेसचे पॅक घेण्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागत असत.

त्यात पुन्हा सिमकार्ड कंपन्यांची मुजोरी इतकी होती की विशेष सणासुदीच्या दिवशी या कंपन्या आपले मेसेज पॅक बंद करून ठेवत असत. म्हणजे महिनाभरासाठी एखाद्या ग्राहकाने ३० -४० रुपयाचा मेसेज पॅक मारला असेल तर सणाच्या दिवशी त्याचे हे पॅक बंद ठेवले जात असत आणि मेन बॅलंस  मधून प्रत्येक मेसेजेस चे पैसे कट केले जात.

हे फक्त मेसेजेसच्या बाबतीतच होत नसे. कॉल्स करण्यासाठी सुद्धा अशा खास दिवशी सीम कार्ड कंपन्या दुप्पट चार्ज घेत असत या कारणासाठी अनेकदा सणाच्या दिवशी लोक आपल्या लिस्ट मधल्या सगळ्या लोकांना मेसेजेस पाठवू शकत नव्हते तसेच कॉल करू शकत नव्हते.

अंँड्रॅाइड फोन बाजारात आले आणि ऍप सिस्टीमची सोय झाली तेंव्हा हे चित्र आमुलाग्र बदलले. अनेक मेसेजिंग ऍप, फ्री कॉलर ऍप या अंँड्रॅाइडच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले आणि लोकांना हव्या तितक्या वेळी हव्या तितका वेळ मेसेजेस करता येऊ लागले, हवा तितका वेळ फोन वर बोलता येऊ लागले.



यासाठी फक्त इन्टरनेटचा डाटा खर्च होत असल्यामुळे सिमकार्ड कंपन्यांना दुसरे कुठलेही हिडन चार्जेस घेता येत नाहीत त्यामुळे एका अर्थी ग्राहकांची होणारी लुटमार थांबली. दिवसरात्र लोक आपल्यापासून दूर असलेल्या प्रिय व्यक्तीबरोबर बोलू लागले. जिथे पूर्वी १ मेसेज परदेशी पाठवायचा म्हटला तरी १०-१५ रुपये लागायचे तिथे आता व्हाॅट्सऍप, टेलिग्राम, हाईक, स्काईप असे अनेक ऍप आले आणि लोकांची मोठी सोय झाली.

the postman

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

माणूस जगभरात एकमेकांबरोबर कनेक्ट झाला. रात्रंदिवस गप्पा मारण्याची सोय या ऍपने करून दिली, त्यात पुन्हा व्हिडीओ कॉलिंग करण्याचे फीचर्स सुद्धा ऍड केल्यामुळे दूर अंतरावरून सुद्धा लोकांना एकमेकांना बघता येवू लागले.

व्हाॅट्सऍप फोन मध्ये नाही असा माणूस आज शोधून सुद्धा सापडणार नाही. लोकांच्या तोंडी तुला व्हाॅट्सऍप करतो, मला व्हाॅट्सऍप कर, असे शब्द रुळले आहेत.

आज अंँड्रॅाइड प्लॅटफॉर्मवर सगळ्यात लोकप्रिय असलेले ऍप म्हणजे व्हाॅट्सऍप आहे. याचा उपयोग लोक मीटिंग घेण्यासाठी, बिझनेस वाढवण्यासाठी सुद्धा करतात. त्यासाठी ग्रुप बनवण्याची मोठी सोय व्हाॅट्सऍपने दिलेली आहे.

जिथे इतक्या सगळ्या उपयुक्त गोष्टी आहेत तिथे या सगळ्यांना एक काळी किनार सुद्धा आहे. व्हाॅट्सऍपने SMS व्यवस्था जवळ जवळ संपवून टाकलेली आहे. पूर्वी मेसेजेस ना चार्जेस पडत असल्यामुळे जास्त कुणी मेसेजेस फॉरवर्ड करत नसायचे आज मात्र व्हाॅट्सऍपची सगळ्यात मोठी डोकेदुखी बनली आहे ती म्हणजे या ऍप वरून मेसेजेस आगीचा वणवा लागल्यासारखे व्हायरल होत राहतात.

याच्यामुळे अनेक खोटे मेसेजेस या व्हाॅट्सऍप वरून व्हायरल करण्यासाठी लोक याचा वापर करतात. फक्त व्हाॅट्सऍप मेसेज व्हायरल झाल्यामुळे मारामारीच्या घटना घडल्या, मॉब लीन्चिंग च्या घटना घडल्या असे अनेक प्रसंग आपण पाहतो. अनेक वेळा व्हाॅट्सऍप मेसेजेस प्रकरण खून करण्यापर्यंत पोहोचले असे धक्कादायक रिपोर्ट देखील आलेले आहेत. त्यामुळे व्हाॅट्सऍप आता फेक न्यूज व्हायरल करणारे ऍप अशा पद्धतीने बदनाम झालेले आहे.

fake news the postman

सकाळ दुपार संध्याकाळ लोक हजारो मेसेजेस एकमेकांना फॉरवर्ड करत राहतात. त्याच्यामध्ये मेसेजेस ची सत्यता तपासून पाहण्याच्या फंदात कोणी पडत नाही. अशा मेसेजेस मुळे अनेक वेळा तेढ निर्माण होणे, दंगे भडकणे अशा गोष्टी सर्रास होतात त्यामुळे ही कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणेसाठी मोठी डोकेदुखी होवून बसली आहे.

आज कोरोनाचे संपूर्ण जगात थैमान चालले असताना या व्हाॅट्सऍप सारख्या ऍप मुळे अनेक खोट्या बातम्या, कोरोनावर औषध मिळाले आहे असा अपप्रचार, मृतांची संख्या, अनेक सोसायटी, शहरात लागण झालेल्या व्यक्तींची नावे, फोटो पसरवले जात आहेत.

अनेकदा कोरोनाची लागण झालेली नसताना एखाद्या व्यक्तीला लागण झाल्याचा दुष्प्रचार पसरवणे या अशा कामात व्हाॅट्सऍपची फार मोठी मदत घेतली जात आहे. धार्मिक तेढ वाढवणारे मेसेजेस सुद्धा सध्या प्रचंड व्हायरल केले जात आहेत. त्यासाठी आता व्हाॅट्सऍप ग्रुपच्या ऍडमिनवर असे खोटे आणि भडकावू मेसेज पसरवले तर कारवाई करण्याचे आदेश देखील दिले गेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी कारवाई झालेली आहे.

व्हाॅट्सऍपने या सर्व गोष्टी विचारात घेवून आता मेसेजेस फॉरवर्ड करण्याच्या संख्येवर आता बंदी आणली आहे.पूर्वी मेसेज फॉरवर्ड करायला लिमिट नसायचे. नंतर हे लिमिट ५ वर आणण्यात आले. एक मेसेज किमान ५ लोकांना फॉरवर्ड केला जावू शकत होता. आता हे प्रमाण माणशी एका व्यक्तीवर आणले आहे.

आता फक्त एकाच व्यक्तीला मेसेज फॉरवर्ड होवू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हाॅट्सऍपने केलेला हा बदल स्वागतार्ह आहे असे म्हणावे लागेल. स्वत:कडून करेक्टिव्ह मेजर्स घेण्यात व्हाॅट्सऍपने घेतलेला हा पुढाकार बऱ्याच खोट्या मेसेजेसना पुढे फॉरवर्ड होण्यापासून टाळू शकतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

 

Tags: Corona VirusFight Against CoronaWhatsApp
ShareTweet
Previous Post

एकदा बरा झाल्यानंतर कोरोनाची दुसऱ्यांदा लागण होते का..? पहा डॉक्टर्स काय म्हणतायत..!

Next Post

ज्या चीनने जगाला कोरोना दिलाय तिथल्याच एका डॉक्टरने जगाला N95 मास्क सुद्धा दिलाय

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

ज्या चीनने जगाला कोरोना दिलाय तिथल्याच एका डॉक्टरने जगाला N95 मास्क सुद्धा दिलाय

शास्त्रज्ञांनी नाझी सैन्याला खोट्या लसी पाठवून मुर्खात काढलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.