आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गोष्ट तशी दुसऱ्या महायु*द्धाच्या काळातील आहे. दुसरे महायु*द्ध हे एका अर्थाने जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हि*टल*र याने जगावर लादले होते. जगावर राज्य करण्याची त्याची रक्तपिपासू महत्त्वाकांक्षा संपूर्ण जगाला विनाशाच्या खाईत घेऊन गेली.
हि*टल*रने त्याच्या काळात ज्यू लोकांवर केलेले अनन्वित अ*त्याचार आजही जग विसरलेले नाही. जवळपास ३ करोड ज्यू लोकांची ह*त्या हि*टल*रने जर्मनीमध्ये उभ्या केलेल्या छळ छावण्यांमध्ये करण्यात आली. दुसऱ्या महायु*द्धात जर्मनीच्या फौजा पोलंडला जाऊन धडकल्या. पोलंड काबीज करून पुढे फ्रांस, स्वीडन, नॉर्वेवर ना*झी फौजा धडका मारत होत्या. सगळीकडे भीतीचे वातावरण पसरलेले होते.
जेव्हा इतके यु*द्ध पेटलेले होते तेव्हा युरोपमध्ये अनेक रोगांच्या साथी देखील पसरलेल्या होत्या. त्याला ना*झी सैन्य देखील बळी पडले. त्यावेळी ना*झी सैन्यामध्ये ‘टायफस’ नावाचा रोग वेगाने पसरला होता. हा रोग माणसाच्या केसात होणाऱ्या उवांमुळे पसरत असे.
हि*टल*रने बुकेनवाल्ड या गावी ज्यू लोकांना यातना देऊन मारण्यासाठी छळछावणी उभारलेली होती. या छळछावणीमध्ये तैनात असलेल्या ना*झी सैन्याला या टायफसची लागण व्हायला सुरुवात झाली होती. जर्मन डॉक्टर या साथीच्या रोगावर औषध शोधण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांच्या प्रयत्नांना हवे तसे यश येत नव्हते. या कामी लस शोधून देण्यासाठी पोलिश डॉक्टर आणि संशोधक लोकांचीही मदत घेण्यात आली.
लुडविक फ्लूक नावाचा एक पोलिश ज्यू डॉक्टर होता त्याच्या प्रयत्नातून या रोगावर लस तर सापडली पण यातील मेख अशी की जी खरोखरची लस होती ती या ना*झी सैन्याच्या हातात पडू नये अशी लुडविकची इच्छा होती. त्यामुळे खरी लस जर्मन सैन्यांच्या हातात कधीच पडली नाही. या रोगाचे थैमान इतके प्रचंड वाढले होते की ना*झी सैन्य यु*द्धापेक्षा या रोगाच्या संसर्गाला जास्त घाबरले होते.
ना*झी सैन्याला हा टायफस रोग नाकीनऊ आणत होता. अनेक जर्मन डॉक्टर याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यात त्यांना यश येत नव्हते. लुडविक फ्लूक या पोलंडमधील ज्यू डॉक्टरने खरी लस ना*झी सैन्याच्या हातात पडू नये म्हणून तब्बल १६ महिने नाझींना अंधारात ठेवून खोटी लस पाठवण्याची व्यवस्था केली होती.
पहिल्यांदा जेव्हा या रोगाची लागण सुरु झाली तेंव्हा त्याला जर्मन सैन्याने अजिबात मनावर घेतलेले नव्हते. ज्यू लोकांच्या ‘घेट्टो’मध्ये हा रोग वेगाने पसरत चालला होता. प्रचंड ताप, थंडी आणि अंगदुखी होवून टायफॉईड रोगासारखी लक्षणे दिसून रोगी तडफडून मरण पावत असे. या रोगाने अनेक कैद्यांचा देखील बळी घेतला त्यानंतर मात्र जर्मन ना*झी सैन्याला देखील या रोगाची लागण व्हायला सुरुवात झाली.
त्यावेळी बर्लिनच्या मेडिकल संस्थेमध्ये या रोगाची लस शोधण्यासाठी उपाय सुरु झाले पण त्याला उशीर झाला होता. या मेडिकल संस्थेचा प्रमुख जोशाम मृगोवास्कीने आपले संशोधन बर्लिन वरून बुकेनवाल्डच्या छळछावणीमध्ये हलवले कारण ब्रिटीश फौजांनी बर्लिन बॉ*म्बह*ल्ले करून उ*द्ध्वस्त केले होते. बुकेनवाल्डच्या छावणीमधील ज्यू लोक प्रयोगासाठी वापरता येईल असा यांचा साधा सरळ फंडा होता.
जर्मन शास्त्रज्ञ रुडोल्फ वोगी, जो तेव्हा जोशाम मृगोवास्कीबरोबर काम करत होता. याच रुडोल्फने टायफोइडवरची लस शोधून काढलेली होती. वोगीने आपल्या संस्थेमध्ये यु*द्धात हरलेल्या पोलिश लोकांना भरती करून घेतलेले होते.
या लोकांवर झालेल्या संसर्गाचा अभ्यास करून त्यांच्या डोक्यात असलेल्या उवांपासून लस तयार करायची असा आराखडा साधारणपणे ठरला होता. मात्र छळछावणीमध्ये अशा माणसांच्या डोक्यात तयार झालेल्या उवांची प्रयोगशाळा तयार करण्यासाठी सरकार परवानगी देत नव्हते. दुसरीकडे कोंबडीच्या अंड्यापासून बनवलेली लस यामध्ये उपयोगी पडेल का याबाबत देखील संशोधन चालू होते पण छावणी मध्ये पोल्ट्री फार्म जरी उघडला तरी त्यांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
११ डिसेम्बर १९४२ रोजी मृगोवास्कीने एक अभिनव पद्धत शोधून काढली. त्याने आणि त्याच्या इतर डॉक्टरच्या टीमने सशाच्या फुफ्फुसापासून लस तयार केली, जिची रोगाबरोबर लढण्याची क्षमता त्या मानाने कमी होती. अशा पद्धतीने लस तयार करणे हे अत्यंत जिकीरीचे काम होते. या लसीचे मानवी शरीरावर होणारे प्रयोग बघण्याआधी त्याचे सशावर अनेक वेळा प्रयोग होणे आवश्यक होते. १९४३ सालच्या नाताळ सणाच्या आधी या लसीचा पहिला नमुना तयार झाला. छळ छावणीमधील कैद्यांवर याचा प्रयोग करायचे ठरले.
याचवेळी मृगोवास्कीने नेमलेल्या या डॉक्टर्स लोकांच्या टीममध्ये डॉ. लुडविक यांची एन्ट्री झाली. लुडविक याने बर्लिन मेडिकल संस्थेचा प्रमुख मृगोवास्की याच्या हाताखाली ट्रेनिंग घेतलेले होते त्यामुळे त्याला या लसीकरणामधील फोलपणा लक्षात आला.
ज्याला बाकीचे टीममेट्स सशाच्या फुफ्फुसापासून तयार झालेल्या अँटीबॉडीज समजत आहेत, त्या प्रत्यक्षात सशाच्या शरीरातील पांढऱ्या पेशी होत्या. ही गोष्ट लुडविकने टीमला समजावून सांगितली. टीममधले बहुतांशी डॉक्टर आणि अधिकारी हे मानवतावादी असल्यामुळे या गोष्टीची खबर मृगोवास्की आणि नाझी सैन्याला झाली नाही पाहिजे यावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब केले.
यानंतर याच डॉ. लुडविकच्या नेतृत्वाखाली या टीमने खरीखुरी लस शोधून काढली. याचा संशय वर बसलेल्या मृगोवास्की आणि इतर ना*झी अधिकाऱ्यांना कधीही आला नाही. त्यांना मेडिकल टर्म्स फारशा कळत नसल्याचा ही फायदा झाला. खरी रोगप्रतिबंधक लस छळछावण्यांमध्ये अत्यंत हलाखीत काम करणाऱ्या लोकांना पोहोचती केली जायची आणि ना*झी सैन्यासाठी निरुपयोगी सशाच्या पांढऱ्या पेशी लस म्हणून पोहोचत्या केल्या जात असत ज्याचा सक्सेस रेट अत्यंत कमी होता.
हे काम पुढे अमेरिकन सैन्याने १९४५ साली बुकेनवाल्डची छळछावणी उ*ध्वस्त करेपर्यंत चालले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.