The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी बांधण्यात आलेला ४,००० फुटाचा बोगदा पोलिसांनी शोधून काढलाय!

by द पोस्टमन टीम
24 April 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


नशेची चटक लागलेली व्यक्ती त्याचे व्यसन पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. तसेच तरुणांमध्ये नशेची ही बीजे रोवणारे, अवैध धंदे करून त्यावर आपले बेकायदा साम्राज्य टिकवणारे गुन्हेगार काहीही करून आपले अवैध धंदे कसे तेजीत चालतील हेच पाहत असतात. नशा करणे किंवा त्यासारखे पदार्थ बाळगणे किंवा त्यांचा पुरवठा करणे हा अवैध धंदाच मानला जातो.

या स्मगलिंगला चाप लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय पोलीस सतत प्रयत्नशील असते. कारण, नशेचा हा व्यवसाय पार सातासमुद्रापार चालत असतो.

या व्यवसायाला सीमेचे बंधन अजिबात नाही. असे बेकायदेशीर उद्योग करणाऱ्यांना सतत पोलिसी दंडुक्याचा धाक असतोच. पण, हे बिलंदर बहाद्दर काही न काही शक्कल लढवून पोलिसांच्या हातावर तुरी देतच असतात. आपला बेकायदा धंदा सुरु राहण्यासाठी ते वाट्टेल ती शक्कल लढवतात. पण, ‘कानून के हात बहोत लंबे होते है’ याची प्रचीती आल्यावाचून राहत नाही.

२०२० साली फेड पोलिसांना (फेडरल रिझर्व सिस्टम) अमेरिका-मेक्सिको बॉर्डरवर एक भूयारी बोगदा सापडला. अमेरिका ते मेक्सिकोपर्यंत पसरलेल्या या बोगद्यची लांबी ४,३०९ फुट इतकी आहे.

जानेवारी २०२० मध्ये स्पेशल टास्कफोर्स टीमने या बोगद्याचा शोध लावला. विशेष म्हणजे इतक्या लांब बोगद्यात व्हेंटीलेशन आणि लाईटींगची देखील सोय आहे. या बोगद्याच्या फुटेजमध्ये व्हेंटीलेशन ट्युब्ज आणि लाईटींग केबल्स आढळून आले आहेत. इतर ही सर्व आधुनिक सोयीसुविधा इथे उपलब्ध आहेत.



या बोगद्यात सुमारे तीन करोड डॉलर इतक्या किमतीचे ड्र*ग्ज आढळून आले. हा बोगदा तीजुआना, मेक्सिको आणि सॅन डीएगो प्रांतातील ओटे मेसा या प्रदेशातून जातो.

यामध्ये सापडलेल्या बेकायदेशीर मालमत्तेमध्ये ३ हजार पौंड किमतीचा मारी*जुआ*ना, १ हजार तीनशे पौंड किमतीचे को*केन, ८६ पौंड किमतीचे मेटा*फेटा*माईन आणि १७ पौंड किमतीचे हिरो*ईन सापडले आहे. शिवाय दोन पौंड किमतीचे फें*टॅनील देखील होते. अवैध ड्र*ग्ज स्मगलिंगचे हे एक मोठे रॅकेट असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

एकाच बोगद्यात एवढ्या मोठ्या किमतीचा माल सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही ते म्हणाले. जमिनीच्या आत ३० फुटावर हा बोगदा खोदण्यात आला आहे.

ड्र*ग्जची वाहतूक होऊ नये म्हणून आम्ही डोळ्यात तेल घालून सीमेवर राखण करतो. तरीही हे ड्र*ग्ज स्मगलर आमच्या डोळ्यात धूळ फेकण्याची एकही संधी सोडत नाहीत. आमच्या समाजात या ड्र*ग्जची ही विषवल्ली पसरू नये म्हणून आम्ही अत्यंत दक्ष राहून काम करत असतो. असे ड्रग्स एन्फोर्समेंट एजन्सीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

सॅन डीॲगो ट्युनेल टास्क फोर्स या विशेष दलाने १९ मार्च २०२० रोजी विशेष मोहीम आखून हा बोगदा शोधून काढला.

या विशेष दलामध्ये स्थलांतरित एजंट, सीमा शुल्क अंमलबजावणी अधिकारी, मादक द्रव्य अंमलबजावणी प्रशासन आणि सीमेवर गस्त घालणाऱ्या दलातील जवान यांचा समावेश असतो. अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्या टोळ्या पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटनेद्वारे विशेष ड्र*ग स्मगलिंग मोहीम आखून त्याद्वारे असे बोगदे शोधले जातात.

या बोगद्यांमधून भरमसाठ अवैध ड्र*ग्ज सापडत असले तरी, कधीही कोणाला अटक झालेली नाही. १९९३ पासून आजपर्यंत सॅन डीऍगो परिसरात असे ७० बोगदे सापडले आहेत.

“अशाप्रकारे सीमापार खोदण्यात आलेल्या बोगाद्यांमुळे आमच्या राष्ट्राच्या सुरक्षिततेला देखील धोका संभवू शकतो. अशा प्रकारच्या बोगद्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगार कोणतीही वस्तू किंवा शस्त्रास्त्रे अमेरिकेमध्ये सहज पोचवू शकतात. विशेषत: जगभर कोरोनाच्या महामारीने हाहाकार माजला असताना अशा प्रकारची कृत्ये अधिकच चिंताजनक आहेत.” असे मत सीमा गस्त एजंट ॲरोन एम. हैटेक यांनी व्यक्त केले. या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे गुप्त भुयारी बोगदे अधिकच धोकादायक ठरू शकतात.

विशेष म्हणजे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ली या सीमेवर जी भिंत उभी केली आहे, तिच्या पासून हा बोगदा अगदी हातभर अंतरावर आहे.

विशेष म्हणजे, सप्टेंबर २०१९ मध्ये जेंव्हा ट्रम्प यांनी ओटा मेसा भागाला भेट दिली होती, तेंव्हा ते म्हणाले होते, “माझ्या राजकीय महत्वाकांक्षेतून उभी रहाणारी ही सीमापार भिंत अगदी अभेद्य असेल.” परंतु, या भिंतीमुळे अमेरिकेत होणारी अवैध ड्र*ग वाहतूक पूर्णतः थांबेल असा जो ट्रम्प यांचा दावा होता, त्याबाबत अनेक संरक्षण तज्ज्ञ प्रश्न उपस्थित करत आहेत.

सध्या या भिंतीचे बांधकाम थंडावले आहे. कारण फेडरल कोर्टाने ट्रम्प प्रशासनाला राष्ट्रीय आणीबाणी सुरक्षा निधीतील रक्कम या भिंतीच्या बांधकामास वापरता येणार नाही असा आदेश जारी केला आहे.

त्यामुळे सध्या तरी हे बांधकाम पूर्णतः बंद आहे. इतका मोठा खर्च आणि उलथापालथ करूनही त्याचे काहीच फलित सध्या तरी दिसत नाही. या भिंतीमुळे कदाचित बेकायदा घुसखोरांची संख्या कमी होऊ शकते, पण अवैध धंद्यातील वाहतूक आणि त्याद्वारे राष्ट्रीय सुरक्षेला उद्भवणारा धोका, हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात.

ड्र*ग्जचे अवैध धंदे करणारे हे गुन्हेगार फक्त जमिनीखालच्या मार्गांचाच अवलंब करतात असे नाही तर, समुद्री सीमा पार करूनही ते या मादक द्रव्यांची वाहतूक करतच असतात.

समुद्री मार्गाने देखील मोठ्या प्रमाणात अशा मादक द्रव्यांची वाहतूक केली जाते. समुद्री मार्गाने होणारी ही वाहतूक देखील सीमापार राष्ट्रांच्या सुरक्षा यंत्रणेसमोरील एक आव्हान आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये एका ड्र*ग वाहतूक करणाऱ्या जहाजावर १० करोड डॉलर किमतीचे को*केन सापडले होते. अधिकाऱ्यांच्या मते हे को*केन दक्षिण अमेरिकेतून युरोपमध्ये पाठवण्यात येत असावा असा त्यांचा अंदाज आहे.

जलमार्ग असो की भुयारी मार्ग, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेले हे आव्हान सहजपणे संपुष्टात येईल असे वाटत नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: Drug SmugglingNarcoticsSmuggling Tunnel
ShareTweet
Previous Post

ऑनलाइन भेटलेल्या जोडप्याचं लॉकडाऊनमध्ये ‘ऑनलाइन’ लग्न झालंय!

Next Post

MDH वाले आजोबा कधीच सोडून जाणार नाहीत असं वाटायचं, पण…

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

19 August 2024
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post
m d h masale

MDH वाले आजोबा कधीच सोडून जाणार नाहीत असं वाटायचं, पण...

bhilwada pattern

कोरोनाला रोखण्यासाठी राजस्थानातलं 'भिलवाडा मॉडेल' देशासाठी आदर्श ठरतंय!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.