आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
आजच्या काळात जग किती पुढे गेलं आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, आणि अर्थात आपण सर्वांनी सुद्धा त्याचा स्वीकार करत स्वतःला तेवढं अपग्रेड केलं आहे. या पुढे गेलेल्या जगाचा एक भाग म्हणजेच आज आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध असणार इंटरनेट आणि त्या इंटरनेट च्या माध्यमातून होणारी सगळी कामे.
बँकांची कामे असो, सरकारी कामे असो खरेदी विक्री असो किंवा कुठलेही आर्थिक व्यवहार असो आज ही सगळी कामे इंटरनेट च्या माध्यमातून घरबसल्या होऊन जातात
पण जर असच एखाद्याने घरबसल्या लग्न केलं तर ? आपल्याला हे ऐकून नवल वाटेल नाही का ? पण हे खर आहे, आणि हे घडलंय ते आपल्या भारतातच
सोशल मीडिया साईट्स वर भेटलेल्या प्रेमीयुगुलाने सहा महिन्यांपूर्वी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि आपल्या घरी आपल्या प्रेम प्रकरणाबाबत माहिती दिली, घरच्यांनी सुद्धा सगळ्या गोष्टी स्वीकारून त्यांना लग्नासाठी परवानगी दिली.
सगळ्या पुढच्या गोष्टी सुरू झाल्या. खरेदी झाली, मुहूर्त ठरला आणि ४ एप्रिल ही लग्नाची तारीख दोन्ही कुटुंबाकडून सहा महिन्यांपूर्वी निश्चित करण्यात आली, तेव्हा कुठे कोणाला माहिती होत की पुढे हे अस सगळं वाढून ठेवलं आहे म्हणून!
पण कोरोना या रोगाची साथ आली आणि संपुर्ण देशात संचारबंदी लागू झाली व आता आपल्या लग्नाचं कस होणार ही काळजी या दोघांनाही वाटू लागली.
हुशार असलेल्या नवरदेवाने यावर तोडगा काढत व्हिडीओ कॉलिंग च्या माध्यमातून लग्न करण्याचा प्रस्ताव घरच्यांसमोर तसेच वधुपक्षासमोर ठेवला.
व विशेष बाब म्हणजे दोन्ही घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी याला विरोध न करता संमती दर्शवली व शेवटी ठरल्याप्रमाणे ४ एप्रिल रोजीच ऑनलाइन विवाह करण्याचा निर्णय ठाम झाला व तब्बल ५० कुटुंबियांच्या साक्षीने हा आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला.
दोन तास चाललेल्या या विवाहसोहळ्यास ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दुबईसारख्या देशातून सुद्धा नातेवाईक वर्हाडी मंडळींनी वधू व वरांस शुभाशीर्वाद दिले.
प्रत्येकाने आपल्या जवळ असलेल्या मिठाईने तोंड सुद्धा गोड केले आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे एरवी पंजाबी लग्नात होती तशी गरबा पार्टी सुद्धा या विवाहसोहळ्यात झाली व सर्वांची मने व परिस्थिती चे भान राखत हा विवाहसोहळा पार पडला..
मुंबईत राहणार २९ वर्षीय मर्चंड नेव्ही ऑफिसर असलेले प्रित सिंग हे नवरदेव या विवाहसोहळ्याविषयी सांगतात की सहा महिन्यांपूर्वी आमचं सगळं ठरलं होत, आणि आमची सर्व तयारी सुद्धा झाली होती.
तसेच परदेशातून सुद्धा सगळे नातेवाईक येणार असल्याने Lockdown जरी संपलं तरी मोठा विवाह समारंभ करता येईलच अशी खात्री नव्हती. म्हणून सर्वांची मने राखत सर्वांचा आनंद टिकून रहावा म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असे ते म्हणतात…
लग्न झाल्याने आम्ही अत्यंत आनंदी आहोतच पण त्या बरोबरच यातली लग्नसोहळा उरकल्यानंतर आम्ही सोबत नाहीयेत हीच आम्हाला फार अवघड गोष्ट वाटत आहे अस ते म्हणाले… या सगळ्यात प्रीत यांनी त्यांची गोव्यात आयोजित केलेली बॅचलर्स पार्टी सुद्धा त्यांना रद्द करावी लागली.
तसेच लग्नानंतर हनिमून साठी श्रीलेंकेत जाण्याचा प्लॅन सुद्धा त्यांना पुढे ढकलावा लागला आहे…पण लवकरच हे कोरोना संकट टळलं की मोठा समारंभ साजरा करून हा सोहळा साजरा करण्याचा आमचा मानस आहे अस त्यांनी सांगितलं आहे…