The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

by द पोस्टमन टीम
16 September 2023
in ब्लॉग, मनोरंजन
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


उद्यापासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाची धूम पुढील १० दिवस निरंतर राहणार आहे. गणपती बाप्पा हे आपल्या सगळ्यांचं लाडकं दैवत. अगदी लहानपणापासूनच आपलं त्याच्याशी एक वेगळं, खास असं नातं असतं. इतर देवांच्या तुलनेत लांब सोंड अन् मोठं पोट असलेला गणपती बाप्पा आपल्याला त्याच्या वेगळेपणामुळे जवळचा वाटतो.

चित्रकलेतही बाकीच्या देवांच्या तुलनेत गणपतीचं चित्र कधीही सोपं असतं. श्रावण संपत आला की, गणेशोत्सवाचे वेध लागतात. महिनाभर आधीपासूनच खपून केलेली सजावट, बाप्पाच्या मूर्तीची निवड, पूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची तयारी इथपासून ते प्रत्यक्ष भाद्रपद शु. चतुर्थीला होणारं बाप्पाचं आगमन व पूजा, उत्साहात म्हटलेल्या आरत्या, चविष्ट मोदकांचा प्रसाद हे सर्व अत्यंत आनंददायी असतं. महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होतो, पण खऱ्या अर्थाने त्याची मजा असते, ती कोकणात.

शिमगा आणि गणेशोत्सव हे कोकणातले सगळ्यात मोठे सण मानले जातात. या दोन्ही सणांना कोकणी माणूस हा जगात कुठेही असला तरी आवर्जून गावी येतोच. कोकणात तसं घरगुती गणपतीचंच प्रस्थ मोठं. सार्वजनिक गणपती कोकणात तसे त्यामानाने कमीच. 

साधारणपणे दीड दिवस ते अनंत चतुर्दशीपर्यंत कोकणात गणेशोत्सव साजरा होतो. क्वचित काही गणपती हे २१ दिवसांचेही असतात. गणपती बरोबरच गौरी उत्सवही कोकणात साजरा होतो. अशाच कोकणातील गणेशोत्सवाशी संबंधित अशा काही वेगळ्या प्रथापरंपरांविषयी आज आपण जाणून घेऊया.

साधारणपणे गणेश चतुर्थीलाच बाप्पाचं आगमन होतं हे तर आपल्याला माहीत आहे. पण रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख इथल्या जोशी कुटुंबाकडे गणपती भाद्रपद शु. चतुर्थीऐवजी प्रतिपदेलाच तीन दिवस आधी स्थापन होतो. यामागेही एक कारण आहे. या जोशी कुटुंबाचे मूळ पुरुष गणेशभक्त होते. अष्टविनायकांपैकी सर्वांत पहिला आणि महत्वाचा गणपती मानला जाणाऱ्या मोरगाव येथील मोरेश्वर मंदिरात पुजारी म्हणून ते सेवा करत होते. एकेदिवशी अचानकच त्यांची तब्येत बिघडली. बरेच उपचार करूनही त्यामध्ये सुधारणा होईना.

एके दिवशी ते झोपलेले असताना मयुरेश्वराचा त्यांना स्वप्नात दृष्टांत मिळाला. “मंदिरामागे विहिरीजवळ मी आहे. मला बाहेर काढ.” त्याप्रमाणे जोशीबुवांनी मंदिरामागच्या विहिरीजवळची जमीन खणून पाहिली असता त्याठिकाणी पेटीत उजव्या सोंडेची चांदीची गणेशमूर्ती सापडली.

बुवांना फार आनंद झाला. काही दिवसांनी ते आजारपणातून पूर्ण बरे झाले. तेव्हा पुन्हा एकदा मोरेश्वराने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की, आता सापडलेली मूर्ती घेऊन आपल्या गावी परत जा आणि तिथे माझा उत्सव सुरू कर.

त्यानुसार जोशीबुवा ती चांदीची गणेशमूर्ती घेऊन देवरुखला आले. तिथे त्यांनी भाद्रपदातील गणेशोत्सवाची सुरुवात केली. ज्या दिवशी जोशीबुवांना ती गणेशमूर्ती सापडली, तो दिवस होता भाद्रपद शु. प्रतिपदा. म्हणून आजही इथे त्याच भाद्रपद शु. प्रतिपदेलाच गणेशोत्सवाची सुरुवात होते. त्या दिवशी इथे उत्सवमूर्तीचं वाजतगाजत आगमन होतं.

हे देखील वाचा

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

इथली गणेशमूर्ती ही नेहमीप्रमाणे मूषकवाहन अर्थात उंदीरमामावर बसलेली नसते, तर ती चक्क घोड्यावर विराजमान असते. या परंपरेमागे असं कारण आहे की, मराठेशाहीच्या दरम्यान इथले अनेकजण छत्रपती शिवाजी महाराज तसंच छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्यात होते. शंभूराजेंना फसवून जी अटक करण्यात आली, ते कसबा हे गावही इथून जवळच आहे.

जोशीबुवांनी सुरू केलेला गणेशोत्सव आज देवरुखमध्ये जोशी कुटुंबियांच्या चौसोपी वाड्यात अत्यंत उत्साहात साजरा होतो. हा गणपती ‘चौसोपीचा गणपती’ या नावाने आता ओळखला जातो. जोशीबुवांना सापडलेली उजव्या सोंडेची चांदीची गणेशमूर्ती आजही जोशी कुटुंबियांनी देव्हाऱ्यात जतन करून ठेवली आहे.

भाद्रपद प्रतिपदेला या उत्सवमूर्तीचं आगमन होतं. ही मूर्ती शाडू मातीची असून ती पूर्णपणे हाताने (कोणताही साचा न वापरता) तयार केली जाते. या मूर्तीचं वाहन असलेला अश्व अर्थात घोडा लाकडी असतो. गणपतीसोबत रिद्धी-सिद्धी तसेच भालदार-चोपदार यांच्याही लाकडी मूर्ती असतात. ही मूर्ती पारंपरिक कोकणी पध्दतीने डोक्यावरुन आणली जाते.

भाद्रपद प्रतिपदेच्या दिवशी सकाळी जोशी कुटुंबाच्या मूळ घरात गणपतीची प्राणप्रतिष्ठा होऊन नंतर चौसोपीच्या गणपतीची मिरवणूक निघते. असे एकूण दोन गणपती देवरुखमध्ये भाद्रपद प्रतिपदेला स्थापन होतात. गणेश चतुर्थीदिवशी दुपारी गणेशजन्माचं कीर्तन व रात्री जागरण असतं.

त्याशिवाय रोज संध्याकाळी आरती झाल्यानंतर भोवती नाचवायचा (गणपतीसमोर घरातले सर्व स्त्रीपुरुष गोल करून फेर धरतात) कार्यक्रम असतो. गौरी विसर्जनाच्या दिवशीच या गणेशमूर्तींचं विसर्जन केलं जातं. विसर्जनाच्या आदल्या रात्रीही जागरण व पहाटे लळीताचं कीर्तन होतं. कीर्तनानंतर गुलाल उधळला जातो. पेशवाई काळापासूनची सुमारे ३७५ वर्षांची भव्यदिव्य परंपरा या गणेशोत्सवाला लाभलेली आहे.

अशीच मोठी परंपरा लाभलेला कोकणातला आणखी एक गणेशोत्सव म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात तारामुंबरी गावातील खवळे कुटुंबियांचा गणेशोत्सव. 

या घराण्यातील एक पूर्वज हे शिवाजी महाराजांच्या काळात सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या सेनेत होते. त्यांना बरीच वर्षं मूलबाळ होत नव्हतं. एकदा त्यांना गणपतीने स्वप्नात येऊन माझी स्थापना कर, अशी आज्ञा केली. मग इ.स. १७०१ मध्ये त्यांनी गणपती स्थापन केला. त्यानंतर त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव गणोजी ठेवण्यात आलं.

दिवस पहिला

आज त्यांची सुमारे दहावी पिढी हा उत्सव साजरा करत आहे. या गणपतीची प्रसिद्धी एवढी झालीय की, एका चित्रपटातही तो दिसला आहे. या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती कुठल्याही कारागिराकडून न बनता खवळे कुटुंबाचे सदस्य स्वतःच शेतातील माती आणून तयार करतात. कुठलाही साचा नसताना दरवर्षी हा गणपती हुबेहूब एकसारखाच बनवला जातो.

विसर्जनादिवशीचं रुप

२१ दिवसांच्या उत्सव काळात रोज रुप बदलणारा कदाचित हा एकमेव बाप्पा असावा. श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेच्या दिवशी मूर्ती बनवायला सुरुवात केली जाते. साधारण ६ फूट उंची असते. गणेश चतुर्थीच्या दिवशी या मूर्तीला संपूर्ण पांढरा चुना लावून मूर्तीचे फक्त डोळे रंगवले जातात. अशाच रुपात या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते.

दुसऱ्या दिवशी त्याचं वाहन असलेल्या मूषकाची मूर्ती पूजेला लावण्यात येते. तिसऱ्या दिवशी रंगकाम सुरू होऊन ते पाचव्या दिवशी पूर्ण होतं. नंतर ७, ९, ११, १५, १७ आणि २१ व्या दिवशीही हे रंगकाम होतं. पाचव्या दिवसापासून रोज संध्याकाळी बाप्पाची दृष्ट काढली जाते. 

विसर्जनादिवशी या कुटुंबातील पूर्वजांचं श्राद्ध करून पिंडदान केलं जातं. इतरत्र कुठेही गणेशोत्सवादरम्यान श्राद्ध केलं जात नाही, मात्र हा गणपती त्याला अपवाद आहे. विसर्जनाची मिरवणूक निघाली की, समुद्रकिनाऱ्यावर पोचल्यावर तेथे दांडपट्टा, तलवार, लाठी असे शिवकालीन मर्दानी खेळ खेळण्यात येतात. विसर्जन करताना प्रथम उंदीरमामा व नंतर गणपतीचं विसर्जन केलं जातं. या गणपतीला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही स्थान मिळालेलं आहे.

तुम्हाला असे काही वेगळे गणपती माहिती असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा !


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

Next Post

या एका बँकेमुळे जगात पुन्हा आर्थिक मंदीचे सावट येऊ घातले आहे

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2023
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

26 September 2023
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

25 September 2023
मनोरंजन

एटीएमच्या चुकीनं अब्जाधिश बनलेला बारटेण्डर

25 September 2023
मनोरंजन

तब्बल नऊ तास वाहतुक कोंडी निर्माण करणारा ‘बर्निंग मॅन’?

11 September 2023
मनोरंजन

आपण सर्रास वापरतो त्या इमोजीज आल्या कुठून हे माहिती आहे का?

6 September 2023
Next Post

या एका बँकेमुळे जगात पुन्हा आर्थिक मंदीचे सावट येऊ घातले आहे

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2023

कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली लाखोंचा स्कॅम झालाय..!

27 September 2023

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)