The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टेस्लाच्या सेल्फड्राइव्ह कारने कोणाला धडक दिली तर त्या अपघाताची जबाबदारी कोणाची?

by द पोस्टमन टीम
15 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगभरात रस्ते अपघातांची संख्या काही कमी नाही. जगभरात दरवर्षी लाखो लोकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागतो. आपल्या देशात होणाऱ्या रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी साधारण दीड लाखांहून अधिक जण प्राण गमावतात. अपघातांच्या कारणांचा विचार केला असता लक्षात येतं की, आपली बेशिस्त वृत्ती आणि बेदरकारपणा, शिस्त न पाळण्याच्या गुणांमुळं जास्त अपघात होतात.

आतापर्यंत यांत्रिक दोषानं अपघात होण्यापेक्षा मानवी दोषामुळं सर्वात जास्त अपघात घडायचे. कुठल्याही वाहनाच्या अपघातासाठी त्या वाहनाच्या ड्रायव्हरला जबाबदार धरलं जातं. ही गोष्ट एक वैश्विक सत्य आहे. कारण, वाहन हे एक मशीन आहे आणि तिला हाताळण्याचं काम माणूस करत असतो. त्यामुळं ॲक्सिडेंटसाठी ड्रायव्हरलाच दोषी ठरवलं जातं.

जर नुकसानभरपाईसाठी दावा ठोकायचा असेल तरीदेखील ड्रायव्हरला आरोपी म्हणून ग्राह्य धरलं जातं. मात्र, जर वाहनामध्ये जर ड्रायव्हरच नसेल आणि तरीही ॲक्सिडेंट झाला तर मग? तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे, चालत्या गाडीमध्ये ड्रायव्हर असणारच ना? अशा प्रश्न डोक्यात येणं साहजिक आहे. पण, सध्या अनेक कंपन्या ड्रायव्हरलेस कार टेक्नॉलॉजिवर काम करत आहेत.

इलेक्ट्रिक व्हेईकल जायंट, टेस्लानं तर कारमध्ये सेल्फड्रायविंग  फिचर आणलं आहे. टेस्लाच्या मते हे फीचर सर्वोत्कृष्ट आहे. मात्र, यामुळं आतापर्यंत काही लोकांचा जीवदेखील गेला आहे. अशा परिस्थितीत ड्रायव्हरलेस गाड्या सुरक्षित आहेत का? टेस्लाच्या गाडीनं अपघात झाल्यास आरोपी कुणाला म्हणायचं? असे प्रश्न आता समोर येऊ लागले आहेत.

वरील प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यापूर्वी आपण टेस्लाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. टेस्ला ही अमेरिकेतील टेक्सास ऑस्टिनमध्ये स्थित असलेली इलेक्ट्रिक व्हेईकल आणि क्लीन एनर्जी कंपनी आहे. टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक कार, घरापासून ग्रिड-स्केलपर्यंत बॅटरी ऊर्जा साठवण, सौर पॅनेल, सौर छतावरील टाइल्स, त्या संबंधित उत्पादनं आणि सेवांचं डिझाइन आणि उत्पादन करते. टेस्ला ही जगातील सर्वात व्हॅल्युएबल कंपन्यांपैकी एक आहे.



जवळपास १ ट्रिलियन युएस डॉलर्सच्या बाजार भांडवलासह टेस्ला ही जगातील सर्वात मौल्यवान ऑटोमेकर आहे. २०२० मध्ये बॅटरी इलेक्ट्रिक वाहनं आणि प्लग-इन इलेक्ट्रिक वाहनांची जगभरात सर्वाधिक विक्री या कंपनीने केली आहे. टेस्लाची उपकंपनी असलेल्या टेस्ला एनर्जी युनायटेड स्टेट्समधील फोटोव्होल्टेइक सिस्टमची एक प्रमुख इंस्टॉलर आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि स्पेस एक्स या अंतराळ कंपनीचे मालक असलेल्या इलॉन मस्ककडे टेस्लाचे सर्वात जास्त शेअर्स आहेत.

ऑटोपायलट फीचर लाँच करणारी टेस्ला ही सध्या जगातील एकमेव कंपनी आहे. मात्र, या फीचरच्या सुरक्षिततेबाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी कॅलिफोर्नियामध्ये टेस्ला कारने एका 15 वर्षांच्या मुलाला धडक दिली आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी कंपनीवर दावा ठोकला. टेस्लाचं ऑटोपायलट फीचर त्यांच्या मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचं कुटुंबीयाचं म्हणणं आहे.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

टेस्लाच्या ऑटोपायलट फीचरमुळं २०१९ मध्येदेखील एक अपघात झाला होता. २०१९मध्ये टेस्लाची मॉडेल एस ही कार अमेरिकेतील ह्यूस्टन शहरात भगधाव वेगानं जात होती. रस्त्यावर अचानक वळण आल्यानं कारचे नियंत्रण सुटलं आणि ती झाडावर आदळली. झाडाला धडकताच कारनं पेट घेतला आणि कारमधील लोकांचा बाहेर पडण्यापूर्वीच जळून मृत्यू झाला. 

या प्रकरणाचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांनी मीडियाला सांगितलं होतं की, अपघातादरम्यान कारमधील ड्रायव्हिंग सीटवर कोणीही बसलेलं नव्हतं. एक व्यक्ती ड्रायव्हिंग सीटच्या शेजारी बसली होती आणि दुसरी व्यक्ती मागे बसली होती. अशा अपघातांनंतर टेस्लाच्या टेक्नॉलॉजीबाबत शंका निर्माण झाल्या आहेत.

टेस्लानं रेकॉर्ड केलेल्या सहा सेकंदाच्या व्हिडिओनुसार, त्यांचं ऑटोपायलट फीचर कार चालवू शकतं. ते कारचा वेग वाढवू शकतं आणि ब्रेक देखील लावू शकतं. मात्र, अनेक प्रसंगी गाडीचा अपघात घडतो, तेव्हा चालकालाही त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. 

कंपनी आपलं अपडेटेड ‘फुल सेल्फ ड्रायव्हिंग’ सॉफ्टवेअर लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र, रस्ते अपघातांमुळं हे तंत्रज्ञान स्कॅनरच्या कक्षेत आले आहे. यूएस ऑटो सेफ्टी एजन्सीने २७ टेस्ला कार क्रॅश प्रकरणांची पुन्हा चौकशी सुरू केली आहे.

ह्यूस्टन शहरातील अपघाताबाबत स्पष्टीकरण देताना टेस्लाचं सीईओ आणि संस्थापक इलॉन मस्क म्हणतात की, आतापर्यंत दाखवलेल्या डेटा लॉगवरून स्पष्टपणे दिसून येतं की या कारमध्ये ऑटोपायलट सक्षम नव्हतं. शिवाय या कारसाठी एफएसडी (फुल सेल्फ ड्रायव्हिंग) प्रणाली खरेदी केलेली नव्हती.

अशा अपघातांमुळं टेस्ला विरुद्ध अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. ज्यात एप्रिलमध्ये फ्लोरिडा स्टेट न्यायालयातील लार्गो येथे झालेल्या कार क्रॅशशी संबंधित खटल्याचा समावेश आहे. ऑटोपायलट असलेली टेस्ला मॉडेल एसटी एका चौकात थांबू शकली नाही आणि समोरच्या शेवरलेट टाहोला धडकली. या अपघातात २२ वर्षीय नायबेल लियॉनचा मृत्यू झाला. 

या प्रकरणात पोलिसांनी टेस्ला ड्रायव्हरला दोषी ठरवलं असून कार किंवा ऑटोपायलट तंत्रज्ञानाला नाही. तर ड्रायव्हरचं म्हणणं आहे की, तो कार चालवत नव्हता. ती ऑटोपायलट मोडवर होती. या प्रकरणामुळं टेस्ला कारचा अपघात झाल्यास नेमकं कुणाला दोषी ठरवायचं हा मुद्दा उपस्थित झाला.

न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधील दिवाणी दाव्याचे प्राध्यापक आणि कॅलिफोर्निया लॉ रिव्ह्यूमधील पेपरचे लेखक मार्क गीस्टफेल्ड यांनी गुन्हेगारी आरोपांचे महत्त्व आणि नवीन तंत्रज्ञानावरील ग्राहकांच्या विश्वासाबद्दल माहिती दिली आहे. कार डिझाईन करताना ड्रायव्हिंग तंत्रज्ञानासह येणार्‍या आत्मसंतुष्टतेची भावना लक्षात ठेवण्याचं निर्मात्यांचं कर्तव्य आहे.

टेस्ला किंवा इतर कोणतेही उत्पादक फक्त ग्राहकांवर जाबाबदारी टाकू शकत नाहीत. ड्रायव्हर्स लक्ष देत आहेत याची खात्री करण्यासाठी त्यांना प्रत्यक्षात डिझाइनमध्ये काहीतरी विशेष सोय करण्याचा प्रयत्न करावा लागेल.

टेस्लाच्या कारमध्ये अपघात होण्यापूर्वीच्या काही सेंकदांचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची क्षमता आहे. त्यावरून दोषी कुणाला ठरवायचं हे निश्चित करता येऊ शकतं. सध्याच्या कायद्यानुसार, जर ड्रायव्हरला अपघात झाला आणि त्याला पुरेशी चेतावणी मिळालेली असेल तर या अपघाताला कार उत्पादकाला जबाबदार मानलं जात नाही.

तरीदेखील टेस्ला कार क्रॅश झाल्यानंतर ऑटोपायलट सिस्टिमला दोषी ठरवायचं की नाही, हा प्रश्न गुंतगुंतीचाच ठरत आहे


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

‘पिंजऱ्यातल्या गोरीलाला ठोसा मारू दे’ म्हणून माईक टायसनने झु अधिकाऱ्याला लाच ऑफर केली होती

Next Post

या पेयांमुळे शरीरातील जळजळ वाढू शकते, त्यामुळे सांभाळूनच!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

19 August 2024
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

या पेयांमुळे शरीरातील जळजळ वाढू शकते, त्यामुळे सांभाळूनच!

आईनस्टाईनने १०० वर्ष आधीच गुरुत्वाकर्षण लहरींच्या अस्तित्वाचे भाकीत केले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.