आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मानवी शरीर फार कमालीचं आहे. म्हणजे एखादा जंतू शरीरात घुसला आणि तो ओळखीचा नसेल की लगेच सगळ्या सिस्टम्स त्याच्यावर ह*ल्ला करायला तयार होतात. ज्याने ही सिस्टम बनवली आहे त्याची खरंच कमालच म्हणावी लागेल. या फॉरेन पार्टीकल आपल्या शरीरात घुसलाय हे आपल्याला सांगायचे शरीराचे वेगवेगळे प्रकार असतात. कधी आपल्याला ताप येतो, कधी पोट दुखतं, तर कधी जळजळ होते. जळजळ होणे हा आपल्या शरीराचा आपल्याला हे सांगण्याचा एक मार्ग की तुमच्या शरीरात एक जंतू घुसला आहे. त्याचा प्रतिसाद म्हणून जळजळ होते.
अनेकदा पांढऱ्या रक्तपेशींचा हा प्रतिसाद अवयवांवर परिणाम करू शकतो. तसेच हा परिणाम दाहक आंत्र रोग (IBD), मधुमेह, सोरायसिस यांसारख्या स्वयंप्रतिकार रोगांना कारणीभूत ठरू शकतो. अनेकदा योग्य आहार न घेतल्याने देखील जळजळ वाढू शकते, म्हणूनच शरीरातील जळजळ नियंत्रित करण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. योग्य आहार घेतल्यास जळजळ कमी करण्यात मदत होऊ शकते.
आज आम्ही तुम्हाला अशा काही पेयांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे शरीरातील जळजळ वाढू शकेल. चला तर मग जाणून घेऊयात.
सोडा:
दिवसभराच्या थकव्यानंतर थंड सोड्याचा एक कॅन कोणाला आवडत नाही? सोडा प्यायल्याने तुम्हाला अत्यंत ताजेतवाने वाटू शकते पण सोडा हे काही आरोग्यदायी आहार म्हणता येणार नाही. सोडा, फळांचे रस किंवा एनर्जी ड्रिंक्स, या पेयांमध्ये प्रचंड साखर असते ज्यामुळे शरीरात इंफ्लेमेटरी प्रक्रिया ट्रिगर होऊ शकते. परिणामी शरीरातील जळजळ वाढू शकते.
फ्लेवर्ड दूध:
दुग्धजन्य पदार्थ अनेकदा लॅक्टोस इंटॉलरन्स असलेल्या लोकांमध्ये दाहक प्रतिक्रिया निर्माण करतात. डेअरीच्या दुधाला कंटाळलेले लोक अनेकदा “व्हीगन” दूध पर्यायांचा अवलंब करतात, जसे की ओट मिल्क, सोया मिल्क, नारळाचे दूध, इ. या दुधाच्या जाती विविध चवींमध्ये देखील उपलब्ध आहेत जे त्यांच्या स्वादिष्टतेत भर घालतात. तथापि, या दुधांमध्ये अनेकदा साखर असते ज्यामुळे शरीरात जळजळ होऊ शकते.
Cappuccino:
कॉफी कोणाला आवडत नाही? कॉफी घेणे चांगलेच आहे; पण याहूनही अधिक चांगले काय आहे माहिती आहे का? माफक प्रमाणात कॉफी घेणे. कारण, कॅफिनचे शरीरावर ऊर्जा वाढवणारे परिणाम होऊ शकतात. तथापि, कॅफीनचे जास्त सेवन केल्याने चिडचिडेपणा आणि जळजळ होऊ शकते. यामुळे डोकेदुखी, चिंता, तणाव इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
गोड चहा:
चहा हे जगभरातील लोकांचे आवडते पेय आहे. त्याच्या लोकप्रियतेमुळे एकाच प्रकारच्या अनेक प्रकारांचा उदय झाला आहे. आपल्याकडे मराठवाड्याच्या भागात जाल तर अतिशय गोड चहा पिण्याची लोकांना सवय आहे असे दिसून येते. गोड चहा घेतल्याने एकदम ताजेतवाने वाटते म्हणून आजकाल त्याची लोकप्रियता वाढत चालली आहे. तथापि, हा चहा आपल्या शरीरासाठी मात्र हानीकारण आहे. कारण, साखरेचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील जळजळ वाढू शकते.
अल्कोहोल:
ही एक गोष्ट आहे जी पिणे कधीच चांगलं असू शकत नाही. तुमच्याकडे दारू सोडण्याची पुरेशी कारणे नसल्यास, आम्ही तुम्हाला आणखी एक सांगणार आहोत. अल्कोहोल हे अशा पेयांपैकी एक आहे ज्यामुळे शरीरात जळजळ होऊ शकते. यामुळे हायपरटेन्शन, हृदयाची गुंतागुंत इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
पुढच्या वेळी यापैकी कोणतीही पेय पिताना नीट विचार करा आणि प्रमाणातच प्या!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.