The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

गर्भवती स्त्रीने टेस्ला कार ऑटोपायलटला टाकून बाळाला जन्म दिलाय..!

by Heramb
22 December 2021
in विज्ञान तंत्रज्ञान, विश्लेषण
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


महागाई, इंधन दरवाढ, असे बरेच आज सहसा कानावर पडतात. पुरवठा, मागणी, कर यांचं किचकट गणित सोडवल्यानंतर इंधनाच्या किमतीचा भलामोठा आकडा समोर येतो. पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनांमुळे आर्थिक नुकसान तर होतेच पण पर्यावरचाही ऱ्हास होण्यास हातभार लागतो. आज हजारो पर्यावरणतज्ज्ञ विनाशाचे अनेक गंभीर इशारे देऊनही पर्यावरणरक्षणाचे काही विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत.

अशा परिस्थितीत मानवाने या समस्यांवर एक रामबाण उपाय शोधून काढला तो म्हणजे इलेक्ट्रिक वेहिकल्स. सामान्य वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांद्वारे कमी प्रदूषण होतं. जगात अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वेहिकल्सची निर्मिती करीत आहेत. भारतातही अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक वेहिकल्सची निर्मिती केली जात असून इव्हीज पारंपरिक वाहनांपेक्षा आर्थिकदृष्ट्या सुलभ असल्याचे सांगितले जाते.

पण भविष्याचा वेध घेऊन आणि दूरदृष्टी दाखवून टेसला मोटर्सने काही वर्षांपूर्वीच इलेक्ट्रिक वेहिकल्सची निर्मिती सुरु केली. टेसलाने फक्त इलेक्ट्रिक वेहिकल्सच तयार केल्या नाहीत तर त्यांच्यामध्ये अगणित फीचर्स समाविष्ट करून ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये प्रचंड भरारी घेतली. ऑटोपायलट मोड किंवा सेल्फ ड्रायव्हिंग मोडबरोबरच या कारमध्ये डॉग मोड, सेंट्री मोड, कि-कार्ड ॲक्सेस, मोबाइलच्या ॲप्सप्रमाणे रेग्युलर आणि ऑटोमॅटिक अपडेट्स असे असंख्य अत्याधुनिक फीचर्स इलॉन मस्कच्या टेसला मोटर्सने दिले आहेत.

टेसला कारमध्ये जन्म झालेल्या एका बाळाला ‘टेसला बेबी’ म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे राहणाऱ्या एका महिलेने टेसला स्मार्ट कारच्या फ्रंट सीटवर बाळाला जन्म दिला. सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या या बाळाला आता ‘जगातील पहिले टेस्ला बेबी’ म्हणून संबोधले जात आहे. प्रसूती झाली तेव्हा ३३ वर्षीय यिरन शेरी, तिचा पती कीटिंग आणि तीन वर्षांचा मुलगा राफा हे सर्वजण टेसला कारमध्येच होते.

यिरन शेरी यांना प्रसूतिवेदना सुरु झाल्यानंतर हे सर्व जण आपल्या कारमधून हॉस्पिटलला जात होते, पण ते मोठ्या ट्रॅफिकमध्ये अडकले. शेरी यांच्या वाढत्या वेदना लक्षात घेऊन तिने गाडीतच मुलाला जन्म देण्याचे ठरवले.

ADVERTISEMENT

यिरन शेरीचा पती कीटिंग शेरीने नेव्हिगेशन सिस्टीम हॉस्पिटलकडे सेट केल्यानंतर कार ऑटोपायलट मोडवर ठेवली. ते हॉस्पिटलपासून अवघ्या २० मिनिटांच्या अंतरावर होते. आता कीटिंगने यिरनची जबाबदारी स्वीकारली होती. कारमध्ये बाळंतपण करण्याचा किंवा रुग्णालयात पोहोचेपर्यंत थांबण्याचा निर्णय हा अतिशय त्रासदायक होता, असे यिरनने सांगितले. कीटिंग अधूनमधून गाडी चालवत होता आणि अधूनमधून त्याच्या पत्नीकडेही लक्ष देत होता, तिचं लक्ष ‘एस्टीमेटेड अरायव्हल टाइम’कडे होतं. पण अगदी क्वचितच वेळा हा ‘टाइम’ बदलत होता.

परिस्थिती प्रचंड अवघड असतानाही तिने धीर सोडला नाही. हॉस्पिटलबाहेर पोहोचताच तिने बाळाला जन्म दिला. नर्सेसनी कारच्या पुढील सीटवरील बाळाची नाळ कापली. त्या मुलीचे नाव आहे ‘मावे’. शेवटी डॉक्टर म्हणाले, “ती निरोगी आहे. अभिनंदन!”. डॉक्टरांच्या या वाक्यानंतर दोघांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि ‘मावे’ जगातील पहिली टेसला बेबी ठरली.

अजूनही टेसला मोटर्स आपल्या उत्पादनांवर संशोधन करून त्यांना सर्वोत्तम बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्याला आणखी काय काय चमत्कार पाहायला मिळतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. टेसला, स्पेस-एक्स आणि तत्सम कंपन्यांनी केलेले संशोधन याचप्रकारे मानवजातीसाठी उपयुक्त असेल हीच माफक अपेक्षा.

हे देखील वाचा

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

रशिया दुसऱ्या महायुद्धापासून जपानच्या या बेटांवर ठाण मांडून बसलाय!

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweetShare
Previous Post

ॲपल, मायक्रोसॉफ्ट नाही तर ही आहे जगातली पहिली ट्रिलियन डॉलर्समध्ये नफा कमावणारी कंपनी

Next Post

नव्या IT कायद्याचा पहिल्यांदाच वापर करत मोदी सरकारने २० युट्युब चॅनेल्सवर बंदी घातलीय

Heramb

Heramb

Related Posts

विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
विश्लेषण

रशिया दुसऱ्या महायुद्धापासून जपानच्या या बेटांवर ठाण मांडून बसलाय!

18 May 2022
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

22 April 2022
इतिहास

त्याच्या संशोधनाने कोट्यवधी लोकांना अन्न दिले आणि लाखोंना वेदनादायक मृत्यूही!

18 April 2022
विश्लेषण

३००० वर्षांपूर्वी माया संस्कृतीतील लोकांनी प्राण्यांचा व्यापार का केला?

18 April 2022
विश्लेषण

शास्त्रज्ञांनी २ हजार वर्ष जुन्या खजुराच्या बिया रुजवून खजुराच्या प्रजातीचं पुनरुज्जीवन केलंय!

16 April 2022
Next Post

नव्या IT कायद्याचा पहिल्यांदाच वापर करत मोदी सरकारने २० युट्युब चॅनेल्सवर बंदी घातलीय

कोणी काहीही म्हणो, सांता क्लॉज जगभर पोहोचला तो 'कोका-कोका'मुळेच..!

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!