The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या एका दगडावरून आजवर बरेच राडे झालेत

by द पोस्टमन टीम
21 December 2024
in मनोरंजन, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


रस्त्यावरचा दगड उचलून त्याची मूर्ती बनवली की त्या दगडालाच सगळेजण देव समजू लागतात. आपल्याकडे दिसणारी ही एक सामान्य बाब. कुठल्याही साधारण वस्तूशी जेव्हा भावना आणि श्रद्धा जोडल्या जातात तेव्हा ती साधारण वस्तू असाधारण बनून जाते. खरे तर फक्त आपल्याकडेच म्हणणे चुकीचे आहे, पृथ्वीतलावरील कुठल्याही संस्कृतीत आणि मानवी समाजात आजवर हेच घडत आले आहे. त्यातही या भावना आणि वस्तू यांचा मेळ खूप जुना असेल तर त्याचे महत्व कैक पटींनी वाढते.

आयर्लंडमधील स्टोन ऑफ स्कॉन ही देखील अशीच एक सामान्य वस्तू, जी लाल रंगाच्या वालुकामय कणांनी बनलेली आहे, त्यामुळे ती दिसायला अगदी खास दिसते. परंतु या साध्या दगडाभोवती आख्यायिका गुंफल्या गेल्या आणि हा एक सामान्य दगड काळाच्या ओघात असामान्य बनून गेला. कोणतीही असामान्य गोष्ट आपल्याकडे असलीच पाहिजे या अट्टाहासापोटी विविध देशांनी त्यावर आपला हक्क सांगायला सुरुवात केली. कधी या देशात, कधी त्या देशात असा हा दगड भरपूर ठिकाणी फिरला आणि पुन्हा त्याच्या मूळ ठिकाणावर आला. या काळात दोन वेळा या दगडाची चोरी देखील झाली.

तर इथे आम्ही ज्या स्टोन ऑफ स्कॉनबद्दल बोलतोय त्याला ‘स्टोन ऑफ डेस्टिनी’सुद्धा म्हटले जाते.

इजिप्त, सिसिली, स्पेन अशा वेगवेगळ्या देशांतून फिरल्यानंतर हा दगड पुन्हा आयर्लंडच्या तारा टेकडीवर ठेवण्यात आला. इंग्लंड आणि स्कॉटलंड दोन्ही देशांच्या सम्राटांचा राज्याभिषेक केला जात असताना विशेषत्वाने हा दगड बसवलेले सिंहासन वापरले जाते.

एका सेल्टिक कथेनुसार, बायबलमधील संत याकोब एकदा बेथेलमध्ये विश्रांती घेण्यासाठी थांबले असताना त्यांनी या दगडाची उशी केली आणि ते झोपी गेले. झोपेत त्यांना देवदूतांनी दर्शन दिले आणि त्यांनी पाहिले की हे देवदूत एका शिडीवरून स्वर्गात जात आहेत. या पवित्र घटनेने त्या दगडालाही पावित्र्य बहाल झाले. पण, पुढे जाऊन याच दगडाने स्कॉटिश लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावनाही निर्माण केली.



सेल्टिक लोकांकरवी स्कॉटलंडमध्ये येईपर्यंत हा दगड आर्यलंडमध्येच होता. त्यानंतर इसवी सन ८४० च्या दरम्यान हा दगड स्कॉन या गावी आणला गेला. इथेच आयर्लंडच्या राजाचा राज्याभिषेक करण्यात आला. त्यावेळी राजाने या आपल्या शाही खुर्चीत हा दगड बसवून घेतला. खुर्चीत दगड बसवला म्हणजे तो एखाद्या गोटीएवढा किंवा फारफार तर गोळाफेकमध्ये वापरल्या जाणाऱ्या लोखंडी गोळ्याएवढा असेल, असे तुम्हाला वाटत असेल तर तुमची कल्पना चुकीची आहे.

हा दगड तब्बल १५० किलो वजनाचा आहे. तरीही राजाने आपल्या सिंहासनात हा दगड बसवला. तेव्हापासून हा दगड स्टोन ऑफ स्कॉन म्हणून ओळखला जातो. स्कॉटचा पहिला राजा केनेथ मॅकलपिन याचा राज्याभिषेक याच दगडी सिंहासनावर झाला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

१२९२ साली जॉन दि बेलीओल हा शेवटचा राजा होता ज्याचा राज्याभिषेक या दगडाच्या सिंहासनावर झाला. १२९६ साली इंग्लंडने स्कॉटलंडवर ह*ल्ला केला आणि हे सिंहासन लंडनला नेले. मग पुन्हा हा दगड बसवून वेस्टमिंस्टर ॲबीमध्ये एक खास सिंहासन तयार करण्यात आले. याद्वारे असा संदेश देण्यात आला की इथून पुढे इंग्लंडचे राजेच स्कॉटलंडवरही राज्य करतील.

काही दंतकथांनुसार या दगडासोबत एक धातूचा तुकडा होता, ज्यावर लिहिले होते, हा दगड जिथे सापडला तिथलेच राजे या सिंहासनावर पुन्हा बसतील.

१६०३ साली राणी एलिझाबेथ पहिलीच्या मृत्युनंतर जेंव्हा स्कॉटलंडचा राजा जेम्स पाचवा या लंडनच्या सिंहासनावर बसला तेंव्हा स्कॉटलंडच्या नागरिकांना त्या धातूच्या तुकड्यावरील भविष्यवाणी खरी ठरल्याचा आनंद झाला.

दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात हा दगड विशेष जतन करून ठेवण्यात आला. तो सुरक्षित राहावा म्हणून एका मोठ्या चर्चच्या अंगणात त्याला गुप्त ठिकाणी दफन करून ठेवण्यात आले. यु*द्ध संपल्यानंतर तो दगड पुन्हा त्या ठिकाणहून खणून काढण्यात आला. १९५० पर्यंत हा दगड त्याच चर्चमध्ये सुखरूप होता.

पण, १९५० साली स्कॉटलंडमधील ग्लासगोव्ह विद्यापीठातील चार विद्यार्थ्यांनी लंडनच्या चर्चमधून तो दगड चोरून स्कॉटलंडला आणण्याचे ठरवले. आणि ते चौघेही यामध्ये यशस्वी ठरले. त्या रात्री चर्चच्या पहारेकऱ्याला उशिरा लक्षात आले की चर्चमधील सिंहासनाची मोडतोड झाली आहे आणि त्यातील तो दगडही गायब आहे.

परंतु लंडनच्या पोलिसांनी अगदी शिताफीने या चोरांचा माग काढला आणि पुन्हा तो दगड लंडनच्या करोनेशन चेअरकडे सोपवला. १९५३ साली दुसऱ्या एलिझाबेथचा राज्याभिषेक याच दगडी सिंहासनावर झाला. तो दगड १९९६ पर्यंत इंग्लंडच्याच ताब्यात होता. ३० नोव्हेंबर १९९६ रोजी हा दगड अधिकृतरित्या स्कॉटलंडकडे सुपूर्द करण्यात आला. त्यादिवशी ‘सेंट अँड्र्यूज डे’ असतो. सेंट अँड्र्यू हे स्कॉटलंडचे एक महान देशभक्त होते.

सध्या हा दगड एडिनबर्ग कॅसलमध्ये प्रदर्शनार्थ ठेवण्यात आला आहे. त्यापूर्वी तो एका गुप्त ठिकाणी ठेवला गेला होता. या ठिकाणी त्याची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली वर्षानुवर्षे त्यावर साचलेली धूळ, कचरा साफ करण्यात आला. हा कचरा आणि धूळ हटवल्यानंतर त्यावर कोरलेला संदेश दिसू लागला. खरे तर यापूर्वी त्यावर संदेश कोरलेला आहे हेच दिसत नव्हते. परंतु हा संदेश खुणा आणि चिन्हांमध्ये कोरलेला आहे, त्यामुळे अजूनपर्यंत तरी त्याचा उलगडा झालेला नाही.

सध्या हा पवित्र दगड स्टोन ऑफ डेस्टिनी एडिनबर्ग कॅसलमध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे. ज्यांना कुणाला तो पाहायचा आहे त्यांना पाहता येतो. इंग्लंडमध्ये जेव्हा नव्या राजाचा किंवा राणीचा राज्याभिषेक होणार असतो तेव्हा हा दगड तात्पुरता तिथे नेला जातो आणि वेस्टमिंस्टर ॲबी (धर्मपीठ) येथे पारंपारिक रीतीने राज्याभिषेकाचा सोहळा पार पडल्यावर तो पुन्हा एडिनबर्ग कॅसलमध्येच आणला जातो.

त्यावर चिन्हांकित केलेल्या मजकुराची उकल आतापर्यंत झाली नसली तरी भविष्यात तरी निश्चितच ही उकल करण्यात यश येईल, अशी आशा करूया.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या देशांचे पासपोर्ट्स आहेत जगात सगळ्यात पावरफुल !

Next Post

क्रांतिवीर मंगल पांडेंना फाशी देण्यासाठी तुरुंगातील जल्लादांनी नकार दिला होता!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

क्रांतिवीर मंगल पांडेंना फाशी देण्यासाठी तुरुंगातील जल्लादांनी नकार दिला होता!

फक्त स्त्रियांच्या मालकीचं असलेलं पाचशे वर्ष जुनं मार्केट

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.