The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई बंदरात भीषण स्फो*ट झाला, त्याचे हादरे शिमल्यापर्यंत पोचले..!

by Heramb
24 January 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


१२ एप्रिल १९४४. तत्कालीन बॉम्बे आणि आताचे मुंबई बंदर. ‘एस.एस. फोर्ट स्टिकीने’ या ब्रिटिश मालवाहू जहाजातून अचानक धुराचे लोट उडू लागले. तात्काळ अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. पण त्यांना यश आले नाही. जळत्या जहाजाच्या कॅप्टनने ‘अबॅन्डन शिप’ असा सिग्नल दिला आणि जहाजावरील लोकांबरोबरच बंदरावरील लोकांचीही धावपळ झाली. या स्फो*टामुळे उत्तर भारतातील शिमला येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. शिमला मुंबईपासून १७०० किलोमीटर आहे. या स्फो*टात सुमारे १२०० लोकांचा मृत्यू झाला, तेरापेक्षा जास्त जहाजे बुडाली आणि मुंबई बंदर आठ महिने बंद राहिले.

मालवाहू जहाजातील अडचण

दुसऱ्या महायु*द्धाचे यश यु*द्धात सहभागी असणाऱ्या प्रत्येक देशाला किती आणि कशी रसद मिळते यावर अवलंबून होते. यूएसए, भारत आणि इतर आशियाई देशांकडून मिळणाऱ्या रसदीवर ब्रिटन अवलंबून होते. ‘एस.एस. फोर्ट स्टिकीने’ या ब्रिटिश मालवाहू जहाजात नागरिकांसाठी अन्न आणि युद्ध साहित्य देखील होते. ‘एस.एस. फोर्ट स्टिकीने’वर भारतीय रुपया स्थिर करण्यासाठी ब्रिटनहून रवाना झालेला सोन्याचा सराफा होता. याशिवाय जहाजावर ‘स्पिटफायर विमान’ होते.

या सर्व साहित्याबरोबरच ‘एस.एस. फोर्ट स्टिकीने’ जहाजावर ज्वलनशील वस्तूसुद्धा होत्या. यामध्ये दारुगोळा, टॉर्पेडो, माईन्स आणि विविध स्फो*टके यांचा समावेश होता. ब्रिटनहून मुंबईकडे येताना ‘एस.एस. फोर्ट स्टिकीने’ जहाज कराची बंदरात थांबले. कराचीहून या जहाजावर कापूस आणि लुब्रिकेशन ऑइल लोड केले जाणार होते. या जहाजाचा कॅप्टन, अलेक्झांडर जेम्स नैस्मिथने आणखी रसद घेण्यास साफ नकार दिला, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याला स्फो*टाची भीती वाटत होती, कारण जहाजावरील रसद ही मोठ्या प्रमाणावर स्फो*टकं होती. 

प्रचंड विस्फो*ट

१२ एप्रिल १९४४ रोजी जहाज बॉम्बे बंदरात आले आणि माल उतरवण्यास सुरुवात झाली. काही लोकांना दुपारी जहाजावर आग लागल्याचे लक्षात आले आणि अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी वापरले. अतिशय कमी धुरामुळे आग कशी आणि कुठे लागली हे समजू शकले नाही. काही तासांत कॅप्टनने जहाज सोडण्याचा आदेश दिला. त्यानंतर काही वेळात जहाजावर स्फो*ट झाला आणि काही मिनिटांतच जहाजाचे तुकडे झाले. बॉम्बे बंदरामध्ये दाट लोकसंख्या असल्याने मृतांची संख्या सुमारे १२०० ते १३०० होती. जहाजाचे कॅप्टन अलेक्झांडर जेम्स नैस्मिथ यांचाही या स्फो*टात मृत्यू झाला.

या स्फोटा*मुळे जहाजाचे रडर (पाण्यामध्ये गती देण्यासाठी वापरण्यात येणारा भाग) बॉम्बे बंदरापासून सुमारे ५ हजार किलोमीटरवर फेकले गेले. या स्फो*टात आणखी तेरापेक्षा जास्त जहाजांचे नुकसान झाले. याशिवाय ब्रिटिश-भारतीय नौदलाच्या सुमारे ३ यु*द्धनौकाही त्यादिवशी उ*ध्वस्त झाल्या. स्फो*टामुळे आजूबाजूच्या १२ किलोमीटरपर्यंतच्या भागाचे अतोनात नुकसान झाले. मुंबईपासून १२०० किलोमीटर अंतरावर असलेल्या शिमला येथील ‘सिस्मोग्राफ स्टेशन’ने हा स्फो*ट भूकंप म्हणून नोंदवला.

आग लागलेले कापसाचे गोळे शेजारच्या भागात पडले आणि त्यामुळे लोकांना आपली घरे सोडावी लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना जीव गमवावा लागला. जहाजातील सोन्याचा सराफा जवळजवळ हरवला आणि बचाव दलाला त्यापैकी काहीच सोने मिळाले. २०११ मध्येही बंदर अधिकाऱ्यांना काही सोन्याचे बार सापडले होते.



स्फो*टाचे घातक परिणाम

बॉम्बे आणि बंगालच्या दुष्काळासाठी आणलेली महत्त्वाची अन्नसामुग्री या स्फो*टामुळे नष्ट झाली. पुढील काही महिन्यांत खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या. रेडिओ सायगॉनद्वारे या भीषण स्फो*टाची बातमी देणारा पहिला देश जपान होता. यु*द्धकाळातील निर्बंधांमुळे या घटनेची दखल भारतीय मीडियाने घेतली नाही. 

स्फो*टकांवर मोठ्या प्रमाणात कापसाची साठवण केल्याने हा स्फो*ट झाला असावा असा अंदाज नंतरच्या तपासात करण्यात आला. तसेच जहाजावरील कर्मचाऱ्यांनी स्फो*टके उतरवायला प्राधान्य न देता कमी महत्वाच्या वस्तू उतरवण्यास प्राधान्य दिले त्यामुळेही या स्फोटाची तीव्रता वाढली असा अंदाज मांडला गेला.

सरकारने या घटनेची जबाबदारी घेतली आणि स्फो*टामुळे अतोनात नुकसान झालेल्या लोकांना आणि कंपन्यांना त्यांनी नुकसान भरपाई देऊ केली. बॉम्बे बंदर पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी ब्रिटिश सरकारला आठ महिने लागले. २०२० साली झालेल्या बेरूतच्या घटनेप्रमाणेच धोकादायक मालवाहू जहाज हे स्फो*टाचे मूळ कारण होते.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

प्राचीन हिंदू साहित्यातील विज्ञानावर प्रकाश टाकणारा पहिला प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणजे कार्ल सेगन

Next Post

Explainer – संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेला रशिया आणि युक्रेनचा नेमका वाद काय आहे..?

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

Explainer - संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेला रशिया आणि युक्रेनचा नेमका वाद काय आहे..?

समुद्रात तेलगळती झाल्यामुळे 'पेरु'ने तीन महिन्यांची 'एन्व्हायरन्मेंटल इमर्जन्सी' घोषित केलीये

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.