The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोणी काहीही म्हणो, सांता क्लॉज जगभर पोहोचला तो ‘कोका-कोका’मुळेच..!

by Heramb
24 December 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


ख्रिसमस आणि सांता क्लॉज यांचं अतूट नातं आहे. जगातील जवळ जवळ प्रत्येक लहान मुलाला सांता क्लॉज माहिती असतोच. पण त्याचा इतिहास आणि सांताबद्दलची काही तथ्ये क्वचितच काही जणांना माहिती असतात. आधुनिक काळातील अमेरिकन सांताची पहिली आवृत्ती रोमन साम्राज्यादरम्यान, भूमध्य समुद्रात उदयास आली. त्याची आख्यायिका संपूर्ण उत्तर युरोपमध्ये सांगितली जात असे. दरवर्षी ख्रिसमसच्या आधी साधारण वीस दिवस, ६ डिसेम्बरला जगातील अनेक लोक ‘सेंट निकोलस’ डे साजरा करतात. हा सण युरोपात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो.

सेंट निकोलसची प्रतिमा काळानुसार वेळोवेळी बदलत राहिली आहे. पण सध्या ख्रिसमसच्या काळात सगळीकडे दिसणाऱ्या पांढऱ्या दाढीचा आणि लालसर गालांच्या म्हाताऱ्याप्रमाणे सेंट निकोलसची प्रतिमा एकोणिसाव्या शतकामध्ये कोठेही नव्हती. तिसऱ्या आणि चौथ्या शतकातील मूळ सेंट निकोलसचे ‘सांता क्लॉजचे’ सर्वात आकर्षक चित्र कोणत्याही कलाकाराने नव्हे तर अत्याधुनिक ‘फॉरेन्सिक फेशियल रिकन्स्ट्रक्शन’ची पद्धत वापरून तयार केले गेले आहे.

१९५० साली इटलीमधील चर्चखालील दफनाच्या खोलीची पुनर्बांधणी करण्यात आली. याचठिकाणी सेंट निकोलसचे शरीर ठेवले होते. सेंट निकोलसच्या हाडांचा आणि कवटीचा अभ्यास करण्यात आला. या दोन्ही गोष्टींचे एक्स-रेज्, फोटोज् आणि सर्व प्रकारचे मोजमाप इत्यादींसह दस्तऐवजीकरण करण्यात आले.

  • सेंट निकोलस:

सेंट निकोलस तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात जन्मलेला एक ग्रीक होता. सुमारे इसवी सन २८० साली तो सध्याच्या तुर्कीमधील मायरा या छोट्या रोमन शहराचा बिशप बनला. बिशप हे ख्रिश्चन धर्मतील एक प्रतिष्ठित पद असून त्याचे पद पाद्रीपेक्षाही मोठे असते. इसवी सन ३०३ साली झालेल्या ‘ग्रेट प्रोजेक्युशन’च्या वेळी चर्चच्या शिकवणीचा एक ज्वलंत समर्थक म्हणून त्याची प्रतिष्ठा निर्माण झाली. निकोलसने शाही आज्ञांचे उल्लंघन केल्याने तो रोमन सम्राटाच्या आदेशानुसार इसवी सन ३१३ सालापासून अनेक वर्षे तुरुंगातच होता.



यादरम्यानच निकोलसचा मृत्यू झाला. पण त्याची कीर्ती मृत्यूनंतरही बराच काळ टिकून होती. त्याने अनेक चमत्कार केले होते असेही म्हटले जाते. विशेष म्हणजे त्याने अनाथ, खलाशी आणि अनेक कैद्यांचे रक्षण केल्याचे सांगितले जाते. काही काळातच सेंट निकोलस ख्रिश्चन संतांमध्येही प्रसिद्ध झाला. अनेक गटांचे संरक्षण केल्याने त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

कॅनडातील मॅनिटोबा विद्यापीठाचा इतिहासकार, गेरी बॉलरने अलीकडच्याच काळात “सांताक्लॉज: अ बायोग्राफी” नावाचे पुस्तक लिहिले. गेरी बॉलरच्या मते, निकोलसच्या आयुष्यातील दोन प्रमुख कथांमुळे तो लहान मुलांचा संरक्षक आणि जादुई भेटवस्तू आणणारा म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यापैकीच एका सुप्रसिद्ध कथेत, त्याने वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन मुलींना सोडवले. निकोलसने त्या तिघींच्या वडिलांना त्यांचा हुंडा देण्यासाठी थैलीभर सोने दिले.

दुसऱ्या कथेनुसार, एकदा सेंट निकोलस मायरा शहराच्या बाहेर, म्हणजेच आपल्या बिशप अधिकारक्षेत्राच्या बाहेर फिरायला गेलेला असताना त्याच्याकडे मायरा शहरातील काही नागरिक एक धक्कादायक बातमी घेऊन आले. मायरा शहराचा शासक युस्टाथियसने तीन निरपराध पुरुषांना मृत्युदंड दिला आहे अशी ती बातमी होती. बातमी मिळाल्यावर निकोलस लगोलग आपल्या शहराकडे निघाला. जातानाच त्याने काही वाटेतील काही लोकांना मृत्युदंड मिळालेल्या लोकांबद्दल विचारपूस केल्यावर त्या तिघांनाही त्यादिवशी सकाळीच मृत्यूदंड देण्यात येणार आहे हे त्याला समजलं. निकोलस लगोलग त्याठिकाणी गेला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

तेथे भयानक दृश्य होतं. लोकांच्या मोठ्या गर्दीमध्ये ते तिघे जण आपल्या गुडघ्यावर बसले होते आणि मृत्यूची वाट पाहत होते. निकोलसने गर्दीतून वाट काढली आणि त्याने जल्लादाच्या हातून तलवार हिसकावून घेऊन जमिनीवर फेकली. निकोलसने या तिघांना मुक्त करण्याचा आदेश दिला. जल्लादानेही ती तलवार पुन्हा उचलण्याचा प्रयत्न केला नाही. अखेरीस मायरा शहराचा शासक युस्टाथियसने आपण केलेल्या पापाची कबुली दिली, त्याला पश्चात्ताप झाला होता. युस्टाथियसला देखील सेंट निकोलसने क्षमा केली.

  • सेंट निकोलसचा प्रभाव आणि सांता क्लॉजचा जन्म:

सेंट निकोलसचा प्रभाव त्याच्या समकालीन लोकांवर तर होताच पण त्याच्या मृत्यूनंतरही त्याची उत्तम कीर्ती होती. अंदाजे इसवी सन १२०० ते १५०० दरम्यान अनेक वर्षे, सेंट निकोलसचा वेष धारण करणारे अनेक लोक लहान मुलांसाठी भेटवस्तू आणत. याशिवाय फिस्ट डेच्या दिवशी देखील ते लहान मुलांसाठी अनेक खाद्यपदार्थही आणत असत.

सेंट निकोलसने काही रोमन दैवतांची शैली वापरात आणली. त्याच्याकडे रोमन सॅटर्न आणि नॉर्स ओडिनप्रमाणे पांढरी दाढी आणि अवकाशात उड्डाण करण्याची शक्ती होती. इथूनच सुरु झाला सांता क्लॉजचा अनंत प्रवास!

जगात अनेक ठिकाणी युरोपीय वसाहती असल्याने हळूहळू सांता क्लॉज जगभरात पोहोचला. सांता क्लॉज जेव्हापासून आहे तेव्हापासून तो लाल रंगच वापरतो असा एक समज आहे. ख्रिसमसचा उत्साह वाढवण्यासाठी हे काल्पनिक पण उत्साहपूर्ण पात्र युरोपीय देशांनी तयार केले. हे पात्र न्यू यॉर्कमधील लोकांनी तयार केले असेही सांगितले जाते.

पण, त्या वेळी बहुतेक गोष्टी पांढऱ्या आणि काळ्या रंगात सादर केल्या जात होत्या. १८६४ साली क्लेमेंट क्लार्क मूरच्या “द नाईट बिफोर ख्रिसमस” या कवितेमध्ये सांता क्लॉजने विशिष्ट रंगाचे कपडे परिधान केल्याचे वर्णन आले आहे. या कवितेत प्रामुख्याने वर्णन होते ते पिवळ्या आणि सोनेरी रंगाचे. कारण हे रंग समृद्धीचे प्रतीक आहेत.

सांता क्लॉजला लाल कपडे देण्याचे श्रेय थॉमस नास्टला द्यावे लागेल. त्याने प्रथमच सांताला लाल रंगाच्या कपड्यांमध्ये चित्रित केले होते. १८७० पासून, नास्टने सांता क्लॉज या काल्पनिक पात्रासाठी शेकडो डिझाइन्स तयार केल्या. अंतिम डिजाईन तयार झाले १८८१ साली. हे डिझाईन आजही जगभरात सांता क्लॉजच्या रूपात वापरले जाते. सर्वप्रथम हे डिझाईन हार्परच्या साप्ताहिक मासिकात सादर केले गेले. थॉमस नास्टने सांताला त्याचे घरसुद्धा दिले. उत्तर ध्रुव. कारण ख्रिसमस, हिवाळा आणि बर्फाचे नाते अतूट आहे. उत्तर ध्रुवापेक्षा जास्त बर्फ कुठे मिळेल!

  • सांताचे व्यापारीकरण:

याच संकल्पना जगातील अनेक ब्रॅण्ड्स, कार्टून्स आणि सिरियल्सनी उचलून धरल्या आणि कालांतराने सांता याच रूपात जगामध्ये सगळीकडे दिसू लागला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, सांता क्लॉजच्या रूपामध्ये बदल करून त्याला आणखी व्यावहारिक बनवावं यावर वादविवाद सुरु झाले. दोन मुख्य कलाकारांनी हे काम करण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे जे.सी. लिएन्देकर आणि नॉर्मन रॉकवेल. त्यांनी लोकांसमोर अधिक व्यावहारिक स्वरूपाचा सांता ठेवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून लोकांना ते काल्पनिक पात्र आहे असे वाटणार नाही.

त्यानंतर ख्रिसमसशी संबंधित ‘कोका कोला’ ब्रँडची जाहिरात करण्यासाठी सांताचा वापर “सेलिब्रेटी” म्हणून करण्यात आला. सांताक्लॉजचा वापर कोका-कोलासाठी जाहिरात म्हणून सुरू झालेल्या पहिल्या मार्केटिंग कॅम्पेनला “थर्स्ट नोज नो सीझन” असे नाव देण्यात आले आणि हे कॅम्पेन १९२०च्या दशकात खूप प्रसिद्ध झाले. १९३४ साली कोका-कोलासाठी काम करणार्‍या चित्रकार हॅडन संडब्लॉमने सांताची प्रतिमा पुन्हा थोडीशी बदलली. प्रत्येक ख्रिसमसला आपण कोका-कोलाच्या जाहिरातींमध्ये पाहतो त्या सांताप्रमाणे हॅडनने सांताचे चित्र काढले.

सांता क्लॉज हे वेगवेगळ्या ‘ब्रँड आणि उत्पादनांद्वारे प्रत्यक्षात येणारं काल्पनिक पात्र’ आहे. ख्रिसमसच्या वेगवेगळ्या परंपरा असलेल्या वेगवेगळ्या देश आणि संस्कृतींनी त्याचा रंग, रूप किंचित बदलले असले तरी सांता एकच काम करतो ते म्हणजे ख्रिसमसच्या आनंदी वातावरणात आणखी उत्साहाची भर घालणे. विशेष म्हणजे हे काल्पनिक पात्र वेगवेगळ्या शोमध्ये, उत्पादनांच्या जाहिरातीमध्ये मोठ्या प्रमाणात दाखवले गेले आहे. त्यामुळेच कदाचित हे आजवरचे सगळ्यात जास्त व्यापारीकरण झालेले काल्पनिक पात्र असावे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

नव्या IT कायद्याचा पहिल्यांदाच वापर करत मोदी सरकारने २० युट्युब चॅनेल्सवर बंदी घातलीय

Next Post

हि*टल*रने चक्क ख्रिसमसलाच हायजॅक करण्याचा प्लॅन केला होता, पण..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

हि*टल*रने चक्क ख्रिसमसलाच हायजॅक करण्याचा प्लॅन केला होता, पण..!

केरळ सरकारने आता स्वतःची प्रशासकीय सेवा सुरू केली आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.