The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

याने माफीचा साक्षीदार बनून अमेरिकेतल्या माफियांची सिक्रेट दुनिया उघड केली होती, पण…

by द पोस्टमन टीम
10 November 2023
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


मॅनहॅटन – अमेरिकेतील मायानगरी न्यूयॉर्क येथील एक गजबजाटाचा परिसर.

आपल्याकडे दक्षिण मुंबईचा जो रुबाब आहे तोच न्यूयॉर्कमध्ये या परिसराचा! इथली लोअर ईस्ट साईड आकर्षक डाइव्ह बार किंवा फार भपका नसलेले, एकांतात वसलेले आणि शांत असे क्लब्ज यांसाठी प्रसिद्ध आहे. आजही अशा क्लबच्या शोधात असलेले अनेक रसिक पर्यटक इथे भेट देतात. पण शंभर वर्षांपूर्वी परिस्थिती फार वेगळी होती. आज लोकप्रिय असलेला हा परिसर तेव्हा शहरातील सर्वांत धोकादायक परिसरांपैकी एक होता.

१९३० आणि ४० च्या दशकात, मर्डर इंक नावाच्या संघटनेने न्यूयॉर्कमध्ये धुमाकूळ घातला होता. त्यांचे काम म्हणजे त्या काळातील प्रसिद्ध गुन्हेगारांसाठी भाडोत्री गुंड पुरवणे, आणि त्या गुन्हेगारांचा प्रत्यक्ष गुन्ह्यांशी थेट संबंध येणार नाही याची काळजी घेणे.

बग्सी सिगेल आणि मेयर्स लॅन्स्की यांनी ही संघटना स्थापन केली. त्यात मुख्यतः इटालियन आणि यहुदी गुंडांचा समावेश होता. या संघटनेने आपल्या द*ह*शतीच्या बळावर अनेक दुष्कृत्ये केली. सुमारे हजार जणांचे खू*न केले.

असाच एक खतरनाक गुंड होता. त्याचे नाव ऍबे रेल्स. मर्डर इंकच्या सर्वात जास्त दह*शत असलेल्या मा*रे*कऱ्यांपैकी हा एक. तो छत्तीस वर्षांचा होईपर्यंत त्याला ४२ वेळा अटक करण्यात आली होती. त्यात खु*नाच्या आरोपाखाली तब्बल सहा वेळा अटक झाली होती. पण १९४० मधे त्याला आणखी एकदा अटक झाली आणि त्याचे दिवस फिरले. पाणी डोक्यावरून जात आहे हे लक्षात आल्यावर रेल्सने स्वत:ला वाचवण्यासाठी आपल्या पूर्वीच्या सहकाऱ्यांना सोडून जाण्याचे ठरवले.

तो पोलिसांना शरण आला.

ऍबे रेल्सला ताब्यात घेणे हे प्रत्येक चौकशी अधिकाऱ्याचे स्वप्न होते. त्याची फोटोग्राफिक मेमरी जवळपास हजारो पानांच्या पुराव्याशी बरोबरी करेल अशी होती. तो मर्डर इंकचा उच्चपदस्थ सदस्य होता आणि त्याच्याकडे भरपूर माहिती होती. अशी माहिती ज्यामुळे इतर मोठे मासे सहज गळाला लागू शकत होते.

हे देखील वाचा

जुगारात पैसे उडवून जिओनीच्या मालकाने या लिडिंग स्मार्टफोन कंपनीला कायमचं संपवलंय..!

झिम्बाव्वेने १० हजार करोड डॉलर्सपर्यंतच्या नोटा छापल्या होत्या, पण…

सरकारच्या या नियमामुळे भारतातील ‘गुगल अर्थ’ इमेजेस क्लिअर नसतात..!

रेल्सच्या मदतीने डझनभर मृतदेह शोधून काढण्यात आणि त्याच्या काही जुन्या मित्रांना गजाआड पाठवण्यात पोलिसांना यश आले. त्या काळात अमेरिकेत इलेक्ट्रिक चेअर हे गुन्हेगारांना मृत्युदंड देण्याचे साधन होते.  गुन्हेगाराला एका लोखंडी खुर्चीवर बसवून त्याच्या पायाला आणि डोक्याला इलेक्ट्रिक वायर्स गुंडाळून शॉक देऊन मारले जाई. रेल्सला ताब्यात घेतल्यावर अनेक गुन्हेगारांचा या पद्धतीने नायनाट करता आला.

ऍबे रेल्समुळे पोलिसांच्या गळाला लागलेला सर्वांत मोठा मासा म्हणजे मर्डर इंकचा प्रमुख अल्बर्ट अनास्तासिया. रेल्सच्या संपर्कात येईपर्यंत मोठमोठे अधिकारी त्याच्या केसालाही धक्का लावू शकले नव्हते.

या अनास्तासियाने स्वतः मॉरिस डायमंड नावाच्या स्थानिक गुंडाचा खू*न केला होता. वास्तविक हे काम करण्यासाठी त्याच्याकडे डझनभर भाडोत्री होते. पण का कुणास ठाऊक, अनास्तासियाने स्वतः हे काम करायचे ठरवले आणि ते पारही पाडले; आणि त्याच्या दुर्दैवाने रेल्सला हा सगळा तपशील माहिती होता.

साक्षीदार म्हणून रेल्सचे महत्त्व बरेच वाढले होते. शिवाय त्याचे काही जुने मित्र त्याच्यावर सूड उगवण्याचीही शक्यता होती. त्यामुळे रेल्सला कोनी बेटावरील हाफ मून हॉटेलमध्ये न्यूयॉर्क पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले. अगदी २४ तासांच्या जागत्या पहाऱ्यात.

या एकाच कैद्याच्या सुरक्षेसाठी तब्बल १८ जणांची नेमणूक करण्यात आली होती! मात्र एवढे होऊनही १२ नोव्हेंबर १९४१ रोजी सकाळी त्याचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह हॉटेलच्या खाली असलेल्या साईडवॉकजवळ सापडला.

त्याच्याभोवती अर्धवट गुंडाळलेल्या दोन चादरी आणि तार सापडली. तपास यंत्रणांना त्याच्या खोलीत त्याच्या रेडिएटरला आणखी एक तार बांधलेली आढळली आणि खिडकीतून बाहेर जाताना ती तुटली होती. त्याच्यावर पहारा करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी असा दावा केला की, त्यांच्या कैद्याने सुटकेसाठी आटोकाट प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते गाढ झोपले होते!

रेल्सच्या मृत्यूभोवतालच्या संशयास्पद परिस्थितीची बातमी देताना वर्तमानपत्रांमध्ये मात्र जोरदार चुरस होती. एकाने तर “त्याला पकडू शकलेला एकमेव नियम म्हणजे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम” अशीही कोटी केली. त्याच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्यासाठी ज्युरींची नेमणूक करण्यात आली.

अधिकृत चौकशी केल्यानंतर अखेर १९५१ मध्ये या ग्रँड ज्युरीने असा निकाल दिला की पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना रेल्सचा मृत्यू झाला.

तथापि, या सिद्धांतातही शंका उपस्थित करायला वाव होता. ऍबे रेल्सचा मृतदेह भिंतीपासून काही अंतरावर सापडला होता. (अपघाताने खिडकीतून पडल्यास प्रेत भिंतीच्या अगदी जवळ सापडते) यात अफरातफर करण्यासाठी पोलिसांना ५०,००० डॉलर्स देण्यात आल्याचा आरोपही झाला. रेल्सच्या मृत्यूनंतर अनास्तासियाविरुद्धचा खटला रद्द करण्यात आला. त्यावेळी तो सुटला खरा, पण काळ त्याची बाहेर वाट पाहत होता. शेवटी १९५७ मध्ये एका न्हाव्याच्या दुकानात त्याचा निर्घृणपणे गोळ्या झाडून खू*न करण्यात आला.

पुढे जवळपास वीस तीस वर्षांनी चार्ली लकीचे चरित्र प्रकाशित झाले तेव्हा त्याने त्यात एब रेल्सला हॉटेलच्या खोलीतून खाली फेकण्यासाठी पैसे दिल्याचा उल्लेख होता.

गुन्हेगारांचे राज्य हे असेच असते. इथे जाण्याची वाट आहे, परतीची जवळजवळ नाहीच! परतण्याचे ठरवले तरी काळ कोणत्या रूपाने तुमच्या समोर येऊन तुमचा घास घेईल सांगता येत नाही. शहाण्याने या वाटेला जाऊ नये हेच खरे…


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या स्टार्ट-अपमुळे लाखांच्या शस्त्रक्रिया काही हजारात होणं शक्य झालंय

Next Post

एका पोरीसाठी या कार्यकर्त्याने हिटलरला सॅल्यूट ठोकायला नकार दिला होता

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

विश्लेषण

जुगारात पैसे उडवून जिओनीच्या मालकाने या लिडिंग स्मार्टफोन कंपनीला कायमचं संपवलंय..!

25 November 2023
विश्लेषण

झिम्बाव्वेने १० हजार करोड डॉलर्सपर्यंतच्या नोटा छापल्या होत्या, पण…

24 November 2023
विश्लेषण

सरकारच्या या नियमामुळे भारतातील ‘गुगल अर्थ’ इमेजेस क्लिअर नसतात..!

23 November 2023
इतिहास

पाकीट विसरले म्हणून नाही तर स्टोअर कार्ड्सच्या या समस्येवर उपाय म्हणून क्रेडिट कार्ड सुरु झाले..

22 November 2023
गुंतवणूक

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

21 November 2023
विश्लेषण

मुंगीएवढ्या लहान किड्यांनी इथं आपलं वेगळं साम्राज्यच उभं केलंय

20 November 2023
Next Post

एका पोरीसाठी या कार्यकर्त्याने हिटलरला सॅल्यूट ठोकायला नकार दिला होता

अमेरिकन मिलिटरीने एकदा चंद्रालाच उडवून टाकायचा प्लॅन केला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023

जुगारात पैसे उडवून जिओनीच्या मालकाने या लिडिंग स्मार्टफोन कंपनीला कायमचं संपवलंय..!

25 November 2023

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)