आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
हि*टल*रचे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते त्याचे क्रौ*र्य. असं म्हणतात की त्या काळात हि*टल*रशी साधे दोन शब्द बोलायलाही भल्याभल्यांची तारांबळ उडायची. अशावेळी त्याच्या विरोधात बोलणे म्हणजे फारच हिंमतीचे काम म्हणायला हवे.
पण अशा सगळ्या वातावरणात एक माणूस त्याकाळी नाझी जर्मनीत होता, ज्याने भरसभेत हि*टल*रला आव्हान दिले होते. ऑगस्ट लॅंडमेसर असे त्याचे नाव होते. त्याने हि*टल*रला ना*झी सलामी देण्यास नकार दिला होता.
एका जर्मन वृतपत्रात २२ मार्च १९९१ साली एक फोटो छापून आला होता. ज्याला बघून लोक हैराण झाले होते. लोकांनी त्या फोटोमध्ये असे काही पाहिले होते, ज्यावर लोकांचा विश्वास बसला नव्हता.
वृत्तपत्रातल्या त्या फोटोमध्ये जिथे आजूबाजूचे सर्व लोक हि*टल*रला ना*झी सॅल्यूट देत होते तेव्हा एक माणूस हाताची घडी बांधून उभा असलेला दिसला. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नाही तर, ऑगस्ट लँडमेसर होता.
हा फोटो १३ जून १९३६ मध्ये हॅम्बर्ग येथील एका बंदरावर घेण्यात आला होता. ऑगस्ट त्या ठिकाणीच काम करत असल्यामुळे तो या फोटोमध्ये दिसून येतो. या बंदरावर त्यावेळी एक मिसाईल लॉन्च करण्यात येत होते. ऑगस्ट लँडमेसर याची कथा ही फार हैराण करणारी आहे.
ऑगस्टने १९३१ साली ना*झी पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. खरंतर लवकर नोकरी मिळावी म्हणून त्याने हे सदस्यत्व स्वीकरले होते. पुढे १९३५ साली, तो ‘इरमा एकलर’ नावाच्या ज्यू महिलेच्या प्रेमात पडला. या प्रेमाला लग्नात परिवर्तीत करण्याचा त्यांचा मानस होता. पण १५ सप्टेंबर १९३५ साली जर्मनीत कुठल्याही ना*झी जर्मन नागरिकाला ज्यू व्यक्तीशी विवाह करण्यावर बंधने घालण्यात आली.
हि*टल*रच्या मते शुद्ध आर्य आणि ज्यू यांच्या संबंधातून दूषित संतान जन्माला येते, यातूनच ज्यू लोकसंख्येला वेगळा काढणारा न्यूमबर्गचा कायदा त्यांनी आणला होता. ऑगस्ट लँडमेसर एका ज्यू मुलीवर प्रेम करत असल्यामुळे त्याने या कायद्याचा विरोध करण्याचा प्रयत्न देखील केला.
१३ जून १९३६ ला काढण्यात आलेला हा फोटो त्याचे सर्वात मोठे प्रमाण आहे. त्याने हि*टल*रला ना*झी सॅल्यूट न ठोकता, हात बांधणे पसंत केले होते. अखेरीस प्रेम तर प्रेम असते. त्याला जाती व धर्माचे बंधन नसते. त्यात मोठमोठ्या अडचणींचा सामना करण्याची ताकद असते. याच बळावर ऑगस्ट आणि इरमा यांनी हा कायदा झुगारून एकत्र राहण्यास सुरुवात केली.
पण हि*टल*रने कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली हे बघून त्याने प्रेयसीला घेऊन डेन्मार्कला जाण्याचा निर्णय घेतला, पण त्याला सीमेवर पकडण्यात आले. एका ज्यू मुलीशी संबंध ठेवल्याचा खटला त्याच्याविरोधात दाखल करण्यात आला. त्याच्यावर एक वर्ष कारवाई करण्यात आली, पण पुरेसे पुरावे त्याच्या विरुद्ध नसल्याने त्याला सोडण्यात आले.
दरम्यानच्या काळात त्याला दोन मुली झाल्या आणि हि*टर*लच्या मंत्र्यांनी त्याच्यावर इरमाला सोडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तो ऐकत नाही, हे बघून त्याला १९३८ साली डिटेन्शन सेंटरमध्ये भरती करण्यात आले. यानंतर ऑगस्ट आणि इरमा पुन्हा कधीच एकमेकांना भेटू शकले नाहीत.
ना*झी लोकांनी इरमाला सोडले नाही, ती सात महिन्याची गर्भवती होती. तरी देखील तिला त्यांनी जेलमध्ये कोंबून मारून टाकले. त्याअगोदर तिने आइरीनला जन्म दिला होता. १९४१ साली ऑगस्ट जेव्हा जेलच्या बाहेर आले त्यावेळी त्यांना पीनल इन्फन्ट्रीमध्ये भरती करण्यात आले, इथे जेलमध्ये शिक्षा झालेल्या लोकांना भरती करण्यात येत होते. या काळात त्याला क्रोएशियाला रवाना करण्यात आले. तिथे असताना तो अचानकच गायब झाला. यानंतर त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला पण तो कधीच सापडला नाही. १९४९ साली जर्मनीने त्याला मृत घोषित केले. हि*टल*र देखील तोवर मेला होता त्यामुळे जर्मनीतील दुःखद ना*झी पर्वाचा अंत झाला होता.
पुढे १९९१ मध्ये जेव्हा तो फोटो बाहेर आला त्यावेळी ऑगस्टचे नाव पुन्हा चर्चेत आले. त्याच्या मुलींनी १९९६ साली ऑगस्ट आणि इरमाची प्रेमकहाणी जगासमोर आणली. आज दोघांच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनी ते दोघेही सच्चे प्रेमी म्हणून आजही लोकांच्या आठवणीत जिवंत आहेत. ऑगस्ट यांचा तो फोटो सरकारच्या दडपशाहीच्या धोरणाच्या विरोधातील एल्गाराचे एक प्रतीक बनला आहे. प्रेमासाठी ऑगस्ट हि*टल*रच्या विरोधात त्यावेळी उभा ठाकला आणि कायमचा अमर झाला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.