आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ही कथा अशा एका अवलियाची आहे जो माणूस असून देखील गेल्या १० – १५ वर्षांपासून शेळीचे जीवन जगत आहे. तुम्ही बरोबर ऐकलत.
खरे पाहता माणसांच्या चक्रमपणाची देखील कमाल असते. थॉमस तेवेत नावाचा माणूस जो आपल्या आयुष्याला कंटाळून स्विस पर्वत रांगावर गेला आणि तिथे अक्षरश: एक शेळी म्हणून जगू लागला.
गेल्या १० ते १२ वर्षापासून हा माणूस स्वत:चे घरदार सोडून आल्प्स पर्वतावर राहायला गेला आणि नुसता राहायलाच गेला नाही तर एका शेळी सारखे तेथे राहू लागला. जेंव्हा पत्रकारांनी थॉमसला शोधून काढलं आणि त्याला याबाबत विचारलं त्यावेळी त्याची खरी कहाणी बाहेर आली.
थॉमसला आपल्या एकसुरी आयुष्याचा प्रचंड कंटाळा आलेला. ऑफिस, ऑफिस ते घर तेच ते कंटाळवाने काम, राजकारण, युद्धे, सिरीयन मुलांचे हाल या सगळ्या गोष्टीनी तो वैतागून गेलेला. तो स्वत: कर्जांच्या विळख्यात देखील अडकलेला होताच. बिल्स देता देता थकून गेला होता.
मित्राच्या कुत्र्याकडे बघताना त्याला वाटायचे आपल्या पेक्षा या कुत्र्याचे आयुष्य चांगले आहे. यातूनच पुढे कदाचित वेगळं आयुष्य जगता येईल का याचा त्याचा विचार सुरु झाला.
आपल्याला प्राण्याचं जीवन जगायचं आहे हा विचार तर पक्का होता मग त्यातल्या त्यात कुठल्या प्राण्याच जीवन जगता येईल याबाबत थोमस ने विचार सुरु केला.
अगोदर आपण हत्तीसारखे जगून बघुया म्हणून त्याने हत्तीवर संशोधन करायला सुरुवात केली. परंतु हत्तीमध्ये देखील त्याला मानवाप्रमाणे बरेच गुण आढळून आले त्यामुळे त्याने हत्तींचा नाद सोडला आणि शेळीला पसंती दिली.
शेळी म्हणजे अगदी स्वच्छंद पणे जगणारा प्राणी आहे त्यामुळे व्हायचं असेल तर शेळी होवूयात हा त्याचा विचार पक्का झाला. त्याचा हा विचार इथपर्यंतच थांबला नाही.
खरी मजा तर पुढे आहे. थोमस ने शेळीसारखे ४ पायांवर राहायचे म्हणून ४ पायांचे प्रोस्थेटिक्स बनवून घेतले. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींकडून एक शेळी तिचे जीवन कसे जगते याची प्रात्याक्षिके घेतली. ती खाते कशी, राहते कशी याबाबतचा त्याने सखोल अभ्यास केला. अगदी ४ पायांवर चालायला देखील सुरुवात केली.
एक वर्षभरानंतर थॉमस स्वित्झर्लंडला आल्प्स पर्वतावर गेला तिथल्या शेळीच्या कळपाला जॉईन करण्यासाठी.
सगळ्यात मोठं आव्हान होतं शेळ्या सारखे गवत खाणे. मानवी आतडी ही कच्चे गावात पचवू शकत नाहीत त्यामुळे याबाबत काय करता येईल याचा देखील थॉमसने रिसर्च केला. शेवटी असे गवत खाण्यासाठी त्याने प्रेशर कुकरचा वापर सुरु केला.
खरं तर गवतावर जगणे त्याला अवघड जाते परंतु थॉमस सध्या आपले शेळीचे आयुष्य आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी निवांतपणे enjoy करत आहे. जगभरातून लोक त्याला तिथे भेटायला येतात आणि त्याच्या अशा राहण्यावर आश्चर्य व्यक्त करतात पण अर्थात थॉमसला त्याची फिकीर नाही. थॉमस आता ऑफिशियल गोट मॅन म्हणून ओळखला जातो आणि आपल्या ओळखीचा त्याला अभिमान देखील आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.