The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महान शास्त्रज्ञ केपलरने त्याच्या आईला चेटकीण ठरून बळी जाण्यापासून वाचवलं होतं

by द पोस्टमन टीम
23 September 2023
in मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


प्राचीन काळापासून मानवी जीवनावर अनेक अंधश्रद्धांचा पगडा आहे, मग ते भारतीय जनमानस असो अथवा पाश्चिमात्त्य. या अंधश्रद्धांमुळे कित्येक लोकांचे जीव देखील गेलेले आहेत. सामान्य नागरिक तर सोडाच पण शास्त्रज्ञांना देखील याची झळ सोसावी लागलेली आहे. जोहान्स केपलर असाच एक जगप्रसिद्ध गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होता. ग्रहांच्या गतीचे तीन प्रमुख नियम शोधण्यासाठी तो प्रसिद्ध आहे.

ग्रह सूर्याभोवती कसे प्रदक्षिणा घालतात याचा शोध केपलरनं लावला. मात्र, त्याची आई कॅथरिनवर जादुटोण्याचे आरोप लावण्यात आले. तिच्या विरोधात सहा वर्षे खटला देखील चालवण्यात आला. मात्र, शास्त्रीय दृष्टीकोनानं विचार करणाऱ्या तिच्या मुलानं तिचा बचाव केला.

१५०० ते १७०० या दोनशे वर्षांच्या काळात युरोपमध्ये साधारण ७३ हजार लोकांना जादूटोण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती. यातील ४० ते ५० हजार लोकांना फाशी देण्यात आली. या लोकांमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक महिलांचा बळी गेला होता. खगोलशास्त्रज्ञ केपलरची विधवा आईसुद्धा यामध्ये बळी गेली असती जर तिच्या मुलानं तिचा बचाव केला नसता तर! नेमकं हे जादुटोण्याचं प्रकरण काय होतं आणि केपलरनं आपल्या आईचा कसा बचाव केला, याबाबत हा लेख…

जोहान्स केपलर (१५७१-१६३०) हा जगातील सर्वात प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञांपैकी एक आहे. त्याने कोपर्निकसच्या सूर्यकेंद्रित विश्वाच्या सिद्धांताला सिद्ध करून दाखवलं. खगोलशास्त्रात त्याचं कार्य इतकं मोठं आहे की, नासानं एका मोहिमेला आणि एका अंतराळयानाला त्याचं नाव दिलं. मात्र, गेल्या काही वर्षांत केपलर आणि त्याचं कुटुंब अनेक संशयास्पद गोष्टींच्या केंद्रस्थानी असल्याच्या चर्चा झाल्या आहेत.

उदाहरणार्थ, २००४ मध्ये अमेरिकन पत्रकारांच्या एका गटानं केपलरवर खुनाचे आरोप केले होते. त्यानं प्रागमधील टायको ब्रॉहे या व्यक्तीला पद्धतशीरपणे विष दिलं होतं. या प्रकरणाचा जर सखोल अभ्यास केला तर नक्कीच तो सर्वात वाईट प्रतिष्ठा असलेला वैज्ञानिक ठरू शकतो, असं या पत्रकारांचं म्हणणं होतं. याशिवाय केपलरच्या आईच्या वर्तणुकीवर देखील अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत.



१६१२ साली जर्मनीच्या लिओनबर्गमधील कोर्टरूममध्ये केपलरला आपल्या ७०वर्षीय आईच्या बचावात खटला लढण्यासाठी उभं रहावं लागलं. खगोलशास्त्रज्ञ जोहान्स केपलरच्या आईचा खटला असल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालं होतं. कॅथरिनवर जादूटोण्या केल्याचे आरोप लागले असून तिच्या विरोधात न्यायालयात खटला उभा राहिल्याची माहिती केपलरच्या बहिणीनं त्याला कळवली होती. तेव्हा तो ऑस्ट्रियातील लिंझ शहरात वास्तव्याला होता.

खटल्याची माहिती मिळताचं केपलरने तत्काळ आपल्या कुटुंबाचा मुक्काम ऑस्ट्रियातून हलवला. त्याची सर्व निरीक्षणे, संशोधनाची माहिती आणि पुस्तकं घेऊन तो लिओनबर्गजवळील एका लहानशा शहरात गेला. जेणेकरून त्याला आईची मदत करता येईल. केपलरची आई एक अशिक्षित महिला होती. ती झाडपाल्याच्या औषधांचा वापर करून स्थानिक लोकांवर उपचार करत असे.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

आपल्या आईच्या या अवस्थेसाठी आपणच जबाबदार असल्याचं त्याला वाटत होतं. कारण काही वर्षांपूर्वी त्यानं काल्पनिक घटनेवर एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्याचे ड्राफ्ट लिओनबर्गमधील नागरिकांच्या हाती लागले होते. या पुस्तकातील गोष्टीमध्ये जो निवेदक होता त्याच्या आईनं चंद्रावर जाण्यासाठी सैतानाचा सल्ला घेतला होता. ते पुस्तक केपलरनं लिहिलेलं होतं. म्हणून नागरिकांनी त्यालाचं खरा निवेदक आणि त्याच्या आईला सैतानाशी बोलू शकणारी व्यक्ती समजलं.

एका शाळेच्या मुख्याध्यापिकेनं कॅथरीन केपलरला जादू येत असल्याचे आरोप केले. दरवाजे-खिडक्या बंद असलेल्या घरात तिला प्रवेश करता येतो. ती जादूचा वापर करून आपल्याकडून पत्र वाचून घेते आणि त्या पत्रांना उत्तर देखील लिहून घेते, असं या मुख्याध्यापिकेचं म्हणणं होतं. कॅथरीनच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीनं सुद्धा तिच्यावर मध्यरात्री जादूटोणा आणि चेटूक केल्याचे आरोप केले. तिच्या पावलांवर पाऊल ठेवल्यास आपणही जादूगार बनू शकतो, असं सल्ला कॅथरिनला आपल्याला दिल्याचं या मोलकरणीनं म्हटलं होतं.

कॅथरिन फक्त स्पर्शानं वेदना भडकवू शकते, असा देखील आरोप तिच्यावर झाला. इतकंच काय तिचा मोठा मुलगा ख्रिस्तोफनं सुद्धा तिच्यावर जादूटोण्याचा आरोप केले. त्यामुळं न्यायालयात तिच्या विरुद्ध मजबूत खटला उभा राहिला होता. मात्र, जोहान्स केपलर आपल्या आईच्या बचावासाठी आला.

त्याला वाटलं होतं की, वर्षाच्या आत तो कॅथरिनला सोडवू शकेल मात्र, हा खटला सहा वर्षे लांबला. सहा वर्षांचा हा काळ त्यानं टब्लिंगन विद्यापीठात काम करून यांत्रिक कॅलक्युलेटर तयार करण्यासाठी प्रभावीपणं वापरला. केपलरनं आपल्या आईसाठी न्यायालयात युक्तिवाद केला.

साक्षीदारांचे आरोप खोडून काढण्यासाठी त्यानं वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला. न्यायालयानं कॅथरिनला निर्दोष घोषित करून मुक्त केलं. मात्र, तोपर्यंत वयोवृद्ध असलेल्या कॅथरीनला सहा वर्षांची शिक्षा भोगावीच लागली होती. जादूटोण्याच्या आरोपांमधून मुक्त झाल्यानंतर सहा महिन्यांनी तिचं निधन झालं.

असं म्हटलं जातं की, कॅथरिन केपलरला जादू येत असल्याचा स्वत: जोहान्स केपलरला देखील संशय होता. तिच्या अनेक गोष्टी त्यानं आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांपासून लपवून ठेवल्या होत्या. मात्र, तरीही त्यानं त्याच्या उत्कृष्ट अनॅलिटीकल स्किल्सचा वापर करून आईला सोडवण्याचा प्रयत्न केला.

जेव्हा त्याची आई निर्दोष सुटली होती तेव्हा तो पूर्णपणे थकून गेला होता. त्याच्या जवळच्या मित्रांशीही काही महिने त्यानं पत्रव्यवहार केला नव्हता. या खटल्याचे तपशील त्यानं कधीही प्रकाशित केले नाहीत किंवा जादूटोण्याचा आरोप असलेल्या इतर कोणत्याही महिलेचा बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही.

त्याकाळी धर्माच्या नावाखाली आणि जादूटोण्याचे आरोप ठेवून अनेक स्त्रियांच्या छळ केला जाई. कॅथरिन केपलरच्या खटल्यामुळं पहिल्यांदा कुणीतरी अशा प्रकारच्या छळाविरोधात आवाज उठवला होता. सर्वात प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या जोहान्स केपलरनं आपल्या आईच्या बचावासाठी आपल्या आयुष्यातील सहा वर्षांचा महत्त्वपूर्ण काळ दिला. यातून आपल्या आई प्रती एका मुलाची असलेली जबाबदारी दिसून येते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

सांगूनही खरं वाटणार नाही, आज उच्चभ्रू लोकांचा खेळ असलेल्या ‘पोलो’चा शोध भारतात लागलाय

Next Post

ब्लॉग- हैद्राबाद मुक्तीलढ्यातील रणझुंजार नेते – पंडित नरेंद्र

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
Next Post

ब्लॉग- हैद्राबाद मुक्तीलढ्यातील रणझुंजार नेते - पंडित नरेंद्र

एकदा हर्शेजचं चॉकलेट खाल्लं की त्यानंतर दुसऱ्या कुठल्याच चॉकलेटला चव लागत नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.