The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

आयआयएममधून लागलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडून हर्षा ‘व्हॉइस ऑफ क्रिकेट’ बनला…

by अनुप देवधर
2 December 2020
in क्रीडा, ब्लॉग
Reading Time:1min read
0
Home क्रीडा

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब

1981-82 साल असेल. त्यावेळी TV फक्त बाजारात आले होते. घरी क्वचितच. भारतात रणजीचा सिझन सुरू होता. रेडिओ म्हणजे सर्वकाही असण्याचा तो काळ. त्यावेळी एका 19 वर्षांच्या कोवळ्या मुलाने सगळ्यांच्या मनात घर केलं. क्रिकेट खेळून नाही, तर रेडिओवर कॉमेंट्री करून. नाव होतं हर्षा भोगले.

पुढे शिक्षण झालं. केमिकल इंजिनिअरिंग केलं. भारतातल्या सुप्रसिध्द IIM अहमदाबाद इथं मॅनेजमेंट मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. काही वर्षं जॉबही केला. पण मनातली आवड शांत बसू देत नव्हती. नोकरी सोडून पूर्णवेळ क्रिकेट कॉमेंट्री करण्याच्या निर्धारातून नोकरी सोडली.

आता काळ थोडा संघर्षाचा होता. त्यावेळी कॉमेंट्रीचे पैसे त्यामानाने कमीच मिळायचे. लग्न झालेलं. कुटुंबाची जबाबदारी होती. अनेक पेपरमध्ये वार्तांकन सुरूच होतं. साधारण 1991-92 साल असावं.

भारताची टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार होती. त्याचदरम्यान ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन कडून कॉमेंट्रीसाठी एका भारतीय माणसाला बोलावणं आलं. अर्थातच हर्षा भोगलेंसाठी ते बोलावणं होतं.

पण पैसे त्या मानानं कमीच मिळणार होते. ऑल इंडिया रेडिओ देशाबाहेरच्या कॉमेंट्रीसाठी पैसे देत नसत. पण तरीही चांगली संधी आहे ही गोष्ट ओळखून ते ऑस्ट्रेलिया का गेले. तिथून एकाच वेळी पाच-सहा वृत्तपत्रांसाठी कॉलम लिहायचा. पुढे 1993 साली आफ्रिका दौऱ्यावर खेळताना हाच प्रकार. कॉमेंट्री 15-20 मि. आधी थांबवून पटकन छोट्याशा बॅगेतल्या टाईपरायटरवर सगळा मॅच रिपोर्ट टाईप करायचा. त्याचा मराठीत अनुवाद करायचा आणि मीडिया सेंटर बंद होण्याच्या आत भारतात फॅक्स करायचा.

इकडे भारतात अनिता, त्यांची पत्नी आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन एक ओळखीच्या गृहस्थांच्या ऑफिसमध्ये त्या फॅक्सची वाट बघत बसायची. रात्रीचे 10 वाजून गेलेले असायचे. अशात तो फॅक्स घेऊन रात्री दुकानं हुडकून त्याचे 5-6 झेरॉक्स काढून परत त्या त्या पेपरच्या ऑफिसला फॅक्स करायचा.

सोपं असतं का सगळं एवढं?

त्यामागे अपार कष्ट आणि मेहनत असते. उच्चशिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी सोडून कुटुंबाची जबाबदारी असताना थोड्याशा बेभरवशाचा, त्या तुलनेनं कमी उत्पन्न देणाऱ्या या क्षेत्राची निवड करणं सोपं होतं का? नक्कीच नाही. मोठं धाडस होतं ते. पण काम आवडीचं आणि आनंद- समाधान देणारं होतं. आणि असं काम कोणीही जर प्रामाणिक प्रयत्नांनी करत असेल, तर नक्कीच तो माणूस मोठा होतो. कित्येक वेळी परदेशात राहण्या-खाण्याचा खर्च त्यांनी स्वतः केला आहे, पण संधी सोडली नाही.

हे देखील वाचा

तत्कालीन राजकाराभारावर प्रश्न उपस्थित केले म्हणून सॉक्रेटिसला विषप्राशन करावं लागलं होतं…

रिलायन्स साम्राज्य उभारणाऱ्या धीरूभाई अंबानींची कहाणी…

गंगेच्या किनाऱ्यावर मजूरांचे दुःख ऐकून स्वामी विवेकानंद रडले होते!

आणि मग ऑस्ट्रेलियामध्ये सहज एका मॉलमध्ये आईस्क्रीम घेत असताना फक्त रेडिओ कॉमेंट्रीच्या आवाजावरून ऑस्ट्रेलियन माणसं ओळखतात, तेव्हा आश्चर्य वाटतं.

Do what you Love & Love what you Do… या वाक्याचं मूर्तीमंत उदाहरण कोणी असेल तर हर्षा भोगलें च नाव खूप वरच्या बाजूला असेल. स्वतःची ओघवती शैली, भाषेवर कमालीचं प्रभुत्व ह्या जोरावर आज टोनी ग्रेग, रिची बेनॉ ह्यांच्या रांगेत जाऊन भारतीय नाव असू शकतं, हे भारतीय म्हणून आपल्यासाठी खरोखर अभिमानाची गोष्ट आहे.

TV आल्यावर पण त्याने ह्या क्षेत्रावर वर्चस्व गाजवलंच; रेडिओच्या काळात क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या धृतराष्ट्रासारख्या लाखो श्रोत्यांसाठी हर्षा भोगले संजय होता.

ADVERTISEMENT

आज हर्षा 59 वर्षांचा आहे. खरंतर आपल्याकडं 58 हे रिटायरमेंटचं वय असलं, तरी अजून खूप वर्षं त्याच्या आवाजात क्रिकेट कॉमेंट्री ऐकायचं भाग्य मिळावं, अशी प्रार्थना!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

या टीव्ही कंपनीने ‘ब्रँडिंग’ची संकल्पना भारतात रुजवली होती

Next Post

जगातले सर्वात जास्त तेलाचे साठे असूनही या देशातल्या लोकांचे खायचे वांधे आहेत..

अनुप देवधर

अनुप देवधर

Related Posts

इतिहास

तत्कालीन राजकाराभारावर प्रश्न उपस्थित केले म्हणून सॉक्रेटिसला विषप्राशन करावं लागलं होतं…

4 January 2021
रिलायन्स साम्राज्य उभारणाऱ्या धीरूभाई अंबानींची कहाणी…
ब्लॉग

रिलायन्स साम्राज्य उभारणाऱ्या धीरूभाई अंबानींची कहाणी…

28 December 2020
गंगेच्या किनाऱ्यावर मजूरांचे दुःख ऐकून स्वामी विवेकानंद रडले होते!
ब्लॉग

गंगेच्या किनाऱ्यावर मजूरांचे दुःख ऐकून स्वामी विवेकानंद रडले होते!

28 December 2020
गांधीजींना ‘महात्मा’ पदवी देणारे स्वामी श्रद्धानंद!
इतिहास

गांधीजींना ‘महात्मा’ पदवी देणारे स्वामी श्रद्धानंद!

23 December 2020
चोर, फकीर की आध्यात्मिक गुरू? ग्रिगोरी रास्पुतिन नेमकं काय रसायन होतं..?
इतिहास

चोर, फकीर की आध्यात्मिक गुरू? ग्रिगोरी रास्पुतिन नेमकं काय रसायन होतं..?

8 December 2020
मराठवाडी नेते, जनता अन् पंजाबचे शेतकरी…!
ब्लॉग

मराठवाडी नेते, जनता अन् पंजाबचे शेतकरी…!

6 December 2020
Next Post
जगातले सर्वात जास्त तेलाचे साठे असूनही या देशातल्या लोकांचे खायचे वांधे आहेत..

जगातले सर्वात जास्त तेलाचे साठे असूनही या देशातल्या लोकांचे खायचे वांधे आहेत..

व्ही पी सिंहांनी मंडल आयोगाच्या तरतुदी लागू करण्याची घोषणा केली आणि संपूर्ण देशात आंदोलन पेटलं

व्ही पी सिंहांनी मंडल आयोगाच्या तरतुदी लागू करण्याची घोषणा केली आणि संपूर्ण देशात आंदोलन पेटलं

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

21 April 2020
शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

20 June 2020
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

अफगाणी सैनिकांसाठी युद्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह ‘नलवा’

16 January 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021

Recent News

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!