The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

या टीव्ही कंपनीने ‘ब्रँडिंग’ची संकल्पना भारतात रुजवली होती

by द पोस्टमन टीम
1 December 2020
in मनोरंजन
Reading Time:1min read
0
Home मनोरंजन

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब

७० च्या दशकात सिनेमा हे एका प्रसिद्ध मनोरंजनाचे साधन होते. त्या काळात सिनेमागृहाच्या बाहेर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असायच्या. टेलिव्हिजन विकत घेणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जायचे. त्या काळी टेलिव्हिजनवर फक्त एकच वाहिनी प्रदर्शित व्हायची त्य वाहिनीची नाव होते दूरदर्शन, त्यावर छाया गीत हा हिंदी गीतांचा कार्यक्रम सकाळी असायचा आणि संध्याकाळी त्याच्यावर हिंदी बातम्या प्रसारित केल्या जात होत्या.

ज्यांच्या घरी टेलिव्हिजन असायचा त्यांच्याकडे लोक मोठ्या संख्येने एकत्र जमायचे आणि त्या घराला एखाद्या मिनी थियेटरचे रूप प्राप्त व्हायचे. टेलिव्हिजनचे अनेक ब्रँड त्याकाळी होते, या ब्रँडस पैकी टेलिव्हिस्टा हा देखील एक प्रसिद्ध ब्रँड होता. या व्यतिरिक्त ऑस्कर, बेल्टेक, वेस्टन, नेलको, सालोरा, बेस्टव्हिजन आणि क्राऊन हे देखील ब्रॅण्ड्स त्याकाळी अस्तित्वात होते.

पण टेलिव्हिस्टाची गोष्टच वेगळी होती. ज्या काळात विस्टन आणि जेके इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडसने भारतीय बाजरपेठेवर आपली पकड मजबूत केली होती, त्यावेळी त्या ब्रँड्सना टेलिव्हिस्टाने आव्हान दिले होते. नुसते आव्हानच दिले नव्हते तर आपल्या अत्यंत आक्रमक अशा प्रसिद्धी तंत्रांच्या बळावर त्यांनी या इतर ब्रँडसच्या बाजारपेठेवर कब्जा केला होता.

१९७२ साली टीव्हीवर ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ हा प्रसिद्ध टॉक शो सुरु करण्यात आला. हा कार्यक्रम फार प्रसिद्ध झाला.

हा टॉक शो सुरु झाला त्याच वर्षी ‘टेलिव्हिस्टा- अ बिग नेम इन टीव्ही’ अशी मोठी पानभर जाहिरात टेलिव्हिस्टाने वृत्तपत्रात छापून आणली.

त्याच वेळी टेलिव्हिस्टाने अजून एक जहिरात काढली या जाहिरातीनुसार टेलिव्हिस्टाने चित्रपटगृहासारखा अनुभव आमच्या टीव्हीद्वारे मिळतो अशा पद्धतीची मार्केटिंग करायला सुरुवात केली. अनेक चित्रपट आणि मालिका यांच्यातही त्यांनी ब्रॅण्डिंग करायला सुरुवात केली होती. त्यांच्या जाहिरातीतून त्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या ब्रँडचे प्रमोशन केले.

त्यांच्या एका जाहिरातीत त्यांनी आपल्या ब्रँडच्या टीव्हीच्या झूम करण्याच्या क्षमतेची ब्रॅण्डिंग केली. यात त्यांनी सतारवादक रवि शंकर यांचे सतार वादन दाखवले होते आणि त्यात सांगितले होते की जर तुम्हाला सतारवादकाच्या बोटांची हालचाल नजरेत टिपायची असेल तर तुम्हाला टेलिव्हिस्टाचा टीव्ही घेण्यावाचून दुसरा पर्याय नाही.

हे देखील वाचा

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

आणि म्हणून सुभेदार पान सिंह तोमर डाकू बनला..

जगण्यासाठी आवश्यक बनलेल्या वायफायचा शोध हॉलीवूडच्या या अभिनेत्रीने लावलाय

ADVERTISEMENT

टेलिव्हिस्टाच्या या अप्रतिम स्ट्रॅटेजीचा त्यांना मोठा फायदा झाला. त्यांच्या ब्रँडने तीन वर्षातच सगळ्या ब्रॅंड्सला पिछाडीवर टाकत, दुसऱ्या स्थानी झेप घेतली. टेलिव्हिस्टाचा टीव्ही प्रसिद्ध होता त्याच्या दोन्ही बाजूने बंद होणाऱ्या स्लायडिंग लाकडी दरवाज्यासाठी, हा दरवाजा त्यांनी डायोनारा या एका ब्रॅण्डच्या मॉडेलची कॉपी करून तयार केला होता.

परंतु टेलिव्हिस्टा फक्त मार्केटिंग करत नव्हता तर त्यांचे टीव्ही हे खऱ्या अर्थाने उत्तम दर्जाचे होते, त्यांची पिक्चर क्वालिटी देखील इतर ब्रँड्सच्या तुलनेत उत्तम होती.

टेलिव्हिस्टाने त्या काळात खरेदीनंतरची सर्व्हिसिंग आणि एका वर्षाची वॉरंटी आपल्या प्रॉडक्टवर दिली होती, यामुळे लोकांचा ओढा टेलिव्हिस्टाकडे फार होता.

टेलिव्हिस्टा ही कंपनी भारतात आर्थिक उदारीकरणाचे युग येण्यापूर्वी चांगल्या स्थितीत होती. त्याकाळी बहुतेक टेलिव्हिजन कंपन्या या जरी आपल्या उत्पादनांची निर्मिती भारतात करायच्या तरी त्यांचे बहुतांश भाग ते तैवान आणि कोरिया या देशातून आयात करायचे. बऱ्याचदा सर्व सुटे भाग आयात करून त्यांच्या जोडणीचे काम फक्त भारतात केले जायचे.

१९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतर परिस्थिती पालटली. ओनिडा, सॅमसंग, एलजी सारख्या अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली. हे सर्व टीव्ही विक्रेते हे भारतीय कंपन्यांच्या तुलनेत अनेक आघाड्यांवर पुढे होते. टेलिव्हिस्टा हा ब्रँड असाच या स्पर्धेत मागे पडत गेला. टेलिव्हिस्टा ही कंपनी आजही अस्तित्वात असली तरी मार्केटवर तिचा आधीसारख ताबा उरलेला नाही.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

जेव्हा बाबरने शिखांचे पहिले गुरु गुरुनानक यांना कैदेत टाकलं होतं..

Next Post

आयआयएममधून लागलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडून हर्षा ‘व्हॉइस ऑफ क्रिकेट’ बनला…

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!
मनोरंजन

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021
इतिहास

आणि म्हणून सुभेदार पान सिंह तोमर डाकू बनला..

4 January 2021
मनोरंजन

जगण्यासाठी आवश्यक बनलेल्या वायफायचा शोध हॉलीवूडच्या या अभिनेत्रीने लावलाय

3 January 2021
मनोरंजन

विन्सेट वॅन गॉग – कॅनव्हासवर वेदना जिवंत करणारा कलाकार

30 December 2020
राजदूत म्हणजे ८०च्या दशकातील तरुणांचा जीव की प्राण!
भटकंती

राजदूत म्हणजे ८०च्या दशकातील तरुणांचा जीव की प्राण!

11 December 2020
फुकट आहे म्हणून हॉटेलातून खिशात भरून आणतो त्या टूथपिकला पण स्वतःचा इतिहास आहे..
इतिहास

फुकट आहे म्हणून हॉटेलातून खिशात भरून आणतो त्या टूथपिकला पण स्वतःचा इतिहास आहे..

10 December 2020
Next Post
आयआयएममधून लागलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडून हर्षा ‘व्हॉइस ऑफ क्रिकेट’ बनला…

आयआयएममधून लागलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडून हर्षा 'व्हॉइस ऑफ क्रिकेट' बनला...

जगातले सर्वात जास्त तेलाचे साठे असूनही या देशातल्या लोकांचे खायचे वांधे आहेत..

जगातले सर्वात जास्त तेलाचे साठे असूनही या देशातल्या लोकांचे खायचे वांधे आहेत..

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

21 April 2020
शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

20 June 2020
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

अफगाणी सैनिकांसाठी युद्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह ‘नलवा’

16 January 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021

Recent News

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!