The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

गुगल ड्राईव्हवर फुकट होणाऱ्या व्हॉट्सॲप बॅकअपला आता पैसे मोजावे लागू शकतात!

by द पोस्टमन टीम
17 March 2022
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आज जग जवळ येतंय असं आपण म्हणतो, त्याला कारण असतं नवनविन पद्धतीने पुढे येणारं विज्ञान, तंत्रज्ञान. गेल्या १० ते १५ वर्षात नुसतं इंटरनेट असं नाव घेऊन आपण म्हणू शकत नाही की या कारणाने जग पुढे गेलं, जवळ आलं, पण यात आपल्याला विशिष्ट नाव घ्यावं लागेल की ज्या माध्यमाने आपले सगळे व्यवहार सोपे केले आणि ते मध्यम म्हणजे व्हॉट्सॲप नावाचं एक भन्नाट असं अप्लिकेशन. एसएमएस, ई-मेल वगैरे माध्यमं त्यांचं काम करत असताना, व्हॉट्सॲप आलं आणि सगळं जग त्याने बदलून टाकलं.

त्यातही महत्वाचं कारण होतं ते म्हणजे यावर असलेल्या सगळ्या सोयी या फुकट असणं ! कुठल्याही सामान्य माणसाला एखादी गोष्ट फुकट मिळत असेल तर तो त्यावर तुटून पडतो. आणि त्याचमुळे आज घडीला व्हॉट्सॲप वापरकर्त्यांची संख्या ही जगभरात २०० कोटी एवढी प्रचंड आहे. यात लागतो तो फक्त इंटरनेटचा खर्च आणि त्याचा असणारा वेग.

फोटो, व्हिडीओ, ऑडिओ, मेसेज, अशा गोष्टी कोणत्याही मर्यादेशिवाय काही क्षणात पाठवता येणे हे याचं मुख्य वैशिष्ट्य. त्यापुढे लागतं ते म्हणजे हे जे काही चॅटिंगपासून बाकी गोष्टी पाठवण्यापर्यंतच्या गोष्टी आहेत ते साठवण्यासाठी, सेव्ह करण्यासाठी लागणारं साधन आणि ते आहे गुगल ड्राईव्ह.

गुगल ड्राईव्ह हा गुगलने प्रत्येक गुगल वापरकर्त्याला दिलेला आभासी असा लॉकर असतो ज्यात आपल्याला आपला डेटा साठवता येतो. बॅकअपचा पर्याय हा त्याचसाठी गुगलला जोडलेल्या प्रत्येक ॲपला दिलेला असतो. तो पर्याय व्हॉट्सॲपमध्येही असतो ज्याद्वारे ठराविक (आपणच ठरवलेल्या) कालावधीनंतर आपल्या व्हॉट्सॲपवरचा सर्व डेटा हा बॅकअप केला जाऊन गुगल ड्राईव्हवर साठवला जातो.

हे बॅकअप करणं जबरदस्तीचं नसलं तरी गरजेचं नक्कीच असतं करणं जेवढी जास्त जागा व्हॉट्सॲप किंवा इतरही ठिकाणी मोबाईलमध्ये साठून तशीच राहील तेवढी कमी जागा शिल्लक राहून नवीन गोष्टी साठवणं अवघड होणं हेही वाढतं. यामुळे मोबाईलला त्याच्या कार्यामध्ये अडचणी येऊ लागतात आणि त्याचसाठी हा बॅकअपचा पर्याय, जो सर्रास सगळ्या वापरकर्त्यांकडून वापरला जातो.

दर काही दिवसांनी, महिन्यांनी आपण देऊ त्या वेळेला आपोआप आपला डेटा ड्राईव्हवर सेव्ह होऊन आपल्या पुढच्या व्यवहारांसाठी काम सोपं होतं. जरी आपण व्हॉट्सॲप दुसऱ्या मोबाईलमध्ये सुरू केलं, पुन्हा नव्याने इन्स्टॉल केलं तरी आधीचा डेटा आपण बॅकअप केला गेला असल्यास पुन्हा मिळवू शकतो. व्हॉट्सॲपचे बॅकअप हे आपल्या मोबाईल क्रमांकाला आणि इमेल आयडीला जोडले गेले असतात त्यामुळे ते थेट आपल्या इमेल द्वारे ड्राईव्हमध्ये साठवले जातात.

पण आता ह्या कामात एक अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सॲपला गुगलने दिलेली एक सुविधा अशी होती की ड्राईव्हने आपल्याला डेटा स्टोरेज साठी दिलेल्या जागेव्यतिरक्त वेगळा कोटा खास व्हॉट्सॲपच्या बॅकअप डेटासाठी दिलेला असे ‘अनलिमिटेड’ प्रमाणात दिलेला असे. त्यामुळे गुगल ड्राईव्हचे १५ जीबी किंवा जास्त असलेले स्टोरेज आणि ते सोडून अमर्यादित असे व्हॉट्सॲप स्टोरेज असा मुबलक भाग वापरकर्त्याला मिळत असे.

हे देखील वाचा

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

त्याच्या संशोधनाने कोट्यवधी लोकांना अन्न दिले आणि लाखोंना वेदनादायक मृत्यूही!

पण नुकतीच व्हॉट्सॲप कडून माहिती सांगितली गेली यापुढे (म्हणजेच ते सांगतील तेव्हापासून) व्हॉट्सॲप बॅकअपसाठी असणारं वेगळं साठवणूक केंद्र हे अमर्यादित वरून मर्यादितवर येणार आहे.

WaBetaInfo ही वेबसाईट व्हॉट्सॲपच्या येऊ घातलेल्या नव्या बदलाची,अपडेट्सची माहिती नवं फिचर किंवा बदल येण्याआधी वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देत असते. त्यांना एका नव्या बदलाचा सुगावा लागला ज्यावर सध्या व्हॉट्सॲपचं काम चालू आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता काही मर्यादित प्रमाणातच स्टोरेजचा पर्याय वापरकर्त्यांना व्हॉट्सॲपद्वारे दिला जाईल आणि तो भरला की आपल्याला मोबाईलवर किंवा व्हॉट्सॲपवर जागा भरल्याचं ‘स्टोरेज फुल’ असं नोटिफिकेशन दिसेल. यात अशीही सुविधा असेल की आपण आपल्याला आपल्या व्हॉट्सॲपमधून होणाऱ्या बॅकअपचा साईझ ठरवता येईल आणि एकूण डेटापैकी काय बॅकअप करायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्यही आपल्याला असेल.

अर्थात हे स्टोरेज हे ड्राईव्हवर असेल फक्त यापूर्वी गुगल ड्राईव्हच्या सर्वांनाच मोफत मिळणाऱ्या १५ जीबी व्यतिरिक्त ‘अनलिमिटेड स्टोरेज’ वापरकर्त्याला मिळत असे ते आता तसं वेगळं न मिळता गुगल ड्राईव्हमधील नेहमीच्या स्टोरेजमध्येच व्हॉट्सॲप डेटा साठवला जाईल.

सध्याची परिस्थिती अशी आहे की iOS या ॲपलच्या ऑपरेटिंग सिस्टीम द्वारे वापरण्यात येणाऱ्या व्हॉट्सॲपचं बॅकअप जे त्याच iOS सिस्टीम मध्ये सेव्ह होत असे त्याला फक्त ५ जीबीची मर्यादा आहे. तेच व्हॉट्सॲप अँड्रॉइड सिस्टीमवर वापरणाऱ्यांचा बॅकअप गुगल ड्राईव्हवर सेव्ह होतो ज्याला काहीही मर्यादा नाही. 

जो खरंतर अँड्रॉइड वापरकर्त्याचा मोठा फायदा आहे. पण कदाचित आता अँड्रॉइडवाल्यांवरही मर्यादा येण्याची शक्यता आहे. यात पण हे लक्षात घेतलं पाहिजे की व्हॉट्सॲपचे जे बॅकअप वर्षभरपेक्षा जास्त काळात अपडेट केले गेलेले नसतात किंवा वापरले गेले नसतात त्यांना गुगल ड्राईव्हमधून आपोआप डिलीट करण्यात येते.

या नव्या प्रक्रियेमध्ये गुगल आणि व्हॉट्सॲप दोघेही सामील आहेत. कारण २०२०मध्ये गुगलने, ड्राईव्हमध्ये फोटो साठवण्यावर मर्यादा आणली होती आणि आता या पाठोपाठ व्हॉट्सॲप डेटा साठवण्यावरही तशीच मर्यादा घालण्यात येऊ शकते असं समोर येत आहे. 

ADVERTISEMENT

हे प्रकरण तसं फारसं वेगळं नाही. या आधी आपल्याला माहीत होतं की गुगल सर्वांनाच १५ जीबी मोफत स्टोरेज देत होतं आणि जास्त हवं असल्यास ते आपण पैसे भरूनही जास्त जागा घेऊ शकत होतो. आताही तेच होत आहे. फक्त यापूर्वी आपले ते १५ जीबी पूर्ण भरायला वर्षही लागत होती, ते आता त्यात व्हॉट्सॲप डेटाही साठवला जाऊ लागल्यास लवकर भरेल, इतकंच!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

2.4 अब्ज डॉलर्सचा फसवणूक करणारा आरोपी भारतातून “बेपत्ता” आहे

Next Post

या जर्मन सैन्याधिकाऱ्याने खुद्द हिटलरचे आदेश धुडकावून लावले होते

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

मनोरंजन

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

31 January 2023
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

22 April 2022
इतिहास

त्याच्या संशोधनाने कोट्यवधी लोकांना अन्न दिले आणि लाखोंना वेदनादायक मृत्यूही!

18 April 2022
विज्ञान तंत्रज्ञान

जगातले सगळे डास नष्ट झाले तर..?

13 April 2022
विज्ञान तंत्रज्ञान

पहिला ‘आयफोन’ ॲपलने नाही तर सिस्कोने बनवला होता!

23 March 2022
विज्ञान तंत्रज्ञान

आईनस्टाईनने १०० वर्ष आधीच गुरुत्वाकर्षण लहरींच्या अस्तित्वाचे भाकीत केले होते

17 March 2022
Next Post

या जर्मन सैन्याधिकाऱ्याने खुद्द हिटलरचे आदेश धुडकावून लावले होते

भंगारात खरेदी केलेल्या 'ईस्टर एग'ची किंमत मिलियन्समध्ये आहे हे त्याला गुगलमुळे कळलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)