आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कोरोनाच्या महासाथीने विस्कळीत झालेली जागतिक पुरवठा साखळी पूर्वपदावर येण्यापूर्वीच युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्र*मणाने आणखी अडचणीत आली. त्यामुळे जगभरातील आयात-निर्यातीच्या खर्चात मोठी वाढ होत असून वस्तू आणि अन्नधान्य यांचे वितरण महाकठीण झाले आहे. याचे गंभीर परिणाम जगभरात दीर्घकाळ भोगावे लागतील आणि जागतिक वित्तवाढीला खीळ बसेल; असा आंतरराष्ट्रीय व्यापार तज्ज्ञांचा दावा आहे.
रशिया आणि युक्रेनमधल्या संघर्षामुळे काही काही विमान उड्डाणे रद्द करावी लागत आहेत किंवा त्यांचे मार्ग बदलावे लागत आहेत. याचे विपरीत परिणाम एकूणच माल वाहतुकीच्या क्षमतेवर होत असून जागतिक पुरवठा साखळी खंडीत होण्याची चिंता जगाला भेडसावत आहे. प्लॅटिनम, ॲल्युमिनियम, सूर्यफूल तेल आणि पोलाद यांसारख्या उत्पादनांचा जागतिक पुरवठा ठप्प होण्याची भीती आहे. शिवाय या संघर्षाच्या परिस्थितीत युरोप, युक्रेन आणि रशियामधले कारखाने बंद पडण्याचा धोका आहे.
रशिया हा इंधनाचा; प्रामुख्याने नैसर्गिक वायूचा प्रमुख उत्पादक पुरवठादार आहे. युरोपला रशियाकडून होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा युक्रेनमार्गे होतो. यु*द्धामुळे हा नैसर्गिक वायूचा मार्ग धोक्यात आल्याने इंधनांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि त्या लवकरच गगनाला भिडण्याची शक्यता आहे.
युक्रेनवरील आक्र*मणामुळे रशियावर अमेरिका आणि अन्य युरोपीय देशांनी आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्याचे पालन करण्यासाठी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी रशियाबरोबरचा व्यापार बंद केला आहे. रशिया आता महासत्ता राहिला नसला तरी त्याचे जगाच्या अर्थकारणातले महत्व अबाधित आहे.
रशियाशी व्यापार ठप्प झाल्याचा मोठा आर्थिक फटका बहुराष्ट्रीय कंपन्यांना बसत आहे. विशेषतः गुंतागुंतीची जागतिक पुरवठा साखळी वापरणाऱ्या कंपन्यांना दोन वर्षापूर्वीपासूनच अडचणी वाढल्या आहेत. यु*द्धाचे आर्थिक परिणाम आणि रशियावरील व्यापक निर्बंधामुळे उद्भवू शकणारी स्थिती अद्याप स्पष्ट झालेले नाहीत, इतक्यातच धापा टाकण्याची पाळी आलेले उद्योग रसातळाला जाण्याची भीती आहे.
“साथीच्या रोगामुळे जागतिक पुरवठा साखळी आधीच दुखावत आहेत आणि तणावग्रस्त आहेत,” ग्रीनबर्ग ट्रौरिग येथील व्यापार वकील लॉरा रबिनोविट्झ म्हणाल्या. ती म्हणाली की परिणाम विशिष्ट उद्योगांसाठी भिन्न असतील आणि यु*द्ध किती दिवस चालेल यावर अवलंबून असतील, परंतु आधीच-असुरक्षित पुरवठा साखळीमुळे परिणाम वाढवले जातील.
यु*द्ध आणि निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर वाहन उत्पादक कंपन्यांना सुट्या भागांचा पुरवठा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. फोक्सवॅगनने सुट्या भागांच्या कमतरतेमुळे वुल्फ्सबर्गमधील मुख्य कारखान्यात आणि इतर अनेक जर्मन प्रकल्पांमध्ये उत्पादन कमी करण्याची पाळी येणार असल्याचे नुकतेच स्पष्ट केले आहे, तर बीएमडब्ल्यूने जर्मनी, ऑस्ट्रिया आणि ब्रिटनमधील प्रकल्पांत उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहन उद्योगांना सुट्याभागांसह अन्य साधनसामुग्रीचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. युक्रेन आणि रशिया हे दोन्ही देश पॅलेडियम आणि प्लॅटिनमचे प्रमुख उत्पादक आहेत. तसेच अल्युमिनिअम, लोखंड आणि क्रोम याचाही तुटवडा नोइर्मां होऊ शकतो.
सेमीकंडक्टर उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेल्या निऑन, झेनॉन आणि पॅलेडियमच्या जागतिक साठ्याबाबत त्या क्षेत्रातले उद्योजक चिंता व्यक्त करत आहेत. सेमीकंडक्टर आणि ऑटो उत्पादनात वापरल्या जाणार्या पॅलेडियम आणि झेनॉनसारख्या सामग्रीच्या कमतरतेमुळे त्या उद्योगांसाठी सध्याच्या अडचणी वाढू शकतात. सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे कार प्लांट्स आणि इतर सुविधांवरील उत्पादन थांबले आहे, इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत आणि वाहन विक्रीही घटत चालली आहे.
रशिया हा जगभरातील गव्हाचा सर्वांत मोठा निर्यातदार आहे. रशिया आणि युक्रेन हे दोनच देश मिळून जगभरातील मागणीपैकी ३० टक्के गव्हाचा पुरवठा करतात. लेबनॉनला गव्हाच्या वापरापैकी ८१ टक्के गहू युक्रेनकडून, तर १५ टक्के रशियाकडून मिळतो. इजिप्त आपल्या मागणीपैकी ६० टक्के रशियाकडून आणि २५ टक्के युक्रेनमधून आयात करतो. तुर्कस्तानला ६६ टक्के गहू रशिया, तर युक्रेनचा १० टक्के गहू पुरवतो.
पाश्चात्य देशांमधल्या आणि उत्तर आफ्रिका आणि मध्यपूर्व देशांमध्ये नागरिकांच्या अन्नपदार्थांमध्ये ब्रेड, पास्ता आणि पॅक केलेलेले अन्न यांचा समावेश आहे. त्यासाठी गहू हे महत्वाचे धन्य आहे. जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे अन्नधान्याच्या किमती आधीच गगनाला भिडल्या आहेत. त्यात धान्याचा तुटवडा निर्माण झाला तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. याचा परिणाम म्हणून विशेषतः गरीब देशांमध्ये कायदा सुव्यवस्थाही धोक्यात येऊ शकते.
जागतिक मालवाहतूक क्षेत्रातील आघाडीच्या ‘मार्स्क’ने अन्न आणि औषधांचा अपवाद वगळता समुद्र, हवाई आणि रेल्वेद्वारे रशियाला जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या सर्व माळांची वाहतूक स्थगित करणार आहे. अशाच प्रकारे जगभरातील इतर प्रमुख मालवाहतूकदार कंपन्यांनी वाहतूक स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नैसर्गिक वायूच्या जागतिक व्यापारात रशियाचा वाटा पाचव्या क्रमांकाचा आहे. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश गहू, बार्ली, मका आणि खतांचे प्रमुख निर्यातदार आहेत. या युद्धामुळे जगभरातील वस्तूंच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम झाला असून या पुढे परिस्थिती अधिक भयावह बनेल; असा इशारा व्हाईट आणि विल्यम्सचे भागीदार ख्रिस्तोफर एफ. ग्रॅहम यांनी दिला आहे.
‘स्विफ्ट’ यंत्रणा वापरण्यावर निर्बंध लादल्यामुळे रशियन आयातीपैकी एक पंचमांश आयात थांबेल, असा बायडेन प्रशासनाचा दावा आहे. परंतु आर्थिक निर्बंधांचा अंकुशांचा व्यापारावर होणारा परिणाम आणखी मोठा असण्याची शक्यता आहे. रशियाची आयात आणि निर्यात मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. आर्थिक निर्बंधांचे नेमके परिणाम अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाहीत.
जागतिक उत्पादनात रशियाचा वाटा २ टक्क्यांहून कमी आहे, त्यामुळे रशियातील उत्पादने न मिळाल्याने इतर देशांवरील परिणाम फारसे गंभीर असणार नाहीत. परंतु रशियन सरकार आणि अर्थव्यवस्था महसूली उत्पन्नासाठी मुख्यतः व्यापारावर अवलंबून आहेत. रशियाची अर्थव्यवस्था धोक्यात आले तर त्याचे परीनं संपूर्ण जगाला भेगावे लागणार आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.