The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईनसुद्धा एका रशियन हेर स्त्रीच्या जाळ्यात अडकला होता

by Heramb
7 October 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दुसऱ्या महायु*द्धादरम्यान रशियन गुप्तहेर आणि एक प्रतिभाशाली शास्त्रज्ञ यांच्यातील प्रेम-प्रकरण जेम्स बाँड चित्रपटाच्या कथानकासारखे वाटत असले तरीही ते वास्तविक आहे आणि त्यात अल्बर्ट आइन्स्टाईनचा समावेश आहे. मार्गारिटा कोनेन्कोवाच्या लिलावात विकल्या गेलेल्या पत्रांनी त्यांचे प्रेमप्रकरण सर्वांसमोर आणले. तोपर्यंत याबद्दल कोणालाही कल्पनाही नव्हती. याच हटके पण तितक्याच धोकादायक प्रेमकथेबद्दल हा विशेष लेख..

अल्बर्ट आईन्स्टाईन, शतकातील सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांपैकी एक. अणुऊर्जेच्या, सापेक्षतेच्या, क्वांटम मेकॅनिक्स आणि फोटोइलेक्टरीक इफेक्टच्या संशोधनासाठी त्याला आधुनिक भौतिकशास्त्राचा देव म्हटलं तर अतिशयोक्त वाटायला नको. सर्व काळातील महान भौतिकशास्त्रज्ञांपैकी एक म्हणून आईन्स्टाइनला मोठ्या प्रमाणात मान्यता आहे.

१९३३ साली अल्बर्ट आईन्स्टाईन अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाच जर्मनीमध्ये ॲडॉल्फ हिट*लर सत्तेवर आला. आईनस्टाईनने नवनिर्वाचित ना*झी सरकारच्या ज्यू-विरोधी धोरणांवर आक्षेप घेतला. तो अमेरिकेत स्थायिक झाला आणि १९४० साली त्याने अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.

दुसऱ्या महायु*द्धादरम्यान त्याने राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्टला पत्र लिहिले आणि त्यांना संभाव्य जर्मन आ*ण्विक शस्त्रास्त्र कार्यक्रमाबद्दल धोक्याचा इशारा दिला. अमेरिकेनेसुद्धा असे संशोधन सुरू करण्याची त्याने शिफारस केली. आइन्स्टाईनने मित्र राष्ट्रांना पाठिंबा दिला, पण त्याने अण्व*स्त्रांचा निषेध केला.



मार्गारीटा कोनेन्कोवाचा जन्म १८९५ साली रशियाच्या दुर्गम सारापुल शहरात झाला. याच ठिकाणी तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. तरुण असताना ती मॉस्कोला गेली, कायद्याच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला आणि इवान बुनिनच्या कुटुंबासह राहिली. मॉस्कोमध्ये ती सेर्गेई कोनेन्कोव्हला भेटली. त्याने आधीच यशस्वी शिल्पकार म्हणून कारकीर्द घडवली होती. १९२२ साली या जोडप्याने अमेरिकेला एकत्र प्रवास केला. त्यांनी काहीच महिने अमेरिकेत घालवण्याचा अंदाज होता पण ते तब्बल २२ वर्षे घरी येऊ शकणार नव्हते.

मार्गारीटाच्या पतीला प्रिन्सटन युनिव्हर्सिटीसाठी अल्बर्ट आइन्स्टाईनचा अर्धपुतळा तयार करण्याचे काम देण्यात आले आणि काम सुरू होण्यापूर्वीच त्या जोडप्याने या महान शास्त्रज्ञाची भेट घेतली. मार्गारीटाच्या पतीने प्रकल्पाच्या योजनांवर बोलण्यासाठी प्रिन्स्टन विद्यापीठाला मोजक्याच भेटी दिल्या, पण दुसरीकडे मार्गारीटा मात्र वारंवार प्रिन्स्टन विद्यापीठाला भेट देत होती.

अखेर आईनस्टाईनने सर्गेईला, म्हणजेच तिच्या पतीला एक पत्र लिहून त्याला मार्गारीटाला सरनाक तलावावर फिरायला पाठवावे असे सांगितले. येथेच आइन्स्टाईनची झोपडी होती. मार्गारीटा आजारी आहे आणि बरे होण्यासाठी तिला चांगल्या हवामानात वेळ घालवणे आवश्यक आहे असे सांगून त्याने बनावट डॉक्टरांचे प्रमाणपत्र त्या पत्राला जोडले. आईन्स्टाईनचे प्रयत्न कौतुक करण्याजोगेच होते, पण तिच्यासाठी ‘आजारपण’ हा “नोकरीचा” आणखी एक दिवस होता, हे कदाचित आईन्स्टाईनला माहित नसावे.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

कोनेन्कोवाचे खरे काम हे मॅन*हॅटन प्रकल्पाबद्दल सर्व काही जाणून घेणे हे होते. मॅन*हॅटन प्रोजेक्ट म्हणजेच अमेरिकेने पहिले अ*ण्वस्त्रे तयार करण्यासाठी केलेले संशोधन. मार्गारीटा आपल्या मोहिनीने प्रभावशाली पुरुषांना भुरळ घालण्यासाठी गुप्तहेर विश्वात प्रसिद्ध होती – यापूर्वी तिने रशियन संगीतकार सर्गेई रचमनिनोफ आणि प्रसिद्ध ऑपेरा गायक फियोडोर चालियापिन यांनाही अशाच प्रकारे भुरळ घातली होती.

अल्बर्ट आईनस्टाईन आणि रॉबर्ट ओपेनहाइमर या अ*णुबॉ*म्बच्या ‘जनकांपैकी’ एकाच्या जवळ जाऊन तिने प्रिन्सटन विद्यापीठाच्या विज्ञान वर्तुळात यशस्वीरित्या घुसखोरी केली. आईन्स्टाईनला अमेरिकेतील सोव्हिएत कॉन्सुलशी ओळख करून देण्यात कोनेन्कोवा यशस्वी झाली असली, तरी तिने त्याच्याकडून मौल्यवान माहिती मिळवली असण्याची शक्यता कमीच होती. कारण जरी अ*णुबॉ*म्बचा विकास करण्यासाठी त्याने राष्ट्राध्यक्षांकडे आग्रह धरला असला तरी तो थेट प्रमुख अ*णुप्रकल्पात काम करत नव्हता.

१९९८ साली कोनेन्कोवाच्या एका अज्ञात नातेवाईकाने सोथबीच्या लिलावगृहात ५६ पत्रांच्या या संग्रहाचा लिलाव केला नसता तर हे प्रकरण कायमचे गुप्त राहिले असते. १९४५ ते १९४६ दरम्यानची पत्रे, कोनेन्कोव्हचे कुटुंब सोव्हिएत युनियनमध्ये परतले त्या वर्षांची होती. या पत्रांतून आईन्स्टाईनला त्याची प्रेयसी एक गुप्तहेर असल्याचे माहित नसावे हे निष्पन्न होते.

तो तिच्याशी प्रेमळ स्वरात बोलतो, तिला “अल्मार” म्हणून संबोधतो. त्यांच्या दोन पहिल्या नावांच्या, अल्बर्ट आणि मार्गारीटावरून आलेल्या ‘पोर्टमॅन्टेउ’ शब्दाचा उल्लेख  (कदाचित जर्मन किंवा रशियन भाषेतील नाव) सतत त्या पत्रात येतो.

आइन्स्टाईनचे वैवाहिक जीवन आनंदी नव्हते. त्याचे पहिले लग्न अविश्वासामुळे घटस्फोट होऊन तुटले आणि मार्गारीटाला भेटल्यावर त्याची दुसरी पत्नी मरण पावली. मार्गारीटाच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच १९८० पर्यंत हेच आईन्स्टाईनचे शेवटचे प्रेम राहिले. कदाचित सर्वात प्रतिभाशाली माणसेही प्रेमासमोर कमकुवत होतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

न्यूझीलँड तर सगळ्यांना माहिती आहे, पण ओल्ड झीलँड कुठे आहे..?

Next Post

हिट*लरने जगातलं सगळ्यात मोठं सी व्ह्यू हॉटेल बांधलं होतं, जे तब्बल ७० वर्षांनी सुरु झालं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

हिट*लरने जगातलं सगळ्यात मोठं सी व्ह्यू हॉटेल बांधलं होतं, जे तब्बल ७० वर्षांनी सुरु झालं

भारतीय पुराणांत वर्णन केलेल्या चौसष्ठ कला कोणत्या आहेत..? जाणून घ्या..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.