The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेतलं चेर्नोबिल: युरेनियमच्या खाणी आणि नावाजो जमातीच्या समस्या

by द पोस्टमन टीम
21 January 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
Novajo Tribe featured Postman
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


दुसऱ्या महायु*द्धाच्या सुरुवातीनंतर अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्याचा इतिहास हा अमेरिकन सरकारच्या अतिरेकी आ*ण्विक महत्त्वाकांक्षेशी जोडला गेला.

अमेरिकेने केलेल्या पहिल्या अणुचाचणीनंतर इथे आ*ण्विक उर्जेशी निगडित संशोधनाच्या कार्याला गती मिळाली. १९५० साली येथे अणु ऊर्जेसाठी अत्यावश्यक अश्या युरेनियमचे साठे आढळून आले होते.

यानंतर इथे युरेनियमवर प्रक्रिया करून आ*ण्विक ऊर्जेच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणावर येथे चालना मिळाली. परंतु या सतत चालणाऱ्या अणुऊर्जा संशोधनाचा सरळ सरळ परिणाम न्यू मेक्सिकोत राहणाऱ्या ‘नावाजो’ जमातीच्या लोकांच्या आयुष्यावर झाला.

आजपर्यंत, न्यू मेक्सिको राज्य आणि नावाजो लोक अमेरिकन सरकारच्या पातकांची गंभीर शिक्षा भोगत आहेत.



तब्बल २० वर्षांपूर्वी अमेरिकन शासनाने कायदेशीररित्या युरेनियमच्या उत्खननावर बंदी घातली असली तरी आजदेखील नावाजो जमातीच्या महिला आणि मुलांमध्ये रेडियेशन्समुळे उद्भवणारे दुष्परिणाम आढळून येत आहेत.

एका अमेरिकन सरकार पुरस्कृत संस्थेने केलेल्या आभ्यासानुसार नावजो महिला आणि मुलांच्या शरीरात रेडियेशन इलेमेंटचे प्रमाण खूप जास्त आहे.

आभ्यासाचा सुरुवातीच्या टप्प्यात, ७८१ महिलांपैकी २६% महिलांच्या शरीरात अमेरिकेतील सर्वाधिक रेडियेशन्स बाधित लोकांच्या शरीराच्या तुलनेत रेडियेशन इलेमेंटचे प्रमाण अधिक होते.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

नावाजो बालकांच्या शरीरात देखील हेच प्रमाण असून, आयुष्याचा सुरुवातीच्या काही वर्षात ते या रेडियेशनच्या संपर्कात आलेले आहेत.

हे महत्त्वाचं सत्य उघडकीस आलं ते टॉम उडल नामक न्यू मेक्सिकोच्या सिनेट मेम्बरमुळे, त्याला तेथील रिप्रेझेंटेटिव्ह असलेल्या डेब हालँड आणि बेन रे लुजन यांचं समर्थन मिळालं.

हालँड ह्या तेथील नेटिव्ह अमेरिकन समुदायाच्या पहिल्या काही लोकप्रतिनिधींपैकी एक आहेत. त्यांनी स्थानिक लोकांच्या व आरोग्य अधिकारांच्या जबाण्या ऐकल्या नसत्या तर कदाचित कधीच हे गंभीर प्रकरण उजेडात येऊ शकलं नसतं.

न्यू मेक्सिको आणि अरिझोनाच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना याचे मोठ्या प्रमाणावर परिणाम भोगावे लागले आहेत. त्यांच्या मते अमेरिकन शासनाने त्यांच्यावर अन्याय केला आहे. अनेक लोकांना फुस्फुसांचा आजार झाला आहे. ते लोक आपला रोष व्यक्त करत आहेत.

इथल्या रिप्रेझेंटेटिव्ह हालँड यांच्या स्वतःच्या घरात देखील रेडियेशनग्रस्त रुग्ण आहेत. यावरूनच या एकूण प्रकरणाची दाहकता लक्षात आल्या वाचून राहत नाही.

त्यांच्या जमातीचं घर असलेल्या ‘लागुना पुएब्लो’ नामक स्थानावर जगातील सर्वात मोठी युरेनियमची खाण तयार करण्यात आली आणि तिथे खाण मजूर म्हणून या जमातीचे लोक काम करू लागले.

अमेरिकन शासनाने मागील काही वर्षात युरेनियमचे साठे असलेल्या खाणी नष्ट करण्याची प्रक्रिया आरंभली असून देखील व्हायचा तो परिणाम लोकांच्या आयुष्यावर झाला आहे.

नावाजो जमातीच्या सबंध भूभागावर या युरेनियम खाणींचा आणि त्यांचा रेडियेशन्सचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यांच्या पिढ्यानपिढ्या विविध आजारांनी ग्रासल्या आहेत.

नावाजो जमातीचे अस्तित्व हे अमेरिकेच्या न्यू मेक्सिको आणि अरिझोना प्रांताच्या विस्तृत भूभागावर विस्तारले असून त्यांची लोकसंख्या जवळजवळ अडीच लाख इतकी आहे.

युरेनियमच्या खाणींनी तब्बल २७००० चौरस किमीचा प्रदेश व्यापला असून या भागातील जमातीच्या अस्तित्वावर याचा दृश्य परिणाम काळानुरूप झाला आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या काळात असंख्य अमेरिकन कंपन्या या भागात उतरल्या बघता बघता तिथे खाणींचे साम्राज्य उभं राहिलं, मोठ्या प्रमाणात आ*ण्विक शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्यात आली.

या खाणींमध्ये काम करायला या नावाजो जमातीच्या व इतर नेटिव्ह अमेरिकन जमातीच्या लोकांना संधी प्रदान करण्यात आली आणि त्यांचा आयुष्यासोबत जुगार खेळण्यात आला.

शीतयु*द्ध संपेपर्यंत हा खेळ असाच सुरू होता. शस्त्र सज्जतेसाठी आणि अमर्याद ऊर्जेसाठी झपाटलेल्या अमेरिकेने अक्षरशः या साठ्यांचा अमर्याद वापर केला होता.

एकदाचं शीतयु*द्ध संपुष्टात आलं आणि या खाजगी अमेरिकन कंपन्यांनी या भागातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली. परंतु त्यांनी तब्बल ५०० खाणी खोदून जशाच्या तश्याच ठेवून माघार घेतली होती.

यामुळे १९९० साली शीतयु*द्ध संपल्यानंतर देखील तब्बल १० वर्ष नावाजो जमातीच्या लोकांवर या खणीतल्या रेडियेशन्सचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत राहिला.

१९९८ साली अमेरिकन शासनातर्फे या खाणी नष्ट करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. या प्रक्रिये अंतर्गत करण्यात आलेले काम देखील अपूर्णच राहिले असून अजूनही तिथल्या नावाजो लोकांच्या आयुष्यावर रेडियेशन्सचा परिणाम दिसूनच येतो आहे.

यामुळेच हे प्रकरण गंभीरपणे शासनाकडून बघितले जावे यासाठी तिथल्या स्थानिक रिप्रेझेंटेटिव्ह, सामाजिक संस्था, राष्ट्रीय आरोग्य संस्था, सरकारपुरस्कृत आभ्यास गट इत्यादींना पुढाकार घ्यावा लागला आहे परंतु अजून देखील तिथल्या लोकांचा लढा सुरूच आहे.

दोन देशातील अतिरेकी स्पर्धेमुळे आणि अमेरिकन शासनाच्या अतिमहत्त्वकांक्षी धोरणांमुळे आज नावाजो जमातीचे भविष्य काळवंडले आहे, हे मात्र नक्की!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

 

ShareTweet
Previous Post

फिलीपाईन्समधल्या ज्वालामुखीचा विस्फोट : एका भयानक संकटाची चाहूल?

Next Post

या इतिहासकाराने शिवरायांचे अस्सल चित्र जगासमोर आणले होते..

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

या इतिहासकाराने शिवरायांचे अस्सल चित्र जगासमोर आणले होते..

जर्मनीच्या एका शहरात दोन दिवसात हजार लोकांनी आत्मह*त्या केल्या होत्या

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.