The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या शास्त्रज्ञाच्या समुद्र सफारीमुळे सुटलं होतं ‘उत्क्रांती’चं कोडं

by द पोस्टमन टीम
11 February 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


उत्सुकता हा मानवी मनाचा स्वभावधर्म आहे. या उत्सुकतेचे बोट धरूनच माणसाने विश्वातील काही रहस्यांचा शोध लावला. काही अडचणींवर मात केली, काही संशोधन केले आणि माणूस आज या टप्प्यापर्यंत पोचला आहे जिथे त्याला परग्रहावरील हालचालींचे आणि घडामोडींचे ज्ञान मिळवणेही सहजसुलभ झाले आहे.

अगदी अश्मयुगापासून माणसाने याच कुतुहलाच्या जोरावर अनेकानेक प्रकारची प्रगती साधली.

या प्रगतीच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा होता. पृथ्वीवरील जैव उत्क्रांतीचा. ही पृथ्वी कधी निर्माण झाली, कशी निर्माण झाली, कुणी निर्माण केली इथून या उत्क्रांतीच्या प्रवासाला सुरुवात होते. यात सगळ्यात मोठी आणि मौलिक भर घातली ती चार्ल्स डार्विनने.

त्याच्या संशोधनाच्या आधारावरच आजही जैवशास्त्राचा डोलारा टिकून आहे. इतके मुलभूत काम डार्विनने त्याकाळात केले आहे. डार्विन एक निसर्गतज्ज्ञ होता. वयाच्या बाविसाव्या वर्षी त्याने निसर्गातील पशु पक्षी प्राणी यांच्या विविध प्रकारांचा अभ्यास करण्यासाठी जगभ्रमंतीला आरंभ केला.



अक्षरश: या अभ्यासासाठी डार्विनने एका जहाजातून सात समुद्र पार करत पृथ्वीप्रदिक्षिणा पूर्ण केली. त्याच्या या जगप्रवासाला तब्बल पाच वर्षांचा कालावधी लागला. या प्रवासात निसर्गातील कितीतरी विस्मयकारक चमत्कार डार्विनने अनुभवले. हा प्रवास म्हणजे डार्विनसाठी आयुष्याला कलाटणी देणारी एक अद्भुत घटना होती.

या प्रवासाचे फलित म्हणजे त्याचे “ओरिजिन ऑफ स्पीसीज्” हे पुस्तक. या पुस्तकाने डार्विनच्याच आयुष्याचीच नाही तर त्यानंतरच्या मानवी ज्ञान लालसेच्या प्रवासाचीच दिशा बदलून टाकली.

१८३१ साली म्हणजे वयाच्या बाविसाव्या वर्षी डार्विनला एका सर्वेशिप वरून जगभ्रमंतीची संधी मिळाली. या शिपचे नाव होते. एचएमएस बीगल. संपूर्ण जगाला प्रदिक्षिणा घालणारा हा प्रवासात त्याने पृथ्वीवरील सातही खंड पालथे घातले. या प्रवासाने डार्विनच्या जीवशास्त्र आणि भूशास्त्राच्या ज्ञानात मुलभूत भर घातली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

पृथ्वीवरील अनेक प्राणी आणि त्यांच्या असंख्य जाती याबाबतही त्याला काही मौलिक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावरच उत्क्रांतीचा सिद्धांत जन्मास आला.

या पाच वर्षाच्या प्रवासात डार्विनने अगणित नोंदी केल्या, त्याच्या या नोंदींनी आणि माहितीने कितीतरी वह्या भरल्या होत्या त्याची गिणतीही शक्य नव्हती. या संपूर्ण प्रवसात त्याने १,५०० हून अधिक जातींचे नमुने गोळा केले आणि ते तो घरी घेऊन आला.

या प्रवासात डार्विनने भूपृष्ठीय घडामोडींविषयी देखील बरीच माहिती गोळा केली. त्याने भूकंप, जमिनीची होणारी धूप आणि ज्वालामुखीचा उद्रेक याबाबतही अनेक महत्वपूर्ण नोंदी गोळा केल्या.

ज्या काळात समुद्र प्रवास हा उत्सुकतेचा आणि अत्यंत धोक्याचा अनुभव होता, तेव्हा एका छोट्या जहाजातून इंग्लंड ते दक्षिण अमेरिका, पॅसिफिक समुद्र आणि गालापॅगोज बेटे, व्हाया ऑस्ट्रेलिया, मॉरीशस आणि दक्षिण आफ्रिका असा प्रवास करणे म्हणजे काही चेष्टेची गोष्ट अजिबात नाही.

बीगल हे एक शाही जहाज होते ज्याची लांबी फक्त ९० फुट होती आणि तरीही फक्त पाच वर्षात या जहाजाने संपूर्ण जग पालथे घातले होते.

या जहाजावर ७४ व्यक्ती, सोबत असंख्य सोयीसुविधा आणि २२ घड्याळे होती. हे सर्व साठवण्यासाठी त्या जहाजावर एक अत्यंत छोटे क्वार्टर होते.

इंग्लंडमधून प्रवासाला सुरुवात केल्यावर जहाज आफ्रिकेच्या पश्चिमी किनाऱ्यावरील केप वर्डे आईसलँड येथे पोचले. तत्पूर्वी, अटलांटिक समुद्र पार करून ब्राझीलदेखील पालथा घातला होता.

त्यानंतर सध्याचे आर्जेन्टीना आणि फॉल्कलँड आईसलँड वरून केप हॉर्न त्यानतंर लॅटिन अमेरिकेचे दक्षिण टोक आणि लॅटिन अमेरिकेचे उत्तर टोक गाठण्यासाठी पॅसिफिक किनाऱ्यावरून ते गालापागोस आईसलँड येथे पोचले.

गालापागोस आईसलँड पासून सुरु झालेला परतीचा प्रवास पॅसिफिक समुदारावरून सिडनी, ऑस्ट्रेलिया, मॉरीशस त्यानंतर हिद महासागरावरून दक्षिण आफ्रिका येथे पोचला. बीगलने पुन्हा एकदा अटलांटिक समुद्र पार केला आणि मग ब्रिटनचा परतीचा प्रवास सुरु झाला. या सगळ्या प्रवासाला तब्बल पाच वर्षे लागली.

अगदी आजच्या काळातही इतक्या अंतराचा आणि इतक्या दिवसांचा समुद्र प्रवास हि निर्धोक बाब नाहीये. या प्रवासात बीगलने सर्वाधिक काळ घालवला तो, दक्षिणे कडील समुद्र किनाऱ्यावर, ज्याला आपण आर्जेन्टीना आणि चिली म्हणतो.

इथेच डार्विनने आपले बहुमोल संशोधन केले ज्याचा प्रभाव त्याच्या पुढील संशोधनावर आणि उत्क्रांतीच्या सिद्धांतावरही दिसून येतो.

ब्राझीलमध्ये डार्विनने घनदाट जंगलांचा आणि तिथल्या मुसळधार पावसाचा अनुभव घेतला. तिथून काही नमुने गोळा केले. नंतर अर्जेंटिना येथे आणि फॉल्कलँड आईसलँड येथे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक जीवाश्मांचा अभ्यास करता आला आणि भूशास्त्राविषयी देखील काही महत्वाचे संशोधनही इथेच करता आले.

त्यानंतर चिलीच्या किनाऱ्यावरून प्रवास करताना आणि अभ्यासादरम्यान डार्विनला चीलो आईसलँडचा शोध लागला. उत्तरेपासून दक्षिणे पर्यंत ११२ मैलाच्या प्रदेशात हे आईसलँड पसरलेले आहे.

दक्षिण अमेरिकेतील हे दुसरे मोठे आईसलँड आहे. चिलीचे भौगोलिक स्थान पाहता आणि त्याच्या किनाऱ्यावरील पर्वत रांगा पाहता चीलो दोन वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानात विभागलेला आहे.

पॅसिफिककडील बेटावर धुवांधार पाऊस आणि जोराचा वारा असतो. ज्यामुळे तेथील पर्यावरणात विविध वनस्पतीच्या असंख्य प्रजाती आढळतात. तर खंडाकडील बाजूकडील क्षेत्र हे डोंगररांगांनी वेढलेले असल्याने तेथील विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्म-हवामानाने शतकानुशतके स्थानिक जैवविविधता टिकवून ठेवली आहे.

याच प्रदेशात अभ्यास करत असताना डार्विनने माउंट ऑसोमो या ज्वालामुखीचा उद्रेक अनुभवला. या अनुभवाने त्याच्या पृथ्वीच्या रचनेविषयीच्या ज्ञानात मौलिक भर घातली.

१८३५ च्या सप्टेंबरमध्ये डार्विन गालापागोस आईसलँडवर पोचला. तेथील ज्वालामुखीय पर्वत आणि महाकाय कासव पाहून डार्विन आश्चर्यचकित झाला. अगदी या कासावांवर चढून त्याने प्रवास करण्याचाही प्रयत्न केला पण, त्यावर बसून तोल साधणे अशक्य असल्याचे त्याने नमूद करून ठेवले आहे.

गालापागोसमध्येच त्याने मॉकिंगबर्डचे काही नमुने गोळा केले आणि नंतर त्याने असे निरीक्षण नोंदवले की प्रत्येक बेटावरील पक्षी हे एकमेकाहून काहीसे भिन्न असले तरी, त्यांचा पूर्वज एकच होता पण उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या मार्गांनी गेल्या मुळे त्यांच्यात एकमेकाहून अलग असणारी वैशिष्ठ्ये निर्माण झाली.

१८३६ च्या मेमध्ये बीगल केप ऑफ गुड होप येथे पोचले. पुन्हा अटलांटिक समुद्रातून प्रवास करत जुलैमध्ये ते सेंट. हेलेना, येथे पोचले. इंग्लंडला परतण्यापूर्वी बीगलने पुन्हा एकदा दक्षिण अमेरिकी समुद्र किनाऱ्यावरून प्रवास केला.

२ ओक्टोंबर १८३६ मध्ये ते फॅलमाऊथ येथे पोचले. त्यानंतर इतर शास्त्रज्ञांच्या मदतीने डार्विनने आणलेल्या जीवाश्मांच्या आणि पक्ष्यांच्या जतन केलेल्या मृत अवशेषांच्या सहाय्याने प्राण्यांचे वर्गीकरण आणि त्यांची उत्पत्ती या विषयीचा सिद्धांत मांडण्याच्या कामाला सुरुवात केली.

एका वर्षात त्याने आपल्या या प्रवासानुभावाबद्दलच्या खूप गोष्टी, नोंदी आणि निरीक्षणे लिहून काढली. ज्याचे १८३९ ते १८४३ या काळात “द झुलॉजी ऑफ द व्हायोज ऑफ एच. एम. एस. बीगल” या नावाने पाच खंड प्रकाशित झाले.

त्यानंतर “द व्हायोज् ऑफ द बीगल” या नावाने डार्विनने आपले एक क्लासिकल पुस्तक प्रकाशित केले, ज्यात त्याची बौद्धिक चुणूक आणि विनोदी शैली जाणवते.

बीगलच्या प्रवासाला निघण्यापूर्वीच उत्क्रांतीच्या सिद्धांताविषयी डार्विनने काही मौलिक विचार व्यक्त केले होते. पण, या प्रवासाने त्याच्या या विचारांना पुष्टी दिली. तसेच हे विचार मांडण्यासाठी एक नवी दिशा देखील त्याला गवसली जी निरीक्षणे आणि तथ्यावर आधारलेली होती.

याच प्रवासातून त्याला उत्पत्तीशास्त्रांसंबंधी विचार करण्यास एक वैज्ञानिक दृष्टीकोन मिळाला. ज्यातून १८५९ साली त्याने “ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज” हा ग्रंथ प्रकाशित केला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Evolution
ShareTweet
Previous Post

भारतीय चित्रपटांवरील बंदीमुळे पाकिस्तानी चित्रपटगृहांना लागलेत भिकेचे डोहाळे

Next Post

अलेक्झांडर फ्लेमिंग नव्हे तर या शास्त्रज्ञाने पहिल्या अँटिबायोटिकचा शोध लावला होता…

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

अलेक्झांडर फ्लेमिंग नव्हे तर या शास्त्रज्ञाने पहिल्या अँटिबायोटिकचा शोध लावला होता...

चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या भयानक व्हायरसबद्दल जाणून घ्या

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.