आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जर्मनी म्हणलं की आपल्यासमोर उभ्या राहतात त्या दोन गोष्टी. पहिली म्हणजे “German made car.” आज कार जगतात जर्मनीचा एवढा दबदबा आहे की फक्त ‘जर्मन मेड’ एवढ्या गोष्टीवरच ती गाडी ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. स्पोर्ट्स, लक्झरी, स्वस्त या सगळ्या विभागांमध्ये जर्मन कार्सच आघाडीवर आहेत. BMW, AUDI, PORSCHE, MERCEDES, Apollo, Volkswagen इत्यादी सर्व आघाडीच्या कार उत्पादक कंपन्या जर्मनीस्थित आहेत.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते आजतागायत “कार्सचं माहेरघर” म्हणजे जर्मनी! जर्मनी कार उत्पादनामध्ये जगात प्रथम क्रमांकावर आहे. कार्स सोडल्यानंतर अजून एका गोष्टीसाठी जर्मनी (कु)प्रसिद्ध आहे, ती म्हणजे क्रू*र राज्यकर्ता, ना*झीवादाचा पुरस्कर्ता “ॲडॉल्फ हि*टल*र” याच्यासाठी. त्याने ज्यु लोकांची केलेली क*त्तल आणि अतोनात छळाबद्दल तर सगळयांना माहितीच आहे.
पण तुम्ही कधीतरी विचार केला आहे का की हि*टल*र आणि कार्स यांच खूप जवळचं नातं होतं. ते नातं एवढं जवळचं होतं की त्यामुळे आज जगातील सर्वात मोठी कार उत्पादन कंपनीचा जन्म झाला होता. होय! तुम्ही बरोबर वाचलं. हि*टल*रने पाहिलेल्या स्वप्नामुळे आजच्या घडीची आघाडीची कार कंपनी VW म्हणजेच फॉक्सवॅगेनची निर्मिती झाली होती.
हि*टल*र जेवढा ज्यु लोकांसाठी वाईट होता तेवढाच तो राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता होता. जर्मनी आणि जर्मन लोकांच्या भल्यासाठीत त्याने चांगली कामंसुद्धा केली आहेत. १९३० च्या आसपास जर्मनीमध्ये मर्सिडीज , BMW, ऑडी यांसारख्या कंपन्यांची चलती होती. पण या कंपन्या फक्त महागड्या कार्स बनवत. त्यांचा ग्राहक हा फक्त श्रीमंत माणूसच होता. गरीब माणसाला अशा कार्स फक्त पाहता यायच्या.
ही समाजातील दरी दूर करण्यासाठी हि*टल*रने १९३३ साली कारनिर्माता “फर्डिनांड पोर्श” याला “फॉक्सवॅगेन”ची (ज्याचा जर्मन अर्थ “लोकांची गाडी” असा होतो) निर्मिती करण्याचे आदेश दिले.
हि*टल*र जर्मनीवासीयांना अशी कार देऊ इच्छित होता जी स्वस्त असेल, टिकाऊ असेल आणि एक कुटुंब तिच्यातून प्रवास करू शकेल. पोर्शने याआधीसुद्धा मध्यमवर्गीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून १९३१ मध्ये एका कारची निर्मिती केली होती. ही गोष्ट लक्षात घेऊनच हि*टल*रने त्याला फॉक्सवॅगेनची निर्मिती करायला सांगितली होती.

हि*टल*रचा आदेश म्हटल्यावर दिवसरात्र एक करून फर्डिनांड या कारच्या निर्मितीसाठी कामाला लागला. या काळातच १९३७ साली ‘जर्मन लेबर फ्रंट’ने फॉक्सवैगेन कंपनीची निर्मिती केली. फर्डिनांड पोर्शचं “लोकांच्या कार”चं डिझाइन हि*टल*रने मंजूर केल्यानंतर १९३८ साली Wolfsburg मध्ये कार निर्मितीसाठी कारखाना टाकण्यात आला.
हि*टल*र हा किती उत्तम व्यावसायिक बुद्धी असलेला होता हे स्पष्ट करण्यासाठी एक किस्सा सांगतो, फक्त कार निर्मिती केली म्हणजे कार विकली जाईलच असं नव्हतं हे हि*टल*रला माहिती होतं. आपल्याला जर सामान्य लोकांना कार विकायची असेल तर ती त्यांच्या पद्धतीनेच विकली पाहिजे. फॉक्सवॅगेनने तयार केलेल्या कारची किंमत त्यावेळी होती ९९० Richsmarks (त्यावेळचे जर्मन चलन). बाकी कारच्या तुलनेत ही किंमत जरी कमी वाटत असली तरीसुद्धा सामान्य लोकांसाठी ती महागच होती.
कारखान्यात काम करणारे लोकं एकदम ही रक्कम भरू शकणार नव्हते, त्यासाठी हि*टल*रने एक बचत योजना आणली –
“Five marks a week put aside if in your own car you want to ride” (जर तुम्हाला हवी असेल स्वतःची गाडी, 5 मार्क्स बाजूला काढून ठेवा, दर आठवड्याला)
ही योजना म्हणजे आजच्या “EMI” सारखीच होती . ही योजना एवढी यशस्वी ठरली की ३,३६,००० लोकांनी या योजनेतून कार घेण्यासाठी बचत सुरू केली. लोकांना आकर्षित केल्यानंतर आता कारचं उत्पादन पूर्ण ताकदीने सुरू करायचं होतं. सप्टेंबर १९३९ मध्ये wolfsburg मधल्या कारखान्यात कारचं उत्पादन पूर्ण क्षमतेने चालू होईल हे ध्येय कंपनीने ठेवलं होतं.
सगळं सुरळीत चालू असतानाच नेमकी माशी शिंकली. सप्टेंबर १९३९ मध्ये महायु*द्ध सुरू झाले. त्यामुळे ज्याठिकाणी कार बनवली जाणार होती तिथे आता यु*द्धासाठी लागणारे लष्करी वाहने तयार केली जाऊ लागली. १९४३ पर्यंत या कारखान्यात १२,००० यु*द्धकैदी काम करत होते. त्यांचं मुख्य काम होतं विमाने नीट करणे आणि ब्रिटनला उडवण्यासाठी लागणाऱ्या बॉ*म्बचे रॉकेट्स तयार करणे.
एवढं सगळं होत असतानासुद्धा त्यांनी फॉक्सवॅगेन कंपनीची “बीटल” ही कार तयार केली. पण महायु*द्धात झालेल्या हवाई ह*ल्ल्याने कंपनीचं खूप नुकसान झालं. त्यामुळे कंपनीला कारचं उत्पादन थांबवावं लागलं. बीटल तयार करण्यासाठी लागणारे सगळे सुट्टे भाग आणि उपकरणे त्यावेळी भूमिगत बंकरमध्ये लपवण्यात आले.
१९४५ मध्ये अमेरिकी सैन्याने जर्मनी वर ह*ल्ला करून जर्मनीला नेस्तनाबूत केले आणि त्यांनी फॉक्सवैगेनचा कारखाना ब्रिटनकडे सुपूर्द केला. त्यावेळी कंपनी जास्त प्रसिद्ध नव्हती म्हणूनच की काय ब्रिटनकडून उ*ध्वस्त होता होता ही कंपनी वाचली .
१९४८ मध्ये फॉक्सवॅगेनचं रूपांतर ट्रस्टमध्ये केलं गेलं आणि तिचं नियंत्रण मग पश्चिम जर्मनीकडे हस्तांतरित करण्यात आलं. याच काळात त्यांनी type 2 van , karmann ghiya sports कारची निर्मिती केली. हळूहळू आता कंपनी नावारूपास येत होती. १९४९ मध्ये कंपनीने त्यांची ओळख – “बीटल” कार अमेरिकेत प्रदर्शित केली आणि विक्रीला सुरुवात केली.

पण पहिल्या वर्षी फक्त २ कार विकल्या गेल्या. विचार करा फक्त २ कार. म्हणजे ही कार बंद केली पाहिजे असंच आपल्या डोक्यात आलं असतं. पण जर्मन मुळी आहेतच हट्टी. त्यांनी तरी ह्या कारची विक्री चालूच ठेवली. हळूहळू आता २ चे २०० आणि २००० झाले होते. १९५५ साली Volkswagen group of America यांनी रणनीती बदलली आणि अतिशय नियोजित विक्री आणि सेवा यांच्यावर काम सुरू केलं. आता अमेरिकेत एकदमच टाइप 1 बीटलचे उत्पादन १० लाखापर्यंत पोहोचले होते.
आता बीटलच्या रूपाने फॉक्सवॅगेनने हातपाय पसरायला सुरुवात केली होती. १९५९ साली अमेरिकी जाहिरात निर्माता “Doyle Dane Bernbach” याच्या डोक्यातून एक कल्पना बाहेर आली. “Think small” या जाहिरात मोहिमेमार्फत त्यांनी आता तरुण आणि सुसंस्कृत लोकांना आकर्षित करायला सुरुवात केली आणि ही जाहिरात एवढी यशस्वी ठरली की आता बीटल ही सगळ्यांचीच आवडती कार झाली होती.
बीटलची लोकप्रियता एवढी वाढली होती की, डिस्नेने बीटल ही गाडी मुख्यपात्र घेऊन अॅनिमेशन चित्रपट तयार केला. बीटलच्या मदतीने आता फॉक्सवॅगेन जगातील सगळ्यात मोठ्या कंपनीपैकी एक म्हणून गणली जाऊ लागली. १९६९ साली कंपनीने “audi” कंपनी खरेदी करून आता luxurious कार्स क्षेत्रातसुद्धा पदार्पण केलं होतं.
दिवसेंदिवस फॉक्सवॅगेन यशाचे एक एक शिखर पार करत होती. १९७२ साली तर कंपनीने कहरच केला होता. एकेकाळी अमेरिकी सैन्याने यु*द्धात पकडलेल्या कंपनीने आज अमेरिका स्थित Ford कंपनीच्या नाकावर टिच्चून बीटलची सर्वाधिक उत्पादित गाडी म्हणून विक्रम केला.
७० च्या दशकात फोर्डची “मॉडेल T” ही सर्वाधिक उत्पादित गाडी होती, पण १९७२ साली फक्त अमेरिकेत फॉक्सवॅगेनने १,५०,०७,०३४ गाड्यांची निर्मिती केली होती. बीटलने मार्केटमध्ये नाव मिळून दिलेल्या कंपनीने नंतर Golf, Jetta, Passat अशा लोकप्रिय गाड्यांची निर्मिती केली.

पहिल्या वर्षी फक्त 2 गाड्यांची विक्री करणारी कंपनी आज जगातील प्रथम क्रमांकाची कार उत्पादन करणारी कंपनी आहे. आज वाहन जगतातील ७ मोठे ब्रँड्स फॉक्सवॅगेनच्या मालकीचे आहेत:
1. Skoda
2. Lamborghini
3. Audi
4. Porsche
5. Bentley
6. Bugatti
7. Ducati
कोणी विचारही केला नसेल की एकेकाळी बंद होण्याच्या मार्गावर असलेली कंपनी जगातील प्रथम क्रमांकाची वाहन कंपनी बनेल म्हणून. आज खऱ्या अर्थाने “फॉक्सवॅगेन” “लोकांची गाडी” बनली आहे. स्वस्त गाड्यांपासून ते सगळ्यात महागड्या गाड्यांपर्यंत, प्रवासी गाड्यांपासून ते मोठ्या मोठ्या ट्रक्सपर्यंत आणि लक्सरी गाड्यांपासून ते स्पोर्ट्स गाड्यापर्यंत. सगळ्या क्षेत्रांमध्ये आज फॉक्सवॅगेन मोठ्या दिमाखात मिरवतीये .
हि*टल*र म्हणाला होता ते आज खरं झालंय ” लोकांना परवडणारी फॉक्सवॅगेन सर्वसामान्य लोकांना नक्कीच एके दिवशी खूप आनंद देईल.”
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









