The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अवघ्या १६व्या वर्षी कचऱ्यापासून ड्रोन बनवणारा ‘ड्रोन बॉय’

by द पोस्टमन टीम
14 April 2021
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


कर्नाटकाच्या मांड्या जिल्ह्यात राहणाऱ्या प्रताप नावाच्या मुलाचं आयुष्य एका रात्रीमध्ये पालटलं आणि त्याला निमित्त ठरलं डिसेंबर २०१७ साली जपानमध्ये झालेलं आंतरराष्ट्रीय रोबोट प्रदर्शन. या मुलाने त्या प्रदर्शनात एका भंगार जमा करून तयार केलेलं एक ड्रोन प्रदर्शनासाठी ठेवलं होतं.

या ड्रोनच्या माध्यमातून आपत्तीग्रस्त भागातील संकटात आडकलेल्या लोकांचा शोध घेणे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे शक्य होणार आहे.

प्रतापने आजवर खूप संघर्ष केला आहे. त्याच्याकडे बघितल्यावर कोणाला पुसटशी जाणीव देखील होणार नाही की हा मुलगा एकेकाळी बसस्टँडवर झोपायचा, मैलोनमैल लांब असलेल्या शिकवणीसाठी चालत जायचा आणि एवढंच नाही तर, त्याने आपल्या प्रोजेक्टसाठी निधी उभा करता यावा म्हणून कित्येक रात्री उपाशी काढल्या आहेत.

असंख्य वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जाऊ शकता अशा ६०० ड्रोन्सची निर्मिती या मुलाने केली असून तो लोकांमध्ये ड्रोन सायंटिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे.

आज त्याच्याकडे अनेक गुणपत्र आहेत, प्रशस्तीपत्र आहेत, अनेक आंतरराष्ट्रीय संस्था त्या मुलाला आपल्याकडे  येऊन काम करायला सांगत आहेत. एका अत्यंत साधारण कुटुंबातुन आलेल्या प्रतापने आपल्या घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आपलं हे स्वप्न पूर्ण केलं आहे.



एका शेतकरी कुटुंबाबत जन्माला आलेल्या प्रतापने आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून शेतात काम करायला सुरुवात केली.

यासाठी ती रोज शेतात जाऊन आपल्या वडिलांना मदत करत होता. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्याचा हाती मेहनत घेण्यावाचून कुठलाच पर्याय नव्हता. सर्वकाही व्यवस्थित चालू होतं आणि एक दिवस प्रतापने टीव्हीवर आकाशात भिरभिरणारे ड्रोन बघितले.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

लहानपणापासून आकाशात उडणाऱ्या घारी बघून मनात देखील आकाशात उंच भरारी घेण्याची इच्छा जागृत व्हायची.

जेव्हा त्याने ड्रोन बघितले त्यावेळी तो दहावीत होता, ज्या गावात तो रहायचा त्याठिकाणी त्याला इंटरनेटचा ऍक्सेस मिळत नव्हता ना त्याचाकडे कुठल्याही प्रकारचा स्मार्टफोन होता, त्यामुळे त्याच्याकडे सायबर कॅफेशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता.

गावातील एका सायबर कॅफेत त्याने नोकरी पत्करली, याची पुसटशी कल्पना देखील त्याचा आईवडिलांना नव्हती. काम करताना त्याला रोज ४५ मिनिटांसाठी इंटरनेट वापरण्याची परवानगी मिळायची. तिथे काम करताना प्रतापला ड्रोनच्या निर्मितीची प्राथमिक कल्पना इंटरनेटच्या माध्यमातून मिळाली. पण त्याच्यासमोर मुख्य समस्या होती ती पैशाची, ज्यावर त्याच्याकडे कुठलंच उत्तर नव्हतं.

ड्रोनच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक असलेल्या वायर, मोटर आणि मदरबोर्ड या अत्यंत महत्त्वाच्या भागांच्या खरेदीसाठी पैसे नसल्याने प्रतापने आपला मोर्चा इलेक्ट्रॉनिक कचऱ्यांकडे वळवला.

फेकून आलेल्या भंगार इलेक्टिकल वस्तू गोळा करायला सुरुवात केली. त्याने जमा केलेल्या सर्व वस्तू आणि विविध उपकरणांच्या निर्मितीच्या अनुभवाच्या बळावर आपल्या गावातून मोठ्या शहरात जाण्याचा निर्णय घेतला. त्याने म्हैसूरच्या जेएसएस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली.

घरातून निघताना त्याच्या वडिलांनी त्याच्या हातावर फक्त ८००० रुपये ठेवले होते, तेवढ्या पैशात त्याने आपली कॉलेजची फी भरली आणि एका ठिकाणी शिकवणी घेऊन तो आपला खर्च भागवू लागला.

याच पैशातून तो ड्रोनच्या निर्मितीसाठी आवश्यक त्या वस्तूंची खरेदी करायला सुरुवात केली. या वस्तुंच्या नादात बऱ्याचदा रुमचे भाडे द्यायचे राहून जायचे, यामुळे एकदा त्याची घरातून हाकलपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी बसस्टँडवर झोपून त्याने दिवस काढले होते.

१६ वर्षांचा असताना त्याने पहिला ड्रोन तयार केला होता. 

यासाठी त्याने ५० वेळा ट्रायल अँड एरर बेसिसवर त्या ड्रोनला उडवून बघितलं होतं. त्याचं हे ड्रोन आकाशात १००० मीटरपर्यंत उडाले होते. एयरोडायनॅमिक्स आणि इंजिनियरिंगचं कुठलंच शिक्षण त्याचा पाठीशी नव्हतं.

त्याने फक्त उपलब्ध पर्याय आणि सामान्य ज्ञानाचा वापर करून त्याने उड्डाणनियंत्रक ड्रोनच्या समोरील बाजूस बसवणे, गुरुत्वाकर्षणाचा बिंदू व्यवस्थित ठेवणे आणि आपल्या ड्रोनच्या वेगवेगळ्या अवयवात समतोल साधने या साधारण समस्यांवर त्याने मात केली.

आपल्या कॉलेजातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरवात केली. त्याने देशभरात अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवल्यानंतर त्याला जपानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोट स्पर्धेत यश प्राप्त केले. त्याला जपानला जाण्याची संधी तर मिळाली पण एक नवीन समस्या उभी राहिली की त्याच्या या जपान दौऱ्याचा खर्च उचलेल?

या प्रसंगी त्याची आईपुढे धावून आली, त्याचा आईने आपले दागिने मोडले आणि त्याला पैसे दिले.

आपली ३०० किलोचा ड्रोन आणि जोडीला दोन कपडे घेऊन २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये प्रताप जपानची राजधानी टोकियोमध्ये उतरला. तिथून त्याला २५ मिनिटाच्या अंतरावर असलेल्या गंतव्य स्थळी पोहचायचे होते. हा त्याचा पहिलाच परदेश प्रवास होता.

तिथल्या बोचऱ्या थंडीने आणि गर्दीने तो आधी बिथरला पण आपल्या तोडक्या इंग्रजीच्या बळावर त्याने एयरपोर्टच्या बाहेरचा मार्ग शोधला. त्याने विमानतळावर असलेल्या कर्मचाऱ्यांची विचारपूस केली की त्याला त्या स्पर्धेला जायचं आहे, कसं जायचं याची त्याला कल्पना नव्हती. त्यावेळी त्याचा खिशात फक्त पंधराशे रुपये होते.

त्याने अखेरीस रेल्वेच्या मदतीने गंतव्य स्थळ गाठले आणि त्याठिकाणाहून एयरपोर्टवर चार चकरा मारून आपलं सर्व सामान त्याने आणलं. त्या स्पर्धेसाठी १२० देशातील मुलं आली होती. ती मुलं अत्यंत सुंदर इंग्रजी बोलत होती. परंतु त्या वातारणात देखील तो डगमगला नाही.

दुसऱ्या दिवशी त्याने त्या प्रदर्शनातील सात वेगवेगळ्या फेऱ्यात आपल्या ड्रोनचे सादरीकरण केले.

यात ड्रोनच्या विविध बाजू मांडण्याचा प्रयत्न त्याने केला, कचऱ्यातून ड्रोनच्या निर्मितीची प्रक्रिया त्या लोकांना दाखवली.

ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २० जणांना गोल्ड मेडलची घोषणा करण्यात आली,  यात कुठलीही अपेक्षा नसताना प्रतापच्या नावाचा समावेश करण्यात आल्याने, त्याचा आनंदाला पारावर उरला नाही. त्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारतात परतल्यावर त्याच्याकडे बघणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन पालटला होता. ज्या लोकांनी आधी त्याला नावं ठेवली तेच आज त्याचं कौतुक करत होते.

त्याने आता भरारी घेतली होती आणि त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. जर्मनीतल्या एका रोबोटिक्स स्पर्धेत त्याने मोठ यश कमावलं. सलग दोन वर्ष त्याने ८७ देशात आपल्या ड्रोनच्या मॉडेलचं सादरीकरण केलं असून अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली आहे.

आज त्या स्पर्धातून मिळालेल्या पैशाच्या बळावर त्याने बंगलोरमध्ये आपली स्वतःची ड्रोन अँड एयरोस्पेस रिसर्च लॅब उभारली आहे.

त्याच्या मनात देशासाठी काही करण्याची उर्मी असून यामुळे त्याने अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या नोकरीला नाकारले आहे. डॉ. कलाम हे त्याचे आदर्श असून त्यांनी वाईट काळात प्रेरणा दिल्याचं तो नेहमी सांगतो.

कर्नाटकच्या भीषण पुरात लोकांना मदत करायला त्याने ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून पोलीस व आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना जीवनावश्यक सामग्रीचा पुरवठा करायला मदत केली होती, यामुळे त्याचा सत्कार देखील करण्यात आला होता.

प्रताप हा एक अत्यंत होतकरू आणि देशभक्तीने ओतप्रोत भरलेला वैज्ञानिक आहे, तो भविष्यात नक्कीच देशाला मोठी मदत करणार असल्याचं मत त्याच्या प्राध्यापकांनी व्यक्त केलं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: DroneDrone ManInnovationPratap NMTechnology
ShareTweet
Previous Post

‘कोरोना’चा धोका असूनही पाकिस्तान आपल्या नागरिकांना चीनमधून परत का बोलावत नाही?

Next Post

घरच्या जेवणाचं एटीएम!- अख्ख्या शहराच्या जेवणाची गरज भागवतंय हे स्टार्ट-अप

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

घरच्या जेवणाचं एटीएम!- अख्ख्या शहराच्या जेवणाची गरज भागवतंय हे स्टार्ट-अप

आधीच्या सरकारवरचा रोष म्हणून जर्मनीने हि*टल*रला निवडून दिले तीच त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.