The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केवळ युक्तीच्या जोरावर लिओ मेजरनं या शहराला ना*झींपासून वाचवलं होतं..!

by Heramb
3 April 2025
in इतिहास, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


लिओ मेजर. दुसऱ्या महायु*द्धात पराक्रम गाजवणारा एक सैनिक. जगाच्या इतिहासात घडलेल्या दोन महायु*द्धांना सुमारे ७ दशकांहून अधिक काळ झाला आहे. एवढा मोठा काळ लोटला असला तरी या यु*द्धांमधील बऱ्याच जखमा आजही ताज्या आहेत. दुसऱ्या महायु*द्धांत अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांबद्दल आजही अनेक लोक गौरवोद्गार काढतात. हि*टल*र आणि मुसोलिनीला धूळ चारण्याच्या प्रयत्नांत अनेक देशांनी योगदान दिलं. यामध्ये युरोपातील एकही देश मागे राहिलेला नाही, यामध्ये नेदरलँड्सचा देखील समावेश होतो.

दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात नेदरलँड्सवर ना*झींचे वर्चस्व होते. नेदर्लंड्समधील झ्वोले शहरात देखील मोठ्या प्रमाणात ना*झी सैन्य होते. या सैन्याचा पराभव करण्यात मोठा वाटा होता तो एका फ्रेंच-कॅनडियन सैनिकाचा. त्याचे नाव होते लिओ मेजर. लिओ मेजर हे फ्रेंच-कॅनडियन नागरिक होते, त्यांनी दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात कॅनेडियन सैन्यात काम केले. एप्रिल १९४५ मध्ये यु*द्ध संपुष्टात येत असताना, हे मेजर रेजिमेंट ‘दे ला चौडिएर’मध्ये होते. या रेजिमेंटवर झ्वोले शहर ना*झींच्या वर्चस्वातून सोडवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

१३ एप्रिल, १९४५ रोजी मेजर आपला जिवलग मित्र कॉर्पोरल विली आर्सेनॉल्टसह झ्वोले शहरात रेकोनिसन्स मिशनवर होते. रेकोनिसन्स म्हणजे शत्रूच्या ठिकाणाबद्दल माहिती गोळा करणे. पण या मिशन दरम्यान लिओ मेजर यांचा ज्युनिअर आणि जिवलग मित्र आर्सेनॉल्टला जर्मन सैनिकांनी ठा*र केले. आपल्या मित्राच्या मृ*त्यूमुळे संतप्त झालेल्या मेजरने ही परिस्थिती आपल्या नियंत्रणाखाली आणायची ठरवली.

केवळ स्टेन ग*न आणि ग्रे*नेड्स घेतलेल्या लिओ मेजरने झ्वोले येथे जर्मन सैन्यावर एकट्याने ह*ल्ला करण्यास सुरुवात केली. गोळी*बार नेमका कोणत्या दिशेने होत आहे कोणालाही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने तो शहरावरील रस्त्यांवरून गोळी*बार करीत होता, त्यामुळे ना*झी सैन्यामध्ये प्रचंड भीती आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या दरम्यान त्यांनी अनेक ना*झी सैनिकांना पकडले आणि काहींनी आत्मसमर्पण केले.

रात्रभर मेजरने आपले मिशन चालू ठेवले, जर्मन उपकरणे उ*ध्वस्त केली, वाहने नष्ट केली. यामुळे झ्वोले शहराच्या मुक्तीचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या शौर्याने तसेच दृढनिश्चयाने त्यांना आपल्या युनिटमध्ये तसेच मोठ्या प्रमाणात सन्मान प्राप्त झाला. झ्वोल्लेमध्ये गाजवलेल्या पराक्रमासाठी  त्यांना डिस्टिंग्विश्ड कंडक्ट मेडल प्रदान करण्यात आले, हा सन्मान प्राप्त करणाऱ्या मोजक्या कॅनेडियन सैनिकांपैकी ते एक बनले.



१९२१ साली मॅसॅच्यूसेट्स येथे जन्मलेल्या लिओ मेजरचे बालपण मॉण्टरीलमध्ये गेले. त्यांच्या जन्मानंतर एकाच वर्षात त्यांच्या कुटुंबाने कॅनडा येथे स्थलांतर केले. १९३० साली त्यांना शिकाऊ प्लमर म्हणून काम मिळाले. १० वर्षांनंतर, अर्थात १९४० साली, काही कारणाने त्यांची नोकरी गेली आणि त्यांनी कॅनडियन सैन्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. १९४४ पर्यंत त्यांचे प्रशिक्षण सुरु होते.

फेब्रुवारी १९४५ मध्ये आपल्या तुकडीबरोबर कॅम्पवर परत जात असताना त्यांच्या ट्रकचा एका खाणीवर मोठा स्फो*ट झाला. यात त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. या अपघातात इतर सर्व प्रवासी ठा*र झाले. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर ते रणांगणावर परतले. १३ एप्रिल १९४५ रोजी लिओ आणि त्याचा मित्र कॉर्पोरल विली आर्सेनॉल्ट यांनी यु*द्धात काम करण्याची तयारी दर्शवली. मध्यरात्री ते दोघे जर्मन सैन्याच्या ताब्यात असलेल्या झ्वोले शहराच्या बाहेरील भागात गेले. कॉर्पोरल आर्सेनॉल्टला गोळी लागली. आपल्या मित्राचा सूड उगवण्याचा निश्चय करून, लिओने ना*झी-व्याप्त शहरावर एकट्यानेच ह*ल्ला केला. त्याच्याकडे ग्रे*नेड आणि स्टेन*गन एवढीच ह*त्यारे होती.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

एका बारमध्ये त्याने काही जर्मन अधिकारी बसलेले पहिले. तिथे फ्रेंच भाषा बोलणारे उच्चपदस्थ अधिकारी देखील होते. झ्वोले शहराला कॅनडियन सैन्याने वेढले असून तुम्ही आपल्या मित्रांना आणि सैन्याला घेऊन लवकरात लवकर इथून निसटा असा सल्ला त्याने फ्रेंच भाषा बोलणाऱ्या उच्चपदस्थांना दिला, आणि त्यांनीही लिओचा सल्ला ऐकून पलायन केले. लिओ एवढ्यावरच शांत बसला नाही तर त्याने संपूर्ण शहरात गोळी*बार केला. त्याने गेस्टापो मुख्यालयाला देखील आग लावली आणि जर्मन सैन्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

मेजरच्या या धाडसी आणि धोरणात्मक पावलांनी झ्वोले येथून जर्मन सैन्य माघारी फिरण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले, शेवटी मित्र राष्ट्रांच्या या वन-मॅन आर्मीने शहराच्या मुक्तीमध्ये मोठे योगदान दिले. त्याच्या या शौर्याने व प्रसंगावधानतेने मित्र राष्ट्रांना विजय मिळवून दिला होता. १४ एप्रिल १९४५ रोजी सकाळी संपूर्ण शहराने लिओ मेजरचे आभार मानले.

लिओच्या या पराक्रमामुळे याच दिवशी ना*झींच्या तोफमाऱ्यापासून होणारा वि*नाश टळला होता. यु*द्धानंतर सामान्य जीवनात परत आल्यावर, लिओने पुन्हा प्लमर म्हणून काम सुरु केले. त्याच्या एका डोळ्याला दुखापत झाली होती आणि दृष्टी देखील कमी झाली होती तरी लिओने ऑगस्ट १९५० मध्ये कोरियन यु*द्धासाठी स्वेच्छेने काम केले.

१४ एप्रिल २००५ रोजी या घटनेच्या ६०व्या वर्धापनदिनानिमित्त लिओ मेजर यांना झ्वोले शहराचे मानद नागरिक बनवण्यात आले. त्यांच्या नावावर त्या शहरात एक रस्ता देखील आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: कॅनडाझ्वोलेदुसरे महायु*द्धनेदर्लंड्सलिओ मेजर
ShareTweet
Previous Post

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

Next Post

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
Next Post

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

जहाज चालवण्यासाठी आता तेलाच्या ऐवजी पवनऊर्जेचा वापर होत आहे..!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.