The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘पिंजऱ्यातल्या गोरीलाला ठोसा मारू दे’ म्हणून माईक टायसनने झु अधिकाऱ्याला लाच ऑफर केली होती

by द पोस्टमन टीम
15 March 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


माईक टायसन, हे नाव तुम्हाला चांगलंच माहीत असेल. बॉक्सिंग आवडत असो किंवा नसो, माईक टायसनचं नाव नक्कीच प्रत्येकानं कधीनाकधी ऐकलेलं असेल. त्याच्या रिंगमधील फाईट्स जगप्रसिद्ध आहेत. त्याला जगातील सर्वांत धोकादायक आणि क्रू*र बॉक्सर म्हटलं जातं. रिंगमध्ये प्रवेश केल्यानंतर माईक टायसननं एकदा समोरच्या प्लेयरला मारण्यास सुरवात केली की, त्याची खैर नसे.

समोरच्या खेळाडूला झालेली दुखापत किती गंभीर आहे, याबाबत टायसन कधीही विचार करत नसे. रिंगमध्ये उतरल्यानंतर टायसनचं लक्ष नेहमीच विजयाकडं असायचं. टायसनबद्दल असं म्हटलं जातं की, तो शक्य तितक्या लवकर खेळ संपवण्याचा प्रयत्न करायचा. एक प्रोफेशनल बॉक्सर म्हणून माईक टायसन जितका प्रसिद्ध होतात तितकाच त्याच्या विचित्र वागणुकीमुळं देखील तो चर्चेत असायचा.

एखाद्या हॉलिवुड मुव्हीतील प्लेबॉय कॅरेक्टरलाही लाज वाटेल, अशा करामती टायसननं आपल्या आयुष्यात केलेल्या आहेत. त्याबाबत जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा…

बॉक्सिंग रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या माईकनं एकदा गोरिल्लाशीदेखील फाईट करण्याचा प्रयत्न केला होता! टायसननं एकदा न्यूयॉर्कमधील प्राणिसंग्रहालयातील सिल्व्हरबॅक गोरिल्लाशी लढण्यासाठी १० हजार डॉलर्स देऊ केले होते. 

ही घटना ८०च्या दशकात घडली होती. त्यावेळी टायसन एक अनबिटेबल हेवीवेट चॅम्पियन होता आणि त्याला या ग्रहावरील सर्वात धोकादायक लढवय्या म्हणून ओळखलं होतं. टायसन आणि त्याची तत्कालीन गर्लफ्रेंड, रॉबिन गिव्हन्स एका प्राणीसंग्रहालयात गेले होते.



शांतपणे प्राणी पाहता यावेत म्हणून ‘आयर्न माईक’नं संपूर्ण प्राणीसंग्रहालयच बूक केलं होतं. तिथे सिल्व्हरबॅक गोरिल्ला इतर लहान गोरिलांना धमकावत असल्याचं टायसनच्या निदर्शनास आलं. त्याला वठणीवर आणण्याची खुमखुमी टायसनच्या मनात आली अन् त्यानं प्राणीसंग्रहालयातील एका कामगाराला पैसे देऊन पिंजरा उघडण्यास सांगितला. मात्र, सुदैवानं त्या व्यक्तीनं असं करण्यास नकार दिला. नाहीतर टायसन त्या सिल्व्हरबॅक गोरिल्लाला धडा शिकवण्यास तयारच बसला होता.

आता तुमच्यापैकी काहींना प्रश्न पडला असेल, जर प्राणीसंग्रहालयातील कामगारानं खरंच पिंजरा उघडला असता तर काय झालं असतं? गोरील्लासमोर टायसनचा टिकाव लागला असता का? अहो, जी व्यक्ती प्रॅक्टिससाठी चक्क वाघ पाळत होती तिच्यासमोर गोरील्ला काय चीझ होती?!! माईक टायसनकडं स्वत:चे तीन पाळीव वाघ होते. तो त्यांच्यासोबत कुस्तीही खेळत असे.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

त्याला प्राण्यांची फारच आवड होती. त्यानं आपल्या घरामध्ये तीन वाघ पाळले होते. तो कायम त्यांच्यासोबतच राहत असे. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्यानं आपलं वाघप्रेम जाहीरपणे सांगितलंही होतं.

माईककडे ‘केनिया’ नावाची एक वाघिण होती. त्याला तिच्याबद्दल खूप आपुलकी होती. तो तिच्यासोबत झोपत असे, खेळत असे. जवळपास १६ वर्षे केनिया त्याच्याकडे होती. नंतर ती म्हातारी झाली. तिचे डोळे खराब झाले. शिवाय, तिनं एकदा एका महिलेचा हात तोडण्याचाही प्रयत्न केला. म्हणून शेवटी टायसननं तिला सोडून देण्याचा निर्णय घेतला.

३० जून १९६६ रोजी अमेरिकेत जन्मलेला माईक टायसन १९८५ ते २००५ या काळात प्रोफेशनल बॉक्सर म्हणून बॉक्सिंग खेळला. वयाच्या २०व्या वर्षी टायसननं हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियनशीप जिंकली होती. असं करणारा तो जगातील सर्वांत तरुण बॉक्सर आहे. जेव्हा माईक टायसननं हेवीवेट चॅम्पियनशीप जिंकली तेव्हा तो फक्त २० वर्षे ४ महिने आणि २२ दिवसांचा होता.

जर तुम्ही माईक टायसनचा रेकॉर्ड बघितला तर तुम्हाला दिसेल की त्याने फक्त नॉकआउटमध्येच १९ वेळा व्यावसायिक लढत संपवली आहे. वयाच्या १८व्या वर्षी तो पहिल्यांदा प्रोफेशन बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरला होता. माईक टायसनच्या समोर हेक्टर मर्सिडीज होता. जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा दोन मिनिटांपेक्षा कमी वेळातच सामना टायसनच्या बाजूनं जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं.

हेक्टर मर्सिडीज माईक टायसनच्या माऱ्याला तोंड देऊ शकला नाही. ही बॉक्सिंग फाईट केवळ एक मिनिट ४७ सेकंदांत संपली होती. त्यानं त्याच्या बॉक्सिंग कारकिर्दीत एकूण ५८ फाईट्स खेळल्या, त्यापैकी ५० लढती जिंकण्यात तो यशस्वी झाला आणि सहामध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. या ५८ फाईट्सपैकी ४४ वेळा त्यानं नॉकआउट राउंडमध्येच विजय मिळवलेले आहेत.

माईक टायसन आणि वाद यांचं सुरुवातीपासूनच एकदम घट्ट नातं होतं. जन्मानंतर काही दिवसांनी त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं. त्यामुळं सुरुवातीपासूनच त्याला समाजकंटकांच्या सानिध्यात रहावं लागलं. त्याचं बालपण संघर्षांनी भरलेलं होतं.

जीवन जगण्याची लढाई तर त्यानं लहानपणापासूनच सुरुवात केली होती. कदाचित याच लढ्यामुळं तो इतका भक्कम बनला होता की समोरचं खेळाडू त्याच्यासमोर टिकूच शकत नव्हते. मारामारी जणू त्याच्या रक्तातच होती. तो कधीच रक्ताला घाबरत नसे. समोरच्या माणसाला जनावरासारखं मारणं हे त्याचे मुख्य उद्दिष्ट असायचं.

१९८२ नंतरची काही वर्षे त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ राहिली. तेव्हा माईक टायसनवर बला*त्काराचा गुन्हा दाखल झाला आणि त्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. शिक्षा पूर्ण केल्यानंतर टायसन रिंगमध्ये परतला.

एकदा त्याला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आणि मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल २४ तासांच्या तुरुंगवासाची, व ३६० तासांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

बॉक्सिंग दिग्गज असलेल्या टायसननं अगदी टोड वेनोमनं देखील नशा केली होती. एका मुलाखतीत त्यानं स्वत: ‘टोड वेनम’ घेतल्याचा खुलासा केला होता. ‘टोड वेनम’ म्हणजे विषारी बेडकांचं विष असतं. या विषामुळं आपण अधिक सर्जनशील झालो, असा दावा टायसननं केला होता.

जेव्हा टायसनला बेडकाच्या विषाबाबत माहिती मिळाली तेव्हा त्याचं वजन १०० पौंडांपेक्षा जास्त होते. तो दारू आणि ड्र*ग्जच्या प्रभावाखाली होता. त्याच्या एका मित्रानं त्याला टोड वेनम वापरून पाहण्याचा सल्ला दिला होता. त्यानं आतापर्यंत ५३ वेळा टोड वेनोमची ट्रिप घेतली आहे. टायसननं अनेक सायकेडेलिक औषधांना पाठिंबा दिला आहे. यामुळं देखील काही लोक त्याच्यावर नाराज झाले होते.

आपल्या वैयक्तिक आयुष्यात माईक टायसन अगदी एखाद्या राक्षसाप्रमाणं क्रू*र होता. मात्र, बॉक्सिंग रिंगमधील त्याच्या कर्तृत्वाला आव्हान देण्याची हिंमत कुणामध्येही नव्हती, ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जयपूरमधील टेकड्यांमध्ये वसलेला हा ‘गलता’ कुंड कधीही आटत नाही!

Next Post

टेस्लाच्या सेल्फड्राइव्ह कारने कोणाला धडक दिली तर त्या अपघाताची जबाबदारी कोणाची?

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

टेस्लाच्या सेल्फड्राइव्ह कारने कोणाला धडक दिली तर त्या अपघाताची जबाबदारी कोणाची?

या पेयांमुळे शरीरातील जळजळ वाढू शकते, त्यामुळे सांभाळूनच!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.