आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आपत्ती नैसर्गिक असो की मानवी, स्थानिक लोकांना परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जात आहे असे वाटते तेव्हा पहिली आठवण होते ती, लष्कराच्या मदतीची. आपल्या जीवाची बाजी लावून दुसऱ्याचे प्राण वाचवण्याची हिंमत फक्त सैनिकच दाखवू शकतात. सैनिक मग ते कुठल्याही देशाचे का असेनात आपल्या जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावर आहे याचा त्यांना क्षणभरही विसर पडत नाही. इतरांच्या सुरक्षेसाठी धडपडणाऱ्या जवानांवरच जेव्हा यमाची धाड पडते तेव्हा संपूर्ण देशालाच शोक अनावर होतो.
असाच एकदा लिबियाच्या बेंगाझी शहरात विकास प्रकल्पांची बोलणी करण्यासाठी गेलेल्या अमेरिकन राजदूत क्रिस्टोफर स्टीवन्स आणि दूतावासातील अधिकारी सीन स्मिथ यांना मारण्यासाठी करण्यात आलेल्या द*हश*तवादी ह*ल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकी सैनिकांनी जे धैर्य दाखवले ते वाखाणण्याजोगे आहे.
९ सप्टेंबर २०१२ रोजी अमेरिकेचे राजदूत क्रिस्टोफर स्टीवन्स आणि परराष्ट्र विभागाचे अधिकारी सीन स्मिथ हे लिबियाच्या बेंगाझी शहरात उतरले. लिबियातील फुटीरतावादी गटाशी चर्चा करणाऱ्या गटाचे नेतृत्व क्रिस्टोफर स्टीवन्स यांच्याकडे सोपवण्यात आले होते. यावेळी स्टीवन्स लिबियामध्ये आधुनिक सुख-सोयींनी सज्ज असे हॉस्पिटल बांधण्याविषयी सरकारशी देखील चर्चा करणार होते. या दरम्यान त्यांच्या राहण्याची व्यवस्था बेंगाझी शहरातील सेफ हेवन या एका बंदिस्त आणि सुरक्षित इमारतीत करण्यात आली होती.
लिबियाचा नेता मोहम्मद गद्दाफी याची ऑक्टोबर २०११ मध्येच ह*त्या करण्यात आली होती. तेव्हापासून लिबियातील वातावरण अस्थिर होते. या पार्श्वभूमीवर लिबियातील अमेरिकी अधिकाऱ्यांनी राजदूत स्टीवन्स आणि सीन स्मिथ यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. कारण कैरोतील अमेरिकन दूतावासासमोर झालेली हिं*सक निदर्शनाची घटना अगदी ताजी होती. अमेरिकी अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबतच्या सूचना दिल्या होत्या तरीही त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले.
११ सप्टेंबरच्या रात्री नऊ वाजता, त्या इमारतीच्या बाहेर अल-शरिया या द*हश*तवादी संघटनेचे अतिरेकी एकेक करत सेफ हिवन इमारती बाहेर जमू लागले. इमारतीच्या सीसीटीव्हीत अतिरेक्यांची हालचाल दिसत होती. अवघ्या चाळीस मिनिटात अल शरीया संघटनेचे शेकडो अतिरेकी या इमारतीच्या बाहेर जमा झाले.
या अतिरेक्यांनी इमारतीच्या कंपाउंडवर ग्रेनेड फेकण्यास सुरुवात केली. कंपाऊंड खिळखिळे झाल्यावर त्यांनी इमारतीच्या आत प्रवेश केला. आत जात असतानाही त्यांचा गोळी*बार सुरूच होता.
लिबियाच्या सैन्यातील काही सैनिक आत तैनात होते ज्यांच्यावर सेफ हिवन आणि अमेरिकेचे राजदूत क्रिस्टोफर स्टीवन्स यांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. लिबियाच्या सैनिकांनाही या द*हश*तवाद्यांनी ठार केले. त्यांना आता क्रिस्टोफर यांचा शोध घायचा होता. क्रिस्टोफरना मारणे हाच या ह*ल्ल्याचा मुख्य हेतू होता.
द*हश*तवादी इमारतीत शिरले असले तरी त्यांना क्रिस्टोफर स्टीवन्स यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. अचानक झालेल्या या ह*ल्ल्याने क्रिस्टोफर, स्मिथ आणि त्यांचा सुरक्षा एजंट स्ट्रीकलँड देखील घाबरून गेले. द*हश*तवाद्यांना राजदूत क्रिस्टोफर यांना मरायचेच होते. क्रिस्टोफर यांनी कशीबशी सीआयएच्या हेडक्वार्टरला ह*ल्ल्याची बातमी कळवली.
क्रिस्टोफर यांच्या खोलीचा दरवाजा तोडणे शक्य नाही, हे लक्षात आल्यावर द*हश*तवाद्यांनी संपूर्ण इमारतीलाच आग लावून टाकली. स्मिथ आणि स्ट्रीकलँड यांचा धुरात कोंडल्याने जागीच मृत्यू झाला. एनएक्स सुरक्षा टीम तत्काळ राजदूत क्रिस्टोफर यांच्या मदतीसाठी जाण्यास सरसावली पण सीआयए एनएक्सच्या प्रमुखांनी त्यांना या मिशनवर जाण्याची परवानगीच दिली नाही.
इकडे सेफ हीवनला आग लागली होती. एनएक्स टीमचे कॅप्टन टाइरॉन वूड्स यांनी आपल्या साथीदारांसह या इमारतीत जाण्याचा निर्णय घेतला तरीही त्याच्या प्रमुखांनी याही वेळी नकार दिला. पण प्रमुखांच्या या नकाराला न जुमानता टाइरॉन वूड्स आगीने लपेटलेल्या सेफ हेवनमध्ये घुसलेच. त्यांनी क्रिस्टोफर स्टीवन्स यांचा शोध घेतला पण ते त्या इमारतीत कुठेच सापडले नाहीत. स्मिथचा तर गुदमरून तिथेच मृत्यू झाला होता. ते पुन्हा सेफ हेवनमधून अॅनेक्स बिल्डींगकडे आले.
या इमारतीतही ३५ अमेरिकी अधिकारी होते, त्यामुळे द*हश*तवादी आता या इमारतीवर ह*ल्ला करणार असा त्यांचा अंदाज होता. अॅनेक्स हेडक्वार्टरमधील या अमेरिकी नागरिकांना सुरक्षित राखणे हेच या टीमचे ध्येय होते. त्यांचा अंदाज अगदी बरोबर होता. पुढच्या काही तासातच द*हश*तवाद्यांनी अॅनेक्स हेडक्वार्टरवर ह*ल्ला केला.
कॅप्टन टाइरॉन वूड्स यांच्या एनएक्स टीममध्ये फक्त आठ अमेरिकन सैनिक होते. ह*ल्ला करण्यासाठी जमलेल्या द*हशत*वाद्यांची संख्या यांच्यापेक्षा खूपच जास्त होती. तरीही या आठ जणांनी हिंमत न हरता द*हशत*वाद्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. जवळपास तेरा तास या आठ सैनिकांनी द*हश*तवाद्यांना रोखून धरले होते.
पहाटे ३.३०च्या दरम्यान सीआयएची एक तुकडी त्यांच्या मदतीसाठी पोहोचली. द*हश*तवाद्यांनी या टीमवर मोटार फायरिंग सुरु केली या ह*ल्ल्यात टीममधील अनेक सैनिक जखमी झाले तर काही सैनिक मृत्युमुखी पडले.
तरीही द*हश*तवाद्यांनी हार मानली नव्हती. त्यांचा गोळी*बार सुरूच होता. अमेरिकेने दबाव आणल्यानंतर लिबियाचे लष्कर अमेरिकन सैनिकांच्या मदतीसाठी पोहोचले. त्यानंतर लिबियाच्या लष्कराला या द*हश*तवाद्यांना संपवण्यात यश आले, पण त्यांच्यासाठीही ही लढाई साधी नव्हती. द*हश*तवाद्यांचा खात्मा केल्यानंतर अॅनेक्स हेडक्वार्टरमधील सगळ्या अमेरिकन नागरिकांना सुरक्षितरित्या विमानतळावर पोहोचवण्यात आले.
सगळे सुरक्षित बाहेर पडले. द*हश*तवाद्यांचीही राखरांगोळी झाली होती. अमेरिकी राजदूत क्रिस्टोफर स्टीवन्स यांचा मात्र कुठेच पत्ता नव्हता. ते गायब झाले होते. त्यांचा मृतदेहही सेफ हिवनमध्ये सापडला नव्हता. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्नही सुरूच होते. यानंतर काही दिवसांनी लिबियातील एका रुग्णालयात त्यांचे शव आढळून आले. त्याच्या शवावर जखमांचे इतके व्रण होते की सुरुवातीला त्यांना ओळखणेही कठीण गेले. ते शव रुग्णालयात कसे आले? कुणी पोचवले? याचाही काही थांगपत्ता लागला नाही.
त्यांचे शव पाहून असे वाटत होते की मारून टाकण्यापूर्वी त्यांना भरपूर त्रास देण्यात आला असावा. पण त्यांना कुठे नेले गेले आणि त्यांना कुणी मारले हे मात्र शेवटपर्यंत कळले नाही. क्रिस्टोफर यांच्या ह*त्येने अमेरिकेला जबरदस्त हादरा बसला होता. या घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता अमेरिकेने त्यांचे पोस्टमार्टमचे रिपोर्टही जाहीर केले नाहीत.
तब्बल तेरा तास आठ सैनिकांनी शेकडोंच्या संख्येने आलेल्या द*हश*तवाद्यांना रोखण्यात मिळवलेले यश अभूतपूर्व होते. या थरारक नाट्यमय घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. मिचेल जेकॉफ यांनी या घटनेवर आधारित ‘थर्टिन अवर्स’ नावाची कादंबरी देखील लिहिली ज्यामध्ये या घटनेतील सगळ्या तपशिलांचे नाट्यमय वर्णन करण्यात आले आहे. हॉलीवूडमध्ये या घटनेवर अधारीत ‘थर्टिन अवर्स’ नावाने एक चित्रपटही बनवण्यात आला. ज्यामध्ये सगळ्या घटनेचा अगदी वास्तव चित्रण दाखवण्याचा प्रयत्न केला गेला.
एनएक्सच्या प्रमुखांनी त्यांच्या टीमला वेळेवर जाण्याची परवानगी दिली असती तर कदाचित क्रिस्टोफर यांचे प्राण वाचू शकले असते. लिबियातील सुरक्षा अधिकाऱ्यांनी क्रिस्टोफर यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती, त्याकडेही अमेरिकन सैन्याने दुर्लक्ष केले. या सगळ्या गोष्टी क्रिस्टोफर यांच्या ह*त्येचे गूढ आणखीनच वाढवतात.
क्रिस्टोफर यांना वाचवण्यात यश मिळाले नसले तरी त्या आठ जिगरबाज सैनिकांनी उरलेल्या ३५ अमेरिकन नागरिकांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. या सैनिकांच्या शौर्याचा प्रत्येक अमेरिकन नागरिकाला अभिमान वाटत होता. अशा जिगरबाज सैनिकांमुळे सामान्य नागरिकांना शांततेने जगण्याची हमी मिळते. या सैनिकांच्या बहाद्दुरीचे कौतुक करावे तितके थोडेच!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










