The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियाचा शोध लावणाऱ्या कॅप्टन जेम्स कुकचा समुद्रसफारीवरच मृत्यू झाला होता.

by द पोस्टमन टीम
13 February 2025
in इतिहास, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आज आपण पृथ्वीला बघू शकतो, पण एकेकाळी ही पृथ्वी कशी आहे हेच लोकांना माहिती नव्हते. त्यावेळी लोकांना असे वाटायचे की दूर लांब क्षितीजावर आकाश पृथ्वीवर टेकते. पृथ्वी गोल नाहीतर ती सपाट आहे, असे लोकांना वाटायचे. पण कालांतराने जसजशी विज्ञानाची रहस्ये उलगडत गेली, तशी लोकांच्या मनातील पृथ्वीची कल्पना देखील बदलत गेली.

विज्ञानाइतकीच महत्त्वपूर्ण भूमिका यात अथांग सागरात एका टोकाहून दुसऱ्या टोकाचा शोध घेणाऱ्या समुद्री खलाशांनी देखील बजावली होती. त्याकाळी कोलंबससारखा संशोधक नवीन भूभागाचा शोध घेत होता, तर वास्को-द-गामा भारताचा शोध घेत होता.

कॅप्टन जेम्स कुक हा देखील अशाच संशोधकांपैकी एक होता. यॉर्कशायरच्या मार्टर या छोट्या शहरातील एका शेतकऱ्याच्या पोटी त्याचा जन्म झाला.

कॅप्टन जेम्स कुकने त्याच्या आयुष्यात ३ महत्त्वपूर्ण सागर सफारी केल्या. ज्यात त्याने प्रशांत महासागरातील बेटांवर राहणाऱ्या लोकांविषयी माहिती गोळा केली आणि त्यांच्याविषयी एक अभूतपूर्व माहिती जगाला उपलब्ध करून दिली.

कॅप्टन जेम्स कुकने १७५५ साली ब्रिटनच्या रॉयल नेव्हीमध्ये प्रवेश केला. एक संशोधक खलाशी बनण्यासाठी त्याने गणित आणि खगोलशास्त्राचे व्यावहारिक प्रशिक्षण घेतले. अठराव्या शतकातील सर्वोत्तम खलाशी म्हणून कॅप्टन जेम्स कुकचा गौरव करण्यात आला होता.



२७ ऑक्टोबर १७२८ रोजी यॉर्कशायरच्या मार्टन नावाच्या छोट्याशा गावात एका साधारण शेतकऱ्याचा घरी कॅप्टन जेम्स कुकचा जन्म झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्याने एका दुकानात काम करायला सुरुवात केली. जेम्स कुकला समुद्रात पोहायची प्रचंड आवड होती. कदाचित त्याची ही आवडच पुढे त्याला समुद्र सफरीवर घेऊन गेली.

कुकने एका कोळशाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर नोकरी पकडली, याठिकाणी त्याला समुद्राच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. १७ वर्षांच्या वयात त्याच्या सागरी कारकिर्दीची सुरुवात एका व्यापारी जहाजावर प्रशिक्षणार्थी म्हणून सुरु झाली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

वयाच्या अठराव्या वर्षी तो आपल्या पहिल्या सागरयात्रेसाठी निघाला आणि इथेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

इथूनच त्याने बाल्टिक आणि आसपासच्या सागरी किनाऱ्यावर काम करण्यास सुरवात केली. १० वर्षांत त्याने नॅव्हिगेशनच्या कलेत प्राविण्य मिळवले. तिथेच त्याने कॅप्टन बनण्याची तयारी केली. १७५५ मध्ये नौकायन सोडून रॉयल नेव्हीमध्ये नाविकांची नोकरी मिळवली. यावेळी जेम्स कुकचे वय केवळ २६ वर्ष होते. या वयात त्याने ब्रिटिश यु*द्धनौकेवर काम करण्यास सुरुवात केली व दोन वर्षांच्या कालावधीतच रॉयल नेव्हीकडून त्याला एका जहाजाचा मालक बनवण्यात आले.

कॅप्टन जेम्स कुक १७६८ साली आपल्या पहिल्या समुद्रयात्रेवर निघाला. एचएम बार्क एन्ड्युव्हर या जहाजात १०० सदस्यांना सोबत घेऊन त्याने आपल्या यात्रेला सुरुवात केली. त्याची ही यात्रा म्हणायला वैज्ञानिक कारणासाठी होती, पण यामागे जेम्स कुकचे काही गुप्त लष्करी अजेंडे होते.

कुकला जे आदेश देण्यात आले होते, त्यानुसार त्याने दक्षिण महाद्वीपाच्या दिशेने यात्रा सुरु केली. पण दक्षिणेत त्याला कुठलाच महाद्वीप सापडला नाही, त्यामुळे त्याने पश्चिमेकडे आपला मोर्चा वळवला. याठिकाणी त्याने न्यूझीलंडच्या बेटाला प्रदक्षिणा घातली व यानंतर आपला ताफा ऑस्ट्रेलियाला नेला.

ऑस्ट्रेलियाला जात असताना त्याचे जहाज ग्रेट बॅरियर रीफ या कोरल संरचनेवरून जाते आहे याची त्याला पुसटशीसुद्धा कल्पना नव्हती.

आणि अचानक एका रिफला जहाज धडकले. जहाजात पाणी भरायला सुरुवात झाली. ११ जून १७७० रोजी हे जहाज अडकले होते. हे जहाज वाचवण्यासाठी त्यांना २० तास संघर्ष करावा लागला तर दुरुस्ती करायला तब्बल तीन महिने लागले होते.

१७७२ ते १७७५च्या दरम्यान कॅप्टन जेम्स कुक हा दुसऱ्यांदा प्रशांत महासागराच्या यात्रेवर निघाला होता. मागच्या यात्रेत ज्या गोष्टींचा शोध घेता आला नव्हता, त्यांचा शोध लावण्याचा जेम्स कुकचा उद्देश होता. आपल्या तीन वर्षांच्या शोधयात्रेत जेम्स कुकने दक्षिण अमेरिकेची सफर केली. त्याने दक्षिण ध्रुवाकडे कूच केली, अंटार्टिकावर तो दक्षिण ध्रुवाच्या फार जवळ जाऊन पोहचला.

याच काळात त्याने तहिती आणि न्यूझीलंड द्वीपाला पुन्हा भेट दिली होती. यानंतर त्याने ईस्टर द्वीप, मार्केस द्वीपसमूह, टोंगा आणि न्यू हेब्रिडस या भागांना भेट दिली. पण त्याच्या आधी इतर देशातील नाविकांनी या भागांची सफर केली होती. त्यामुळे दुसऱ्या यात्रेत त्याच्या हातात विशेष असं काही आलं नाही.

असं असलं तरी त्याच्या या यात्रेने त्या भागांतील अनेक पैलूंचा उलगडा होण्यास मदत झाली. त्याने दक्षिणी प्रशांत महासागरातील आधुनिक मानचित्र उपलब्ध करून दिले.

१७६० मध्ये उत्तर अमेरिकेत फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये यु*द्ध सुरु होते, त्यावेळी कॅप्टन जेम्स कुकने सेंट लॉरेन्स नदीचा नकाशा तयार केला होता.

कॅनडाजवळच्या न्यू फाऊंडलॅंडचा नकाशा देखील त्यानेच तयार केला होता. त्याने त्यावेळी तयार केलेली मानचित्रे आणि नकाशे विसाव्या शतकात देखील उपयुक्त सिद्ध झाले होते.

त्याने त्याकाळातील नॅव्हीगेटर्सच्या तुलनेत जास्त क्षेत्रांचा शोध घेतला होता आणि मानचित्रावर त्याचे आरेखन देखील केले होते.

एकवेळ अशी होती की अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि स्पेनच्या दरम्यान यु*द्ध सुरु होते. त्यावेळी देखील एक अग्रणी शोधकर्ता म्हणून कुकचा मोठा सन्मान केला जात होता. त्याला कधीच परदेश यात्रा करण्यापासून रोखण्यात आले नाही.

वयाच्या ४७व्या वर्षी १७७६ मध्ये कॅप्टन जेम्स कुक आपल्या तिसऱ्या यात्रेवर निघाला, यावेळी तो नॉर्थ वेस्टर्न रूटच्या शोधात निघाला होता. अर्धा रस्ता ओलांडल्यावर त्याचे जहाज कॅनडाच्या पश्चिमेला अलास्काच्या द्वीपावर येऊन पोहचले. त्याने तिथून आर्क्टिकच्या दिशेने प्रवास सुरु केला.

कुक या मार्गावर ५० मैल पुढे आपले जहाज घेऊन आले तोच वातावरणात अचानक बदल झाला, थंडीची लाट आली, यामुळे कुकचा सगळाच क्रू गारठला होता. त्यांच्या कॅप्टनमध्ये जहाज चालवण्याची ताकद उरली नव्हती. जेम्स कुक तरीदेखील पुढे जाण्यास सांगत होते, यामुळे कॅप्टन आणि क्रूमध्ये असंतोषाचा भडका उडाला.

अखेरीस त्यांच्या दबावामुळे जेम्स कुकने जहाज दक्षिणकडे वळवले. जेम्स कुकचा या यात्रेदरम्यानच मृत्यू झाला. ज्या समुद्रावर जेम्सने लहानपणापासून प्रेम केले त्याच समुद्रात त्याचा मृत्यू झाला!

कुकच्या या प्रचंड संशोधन कार्यासाठी नासाने त्याचा गौरव करत आपल्या स्पेस शटलला ‘कुक’चे नाव दिले होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

पाब्लो एस्कोबारचा मृत्यू नेमका कसा झाला, याबद्दल अजूनही लोकांमध्ये एकमत नाही आहे.

Next Post

या आहेत जगातील सर्वात प्राचीन भाषा!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
Next Post

या आहेत जगातील सर्वात प्राचीन भाषा!

फ्रेंच फ्राईजचा हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.