The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगातली पहिली अंतराळवीर एक रस्त्यावरची भटकी कुत्री होती

by द पोस्टमन टीम
29 October 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


३ नोव्हेंबर १९५७ या दिवशी सोव्हिएत युनियन (रशिया) यांनी ‘स्पुटनिक २’चे त्याच्या कक्षेमध्ये यशस्वी प्रक्षेपण केले. ‘स्पुटनिक २’ लवकरच ‘स्पुटनिक १’च्या जागी स्थिर झालं, ज्या ‘स्पुटनिक १’मुळे जवळपास सगळच जग चिंतेत होतं. पण ‘स्पुटनिक २’ त्यापेक्षा जरा वेगळा उपग्रह होता जो स्वतःसोबत आतमध्ये एक जिवंत प्रवासी घेऊन प्रक्षेपित झाला होता.

या दिवशी इतिहासात, सूक्ष्मजीवांपेक्षा मोठा असा एक पहिला सजीव पृथ्वीच्या कक्षेत पाठवला गेला होता. ‘लायका’, या कुत्रीमुळे पृथ्वीवरील सजीव अवकाश प्रक्षेपणात, अवकाशात जगू शकेल हे सिद्ध होणार होतं. या घटनेपूर्वी हा एक विवादित प्रश्न होता.

लायका

अवकाशात पाठवला जाणारा पहिला सजीव, लायका हा मॉस्कोच्या रस्त्यावरून उचलून आणलेला एक कुत्री होती. भटके प्राणी हे बऱ्याच वेगवेगळ्या कारणांसाठी सोव्हिएत संशोधकांच्या प्रयोगासाठी फार चांगल्या प्रकारे उपयुक्त होते. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांमध्ये कुठल्याही परिस्थितीत जगण्याची प्रवृत्ती असते, खडतर वातावरणात जगणे, जास्त काळ काही खायला नाही मिळालं तर भूक मारून जगण्याची वृत्तीही निर्माण झालेली असते.

लायका तिच्या छोट्या आकारामुळे, स्वभावासाठी, मैत्रीपूर्ण स्वभावामुळे निवडली गेली. जेव्हा लायकाला एका यंत्रामध्ये बसवून अवकाशात प्रक्षेपित केलं गेलं, ज्यातून सर्व संशोधक तिच्या सर्व चाचण्या पृथ्वीवर, प्रक्षेपणादरम्यान आणि अवकाशात घेऊ शकले तेव्हा खऱ्या अर्थाने लायकाने त्या दिवशी इतिहास रचला.

अवकाशात जाणारा पहिला सजीव असल्यामुळे सर्वच प्रकारे, तिची केली गेलेली रचना अगदी ठीकठाक होती, कारण तिला त्याच कारणास्तव पाठवलं गेलं होतं.



‘नासाच्या लेखी’

‘स्पुटनिक २’ ने तिला झोपण्यासाठी किंवा उभे राहण्यास पुरेशी जागा ठेवली होती आणि अगदी व्यवस्थित बांधलेलंही होतं. हवेवर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या उपकरणाद्वारे पुरेशा ऑक्सिजनचाही पुरवठाही ठेवला होता. जिलेटीनने पॅक केलेलं खाद्य आणि पाणीही उपलब्ध होतं. लायकाला शरीरातील विष्ठा बाहेर टाकण्यासाठी एक पिशवीही लावली होती आणि त्यात दिसून येणाऱ्या बदलांच्या परीक्षणासाठी इलेक्ट्रोड जोडले होते.

सुरवातीला प्रक्षेपणाच्या काळात खाण्यापिण्यात लायकाने नखरे केले पण नंतर तिने व्यवस्थित खाणं सुरू केलं. तरीही दुर्दैवाने ती जास्त काळ जगू शकली नाही.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

‘लायकाचा मृत्यू’

सुरवातीला सोव्हिएतकडून नोंदवले गेले की पहिले काही आठवडे मस्तपैकी जेवण करत, तिला दिलेल्या जागी, लायका मजेत राहत होती. नंतर पुढे आलं की अवकाशात गेल्यानंतर काही तासातच लायकाचा मृत्यू झाला. यानाच्या अचानक वाढलेल्या तापमानामुळे ती ‘ओव्हरहीट’ झाली, ‘स्पुटनिक २’च्या उच्च दाबाने बंदिस्त असलेल्या केबिनमधील वाढलेलं तापमान ती सहन करू शकली नाही.

लायकाच्या मृत शरीराने पाच महिन्यात २७,००० वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा मारल्या. जेव्हा त्या यानाच्या कक्षेचा कार्यकाळ संपला तेव्हा, मृत लायकाच्या त्या यानासोबत जळून अस्थी झाल्या.

अगदी हेतुपूर्वक अवकाशात पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावण्यासाठी पाठवलेला लायका हा पहिला सजीव होता. अवकाश संशोधनातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता. एक सजीव प्राणी पृथ्वीबाहेरील वातावरणात जिवंत राहू शकतो का नाही हे याने सिद्ध होणार होतं.

खरंतर अमेरिकेने माकडासारखे प्राणी अवकाशात पाठवून चाचण्या घेण्याची योजना अगदी दुसऱ्या महायु*द्धानंतर लवकरच आखली होती पण शेवटी सोव्हिएत संघाने यात बाजी मारून आपल्या यानातून पहिला पृथ्वीच्या कक्षेत राहू शकेल असा सजीव अवकाशात पाठवला. लायका ‘सोव्हिएत स्पेसफ्लाइट चाचणी’त मेलेल्या पाच कुत्र्यांपैकी एक ठरली.

मॉस्को येथील लायकाचे स्मारक

लायकाच्या ऐतिहासिक अवकाश प्रवासानंतर ४ वर्षांनी १९६१ अमेरिकेने अवकाश चाचण्यांसाठी २ जिवंत माकडांना अवकाशात पाठवून त्यांना सुखरूप पृथ्वीवर आणलं.

पुढच्या काळात अगदी दहा वर्षांनंतर मनुष्य चंद्राच्या भूमीवर चालत होता, पण हे शक्य झालं ते त्या एका अवकाश भरारीमुळे ज्यात मॉस्कोतल्या त्या एका भटक्या कुत्रीला मानवी भविष्यासाठी हौतात्म्य पत्करावं लागलं.

लायकाचे स्मारक रशियातल्या स्टार सिटी येथील कॉस्मोनॉट प्रशिक्षण केंद्रामध्ये पुतळ्याद्वारे करण्यात आले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

Explainer – मनसुख हिरेन, सचिन वाझे, परमवीर सिंह. समजून घ्या संपूर्ण प्रकरण!

Next Post

या वकिलाने फ्रांसमध्ये राज्यक्रांती घडवून आणली आणि पुढे स्वतःच गिलोटिनवर गेला

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

या वकिलाने फ्रांसमध्ये राज्यक्रांती घडवून आणली आणि पुढे स्वतःच गिलोटिनवर गेला

ज्या ख्वाजा युनुस प्रकरणावरून सचिन वझे निलंबित झाले होते ते नेमकं काय होतं..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.